डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-१४
मागील भागात:-
श्याम विचारात पडला आणि पुढे निघाला.
"काय नाव ठेवू तुझं? " तो डोकं खाजवतं पुटपुटला.
ती केसांची एक बट डोळ्यांपुढे घेत ते बघत चालू लागली.
आता पुढे:-
तेवढ्यात श्यामचे लक्ष तेथून दिसणाऱ्या देवीच्या मंदिराकडे गेले. त्याचे ओठ रूंदावले.
तो देवीच्या मंदिराकडे बोट करून म्हणाला,"ते बघ.. ते देवीचे मंदिर दिसते ना? त्या देवीच्या नावावरून तुझे नाव ठरवू. मी तुला तीन नावे सुचवतो. तुला जे नाव आवडेल तेच ठेवू या. चालेल."
त्याने तिच्याकडे पाहिले.
ती दोन वेण्या धरून हसत म्हणाली,"चालेल."
"अम्म..अंबिका, तुळजा आणि दुर्गा.. यातील तुला कोणते आवडले?" त्याने विचारले.
ती प्रत्येक बोटावर एकेक नाव मोजत उच्चारू लागली.."अंबिका, तुळजा ..अम्म.. दुर्गा.." क्षणभर थांबून म्हणाली,"हा! दुर्गा नाव बेस्ट राहिलं."
"दुर्गा.. ये येऽऽ.." हे नाव घेत ती आनंदाने उड्या मारू लागली.
"बरं, आजपासून तुझं नाव दुर्गा..चल, दुर्गा आता जाऊ या. सगळ्यांचे आवरून झालं आहे. तूच एकटी राहिली आहेस. चल, पटकन आंघोळ करून आवरून घे." तो तिला तेथून नेत म्हणाला.
"ठीक आहे. चल." ती होकारार्थी मान डोलावत ड्रेस हात धरत उड्या मारत त्याच्यासोबत निघाली.
त्याने तिच्या हातावर दंतमंजन दिली. ते पाहून ती त्याला म्हणाली,"हे काय आहे?"
"ह्यॅ, हे कशासाठी?" ती तोंड वाकडे करत म्हणाली.
"याने दात घासतात." तो दात घासायची ॲक्टिंग करत म्हणाला.
"व्याॅक! छी! मी नाही घासणार याने दात. मला टूथपेस्ट आणि ब्रश पाहिजे." ती हात झटकत पाय आपटत म्हणाली.
"ओय महाराणी! इथे तर कोळसा किंवा राखेने दात घासतात. हे दंतमंजन मी तुझ्यासाठी पदरच्या पैशाने आणले आहे. आज दात घासून घे. उद्या आणतो टूथपेस्ट आणि ब्रश." तो तिला समजावत म्हणाला.
"मी महाराणी नाही. दुर्गा आहे ना." ती डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली.
त्याने मान डोलावली.
"ठीक आहे, याने दात घासेन; पण ॲटलिस्ट ब्रश तरी दे ना. बोटाने मला दात घासायला जमणार नाही." ती तोंड बारीक करून म्हणाली.
'आता हिला ब्रश कोठून देऊ?' तो डोकं खाजवत पुटपुटत इकडेतिकडे पाहू लागला.
त्याला समोर कडूलिंबाचे झाड दिसले. त्याच्या डोळ्यांत चमक आली. त्याने त्या झाडाची एक छोटीशी डहाळी तोडली. त्याच काडीचा ब्रश बनवून तिच्या हातात दिला.
"हा कसला ब्रश?" ती काडी उलटसुलट पाहत म्हणाली.
"हे हर्बल ब्रश आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया टाईप." तो तिला पटवून देत म्हणाला.
"अच्छा!" म्हणत तिने ती काडी पुन्हा निरखत पाहू लागली.
कसे दात घासायचे हे त्याने तिला नीट समजावून सांगितले. नंतर त्याने तिला निर्मला मावशीला हाक मारत दिला अंघोळीला पाठवले.
पण ती जायला तयार नव्हती. ती त्याला म्हणाली,"ए श्याम, तू मला अंघोळ घाल. नाही तर आपण दोघे मिळून अंघोळ करूया."
तिच्या या बोलण्यावर काय बोलावं ते त्याला कळेना. त्याला ऑकवर्ड फिल झाले. पण तिच्याकडे पाहून तो संयमाने म्हणाला,"दुर्गा, मुलं मुली एकत्र अंघोळ करत नसतात. तसंही माझी अंघोळ झाली आहे. मला दुसरे काम आहे. चुपचाप मावशीबरोबर जा."
"अरे, पण!.." ती पुढे बोलायच्या आधीच त्याने ओठांवर बोट ठेवून मोठे डोळे करत 'चुप बस' असा इशारा केला.
ती तोंड लटकवत चुपचाप हाताची घडी तोंडावर बोट करत उभी राहिली.
निर्मला मावशीला त्याने तिला अंघोळ घालून युनिफाॅर्म घालून द्यायला सांगितले आणि तो त्याच्या कामाला निघून गेला.
मावशीने तिला कसे अंघोळ करायचे ते सांगितले. ती अंघोळीसाठी बाथरूम गेली.
तिथल्या खिडकीच्या बाहेरून तिला कुजबुजण्याचा आवाज आला. ती कान टवकारून ऐकले.. आणि पळतच बाहेर आली .."साप ऽऽ.. साप.." असे ओरडत उड्या मारू लागली.
तिथल्या खिडकीच्या बाहेरून तिला कुजबुजण्याचा आवाज आला. ती कान टवकारून ऐकले.. आणि पळतच बाहेर आली .."साप ऽऽ.. साप.." असे ओरडत उड्या मारू लागली.
क्रमशः
काय ऐकले दुर्गाने? तिथेच खरंच साप होता का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे
