Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१६)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्नाची गाठ बांधली. कसे निभावतील ते दोघे हे नाते? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-१६

मागील भागात:-

मंगेशने धावत तिला घट्ट पकडले. नरेशने जखमेवर रूमाल बांधला आणि दोघे मिळून तिला ओढत घेऊन चालले. ती सुटण्यासाठी झटापट करत होती.

आता पुढे:-

शहरात एक व्यक्ती व्हिस्कीचा ग्लास तोंडाला लावत मोबाईलमध्ये असलेल्या फोटोकडे वासनांध नजरेने पाहत होता.

तेवढ्यात गुळगुळीत टक्कल असलेला एक गुंड त्याच्याकडे आला आणि त्याच्या समोर मान खाली घालून समोर हात बांधून उभा राहिला. त्याची चाहूल लागलाच त्याच्याकडे पाहत कडक आवाजात त्याने त्याला विचारले,"काही खबर कळली का?"

"नाही सरजी, खूप शोधलो पण तिच्याबद्दल काहीच कळले नाही." त्याने मान खाली घालून भीतभीतच सांगितले.

"जा की भो***, जाऊन शोध तिला. हेच सांगयला आला होतास काय? इडियट! एका कामाचे नाहीत तुम्ही? खाऊन-खाऊन माजलात नुसते. तुम्हाला काय फुकट पोसत नाही मी, त्यासाठी नोटांची बंडल‌ देतोच ना. यूसलेस कुठले!" तो त्याच्याकडे पाहत आगपाखड करत होता.

तरीही तो गुंड खाली मान घालून गुपचूप ऐकत उभा होता.

"ऐकायला आले नाही वाटतं तुला. माझं तोंड काय पाहत आहेस? जा, निघ इथून." तो व्यक्ती त्याच्यावर मोठ्याने ओरडला.

तो दचकला पण तसेच धीटपणे हळूच खिशातून एक फोटो काढत धीर एकवटून त्याच्यासमोर केला.

त्याने रागात पाहत विचारले," हे काय आहे?"

"मॅडमचा फोटो आहे, सरजी." तो हळूच नजर वर करून म्हणाला.

"हा, मग त्याचं काय?" तो.

"आपण ह्या फोटोची न्यूज पेपर, मिडिया किंवा पब्लिकमध्ये पब्लिसिटी केली तर ती पब्लिक आणि पोलिसांच्या नजरेस पडेल त्यामुळे ती लवकर सापडेल." त्याने स्पष्टीकरण दिले.

त्याच्या स्पष्टीकरणावर तो व्यक्ती प्रचंड संतापला. अश्लिल शिव्या देत त्याच्या अंगावर चावळून आला आणि त्याच्या तोंडावर जोरदार पंच दिला. तो पंच इतका जबरदस्त होता की त्याच्या तोंड फुटून त्यातून रक्त येऊ लागले. जे त्या व्यक्तीच्या हातालाही लागले. त्याने दुसऱ्या त्याच्या गुंडाला डोळ्याने खूण केली. तसे त्याने टिशू पेपर आणून दिले.

त्याने आधी स्वतःच्या हाताला लागलेले रक्त पुसले आणि नंतर त्या गुंडांच्या तोंडाचे रक्त पुसतं‌ कुत्सित हसत मान तिरकी करून विचारले,"मी तुला का पंच मारला, सांगू का तुला?"

त्या गुंडाला खरं तर खूप राग आला होता. पण तो मुठ आवळून राग गिळून म्हणाला,"सांगा, सरजी."

तो अडखळत चालत म्हणाला,"गुड, ऐक मग. तू ज्या फोटोची पब्लिसिटी करू म्हणालास ना, ती जर पोलीस किंवा पब्लिकच्या हाती लागली आणि तिने जर तोंड उघडले तर सगळं सत्य बाहेर‌ येईल. मग बिनभाड्याच्या खोलीत खडी फोडायला कोण जाईल! तू की मी?"

तो तिरकस पाहत गंभीर झाला.

"तुम्ही, सरजी! " तो अडखळत म्हणाला.

"राईट! हेच पाईंट आहे. म्हणून पब्लिसिटी करायला नको. कितीही खर्च येऊ द्या,  पाहिजे तितकी माणसे पेरा. आकाश पाताळ एक करा, पण ती सापडली पाहिजे.
काम फत्ते झाले‌ तरच खिसा गरम करेन नाही तर तुम्हाला माहिती मी तुमच्या सोबत काय करू शकतो ते? आणि अजून एक गोष्ट हे काम करताना कोणालाही कानोकन खबर लागता कामा नये! समजलं!" तो दाराला टेका देत उभारत आवाजात जरब आणत म्हणाला.

"हो सरजी, समजलं." तो टकला गुंड म्हणाला.

"हे घे," तो पाचशेच्या चार नोटा त्याच्या समोर करत म्हणाला,"हे तुझे मेडिकल एक्सपेन्स!"

ओठ तिरपे करत पुन्हा त्यांच्यावर नजर टाकली आणि तो तेथून निघून गेला.

क्रमशः

कोण आहे हा व्यक्ती? त्याने कोणाला शोधायला सांगितले? ती दुर्गा असेल की दुसरी कोणी?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे


0

🎭 Series Post

View all