Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-५९)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-५९

मागील भागात:-

"अच्छा, म्हणून ह्यांनी कालपासून ना औषध घेतले ना की जेवणं केलं." फादरांनी हसत विचारले.

सगळ्यांनी एकसाथ मान डोलावली.

"फादर तुमची परवानगी असेल तर मी यांना एक चक्कर मारून आणू का?" श्यामने त्यांना विचारले.

आता पुढे:-

"अरे श्याम, यांना घेऊन जाणे म्हणजे किती मोठी रिस्क असेल माहिती आहे ना तुला? यांच्यातला एकजण जरी नजर चुकवून पळाला तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? मग असं असताना कशी परवानगी देऊ मी तूच सांग ना? आपण सगळेच प्राॅब्लेममध्ये येऊ." फादर म्हणाले.

फादरांचे बोलणे ऐकून सगळ्यांचे चेहरे हिरमुसले आणि सर्वांनी माना खाली टाकल्या.

"बघा फादर, यांचे चेहरे कसे झालेत? यांना व्यवस्थित नेण्याची-आणण्याची जबाबदारी माझी. मोठ्या व्हॅनमध्ये लाॅक करून यांना घेऊन जाईन. एकाच ठिकाणी बंदिस्त राहिल्याने ते उबून गेले असतील, पापबिचारे! जास्त लांब नाही जाणार, इथेच जवळपास घेऊन जाईन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही प्राॅब्लेम येणार नाही. ट्रस्ट मी." श्याम त्यांना समजावत विश्वासाने म्हणाला.

"ओके, आय ट्रस्ट यू, माय चाईल्ड! तू जबाबदारी घेतोस तर आय व्हॅव नो एनी प्रोब्लेम. बट् बी केअरफुल!" फादर त्याचा खांदा थोपटत स्मित करत म्हणाले.

"थॅंक्यू, फादर." श्याम खूश होऊन म्हणाला.

सगळ्यांचे चेहरे खुलले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.

श्याम सर्वांना एका मोठ्या व्हॅनमध्ये घेऊन गेला. तो स्वतः व्हॅन चालवत होता. त्याच्यासोबत समोर दुर्गा बसली होती.

मस्त एन्जॉय करत ते निघाले होते. जास्त लांब नाही म्हणतानाही तो त्यांना थोडंसं लांब शहरात घेऊन आला.

आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहून सगळे खुश झाले होते. ते पाहून कर्नल सयाजी खूश होऊन श्यामला म्हणाले,"खूप दिवसांनी बाहेर फिरतोय, लय भारी वाटतंय, कॅप्टन श्याम. या सिच्युएशनमध्ये गाणे म्हणत नाचावंस वाटतं."

"होय श्याम, तू वहिनी बरोबर गाणं म्हणत नाच, आम्ही एंजॉय करतो." दुसरा एक पेशंट हसत म्हणाला.

"अरे, तिला अशा परिस्थितीत नाचता येणार नाही." श्याम हसत म्हणाला.

"मग तू गाणं म्हण की.." दुसऱ्याने फरमाईश केली.

दुर्गा शांत बसून त्यांच बोलणं ऐकत होती. त्याने तिच्याकडे एक नजर पाहून तिला विचारले,"मी गाणं म्हणू का, दुर्गा?"

"हां.. म्हण .." ती विचारात असलेली सावरत बसून हसत म्हणाली.

"ओके, ऐका मग..पण तुम्हीही सर्वांनी साथ द्यायची, हां.." श्याम हलकेच माने वळून हसत म्हणाला.

सर्वांनी एकत्र सुरात होकार दिला.

श्यामने आधी घसा खाकरला आणि गायला सुरुवात केली..

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे,
गीत गा रे, धूंद व्हा रे..

नवे पंख पसरा, उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे,
गीत गा रे धूंद व्हा रे..

ल ल ला ला..
जु जु जु जु जु
जु जु जु जु..

गाण्यांचा आस्वाद घेत ते तिथून पुन्हा परत फिरले. पण एक कार त्यांना आडवी आली. म्हणून श्यामने कपाळावर आठ्या पाडत ब्रेक दाबला. ती कारही काही क्षण थांबली आणि त्यातील लोक रागात श्यामकडे पाहू लागली.

दुर्गाची नजरही त्यांच्याकडे गेली. तिने त्यांना ओळखले होते. ती अभयची माणसं होती जी तिच्या शोधात फिरत होती. त्यांनीही तिला ओळखलं. तिने घाबरून चेहरा हाताने लपवला.

श्यामचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो त्यांना साॅरी म्हणाला आणि त्याने त्या कारला क्राॅस करून व्हॅन पुढे घेतली. दुर्गाने सुस्कारा सोडला.

तसे त्या लोकांनी ड्रायव्हरला त्याचा पाठलाग करायला सांगितले.

त्यांनी लांबून श्यामच्या व्हॅनचा पाठलाग केला. व्हॅन हाॅस्पिटलच्या आवारात पोहोचली. श्यामने आधी दुर्गाला घरी सोडले आणि नंतर सर्व पेशंटांना त्यांच्या वाॅर्डमध्ये सोडून आला.

दुर्गाला घरी सोडलेले त्या लोकांनी लांबून पाहिले होते. त्यांनी लक्ष देऊन ते घर पाहिले आणि तेथून निघून गेले.

दुर्गा मनात खूप घाबरली होती. तिने एकदा दोनदा मागे वळून पाहिले होते. पण ती लोक लपल्याने तिला दिसली नाहीत. तेव्हा तिला बरं वाटलं. पण मनात मात्र भीती दाटून आली होती.

'मी या ठिकाणी आहे हे त्या लोकांनी अभयला सांगितले तर..' या विचाराने तिला धडकी भरली. पण एकदम शांत झाली.

इकडे त्या लोकांनी अभयला दुर्गाबद्दल सांगितले.

"तुम्ही पाहिली ती माझीच दुर्वा आहे, ही खात्री आहे ना, तुम्हाला?" अभयने सिगारचा एक कश ओढत विचारले.

"हो सर. तिचे फक्त लग्नचं झालं नाही तर ती प्रेग्नंटही आहे." एकाने सांगितले.

"इंटरेस्टिंग..हा हा.." तो तोंडातून धूर सोडत उपहासाने हसत म्हणाला.

थोडे दिवस अजून निघून गेले. श्याम दुर्गाचे चेकअप करून आला आणि तिला घेऊन घरी चालला होता. तेव्हा फादरांशी त्याची भेट झाली.

"काय रे, श्याम? बायकोचे चेकअप करून आणलेस वाटतं? काय म्हणाले डाॅक्टर?" ते दुर्गाकडे पाहत म्हणाले‌.

"हो, फादर." श्याम चेहरा पाडत म्हणाला.

"काय रे चेहरा का उतरला आहे तुझा? काही प्राॅब्लेम आहे का?" त्यांनी चिंतेने विचारले.

"डाॅक्टरांनी सांगितले की ही खूपच वीक झाली आहे. तिचे सिझेरीन करायला लागेल. पण त्यातही खूप काॅम्प्लिकेशन येईल." तो गंभीर आवाजात म्हणाला.

"काय सिझेरीन?" फादर डोळ्यावरचा चष्मा काढत चिंतीने म्हणाले.

क्रमशः

दुर्गाची डिलीव्हरी व्यवस्थित होईल का? अभय येईल का तिला न्यायला?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all