डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-४४
मागील भागात:-
फादर त्याच्या चारित्र्यावर शंका घेत होते. हे दुर्गाला सहन झालं नाही. फादरच्या बोललण्याने श्यामचा चेहरा पडला.
तिच्या काळजात कसं तरीच झालं. डोळे भरून आले. तिने दाराच्या सळया हाताच्या मुठीत घट्ट आवळून धरल्या आणि मनात काहीतरी निर्धार केला.
तिच्या काळजात कसं तरीच झालं. डोळे भरून आले. तिने दाराच्या सळया हाताच्या मुठीत घट्ट आवळून धरल्या आणि मनात काहीतरी निर्धार केला.
आता पुढे:-
सूर्य मावळतीकडे झुकला होता. आकाशात केशरी-गुलाबी छटा पसरल्या होत्या. दिवसभराच्या धावपळीने थकलेली झाडंही जणू निवांत श्वास घेत होती. थंडगार वाऱ्याची हलकी झुळूक अंगावर येत होती. पक्षीही किलबिल करत आपल्या घरट्याकडे परतत होती. हाॅस्पिटल आवारात हळूहळू दिवे लागायला सुरुवात झाली होती आणि चर्चच्या घंटानादाने परिसरात एक पवित्र शांतता पसरली होती. संध्याकाळची प्रार्थना करून फादर माघारी फिरत होते.
मनात निर्धार केल्याप्रमाणे दुर्गा मान खाली घालून हळूहळू पावले टाकत चर्चमध्ये आली. तिला अचानक चर्चेमध्ये पाहून फादर चकित झाले. पण त्यांच्याकडे न पाहता ती कन्फेशन बूथमध्ये शिरली.
ती तिथे गेली हे पाहून फादर गळ्यात जांभळ्या रंगाचा ज्यावर सोनेरी रंगाचे क्राॅस असलेले स्टोल गळ्यात घातले आणि कन्फेशन बूथकडे आले.
तिथे आत अंधुक प्रकाश होता. दुर्गा दोन्ही गुडघ्यावर बसली आणि दोन्ही हात एकमेकांत गुंफून बूथच्या बाकावर ठेवले.
समोर जाळीपलीकडे असलेल्या खुर्चीवर फादर शांतपणे बसले होते.
धीट एकवटून दुर्गा सांगू लागली,"मी आजपर्यंत वेड्याचं नाटकं करत होते त्यासाठी मी तुमची माफी मागते, फादर."
ती वेडी नव्हती, वेडेपणाचं नाटक करत होती हे ऐकून फादरांना धक्काच बसला.
"बाकी लेडीज पेशंटांशी श्याम जसा वागत होता, तसाच तो माझ्याशीही तसाच वागत होता. त्यानेही कधीही वाईट भावनेने पाहिले नाही की स्पर्शही केला नाही. मी आई होण्यास तो कुठेच कारणीभूत नाही, फादर." तिने रडत सांगितले.
हा फादरांसाठी अजून एक धक्का होता. हा धक्क्याने त्यांची पाठ आणि डोके मागे टेकले गेले. त्यांचे डोळे भरून आले आणि तोंडातून आपसूकच "ओह! जेजेस" असे पुटपुटले.
ती तिचा भूतकाळ सांगू लागली. ती हाॅस्पिटलमध्ये येण्यापूर्वी तिच्या आयुष्यात काय घडले ते ती सांगू लागली.
दुर्गाचे खरे नाव दुर्वा होते. ती आईवडिलांची एकुलती एक आणि गर्भश्रीमंत मुलगी होती. ती खूप सुंदर, सालस, संस्कारी आणि पदवीधर होती.
लहानपणीच एका अपघातात तिने तिच्या आईवडिलांना गमावले होते. तिचे पालनपोषण तिच्या विधवा असलेल्या आत्या विमलने केला होता. तिला एक मुलगा होता, अभय. पतीच्या निधनानंतर दुर्गाच्या आईवडिलांनी विमल आणि अभय यांना थारा दिला होता.
तिच्या आईवडिलांनंतर विमलने खूप मायेने तिचा सांभाळ केला. तिला कधीच तिच्या आईवडिलांनी कमी भासू दिली नाही. त्यामुळे दुर्वाही तिच्यावर प्रेम करत होती. तिच्यावर डोळे झाकून तिने विश्वास ठेवला.
वयात आल्यावर दुर्वा खूपच सुंदर दिसत होती. त्यामुळे अभय तिच्या सुंदरतेवर भाळला होता. लहानपणापासूनच त्याला ती आवडत होती. तो तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होता. पण तिच्या मनात त्याच्याबद्दल काहीच नव्हते. ती फक्त त्याला आत्याचा मुलगा मानत होती.
एके दिवशी दुर्वा फुलदाणीत फुले समजवून उरलेली फुले घेऊन चालली होती. अभय तिथेच सोफ्यावर पायांवर पाय टाकून ऐटीत बसून सिगरेटचे झुरके घेत होता. सोबत तिला रोखून पाहतही होता. त्यांची नजर तिला आवडायची नाही. ती त्याला बोलायचेही टाळत होती.
तिचे तारुण्यसुलभ सौंदर्य पाहून तिला मिळवण्याची सुप्त इच्छा त्याच्या मनात जागी झाली.
जाणाऱ्या तिला थांबवत तो म्हणाला,"दुर्वा, थांब. जरा इकडे ये."
त्याच्या आवाजात एक हुकमीपणा होता. तिला जायचे नव्हते पण सकाळी-सकाळी तिला मूड खराब करायचा नव्हता. म्हणून ती अनिच्छेने त्याच्याजवळ गेली.
त्याच्याकडे न पाहताच थोडी चिडतच ठसक्यात तिने विचारले,"काय काम आहे? कशाला बोलावलेस तू?"
तो उठून उभा राहिला आणि खिशातून एक कागद काढून तिच्या पुढे करत म्हणाला,"हे वाच."
क्रमशः
काय दिले असेल अभयने दुर्वाला?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा