अंतरी अनामिक ओढ
सखीला सख्यासाठी वाटे
दुराव्यामुळे फुटतात
नात्याला विचित्र काटे
सखीला सख्यासाठी वाटे
दुराव्यामुळे फुटतात
नात्याला विचित्र काटे
कितीही काळजी घेऊनही
अतूट बंधन होते सैल
चालावे लागे विचाराने
प्रयत्न वाटेचे मैल
अतूट बंधन होते सैल
चालावे लागे विचाराने
प्रयत्न वाटेचे मैल
प्रेमाच्या वसंताला
का ग्रीष्माचा मिळे श्राप ?
कधीच मोजले नाही
प्रीतीच्या स्वप्नांचे माप
का ग्रीष्माचा मिळे श्राप ?
कधीच मोजले नाही
प्रीतीच्या स्वप्नांचे माप
सखीसम सख्याने एक पाऊल
पुढे चालण्यासाठी टाकावे
कधीतरी असमंजस सखीसाठी
थोडेतरी नात्यासाठी वाकावे
पुढे चालण्यासाठी टाकावे
कधीतरी असमंजस सखीसाठी
थोडेतरी नात्यासाठी वाकावे
© विद्या कुंभार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा