Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१२)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्नाची गाठ बांधली. कसे निभावली ते दोघे हे नाते? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग :-१२

मागील भागात:-

"काय हा! हरी पण ना. तो मुद्दामहून त्यांना धक्का मारून गेला. मी बघतो त्याच्याकडे, फादर. तुम्ही काळजी करू नका." असे म्हणत श्याम तेथून निघून गेला.

फादर सुस्कारा टाकत नकारार्थी मान डोलावत निघून गेले.

आता पुढे:-

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे श्याम लवकर ड्युटीवर आला. बागेतील ताजी फुले तोडून त्यांचे दोन सुंदर गुच्छ केले.

एक गुच्छ फादर देत तो हसून म्हणाला,"गुड मॉर्निंग, फादर!

त्यांनीही स्मितहास्य करत तो स्वीकारले.

नंतर तो देवीच्या मंदिरात आला. देवीच्या चरणांवर तो गुच्छ ठेवून मनोभावे प्रार्थना करत म्हणाला,"आई, इथले सगळे लहान लेकरे आहेत असे फादर सांगतात. पण माझ्या दृष्टीने ते सर्व लेकरांपेक्षाही जास्त हतबल आहेत. कारण लेकरांना काही कमी जास्त झाले की त्यांचे आप्तमंडळी काळजी घेतात. पण या लेकरांना स्वतःबद्दल काहीच कळतं नाही. आई, यांना लवकरात लवकर पूर्ण बरे कर आणि त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवं. त्यांची सेवा करणं मला मला ओझं नाही गं. पण असा त्रास कोणाच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. वेडा किंवा वेडी असणं किती वेदनादायक असतं. हे रोज इथे दिसतं. आई, सर्वांना सुखी-समाधानी ठेव."

तो डोळे मिटून, हात जोडून मनोभावे प्रार्थना करत होता.

थोड्यावेळाने जेव्हा त्याने डोळे उघडले  तेव्हा तो चाट पडला.

कारण त्याच्या बाजूला सर्व पेशंट एका रांगेत उभे हात जोडून नमस्कार करत होते.

तो गालात हसत म्हणाला,"अरे व्वा! सगळे प्रार्थना करत आहेत. खूप छान. बरं, हात खाली करा सगळेजण."

सगळ्यांनी हात खाली केले. तो त्यांना म्हणाला,"सांगा बरं, तुम्ही सर्वांनी देवी आईकडे काय मागितलं?"

क्षणांत वातावरण बदललं. काहींच्या डोळ्यांत पाणी आलं, तर काहींचे हुंदके फुटले. सगळे एक सुरात रडू लागले.

"अरे, काय झाले? का रडताय तुम्ही?" तो गोंधळून त्यांना विचारले.

" लवकरात लवकर तू वेडा व्हावास, हे मागितले. अजून काय?" असं म्हणत त्यातला एख रडत रडत निघून गेला. उरलेली त्याच्या मागोमाग निघून गेले.

"अरे देवा! असे बोलणारे वेडे कसे असतील." तो डोक्याला हात लावत पुटपुटला.

तेवढ्यात त्याचे लक्ष काल आलेल्या मुलीच्या वाॅर्डकडे गेले. त्या दाराच्या आतून तिची ओढणी लटकलेली दिसली.

"अरेच्च्या!" त्याच्या काळजात धस्स झालं.

तो धावत तिथे आला. सळयातून हात घालून ओढणी सावधपणे सरकवली आणि तिला शोधत पाहू लागला. ती समोर शून्यात नजर लावून छताकडे पाहत बसलेली दिसली.

दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसा ती दचकून त्याच्याकडे बघू लागली.

तिचा ड्रेस अस्ताव्यस्त झाला होता. केस विस्कटलेले होते. तो पटकन ओढत हातात घेऊन तिच्या दिशेने येत म्हणाला,"अगं ए, काय हा अवतार केलाय आहेस? चल, आधी ही ओढणी नीट घे."

"जा.. तू खूप दुष्ट आहेस. माझ्याशी खोटं बोलून मला तू इथे कोंडून गेलास." ती गुरफटून म्हणाली.

"बरं, ते नंतर बोलू. आधी तू ओढणी घे." तो ओढणी पुढे करत संयमाने म्हणाला.

"माझं सांगितलेले तू ऐकले नाहीस. मग मी तुझं का ऐकू? कट्टी फू आहे मी तुझ्याशी. आणि मी ओढणी नाही घेणार." ती गाल फुगवून मान वळवत म्हणाली.

"तू ओढणी घेणार आहेस की नाही." तो थोडा आवाज चढवत म्हणाला.

"ऊं हुं," तिने मान डोलावत नकार दिला.

श्यामने तिच्या हाताला धरून उठवले आणि तिला व्यवस्थित उभा केले. तिचा ड्रेस नीट केला आणि तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळली.

"अय्यो, ओढणी अशी घालतात का? वेडाच आहेस तू?" ती हसत डोक्याला हात लावला.

त्याने मग ती गुंडाळलेली ओढणी काढून दोन्ही खांद्यावर घातली. तेव्हा ती खूश होऊन टाळी वाजवत म्हणाली,"व्हेरी गुड! अशी घालतात ओढणी."

क्रमशः

श्याम तिला कसे सांभाळून घेईल?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे
0

🎭 Series Post

View all