डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-१५
मागील भागात:-
मावशीने तिला कसे अंघोळ करायचे ते सांगितले. ती अंघोळीसाठी बाथरूम गेली.
तिथल्या खिडकीच्या बाहेरून तिला कुजबुजण्याचा आवाज आला. तिने कानोसा घेत, कान टवकारून ऐकले.. आणि पळतच बाहेर आली .."साप ऽऽ.. साप.." असे ओरडत उड्या मारू लागली.
तिथल्या खिडकीच्या बाहेरून तिला कुजबुजण्याचा आवाज आला. तिने कानोसा घेत, कान टवकारून ऐकले.. आणि पळतच बाहेर आली .."साप ऽऽ.. साप.." असे ओरडत उड्या मारू लागली.
आता पुढे:-
"ए पोरी, कोठे आहे साप? कुणीकडे केला?" निर्मला मावशी घाबरून पळतच आल्या आणि तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला.
"त्या तिकडे या बाथरूमच्या पाठीमागे गेला." ती बाथरूमच्या दिशेने बोटं करून घाबराघुबरा चेहरा करून सांगितले.
सगळे त्या दिशेने गेले तर नरेश एक स्त्री पेशंट वनिताशी जवळीक साधाण्याचा प्रयत्न करत होता. त्या सगळ्यांना पाहून तो चपापला.
वनिता बाहुलीशी खेळत होती.
"नरेश, तू इथे काय करत आहेस?" मावशी संशयीत नजरेने त्याच्याकडे पाहत विचारले.
"अं ते.. काय मावशी! तुमचं लक्षच नसतं, अहो, ही वनिता तिकडे जंगल एरिया आहे ना, जात होती तर तिला मी इकडे घेऊन येत होतो." तो सफाई देण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.
पण वनिता मध्येच बाहुलीला दाखवत म्हणाली,"नाही मावशी, हा.. हा खोटं बोलतोय. मला बाळ देतोय म्हणून तिकडे घेऊन जात होता."
मावशी आणि इतर लोक रागाने अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होतो.
"ए ..ए काहीही काय सांगतेस?अहो या वेडीचं काय खरं धरता? मी कुठे काय बोललो? हि तिकडे चालली होती, घ्या मावशी सांभाळा हिला!" तिच्याकडे पाहत तिरमिरीने नरेश म्हणाला.
पण वनिताच्या छातीवरचा विस्कटलेला पदर सगळं काही खूप काही सांगून गेला.
तेवढ्यात मंगेश तिथे आला.
तेवढ्यात मंगेश तिथे आला.
मावशी एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकत वनिताला आणि दुर्गालाही घेऊन जात होत्या तर तिला मंगेश म्हणाला, "मी हिला घेऊन येतो, तुम्ही वनिताला घेऊन जा."
"बरं, लवकर घेऊन ये." मावशी त्याला म्हणाली आणि वनिताला घेऊन गेली.
"काय रे, काय झाले?" मंगेशने नरेशला विचारले.
"या वेडीमुळे सगळा प्लॅनवर पाणी फेरले." तो दात ओठ खात दुर्गावर धावून गेला.
"ए कोणाला वेडी म्हणालास?" दुर्गा त्याचा हात हवेत पकडत रागात म्हणाली.
"तुझ्या तर.."
सटाक ऽ ऽ
नरेशने खणखणीत चापट तिच्या कानाखाली लगावली. इतक्या जोराने चापट लगावली की ती डायरेक्ट जमिनीवर कोसळली.
ती खाली पडलेली पाहून नरेश, मंगेश आणि दीपक एकमेकांना टाळी देत हसू लागले.
"यार नरेश, त्या वनितापेक्षा ही जास्तच सुंदर आहे. हिलाच तू निघून जायला हवं होतंस." मंगेश डोळा मारत नरेशला म्हणाला.
"त्यानेच का बरं न्यायचं? फळं वाटून खाण्यात जास्त मजा येते! काय म्हणतोस? " दीपक हातात हात देत जीभ गालात खेळवत हसत म्हणाला.
खाली पडलेल्या दुर्गाला नरेशने मारल्याचा रागच आला. त्या तिघांकडे रागातच पाहत ती जमिनीवर हाताने चापचत होती. तिच्या हाती मातीची एक छोटी रिकामी कुंडी लागली.
ते तिघे तिच्याकडे पाहत हसत होते. ती पटकन उठली आणि पूर्ण ताकदीनिशी ती कुंडी नरेशच्या डोक्यावर मारले.
तो चुकायला गेला; पण तोपर्यंत ते डोक्यावर आदळले होते. त्याचे डोके फुटून त्यातून रक्त येऊ लागले.
दिपक घाबरून पळून गेला; पण ती उड्या मारत टाळ्या वाजवत हसू लागली आणि म्हणाली,"ये ऽ ऽ नारळ फुटला रे.." असे म्हणत ती पळत जाऊ लागली.
नरेश डोक्याला हात लावून तिला रागात पाहत एक शिवी हसडत म्हणाला,"मंग्या, रे बघतोस काय? पकड तिला. मला मारले तिने? असा शाॅक ट्रिटमेंट देऊ की पुन्हा कधी ती आयुष्यात कोणावर हात उचण्याच्या लायकीची राहणार नाही."
मंगेशने धावत तिला घट्ट पकडले. नरेशने जखमेवर रूमाल बांधला आणि दोघे मिळून तिला ओढत घेऊन चालले. ती सुटण्यासाठी झटापट करत होती.
क्रमशः
दुर्गा शाॅक ट्रिटमेंटची शिकार होईल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा