डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-२७
मागील भागात:-
एकजण डाॅक्टरकडे हात करत तोंड वाकडे करत म्हणाला,"डाॅक्टरला शूट करा, लय कडू औषध गोळ्या देतो. इंजेक्शन पण टोचवतो."
दुसरा म्हणाला,"आधी ह्या मावशी शूट करा, लय चिडचिड करते."
तशी ती मावशी केविलवाण्या नजरेने पाहत रडक्या सूरात फादरांना साद घातली.
आता पुढे:-
"ओह जेजस," फादर कपाळावर, छातीवर दोन्ही बाजूला हात टेकवत चिंतेने म्हणाले.
"मला लेकरांचं कसं होणार, फादर?" इन्स्पेक्टर थरथरत म्हणाला.
"रिव्हॉल्वर इथे आणण्या आधी तो विचार करायला हवा होता." फादर ओठ दाबत म्हणाले.
"आधी याला, त्याला." सर्वांनी एकच गलका सुरू केला.
त्या गलक्याने सयाजीने "ओह" म्हणून दोन्ही हाताने डोके गच्च पकडले.
"अ ह ऽऽ कर्नल सयाजी स्वतःच कन्फ्युज झाला." ते चिडून एका हाताची मूठ घट्ट आवळून चिडत म्हणाले.
ही संधी साधून फादर इन्स्पेक्टरला म्हणाले,"इन्स्पेक्टर, कर्नल कन्फ्युज झालेत, हीच योग्य वेळ आहे. तुम्ही पटकन मागून जाऊन त्यांच्या हातातील रिव्हाॅल्वर काढून घ्या."
"हो, जातो." असे म्हणत इन्स्पेक्टर हात वर करूनच हळूहळू सरकत जाऊ लागले. पण नेमकं त्याचवेळी सयाजींची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी इन्स्पेक्टरच्या पायाजवळ जमिनीवर गोळी झाडली. त्यासरशी घाबरून इन्स्पेक्टर बुडाला पाय लावत आधीच्या जागेवर जाऊन उभा राहिला.
एक डाॅक्टर आणि नर्स घाबरत श्यामला म्हणाला,"अरे श्याम, लवकर चल. ते कर्नलने सर्वांवर गन रोखून धरली."
"काय तरीच काय बोलताय डाॅक्टर, अहो ते तर गन म्हणून काठी खांद्यावर घेऊन फिरतात की." श्याम हसत म्हणाला.
"नाही रे, कोणी तरी इन्स्पेक्टर फादरला भेटण्यासाठी आले होते. त्यांची रिव्हाॅल्व्हर त्यांनी काढून घेतली. तू चल, लवकर." नर्सने भयभीत होऊन सांगितले.
"अरे देवा! चला मग तिकडे." तो धावतच तिकडे पोहोचला.
तो पर्यंत कर्नल इन्स्पेक्टरवर रिव्हाॅल्व्हर रोखत म्हणाले,"इन्स्पेक्टर, डोन्ट मूव्ह. स्टेडी. वन, टू.."
"अहो कर्नल, थांबा?" श्याम धापा टाकत येत त्यांना म्हणाला.
कर्नलने रिव्हाॅल्व्हर खाली घेतली आणि श्यामकडे पाहू लागला.
"कर्नल, व्हाॅट्स गोईंग ऑन?" श्यामने त्यांना विचारले.
"ऑल एनिमिज अरेस्टिंग ॲण्ड आय विल शूट देम!." कर्नल करड्या आवाजात म्हणाले.
"गुड कर्नल, बट वुई ऑल आर इंडियन्स. आपण एनिमिजना पाठीवर शूट केले तर आपली मान खाली जाईल आणि गौरव कमी होईल." श्याम विचार करत म्हणाला.
"येस, इंडियन प्रेस्टिज. येस, ऑल अबाऊट टर्न." सयाजी मोठ्याने म्हणाले.
तसे सगळे वळून समोर उभे राहिले.
"पाठीवर गोळी झाडली असती तर थोडे तरी वाचण्याचे चान्सेस होते, पण आता समोरून गोळी छाताडात आणि मी डायरेक्ट ढगात जाणार असे वाटते, फादर." इन्स्पेक्टर रडका सूर लावत म्हणाला.
"याला सर्वस्वी तुम्हीच,इन्स्पेक्टर." फादर दातावर दात घासत म्हणाले.
"नो डिस्कशन, इन्स्पेक्टर स्टेडी. टेल यूवर लास्ट विश!" कर्नल रिव्हाॅल्व्हर रोखत म्हणाले.
"कर्नल, अवर नॅशनल एंथेम." श्याम त्यांच्या कानात कुजबुजला.
क्रमशः
श्यामची आयडिया कामी येईल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा