डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-४९
मागील भागात:-
"आत्या, आत्या.." विमलला आवाज देऊ लागली. पण तिचा प्रतिसाद मिळाला नाही.
मग ती हळूहळू जिना उतरून खाली येत होती. तेव्हा तिला विमल आणि गणू बोलत दबक्या आवाजात बोलत होते. ती त्याला नोटांची बंडल देत होती.
आता पुढे:-
आत्या म्हणून निघणारा दूर्वाचा आवाज घशातच अडकला आणि जिन्याच्या मधल्या पायरीवरच ती थबकली.
विमलच्या हातातल्या नोटांच्या बंडलवर तिची नजर खिळली.
क्षणभर तिला वाटलं — आपण चुकीचं पाहतोय. पण गणू नोटा घेऊन घाईघाईने खिशात घालत विचारले," बाईसाहेब, इतके सगळे पैसे कशाला देत आहात? "
"हे बघ, आपल्यातल्या पाच-सहा जणांना जमा कर. त्यांना प्रत्येकी हजार-दोन हजार रुपये देऊन आपल्या गावातल्या एम. एल. ए. घरी यायला सांग." विमल गणूला दबक्या आवाजात सूचना देत होती.
दुर्वा हळूवार पावले टाकत जिना उतरून खाली येत होती. विमल बोलणे तिच्या कानावर पडत होते.
ती दाराच्या आड उभी राहून सगळं ऐकत होती.
"तुमच्या मुलाने म्हणजे अभय सरांनी ताईसाहेबांचे आयुष्य का खराब केले?" गणूने मनातील प्रश्न विचारला.
तो खूप जुना विश्वासू नोकर होता. त्यामुळे ती कमरेवर हात त्याला म्हणाली,"अरे वेड्या, त्या दुर्वाला लग्न कर म्हणून माझा मुलगा किती मागे लागला होता. मीही अप्रत्यक्षपणे तिला समजावत होते; पण ती होती की लग्न करायला सपशेल नकार दिला. ती कशालाच जुमली नाही. (डोळे मोठे करून नाक फुगवत )मग मीच डोकं चालवलं. दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करुन दिले. त्याच संधीचा फायदा घेऊन तिच्यासोबत मधुचंद्राची रात्र साजरी करायला सांगून डाव हातात घ्यायला मीच सांगितले." ती मोठ्याने हसली.
नंतर कपटी हसत पुढे म्हणाली,"अशा ती एक शील गमावलेली मुलगी आहे. हा विषय गावच्या पंचायतीमध्ये गेला तर सगळा गाव तिच्यावरच बोटं उचलून हसेल आणि ज्याने तिचे शीलहरण केले. त्याच्यासोबत लग्न करायचे आदेश पंचायत सुनावेल. तेव्हा तिला त्यांचं ऐकावंच लागेल. काहीच करू शकणार नाही ती. हुं.."
तिच्या प्लॅनवर तिला अति आत्मविश्वास होता. त्यामुळे पदराला झटका देत ती उपहासाने हसली.
तिचे बोलणे ऐकून दुर्वाच्या हृदयात जोरात काहीतरी तुटल्यासारखं झालं.
“म्हणजे… सगळं ठरवून केलं गेलं होतं?”
“म्हणजे… सगळं ठरवून केलं गेलं होतं?”
मनात काल रात्रीपासूनचे तुकडे जुळू लागले
दुधाचा आग्रह…गणूचा हट्ट…दाराची कडी…
आणि अभयच्या हातातला चाव्यांचा जुडगा…
दुधाचा आग्रह…गणूचा हट्ट…दाराची कडी…
आणि अभयच्या हातातला चाव्यांचा जुडगा…
तिचे ओठ थरथरले. 'हे अपघात नव्हतं…हा कट होता.'
ती लगेच मागे सरकली. पायांना जोर नव्हता, पण मनात एक आग पेटली होती.
तिचे डोळे वाहत होते. पण डोळे पुसत तिने मनात निश्चय केला,"मी आत्ता काहीही बोलणार नाही. रडणार तर बिलकुल नाही. आणि कोसळणारही नाही."
तिच्या डोळ्यांसमोर झाडं कापायची कात्री पडली होती. तिने ती पटकन उचलून मागे लपवली आणि दाराआड तशीच उभी राहिली.
"तू जा आता. सांगितलेले काम तेवढं कर. जा पटकन." विमल आजूबाजूला कानोसा घेत गणूला जायला सांगितले.
तो निघून जाताच ती गर्रकन मागे फिरून आत आली.
दाराआड दुर्वाला पाहून ती चाचपली. दुर्वा भरलेल्या डोळ्यांनी तिला पाहत होती.
विमल ओढूनताणून हसू आणत तिला म्हणाली,"दुर्वा बाळा, तू इथे कशी? अगं ते.."
"का केलेस गं असे? काय चुकलं माझं? तुला आईचा दर्जा दिला ही चूक झाली का माझी? " दुर्वाने कळवळून विचारले.
"अगं, काय बोलतोस तू? मी आईचं आहे की तुझी?" ती तिच्याजवळ जात होती तोच दुर्वाने पाठीमागे लपवलेली कात्री समोर केली आणि रागाने पाहत म्हणाली,"खबरदार! पुन्हा तू माझी आई आहेस म्हणालीस तर.. तू त्या नीच मुलाची आई आहेस. पुढे येऊ नकोस, नाही तर ही कात्री तुझ्या पोटात खुपसेन."
"ए वेडी झाली का तू? काहीही काय बोलतेस? पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आता तुला सगळं कळलं आहेच तर चल हो तयार, माझ्या पोराशी लग्न करायला. असंही इज्जत गमावलीच आहेस तू. माझ्या पोराशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीच आहे." विमल विक्षिप्त हसत पुढे येत म्हणाली.
"ए मागे हो म्हणाले ना मी. नीच आहात तुम्ही दोघेही. तुझ्या तर.." दुर्वा तिच्यावर जोरात ओरडली. तिच्या डोळ्यांत रक्त संचारलं होतं. तिचे हात थरथरत होते पण तरीही पूर्ण ताकदीनिशी ती कात्री घट्ट पकडून तिच्यावर धावून आली.
क्रमशः
दुर्वा विमलला मारेल का? काय होईल पुढे?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा