डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-४
मागील भागात:-
तो हात मागे घेत म्हणाला,"नो... असं नाही मिळणार चाॅकलेट. आधी औषध मग चाॅकलेट!" तो टॅबलेट तिच्या समोर करत म्हणाला.
आता पुढे:-
"शी! व्याॅक ! हे औषध कडू लागते. मी नाही खाणार." ती वेडंवाकडं तोंड करत लहान मुलासारखी त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"ठीक आहे. जाऊ दे मग. मी हे चाॅकलेट त्या नर्सलाच देतो." तो जाण्याचे नाटक करत दोन पावलं मागे सरकत म्हणाला.
"ए तिला का बरं देतोस?" ती चिडून म्हणाली.
"हे माझे चाॅकलेट आहे ना. ते मलाच पाहिजे. ठीक आहे दे.. ते औषध खाते मी. पण तू नक्की मलाच देणार ना चाॅकलेट? आधी प्राॅमीस कर तू." ती हाताचा तळवा पुढे करत पापण्या फडफडत नाखुशीने म्हणाली.
"प्राॅमीस!" तो तिच्या हातावर हात ठेवून हसत म्हणाला.
तिने तोंड कसंनुस करत औषध घेतले, पाणी पिले आणि चाॅकलेटसाठी त्याच्यासमोर हात केला.
"गुड गर्ल!" म्हणत हसत त्याने तिला चाॅकलेट दिले. तोंडाला लागलेले पाणी रूमालाने पुसले.
ती आनंदाने मिटक्या मारत चाॅकलेट खाण्यात गुंग झाली. पण ते खाताना तिने पूर्ण तोंड भरवून घेतले होते. हाताच्या बोटांना लागलेलं चाॅकलेट ती जीभेने चाटत होती. तो नकारार्थी मान भिंतीला टेका देऊन तिला पाहत होता.
तिचे खाऊन झाल्यावर तिने जीभ ओठांवर फिरवले. रॅपरवर लागलेले ती चाटू लागली तेव्हा त्याने हातातून काढून घेतले. ती रागाने त्याला पाहू लागली.
ती पाय आपटत गाल फुगवून त्याला म्हणाली,"मला अजून चाॅकलेट पाहिजे."
"बास झालं, उद्या आणून देतो. चल आता तुझे तोंड साफ करू. कपड्यावर पण सांडून घेतलेस तू, वेडाबाई!" तो सहज हसत तिच्या हाताला धरत तिला म्हणाला.
"जा, तू पण मला वेडी म्हणालास. मी नाही तोंड साफ करणार." ती त्याचा हात झटकत म्हणाली आणि हाताची घडी घालून रूसून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली.
तिच्या या कृतीने त्याला हसायला आलं. त्याने कपाळावर दोन बोट घासली. हळूच तिच्यासारखं गाल फुगवून तिच्यासमोर आला. तशी तिने पुन्हा त्याला पाहून तोंड फिरवून घेतले.
"ए दुर्गा, साॅरी ना. मी लाडाने वेडूबाई म्हणालो. पुन्हा नाही म्हणणार. उद्या मोठं चाॅकलेट आणतो." तो तिच्या समोर येत दोन्ही हात फैलावत म्हणाला.
"प्राॅमीस ना!" तिने एक भुवई उंचावत तिरके पाहत विचारले.
"हो, बाबा." तो हसत म्हणाला.
"मग कान धरून साॅरी म्हण." ती नाक गोळा करून म्हणाली.
तो कान धरून साॅरी बोलला. तेव्हा कुठे ती हसली आणि तोंड साफ करून द्यायला तयार झाली. तेव्हा त्याने सुटकेचा निःश्वास टाकला.
तिचे तोंड साफ केल्यावर तो तिथे काम करणाऱ्या मावशीला तिला अंघोळ घालून कपडे घालायला सांगितले आणि तो त्याच्या कामाला निघून गेला.
तो हाॅस्पिटलच्या आवारात असलेल्या स्टाफ हाऊसमध्ये राहत होता. कधी कोणाला इमर्जन्सी लागली तर पटकन जाता येईल हा त्यामागील उद्देश होता.
दिवसभराच्या कामातून तो तिच्याकडे आवर्जून लक्ष देत होता. तिचं खाण, पिणं औषध गोळ्या याकडे तो जातीने लक्ष देत होता. तो तिचे सर्व काही मनापासून करत होता. तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याने तो तिला सोबत ठेवू शकता. पण तिची काळजी घेत होता.
रात्र झाली, तिला जेवणं भरवून झोपी घातले. ती झोपल्याची खात्री झाल्यावर तिच्या अंगावर पांघरूण टाकले आणि दाराला बाहेरून कुलूप लावले. तिथल्या गार्डला लक्ष द्यायला सांगून तो त्याच्या रूममध्ये आला. त्याचे जेवण झाल्यावर तो अंथरूणावर लवंडला. आजचे तिचे लहान मुलासारखे रुसणे आठवून त्याला हसू आले.
ती इथे आली तो दिवस त्याला आठवला.
क्रमशः
कोण ही दुर्गा? ती इथे कशी आली?
©️जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा