Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-३४)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:- ३४

मागील भागात:-

"असं का बोलतेस गं? कोणी कसं नाही तुला? मी त्या दिवशी पण सांगितले होते ना. मी आहे ना तुला.." तो स्वतःकडे हात करत मायेने म्हणाला.

"खोटं बोलतोस तू! माझ्याकडे पाहायला कोणालाच आवडत नाही." ती गाल फुगवून रडका सूर लावत म्हणाली.

आता पुढे:-

"तसं नाही गं बाई, तुझ्याकडे पाहायला मला खरंच खूप आवडते." तो हसत तिला म्हणाला.

"खरंच!" तिने तिच्या टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप करत विचारले.

"हो बाबा, अगदी खरं! मी खूप मनापासून सांगतोय. गाॅड प्राॅमीस!" तो गळा चिमटीत पकडून म्हणाला.

"हुं" ती हुंकारली.

"चल आता जेवायला." तो तिला म्हणाला.

"अम्म हुं, असं नाही. आधी मला माझी राणी म्हण." ती लाडिक हट्ट करत म्हणाली.

"बरं..माझी राणी." तो म्हणाला.

"ए छी ! असं म्हणतात का? ए किती बकवासपणे म्हणतोस तू. जरा प्रेमाने, मायेने म्हण की." ती फुगी चेहरा करत म्हणाली.

"बरं..माझी रा..णी," तो मायेने सूर लावत म्हणाला.

"माझी शोना म्हण." ती म्हणाली.

"माझी शोना.." तो.

"माझी टाॅ..मी म्हण," ती पुन्हा लाडात सूर लावत येत म्हणाली.

"थू! अगं ए , टाॅमी काय टाॅमी.. टाॅमी नको." तो तोंड वाकडे करत म्हणाला.

"का?" ती डोळे वर करून म्हणाली.

"का म्हणजे? अगं टाॅमी हे कुत्र्याचं नाव असतं. तुला म्हणताना कसं वाटलं ते?" तो हसत म्हणाला.

"असू दे, त्याला काय होतंय? मायेने, लाडाने काय पण नाव ठेवू शकतो ना आपण." ती नाक गोळा करत म्हणाली.

"हम्म, बरं बाई म्हणतो, माझी टाॅ..मी." तो शरणागती पत्करून म्हणाला.

"माझी पिल्लू म्हण." तिची मागणी वाढली.

तो एकदम दचकलाच.

"अगं ए, काहीही काय? कसे वाटेल ते? मी नाही म्हणणार." तो ऑकवर्ड फिल करून म्हणाला.

"का, काय होतंय? का नाही म्हणणार? लहान मुलांना म्हणत नाहीत का?" ती म्हणाली.

"हो, लहान मुलांना म्हणतात पण.." तो कपाळावर बोट रब करत वैतागून म्हणाला.

"हा, मग मीपण लहान आहे ना, मग म्हण ना." ती पुन्हा गाल फुगवून म्हणाली.

"हे बघ हे शेवटचे, या नंतर काही म्हणायला सांगायचे नाहीस." तो सुस्कारा सोडत दटावत म्हणाला.

"हो." ती.

"माझी पिल्लू, चल आता." तो इकडे तिकडे बघत पटकन म्हणाला.

"ए व्याॅक! असं म्हणतात का? जरा प्रेमाने, मायेने म्हण. अशी हनवुटी हातात पकडून, हलवत (स्वतःची हनवुटी हातांच्या बोटांनी पकडून डुलत) जरा लाडाने माझी पिल्लू म्हण." ती हसत म्हणाली.

"ही पोरगी एखाद्या दिवशी मला खरंच सुळावर देणार असंच वाटतं? असे कसे वाग म्हणतेय?" मनात कपाळावर हात मारत तो म्हणाला.

"माझी पिल्लू, ठीक आहे, चल आता." तो तिच्या हनवुटीला हातांच्या बोटांनी पकडून हलवत प्रेमाने म्हणाला आणि पटकन पारावरचा पाय खाली ठेवत मागे फिरला.

समोर फादर हात मागे बांधून त्या दोघांना उभे होते.

ती तोंडात बोट धरून हसत होती.

क्रमशः

काय असेल फादर यांची प्रतिक्रिया?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all