Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-११)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिचा मान टिकवण्यासाठी अनपेक्षित तिच्याशी त्याची लग्नाची गाठ बांधली गेली. कसे निभवेल श्याम हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-११

मागील भागात:-

"हो, आज ॲडजस्ट करं हं." तो डोळ्यांची उघडझाप करत हसत म्हणाला.

तिने ओठ बाहेर काढत मान वर खाली केली.

चावी बाहेरच्या बाजूला असलेल्या हॅंगरला अडकवले आणि गार्डला लक्ष द्यायला सांगून तो तिकडून निघून गेला.

आता पुढे:-

फादर चालत चालत तिच्याबद्दल डाॅक्टरांशी बोलत म्हणाले,"काय वाटतं तुम्हाला त्या मुलीबद्दल?"

"फादर त्या मुलीचे वागणे-बोलणे बघून तरी काही दिवसांपासून ती मेंटल अपसेट झाली असावी असे वाटते. म्हणजे ती काही जन्मापासून तशी नाही." एक लेडी डाॅक्टर फादरला म्हणाली. दुसऱ्या जेन्ट्स डाॅक्टरानेही मान डोलावून तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

"तू आर राईट, डाॅक्टर. मलाही तसंच वाटतंय. तिच्या मनोवैकल्य फारसं गंभीर वाटत नाही. थोडासा मायनर प्राॅब्लेम असू शकतो. कारण चार प्रश्न विचारले तर एक-दोन प्रश्नांची उत्तरे ती बरोबर देतेय. बघू चार-पाच दिवस अजून ऑबझर्व्हेशन करू. मग नंतर पुढची ट्रिटमेंट ठरवू." विचार करत फादर त्यांना म्हणाले.

होकारार्थी मान डोलावत डाॅक्टर निघून गेले. तोच एस. पी. आणि श्यामही तिथे आले.

"ओह, साॅरी सर, तुम्हाला वाट पाहायला लावली." त्यांना पाहून फादर दिलगीरी व्यक्त करत म्हणाले.

"इट्स ओके, फादर. साॅरी तर मी म्हणायला पाहिजे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." एस पी म्हणाले.

"नाही सर, उलट तुम्ही तर खूप चांगले काम केले. एका तरुण मुलीला सुरक्षित‌ आणि योग्य ठिकाणी आणलंत." फादर कृतज्ञतेने म्हणाले.

"एका नागरिकाचं कर्तव्य आणि माणुसकी निभावली मी. त्या मुलीने काही सांगितले का? कारण मी विचारल्यावर तिने मला काही सांगितले नाही. तिला पाहिल्यावर चांगल्या श्रीमंत घरातील वाटते." एस. पी. त्यांना समजून घेत म्हणाले.

" हो, आम्हालाही तसेच वाटते. श्रीमंतीचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसतं. त्या वरून ती मोठ्या घरातील मुलगी असावी, असे वाटते. आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला; पण तिने काहीच सांगितले नाही. अधूनमधून इंग्रजीतून बोलते, त्यावरून ती शिकलेलीही वाटते. तिच्या घरचे तिला शोधण्यासाठी न्यूज पेपर किंवा टि.व्हि. वर ती हरवलेली बातमी देतीलच. पोलीसांमार्फतही तिचा शोध घेतील. जर तिच्या घरांच्यांना पटलं तर इथेच तिला इलाजासाठी ठेवतील. नसेल पटत, तर सोबत नेतील. बघू काय होतंय ते." फादर त्यांना म्हणाले.

"बरं फादर, आता मी निघतो. आता मी रिटायर्ड माणूस आहे; पण अधूनमधून येत राहीन. तिच्याबद्दल काही कळलं तर कळवा मला." एस. पी. फादरला हस्तांदोलन करत म्हणाले.

तेवढ्यात हरी पुन्हा गाडी चालवण्यासारखे आवाज करत तिथे आला. मगाशी एस.पी. ने सिगारेट दिले नाही याचा राग मनात धरून त्याने मुद्दामहून धक्का देवून निघून गेला.

श्यामने त्यांना वेळीच सावरले. ते  पडता-पडता वाचले. श्यामचे आभार मानून ते जाऊ लागले, तेव्हा फादर आणि श्याम त्यांना आग्रहाने म्हणाले,"तुम्ही आमचे जुने स्नेही आहात. नियमित देणगी देऊन तुम्ही आम्हाला सहकार्य करता. इथल्या पेशंटबद्दल तुमच्या मनात कळवळा आहे. तर त्यासाठी तुमचे जेवढे आभार मानले पाहिजे तेवढे कमीच आहे."

"नको, राहू द्या. आयुष्यात सर्वकाही मिळाले मला."(जाणाऱ्या हरीकडे पाहत) "तुम्ही म्हणालात तेच खूप आहे. चला येतो, काळजी घ्या." असे हात जोडत म्हणत ते निघून गेले.

फादर थोडे निराश झाले.

"काय हा! हरी पण ना. तो मुद्दामहून त्यांना धक्का मारून गेला. मी बघतो त्याच्याकडे, फादर. तुम्ही काळजी करू नका." असे म्हणत श्याम तेथून निघून गेला.

फादर सुस्कारा टाकत नकारार्थी मान डोलावत आपल्या वाटेने निघून गेले.

क्रमशः

त्या मुलीच्या घरचे तिला शोध घेत येतील का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all