डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:- ३३
मागील भागात:-
तेवढ्यात एक कार हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली. तिच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने दोघांनीही डोळ्यांवर हात ठेवला.
प्रकाश बंद झाला आणि गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली. त्या व्यक्तीला पाहून श्यामने आवंढा गिळला.
आता पुढे:-
ती व्यक्ती फादर होती. फादर काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ते कारमधून उतरून टाॅक टाॅक असा बूटांचा आवाज करत तरतरा चालत त्यांच्याकडे आले. श्यामही दुर्गाला घेऊन त्यांच्याकडे यायला निघाला.
दोघेही आमनेसामने आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते.
त्यांनी त्याला विचारले,"काय रे, तुम्ही दोघे एवढ्या रात्री कुठे फिरत आहात?"
दुर्गा देहाला झोके देत हसत होती.
"फादर, ते कर्नल आणि ही दोघेही त्यांच्या वाॅर्डमधून निसटून आले होते." श्याम सांगत होता तोच त्यांचे सांगणे दुर्गाने तोडले.
"नाही फादर, हाच म्हणाला की तुला काहीतरी इम्पाॅर्टंट दाखायवायचे आहे म्हणून घेऊन आला." दुर्गा लहान मुलासारखा चेहरा करून डोकं खाजवत म्हणाली.
"नाही..नाही.. फादर, तसं काही नाही..ए डोक्यावर पडलीस काय? काय पण काय सांगतेस." तो तिला रागावत म्हणाला आणि पुन्हा फादरकडे पाहत म्हणाला," फादर, ही आणि कर्नल दोघेही निसटले होते. त्या कर्नलला त्यांच्या वाॅर्डमध्ये सोडून आलो. आता हिला हिच्या वाॅर्डमध्ये सोडायला चाललो होतो."
"असे कसे निसटले, गार्ड आणि वाॅचमन असताना? हे निसटून जाईपर्यंत काय ते झोपा काढत होते की काय? कुठे गेले ते सगळे?" फादर थोडे चिडत म्हणाले.
"ते प्यायला अं.. म्हणजे चहा पिण्याच्या वेळेत निसटून आल्याचे वाटते, फादर." श्याम बाकी काही न सांगता म्हणाला.
"किती इरिस्पॉन्सिबल आहेत ते. बाकी पेशंट आहेत ना जागेवर?" फादरने काळजीने विचारले.
"अम्म, परत एकदा जाऊन चेक करून बघतो, फादर." श्याम फादरांना दिलासा देत म्हणाला.
"बरं, चेक करून बघ एकदा." फादर म्हणाले.
"हो बघतो, फादर." तो त्यांना म्हणाला.
फादर निघून गेले. ते जाताच श्याम दुर्गाला ओढत वैतागत म्हणाला,"ए पोरे, चल."
दोन दिवसांनी-
दुपार होत आली तरी दुर्गा जेवली नाही हे कळल्यावर श्याम तिला शोधत होता.
ती एका झाडाच्या पारावर मांडी घालून झाडाला टेका देऊन उदास एकटीच बसली होती.
तो कमरेवर हात ठेवून इकडे तिकडे पाहत म्हणाला,"कोठे गेली ही पोरगी?"
त्याचा आवाज कानांवर पडताच तिने स्वतःला नाॅर्मल केले आणि मोठ्याने बोटे मोजू लागली.
"अठरा..एकोणीस..तीस.." असे म्हणत ती मागे पुढे डुलत होती.
तिचा आवाज येताच त्याने तिच्याकडे पाहिले आणि हसत तिच्याजवळ आला.
"ए, तू इथे आहेस होय. कधीपासून मी तुला शोधतोय? सगळे दुपारच्या जेवणाला आले. तुला काय झालं न जेवायला? तू का नाही आलीस जेवायला?" तो पारावर एक पाय ठेऊन गुडघ्यावर हात ठेवून थोडं झुकतं म्हणाला.
"मी कोणासाठी जेवू? कोण आहे मला विचारायला?" ती उदास होत ओठ आकसून घेत म्हणाली.
"असं का बोलतेस गं? कोणी कसं नाही तुला? मी त्या दिवशी पण सांगितले होते ना. मी आहे ना तुला.." तो स्वतःकडे हात करत मायेने म्हणाला.
"खोटं बोलतोस तू! माझ्याकडे पाहायला कोणालाच आवडत नाही." ती गाल फुगवून रडका सूर लावत म्हणाली.
क्रमशः
कसे मनवेल श्याम दुर्गाला? ती ऐकेल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा