डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-५२
मागील भागात:-
फादर हात मागे बांधून किंचित हसत पुढे येत म्हणाले,"हे बघ बाळा, जसं तुझं मन तुला साक्ष देतंय तसंच माझंही मन मला साक्ष देतंय की सत्य काय ते श्यामला सांगून तुम्हा दोघांना एकत्र करणे, माझं कर्तव्य आहे. चल माझ्यासोबत."
आता पुढे:-
"थांबा, फादर. कन्फेशन बूथमध्ये सांगितलेलं सत्य हे पापाची कबुली देणं किंवा प्रायश्चित्त असतं ना? ते गुपितही असतं ना, फादर. मग अशी गोष्ट तुम्ही बाहेर सांगणं गॉडला स्वीकृत असेल का?" दुर्गाने फादरला विचारलं.
फादरचा चेहरा उतरला. ते आवंढा गिळत तिच्याकडे पाहिले.
तिने त्यांच्या फादर असण्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने त्या कोंडीत त्यांना चांगलेच पकडले आणि ते निःशब्द झाले.
"स्वीकृत नसेल ना, फादर. येते मी." असे म्हणत ती निघून गेली.
तिला जाताना बघण्याशिवाय फादर काहीच करू शकले नाहीत.
दुसरा दिवस उजाडला. श्याम नेहमीप्रमाणे ड्युटीवर आला. एका पेशंटचा भाऊ तिच्या बहिणीसाठी खाऊ घेऊन आला होता. ते तो घेऊन चालला होता. तेव्हा फादरने त्याला आवाज देऊन बोलावले. तो खाऊ तसंच हातात धरून तो त्यांच्याकडे निघाला.
फादर दुर्गाच्या वाॅर्डजवळ उभे होते. ती त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती.
ते स्मितीत नजरेने तिच्याकडे पाहत होते.
श्याम त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,"बोला, फादर."
श्यामला आलेलं पाहून दुर्गा पाठ फिरवून निर्विकार उभी राहिली.
फादर तिच्याकडे पाहत म्हणाले,"हिचा मायनर असा प्राॅब्लेम आहे. मग हिला घरी ठेवून, काही प्राॅब्लेम आला तर लगेच इथे आणून ट्रिटमेंट करू. असे या आधी आपण डॉक्टरांशी डिस्कशन केले होते ना."
"हो, फादर." श्याम उद्गारला.
"हे मी तुला का सांगतोय असा प्रश्न विचारण्याआधीच मी तुला सांगतो..मग ऐक..आता ही तुझी बायको आहे. एवढ्या सगळ्या पेशंटसोबत राहण्याऐवजी ती तुझ्यासोबत राहिलेलं चांगल असेल ना." फादर मंद स्मित करत म्हणाले.
दुर्गा खिडकी जवळ उभी होती. तिच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिने खिडकीचे ग्रील घट्ट पकडले.
श्याम काय उत्तर देईल त्याकडे तिने कान टवकारले.
तो विचार करत होता. त्याला तसे पाहून त्यांनी विचारले,"काय रे, काय विचार करतोयस?"
"हं..काय नाही, फादर. तुम्ही म्हणाल तसं." तो म्हणाला.
"अरे यात मी काय म्हणणार रे, बाबा? घर तुझं, बायको तुझी, आत्ताच घेऊन जा तिला." फादर हसून म्हणाले.
"ठीक आहे, फादर. हे ठेऊन येतो मग घेऊन जातो तिला." तो हातातला सामान दाखवत म्हणाला आणि निघून गेला.
फादरांनी होकारार्थी मान डोलावली.
तो जाताच फादरही जायला निघाले होते. तेवढ्यात दुर्गाने त्यांना हाक मारली,"फादर, आता तुम्ही.."
तिचे बोलणे तोडत ते हलकेच वळून पाहत सौम्य हसत म्हणाले,"माफ कर, बाळा. आता मी फक्त एक डाॅक्टर आहे. एका पेशंटच्या घरच्यांना काय सांगायचे तेच मी श्यामला सांगितले. विश यू गुड लक!"
फादर एक उत्तम डाॅक्टरही होते. याचा त्यांनी फायदा घेतला.
ते गालात हसले आणि निघून गेले.
तीही विचार करत मंद हसली.
थोड्यावेळाने श्याम तिथे अडकवलेली चावी घेऊन वाॅर्डचे कुलूप काढून आत आला.
समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे जागीच मोठे झाले.
तो पळतच दुर्गा जवळ गेला आणि जोर जोरात फादरांना आवाज देऊ लागला,"फादर, लवकर या.."
क्रमशः
श्याम का फादरांना आवाज देतोय? काय झालं असेल दुर्गाला?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा