Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-३६)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नाते? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-३६

मागील भागात:-

फादर दुर्गाचा फोटो काढून पब्लिसिटी करण्याचे मत व्यक्त केले. त्यावर श्यामने तिच्या घरच्यांनी तिच्या भविष्याचा विचार करून तिचा फोटो पब्लिक केला नसेल. आपण केला तर तिच्यासाठी प्रश्न निर्माण होतील असे मत व्यक्त केले.

आता पुढे:-

श्याम ज्या कळकळीने त्याचे मत व्यक्त केले. ते फादरा यांनाही पटले. ते सहमत दर्शवत एस. पी. यांना म्हणाले,"येस, श्याम इज राईट. श्याम म्हणतो त्यात खरंच तथ्य आहे. खरंच की या दृष्टीने आम्ही विचार केलाच नव्हता. माफ करा, सर. तुम्हाला तसदी झाली. तुम्ही त्या मुलीचा भल्याचा विचार केला होता. पण श्याम बोलला तेही बरोबरच आहे."

"माफी कशासाठी, फादर? तिच्या भविष्याचा विचार आपल्या मनात आलाच नाही जे या पोराच्या मनात आलं. खूप गुणाचा मुलगा आहे, श्याम." स्मित करत एस. सी. श्यामकडे कौतुकाने पाहत फादर यांना म्हणाले.

"श्यामसारखा स्टाफ आहे म्हणून मी निश्चिंत आहे. फार मनापासून तो त्याची ड्युटी करतो. सगळ्या पेशंटांची अगदी घरच्यांसारखी काळजी घेतो. कौतुक करावा असाच हा आहे. ही मेकस मी व्हेरी प्राउड!" फादर श्यामच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जवळ घेत म्हणाले. बोलताना त्यांची छाती अभिमानाने भरून आली होती.

"फादर, मी तुमच्या कामी आलो. यातच मला आनंद आहे. तुमच्या समाजसेवेपुढे माझे योगदान शून्यच आहे. बस मी खारीचा वाटा उचलला. पेशंटची सेवा करण्यात मला आनंद मिळतो." श्याम हळवं होतं म्हणाला.

फादरही भावूक होत त्याला गळ्याशी लावून घेतले.

अशातच काही दिवस निघून गेले. एके दिवशी फादरने श्यामला पेशंटची प्रोग्रेस जाणून घ्यायला बोलवले. त्याच्या आधीच दोन डॉक्टर त्यांच्यासमोर येऊन बसले होते.

"आय थिंक पवन इज ऑल राईट आणि डाॅक्टरही म्हणत आहेत की तो ठीक आहे. तर त्याला घरी पाठवून देऊ.‌ काही अडचण आली तर आपल्याशी काॅन्टॅक्ट करतील."  फादर त्याला म्हणाले.

"नको, फादर." श्याम म्हणाला.

"का?" फादरने विचारले.

"आताच त्याला बघून आलो. त्याने नेहानर्सच्या डोक्यात ग्लास फेकून मारण्याचा प्रयत्न केला." श्याम म्हणाला.

"का बरं?" फादरांनी कपाळावर आठ्या पाडत विचारले.

"ती कोणालातरी तीन महिने झाले असे सांगत होती. त्याला काय झालं माहिती नाही, एकदम तीन असे मोठ्याने उच्चारत, रागाने तिच्या दिशेने ग्लास भिरकावला." श्याम सांगत होते.

नेहानर्सचे नाव ऐकताच डाॅक्टर मोहिते ताडकन उठून उभे राहिले आणि घाबरून विचारले," काय! नेहाला काही झाले तर नाही ना."

"नाही डाॅक्टर, तिला काही नाही झाले. ती ठीक आहे. तिने त्याचा वार चुकवला." श्यामने सांगितले तेव्हा त्यांनी छातीवर हात ठेवून सुस्कारा सोडत म्हणाले,"हं, बरं झालं."

"फादर, ती जी मुलगी जिला एस. पी. यांनी इथे ॲडमिट केले होते. श्यामने तिचे नाव दुर्गा ठेवले आहे. ती एकदम ठीक आहे. तिला डिस्चार्ज देण्यास काहीच हरकत नाही." डाॅक्टर सुवर्णा म्हणाली.

"हो फादर, मलाही तसंच वाटतं. कधीतरी  तरी वेड्यासारखे करते. नाही तर तिचं बोलणं, वागणं आणि चालणं सगळं व्यवस्थित आहे." श्यामनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"तू म्हणतोस ते ठीक आहे श्याम; पण ती मुलगी कोण कुठली याबद्दल काहीच माहिती नाही. त्यात तिला शोधत कोणीच आले नाही. मग?" फादर यांनी प्रश्न उपस्थित केला.

"मी एक सुचवू का, फादर?" श्याम परवानगी मागत म्हणाला.

"हा, बोल ना." फादर म्हणाले.

"एस. पी. सरांनी तिला इथले होते ना." तो म्हणाला.

फादरने हुंकार भरला.

"मग तिला त्यांच्याच घरी ठेवून घ्यायला सांगू. काही प्राॅब्लेम आला तर इथे आणून तिची ट्रीटमेंट करू." श्यामने सुचवले.

"येस येस.."  असे म्हणत फादर अजून काही तरी बोलणार होते तोच कोणीतरी मोठ्याने गाणी म्हणण्याचा आणि काही तरी वाजल्याचा मोठ्याने आवाज आला.

क्रमशः

कोण गाणं म्हणत असेल ? दुर्गा एस. पी. च्या घरी जाईल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे

0

🎭 Series Post

View all