Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-४८)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी अनपेक्षितपणे लग्नाची गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं, जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-४८

मागील भागात:-

"माय स्वीट हार्ट..सकाळी जेव्हा तू जागी होशील तेव्हा बाॅम्ब फुटलेला असेल. बूम ऽऽ.."

तो उठला आणि तिच्या अंगावर पांघरूण ओढले आणि स्वतःचे कपडे घालून तेथून विचित्र हसत निघून गेला.

आता पुढे:-

दुसऱ्या सूर्याची सोनेरी किरणे धरतीवरती प्रकाश पसरला. पण दुर्वाचे जीवनात मात्र अंधकार दाटून आला याची खबर तिला नव्हती.

सकाळी तिला थोड्या उशिरानेच जाग आली. पहिल्यांदा तिला जाणवलं ती थंडी. कारण पांघरूणाशिवाय तिच्या अंगावर काहीच नव्हतं.

क्षणभर तिला समजलंच नाही. डोळे चोळले. आजूबाजूला पाहिलं. तिचे स्वतःचे सगळे कपडे रूममध्ये विखुरलेले दिसले. ते पाहून तिचे डोळे भरून आले. मग तिची स्वतःकडे नजर गेली… आणि तिचा श्वास अडकल्यासारखा झाला.

हात झटकन छातीवर गेले.देह आकसून गेला. ती पांघरूण ओढून स्वतःला गुंडाळून घेत बसली. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की कानात आवाज घुमू लागला.
डोक्यात पहिला विचार चमकून गेला—
“माझे कपडे…?”

तेवढ्यात दार उघडून अभय हसत तिच्या रूममध्ये आला आणि म्हणाला,"गुड मॉर्निंग, स्वीट हार्ट. उठलीस तू?"

तिला पाहून तिने स्वतःला पांघरूनात अजून जरा गुंडाळून घेतले.

तो पुन्हा तिच्याकडे पाहत हसत म्हणाला,"ओह! साॅरी..तुझी तर बॅड माॅर्निंग झाली असेल ना गं."

ती खाली मान घालून बसली होती.

तोच तिला कडवट हसत म्हणाला,"काल रात्री तू तुझ्या रूममध्ये होतीस. आता माझ्या रूममध्ये आहेस. तर तुझ्या मनात प्रश्न पडला असेल ना की तू इथे कशी आलीस?"

तो आवरून डोळ्यांवर गॉगल चढवून आला होता. तो निर्लज्जपणे हसत म्हणाला,"लेट मी एक्सप्लेन..याची मदत घेऊन इथे आलो. हे बघ.. ढॅंडॅंढांण.. " हातातील चाव्यांचा जुडगा खणखण करत तिला दाखवला.

ती डोळे वटारून त्याला पाहत होती.

"व्हाॅट अ ग्रेट नाईट! फंटॅस्टिक!" तो ओठ चावत उपहासाने हसत म्हणाला.

"तू चीज बडी हैं मस्त मस्त, तू चीज बडी हैं मस्त..टाॅक..उम्माह.." असे म्हणत एक खुर्ची ओढून तिच्या समोर आरामात त्यावर बसला.

ती थरथरत्या हातांनी स्वतःला झाकत रागाने लालबुंद झाल्याने मोठ्याने त्याच्या ओरडली,"You scoundrel!"

"अरेरे! पती परमेश्वर असतो. त्याला तोंडाला येईल ते अपशब्द बोलून त्याचा इनस्ल्ट बोलू नये गं." तो थोडा झुकत तिला पाहत म्हणाला.

ती रागाने थरथरत त्याला पाहत होती.

"काय झाले? कळलं नाही का? ओके सांगतो.. एक भारतीय मुलगी, तेही संस्कार, संप्रदाय जपणारी. तिचं जर शील हरण झालं असेल तर काय करेल ती. अम्म.. ऑप्शन एक- ती आत्महत्या करेल. ऑप्शन दोन- ज्याने तिचे शीलहरण केलं असेल त्याच्याच हात ती धरेल. हे दोन्ही ऑप्शन सोडले तर तुझ्याकडे आणखी तिसरा ऑप्शन आहे का?" त्याने गाॅगल काढून हात घेतला आणि खुर्चीवर उठू इकडून तिकडून येरझाऱ्या घालत म्हणाला.

तो एक पाय बेडवर ठेवून त्यावर ठेवत म्हणाला,"अं हुं..सो आता तुझ्याकडे वळूया. तू एक हुशार, बुद्धिमान मुलगी आहेस. त्यात धैर्याशीलही आहेस. तुझ्यासारखी मुलगी आत्महत्या करू शकणार नाही. नाही भेकड म्हणतील सगळे."

नंतर तिच्या जवळ येत निर्दयीपणे तिचे केस धरले. केसांना ओढ बसल्याने तिला सलू लागले. ती "आह ..ऽऽ " म्हणून विव्हळली.

केस तसेच घट्ट धरून तो दात ओठ खात तिला म्हणाला,"संध्याकाळपर्यंत तू लग्नाला तयार झालीच पाहिजेस. नाही तर .." त्याने कडक शब्दांत जवळजवळ धमकावले आणि डोळ्यांवर गॉगल चढवून तो ताडताड पावले टाकत तेथून निघून गेला.

तिचा मेंदू सुन्न आणि शरीर जड झालं होतं.
हळूहळू वेदना जाणवू लागल्या. कंबर, मांड्या… चालताना ओढल्यासारखं. पोटात अनाकलनीय वेदना होऊ लागल्या. कसं बसं स्वतःला सावरत तिने विखूरलेले कपडे घातले आणि कसं बसं तिच्या रूममध्ये आली.

आणि डायरेक्ट बाथरूम गाठले. स्वतःला शाॅवर खाली शांत करू लागली. थोड्यावेळाने आवरून ती रूम बाहेर पडली. विमलच्या कानांवर ती गोष्ट सांगावी असा विचार करून ती तिला शोधत होती.

"आत्या, आत्या.." विमलला आवाज देऊ लागली. पण तिचा प्रतिसाद मिळाला नाही.

मग ती हळूहळू जिना उतरून खाली येत होती. तेव्हा तिला विमल आणि गणू बोलत दबक्या आवाजात बोलत होते. ती त्याला नोटांची बंडल देत होती.

क्रमशः

विमल आणि अभय यांचे कारस्थान दुर्वाला कळेल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all