डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:- २०
मागील भागात:-
"ए जा रे! तू तुझं काम बघ." श्याम त्याला दरडावत म्हणाला.
तो दबकत निघून गेला.
"तो चुकीचे काय बोलला, ड्युटी चालू आहे ना तुझी. तेच चालू दे बोलला ना." मांडी घालून बसत ती हळूच हसत निरागसपणे म्हणाली.
आता पुढे:-
"तुला नाही माहिती, दुर्गा. 'चालू दे', असे तो वेगळ्या अर्थाने म्हणाला. ते जाऊ दे, सोड. थांब, तुझा मेकअप करतो." तो म्हणाला.
तिला सांगितले तरी कळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याने विषय बदलला.
त्याने आधी केसांची कशी बशी वेणी घातली आणि तिचा मेकअप करायला घेतला.
"हलू नकोस, गं. जरा थोडा वेळ शांत बसं ना !" तो वैतागत म्हणाला.
"हुं..मी कुठे हलतेय, तुझेच हात थरथरत आहेत." ती तोंड बारीक करून म्हणाली.
"ओके, बाबा. होतंच आलंय. आता ही टिकली लावतो, म्हणजे झालं." तो टिकली पाकिटातून काढून बोटावर घेत म्हणाला.
तिच्या कपाळावर दोन्ही भुवयांच्या मधोमध त्याने टिकली लावली आणि खूश होऊन तो म्हणाला,"परफेक्ट! नाऊ यू लुकिंग सो प्रीटी!"
त्याने हातांच्या बोटांनी मोर नाचवत डोळे मिचकावले.
"अरे, पण तू काजळाची तीटच नाही लावलेस! ते पण लाव ना!" ती वेण्या हातात धरून, क्युट चेहरा करून म्हणाली.
"अरे हा! विसरलोच बघ. थांब लगेच लावतो." तो कपाळावर हात मारत हसत म्हणाला आणि काजळाची डब्बी घेतली.
त्याने तिला काळज लावली.
"मला आरसा दाखव ना. बघू तू माझा कसा मेकअप केला आहेस ते?" ती आरश्यात बघण्याची हट्ट करत म्हणाली.
"आरश्यात बघायलाच पाहिजे का?" त्याने कमरेवर हात ठेवत म्हणाला.
"हुं.." ती पापण्यांची उघडझाप करत हुंकारली.
"बरं, देतो; पण मी गेल्यावर बघ हं.." तो आरसा तिच्या हातात देत हसू दाबत म्हणाला आणि तेथून पोबारा केला.
जेव्हा तिने स्वतःला आरश्यात पाहिले. तिने नाकपुड्या फुगवल्या.
"श्याम.." असं म्हणत हाताची मूठ गादीवर आदळली.
कारण त्याने लहान बाळाला तीट लावतात तसं त्याने तिच्या कपाळावर, दोन्ही गालांवर आणि हनवुटीवर मोठे-मोठे तीट लावले होते. त्यामुळे तिला राग आला.
श्याम दाराच्या मागे लपून तिला बघत हसत होता. तिला राग आलेला पाहून त्याला मजा येत होती.
पण नंतर ती रागात रडत ते लावलेले तीट पुसत होती. ते पाहून त्याचं हसू मावळला. त्याला वाईट वाटले. तसा तो लगेच तिच्याजवळ आला.
तोंड बारीक करत, कान धरून तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला,"साॅरी, दुर्गा. मला तुला रडवायच नव्हतं. मला फक्त तुझी गंमत करायची होती."
ती गाल फुगवून रडत-रडत म्हणाली,"असं नाही साॅरी म्हणायचं. तू उठाबशा काढ आणि कोंबडा बन."
"बरं, अजून काही." तो कान पकडत उठाबशा काढत म्हणाला.
"सांगते, तू थांबू नकोस." ती लहान मुलासारखं ओठ बाहेर काढत म्हणाली.
हुंकार भरत तो उठाबशा काढत होता. थोड्याच वेळात तो दमला आणि तो केविलवाण्या नजरेने तिला पाहत लागला.
"थांब आता, बसं करं आता, कोंबडा बन." ती ओठांचा चंबू करून म्हणाली.
ती थांब म्हणाली तेव्हा त्याची कळी खुलली होती. पण 'कोंबडा बन' म्हणल्यावर त्याने तोंड पाडलं.
"कोंबडा बनायला तुला प्राॅब्लेम आहे काय? मग राहू दे." ती त्याला म्हणाली.
"हुश्श! सुटलो बाबा!" तो छातीवर हात ठेवून सुस्कारा टाकत म्हणाला.
"कोंबडा नाही.. पण तुला घोडा बनावं लागेल!" तिने दुसरा बाॅम्ब फोडला.
"काय ? घोडा!" त्याने मोठ्याने ओरडून आश्चर्याने कपाळावर हात मारत विचारले.
क्रमशः
श्याम घोडा बनेल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा