डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-३०
मागील भागात:-
'शाॅक ट्रिटमेंट' ऐकताच सयाजी घाबरून वाकले आणि आवंढा गिळत काॅटवर बसले.
"कम कर्नल!" ती हळू आवाजात म्हणाली.
"नो.. नो.. फाॅर शाॅक ट्रिटमेंट, कर्नल सयाजी इज नॉट कमिंग!" ते खांद्यावरील हातात काठी घेत घाबरलेल्या सूरात म्हणाले.
आता पुढे:-
"कम कर्नल!" दुर्गा पुन्हा दबक्या आवाजात म्हणाली.
"नो… नो… कर्नल रेडी फाॅर वॉर, बट नॉट फाॅर शाॅक!" सयाजी घामाघूम होत म्हणाले.
दुर्गा थोडी पुढे झुकली. तिचा चेहरा अचानक गंभीर झाला.
"अहो, कर्नल हे सगळे मागे लागतील म्हणून मी खोटं बोलले." दुर्गा हळू आवाजात सयाजींना म्हणाली.
"ऑ.. खरंच!" आवासून तिला डोळे करून बघू लागले.
"अहो कर्नल, आज आपल्या देशावर खूप मोठी आपत्ती येणार आहे." ती हातवारे करून गंभीर स्वरात म्हणाली.
"आपत्ती! कसली आपत्ती?" त्यांनी गंभीर होऊन तिला विचारले.
"हो कर्नल, आपल्या कॅप्टन श्यामवर एनिमी अटॅक करणार आहेत." ती पुन्हा गंभीर होत म्हणाली.
"व्हाॅट ! माय फ्रेंड श्याम इज इन डेंजर. त्याच्यावर अटॅक होणार आहे. नो नो.. कर्नल हिअर देन देअर इज नो फियर. कर्नल इज कम..जय हिंद!" ते संतापाने म्हणत उठले आणि तिच्या बरोबर बाहेर आले. ते दोघेही गाॅर्ड आणि वाॅचमनची नजर चुकवत श्यामच्या रूमजवळ आले.
"कर्नल, कम कम.. ते पाहा कॅप्टन श्याम झोपले आहेत. त्यांना उठवून सांगा, एनिमी अटॅक करणार आहेत म्हणून. जा लवकर!" दुर्गा झोपलेल्या श्यामकडे हात करत त्यांना म्हणाली.
"हो, हो.." म्हणत ते खांद्यावरील काठी बंदूकीसारखी समोर रोखत सावध पवित्रा घेत श्यामला उठवायला गेले.
त्यांनी हळूच काठी त्याला टोचवली. तेव्हा श्याम झोपेतून दचकून जागा होऊन ओरडला,"आहऽऽ.."
"वेड्यासारखी स्वप्न पडत आहेत. स्वप्नात पण पेशंटच दिसत आहेत." तो उठून बसत पुटपुटला आणि पुन्हा झोपी गेला.
"शुक..शुक.. कॅप्टन श्याम, एनिमी अटॅक, वेक अप!" सयाजी हळू आवाजात म्हणत त्याला खांद्याला धरून हलवून उठवू लागले.
पण तो झोपेत होता. तो उठत नाही हे पाहून ते पुन्हा त्याला आवाज देत उठवू लागले.
तेव्हा श्याम डोळे किलकिले करून कपाळावर आठ्या पाडत वैतागत स्वतःशी म्हणाला,"अरे, देवा! हे स्वप्न नाही, खरेच आहे. हे पळून आले आहेत वाटतं."
"कॅप्टन श्याम! एनिमी अटॅक!" सयाजी सावध पवित्रा घेत हळू आवाजात म्हणाले.
"हो बाबा! तुमच्या सोबत अजून कोण कोण नजर चुकवून पळून आलेत, ते सांगा?" श्यामने वैतागत आळसवलेल्या सुरात विचारले.
"ओ कॅप्टन श्याम, इंडिया इज इन डेंजर!" कर्नल आगतिकतेने म्हणाले.
"माय स्लिप इज इन डेंजर! फादरांची स्लिप पण डेंजर झाली ना तर माझी चामडी सोलून वाळत घालतील." श्याम वैतागून बडबडला.
"ओ कॅप्टन, यू कम.." ते त्याचा हात धरून जबरदस्तीने काॅटवरून उठवून उभा केले आणि त्याच्या हातात काठी देत म्हणाले,"होल्ड द गन!"
श्यामच्या झोपेचं खोबरं झालं म्हणून तो खूप वैतागला तरी त्याने ती हातात घेतली.
त्याला बाजूला करून सयाजीने त्या काॅटवर दोन उभ्या उश्या ठेवल्या आणि त्यावर पांघरूण ओढले. ते पाहून श्यामने त्यांना विचारले,"अहो कर्नल, असे काय झोपवल्यासारखे सेटअप केलाय?"
"यू स्लिपिंग, एनिमी अटॅक!" ते त्यावर बोट टेकवत गंभीर होतं म्हणाले.
"काय एनिमी इज अटॅक, बोलता.. चला गपचिप .." तो चिडून ती काठी बंदूकीसारखी ताणत म्हणाला.
सयाजी घाबरून मागे सरकले. तेव्हा त्याने त्यांच्या दंडाला पकडून त्याच्या रूमवर नेले. तो सॅंडो बनियन आणि शाॅर्ट घालून झोपला होता. म्हणून आधी कपडे बदलण्यासाठी तो रूममध्ये आला. त्यांना थोडावेळ शांत राहायला सांगून कसेबसे त्याने पॅन्ट शर्ट अडकवले व त्यांना त्यांच्या वाॅर्डमध्ये सोडायला नेऊन जात होता.
तोच नरेश आणि मंगेश हातातील काठी मागे लपवत येत असताना सयाजींना दिसले.
त्या दिशेने बोट करत सयाजी त्याला हळू आवाजात म्हणाले,"लूक एनिमी. कॅप्टन, आय अल्सो फाईट!" उत्साहाने हातातील काठी व्यवस्थित आनंदाने पकडले.
क्रमशः
नरेश आणि मंगेश यांचे मनसुबे उधळून लावेल का श्याम?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा