Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-२१)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-२१

मागील भागात:-

"कोंबडा बनायला तुला प्राॅब्लेम आहे काय? मग राहू दे." ती त्याला म्हणाली.

"हुश्श! सुटलो बाबा!" तो छातीवर हात ठेवून सुस्कारा टाकत म्हणाला.

"कोंबडा नाही.. पण तुला घोडा बनावं लागेल!" तिने दुसरा बाॅम्ब फोडला.

"काय ? घोडा!" त्याने मोठ्याने ओरडून आश्चर्याने कपाळावर हात मारत विचारले.

आता पुढे:-

"ए, किती जोरात ओरडतोस रे? कान फुटले ना माझे!" दुर्गा दोन्ही कानावर हात ठेवून वैतागलेल्या सुरात म्हणाली.

"साॅरी..बनतो घोडा!" तो इवले तोंड करून खाली गुडघ्यावर बसला आणि दोन्ही हात जमिनीवर टेकवले.

"ये ऽ ऽ मस्तच." ती टाळ्या वाजवून उड्या मारत होती.

तिच्या चेहऱ्यावरील निरागस हसू पाहून त्याच्याही ओठांवर हसू तरळले.

ती त्याच्या पाठीवर दोन्ही बाजूला पाय टाकून बसली. त्याच्या डोक्यावर एक हात आणि दुसरा हात लगाम चालवल्यासारखे करत ती म्हणाली,"चल रे, घोड्या.. टप टप.."

"लकड़ी की काठी काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा.."

ती पाठीवर बसून डुलत, हसत गाणं म्हणत होती.

तो तिला घेऊन हळूहळू चालत होता. तिच्या आनंदात त्याला आनंद मिळत होता.

बघणारे सगळे विचित्र नजरेने पाहत होते. फादरही हे चित्र दुरून पाहत होते. ते गालात हसले.

'श्याम किती छान पद्धतीने तिला सांभाळत आहे. अशा मुलाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.' त्याच्याकडे फादर स्मित करत मनात म्हणाले.

नरेश आणि मंगेश मात्र ते पाहून मनात चरफडत होते.

"ए दुर्गा, दमलो गं मी. बास की आता, मला दुसऱ्या पेशंटलाही पाहायचे आहे. जाऊ दे ना." थोडया वेळाने तो मान तिरकी करून तिला बारीक आवाजात म्हणाला.

"उम्म, (वरती पाहत डोक्याला बोट लावत विचार करत) ठीक आहे. घोडा दमलाय आता. आजची रपेट मस्त होती. मला खूप मज्जा आली. तू जा." ती शहाण्या बाळासारखं हसत म्हणाली आणि त्याच्या पाठीवरून खाली उतरली.

"अब्बा! पाठ गेली माझी कामातून?" तो चेहऱ्यावर त्रासिक भाव आणत, पाठीला मागून हात लावत म्हणाला.

"खूप दुखतंय का रे पाठ तुझी! आय एम साॅरी, श्याम." ती दोन्ही कान धरून ओठ मुडपत म्हणाली.

"हम्म, बट इट्स ओके. तुला मज्जा आली ना. झालं तर मग." तो तिचे कानावरील हात काढत हसत म्हणाला.

"पण तुझी पाठ दुखतेय ना, तू संध्याकाळी डाळिंब खायला येशील ना तेव्हा दाबून येईन मी. म्हणजे तुला आराम मिळेल." ती काळजीच्या सुरात त्याला म्हणाली.

त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आतापर्यंत त्याची आई आणि फादर सोडले तर त्याची आस्थेने कोणी विचारले नव्हते की काळजी केली नव्हती.

तो गहिवरल्या सुरात म्हणाला,"तू म्हणालीस ना तर पाठदुखी छू मंतर झाली बघ."

"खरंच ना!" ती डोळ्यांच्या बाहुल्या नाचवत म्हणाली.

"हुं, चल मी निघतो, संध्याकाळी येतो." त्याने कापडाने तिचे तोंड साफ केले आणि तो निघून गेला.

ती उड्या मारत वाॅर्डभर फिरत होती.

संध्याकाळी त्याने तिच्या सोबत डाळिंबाचा आस्वाद घेऊन आला.

असेच थोडे दिवस निघून गेले.

एके रात्री नरेश आणि मंगेश दोघेही बीडी पित बसले होते. त्यांच्या मनात दुर्गा विषयीचा राग खदखद होता.

"मंग्या, त्या वेड्या दुर्गेमुळे फादरने आपल्याला डिसमिस करण्याची धमकी दिली. तिला असंच नाही सोडायचं." नरेश रागात बिडी फुकत म्हणाला.

"हो ना, आपल्या अपमानाला कारणीभूत असणाऱ्या त्या दुर्गेला अजिबात सोडायचे नाही. तिला धडा शिकवायलाच हवा." मंगेश संपलेली बिडी खाली टाकून देत ते पायाशी चिरडत म्हणाला.

"हो, आणि सोबत मनातली इच्छा पण पूर्ण करू." नरेश छातीवर हात फिरवत विकृत हसत म्हणाला.

"चल मग, शुभस्य शीघ्रम!" मंगेश त्याच्या हातात हात मिळवत डोळा मारत म्हणाला.

क्रमशः

काय करतील नरेश आणि मंगेश? त्यांच्या मनसुब्यात ते यशस्वी होतील का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all