डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-२३
मागील भागात:-
ती फतकल मांडून त्याच्याजवळ येऊन बसली.
"आज स्वारी इकडे कशी?" त्याने कणीक तिंबत हसत तिला विचारले.
"स्वारी? ते कोण आहे बरं?" तिने प्रश्नार्थक चेहरा करून विचारले.
आता पुढे:-
"अगं माय, तुला म्हणालो मी." श्याम नकारार्थी मान डोलावत हसत म्हणाला.
"पण माझं नाव तर दुर्गा आहे. मग आता स्वारी पण आहे का?" ती दातात बोट धरत पुन्हा विचारले.
"अरे बाबा, तुझं नाव दुर्गाच आहे. पण तू अशी अचानक इथे आलीस ना म्हणून म्हणालो." तो कणीक उलट पटल करत म्हणाला.
"अच्छा, असं का?" ती समजल्यासारख मान डोलावत म्हणाली.
त्याने हुंकार भरत मान डोलावली.
"ए हॅलो, तू हे काय करतोस?" ती त्याला पीठ मळताना बघून विचारले.
"कणीक मिळतोय चपाती बनवायला." तो त्याचे काम करत म्हणाला.
"अय्या, तुला चपातीपण बनवता येते?" तिने कुतूहलाने पाहत विचारले.
"हो, खूप आधीपासून येते." तो हसत म्हणाला.
"हा का? पण ते तर गोल लाटून बनवतात ना!" ती लाटण्याची ॲक्टिंग करत हसून म्हणाली.
"हो, बरोबर. पण त्या आधी पीठ व्यवस्थित मळून घ्यावं लागतं." तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
"इकडे आण, मी मळून देते." ती परात घेण्यासाठी पुढे सरसावत म्हणाली.
"नको, नको..मी करतो. कणीक मळणे एवढे सोपे नसते. त्यासाठी सायन्टिफिक थिकिंग पाहिजे. पाकशास्त्रात निपून असले पाहिजे." तो सांगत होता.
ती ऐकत होती. त्यातलं तिला किती कळलं माहिती नाही. पण ती कान देऊन ऐकत होती.
तो पुढे म्हणाला,"पीठ मळायच्या आधी ते चाळून घ्यायचं. मग पिठात पाणी घालून ते मळायला सुरूवात करायची. जास्त पाणी ओतायचे नाही. पिठ भिजेल इतपत पाणी टाकायचे. नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचे. त्यात चिमूटभर मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं. गाठी अजिबात होऊ द्यायचे नाही. अगदी मऊसूत थिंबून घ्यायचे. म्हणजे चपाती छान होतो. मग छोटे-छोटे गोळे बनवून त्याला दोन्ही हाताने दाबून थोडे चपटे पेढ्यासारखं करायचे. आधी कोरडे पीठ पोळपाटावर पसरावयाचे. मग त्यावर तो पेढा ठेऊन लाटण्याने लाटून घ्यायचा." चपाती कशी बनवयायची हे तो तिला समजावून सांगत होता.
ती दोन्ही हाताने स्वतःचे पाय धरुन त्याचे बोलणे ऐकत होती. समजल्या सारखे तिने मान डोलावली.
"ते सोड, जाऊ दे. तू इथे का आलीस ते सांग?" त्याने तिला विचारले.
"अम्म, मला ना तुझ्या पाठीवर बसून पूर्ण कंपाऊंडची सैर करायची आहे. मला फिरवशील? " ती लाडात येत म्हणाली.
"ए पोरे, मी तुला पाठीवर घेऊन पूर्ण कंपाऊंडची सैर करायला लागलो ना, लोक मलाही तुझ्यासारखे समजतील." तो अप्रत्यक्षपणे नकार देत म्हणाला.
"हुं, बरोबर आहे. मग आता काय करायचे?" ती ओठ बाहेर काढत नाराज होतं म्हणाली.
"काही नाही, मला माझं काम करू दे. शांत बसं जरा." तो तिला डोळे दाखवत म्हणाला.
ती गरीब चेहरा करून खाली मान घालून बसली. त्याचं काम होईपर्यंत ती तशीच बसून राहिली. त्याला हसूच आले. पण तिचे गाल फुगवणे त्याच्या लक्षात आले.
"ए दुर्गा, काय झालं? का एवढी शांत बसलीस?" त्याने तिला विचारले.
"तूच म्हणालास ना शांत बसं म्हणून. आणि आता मी विचार करत होते." ती गाल फुगवून नाक उडवत म्हणाली.
"कसला?" त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारले.
क्रमशः
कसला विचार करत असेल दुर्गा?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा