डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-१९
मागील भागात:-
श्यामने नकारार्थी मान डोलावली आणि मनात काहीतरी विचार केला. हातातले सामान ठेवून परत दुर्गाकडे आला.
आता पुढे:-
श्यामने हळूवार तिला साद घातली.
"दुर्गा, ए दुर्गा..उठ माय!" तो मवाळ आवाजात म्हणाला.
मगाशी तिने त्याचे आणि मावशीचे बोलणे ऐकले होते. तिला खूप भरून आलं होतं. ती पाठीमागे झोपली होती.
तो तिच्या जवळ जात बेडच्या एका कडेला बसला. पुन्हा मायेने त्याने हाक मारली,"ए दुर्गा, मला माहिती आहे तू जागी आहेस."
तिने भरलेले डोळे पुसले आणि हळूच कूस वळवून त्याच्याकडे पाहू लागली.
तिचा चेहरा कोमेजला होता. चेहऱ्यावरील चैतन्य हरवलं होतं.
"आता तू एक पेशंट आणि मी तुला पाहायला आलोलो तुझा नातेवाईक. येताना मी तुझ्यासाठी येताना हा डाळिंब आणि बिस्किट पुडा विकत आणला आहे." तो हातातील डाळिंब आणि बिस्किट पुडा तिला दाखवत हसत म्हणाला.
"खोटं ! तू खोटं बोलतोस?" ती लहान मुलासारखा निरागस चेहरा करत म्हणाली.
"काय खोटं!" त्याने भुवया आकसून घेत विचारलं.
"इथल्या कंपाऊंडमध्ये डाळिंबाचे झाड आहे, मला माहिती आहे. त्या झाडाचे डाळिंब तू तोडून आणेल ना." ती निरागस चेहरा करून ओठ बाहेर काढत हळू आवाजात म्हणाली.
तो मंद हसत म्हणाला,"त्याचं झालं काय? हे खरं आहे की मी हे डाळिंब इथल्या झाडाचे आणले. आज माझा पगार झाला तसा माझ्या आईला मी पैसे पाठवले आणि येताना दुकानातून हा बिस्किट पुडा माझ्या पैशाने आणले. ओपन करून देऊ तुला?"
तो पुडा हातात घेऊन फोडत होता.
"नको..नको..आता नको फोडूस. संध्याकाळी आपण दोघे मिळून खाऊ या." ती चेहऱ्यावर तेच भाव आणत म्हणाली आणि त्याच्या हातातून डाळिंब आणि पुडा हातात घेतला.
"ओके, मलाही डाळिंब खूप आवडते. मला तुला अजून काहीतरी सांगायचे होते. काय बरं?अम्म.." तो कपाळावर एक बोट टेकवत विचार करू लागला आणि काही क्षणांने म्हणाला,"उम्म..हा, तू इथे नवीन आली होती तेव्हा तू किती सुंदर नक्षत्रासारखी दिसत होतीस ! हा.. आणि आता पाहा, या दोन दिवसात अंघोळ केली नाहीस, तोंड धुतले नाहीस, विंचरले नाही. आता मावशीकडे जा, छान अंघोळ कर, कपडे घालून ये. नंतर मी केस विंचरून देतो, छान मेकअप पण करतो. चालेल ना." त्याने प्रेमाने समजावले.
"हो, चालेल." तिने स्मितहास्य करत मान डोलावली.
"गुड गर्ल!" तो तिला म्हणाला आणि निघून गेली.
ती मावशीच्या मदतीने आवरून आली. तो पुन्हा येऊन तिचे केस विंचरू लागला. तिचे केस कुरळे, लांब होते. त्याला जमत नव्हते. तरी तो करण्याचा प्रयत्न करत होता. दुसरे वाॅर्डबाॅय त्याला तसे करताना पाहून हसत होते. दुसरा एक जण पण डोकावून पाहू लागला. एक डाॅक्टर म्हणाला," ए, ते बघ रे."
त्या आवाजाने श्यामने तिकडे पाहिले. तेव्हा तो वाॅर्डबाॅय त्याला हसत म्हणाला,"चालू दे बाबा, तुझं!"
"ए जा रे! तू तुझं काम बघ." श्याम त्याला दरडावत म्हणाला.
तो दबकत निघून गेला.
"तो चुकीचे काय बोलला, ड्युटी चालू आहे ना तुझी. तेच चालू दे बोलला ना." बेडवर मांडी घालून बसत ती खांदे आकसून घेत हळूच निरागसपणे हसत म्हणाली.
क्रमशः
श्याम कसे समजावेल तिला? त्याची काळजी घेणे त्याला महागात पडेल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा