डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-५
मागील भागात:-
रात्र झाल्यावर श्याम तिला जेवणं भरवून झोपी घातले. ती झोपल्याची खात्री झाल्यावर तिच्या अंगावर पांघरूण ओढले. दाराला बाहेरून कुलूप लावले. तिथल्या गार्डला लक्ष द्यायला सांगून तो त्याच्या रूममध्ये आला. त्याचे जेवण झाल्यावर तो अंथरूणावर लवंडला. आजचे तिचे लहान मुलासारखे रुसणे आठवून त्याला हसू आले.
ती इथे आली तो दिवस त्याला आठवला.
आता पुढे:-
दोन महिन्यांपूर्वी-
सकाळचे नऊ वाजत आले होते. श्याम सगळ्या पेशंटसोबत त्यांच्यासारखेच कपडे घालून त्याच्यांशी खेळत होता. कोणी त्याच्या हाताला धरून ओढत होतं तर कोणी, त्याचे केस धरून ओढत होतं. पण तो चिडचिड न करता सर्वांना समजून घेऊन सांभाळून घेत होता.
त्या हॉस्पिटलच्या समोर मोठे मोकळे मैदान होते. अवतीभवती वेगवेगळी फुलांची आणि फळांची झाडे होती. सर्वांना घेऊन तो त्या मैदानावर आला.
आधी त्यांना मंदिरात घेऊन गेला. त्याने जसे देवीचे दर्शन घेऊन नमस्कार केला. तसेच तेही करत होते. नंतर तर तो चर्चमध्येही घेऊन गेला. तिथे त्यांना नमस्कार करायला सांगितले.
तेथून पुन्हा त्यांना मैदानावर घेऊन आला आणि व्यायाम करायला शिकवत होता. कोणी करत होतं तर कोणी शांतपणे उभ होतं तर कोणी मटकन जमीनीवर बसत होतं. कोणीही बाहुलीशी बाळ समजून त्याला मांडीवर थोपटत होतं.
एक कर्नल होते जे मोठ्या काठीला बंदूक समजून खांद्यावर घेऊन सावधान या स्थितीत वावरत होते.
तो सगळ्यांची मायेने देखभाल करत होता. तेथे अजून काही लोक होते ज्यांना श्याम त्यांच्या डोळ्यांत खुपत होता.
त्यात मंगेश आणि नरेश हे दोघे होते. ते दोघेही त्याच्यासारखेच काम करत होते. पण त्यांच लक्ष कामापेक्षा जास्त इतर गोष्टींकडे असायचे. ते दोघे नेहमी महिला किंवा मुली पेशंटशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचे. त्यांची मानसिक अवस्था ठीक नाही याचा गैरफायदा घ्यायला पाहायचे; पण प्रत्येक वेळी श्याम ढाल बनून समोर असायचा. त्यामुळे त्यांची डाळ शिजत नसायची. त्यामुळे ते दोघे त्याच्यावर खार खाऊन होते. त्यात तो त्यांच्या नंतर कामाला लागलेला असूनही फादरांच्या मर्जीतला एक विश्वासू बनला होता हेही त्यांना रूचलं नव्हतं.
कानामागून घेऊन तिखट झाला म्हणून ते त्याच्यावर जळत होते. त्याच्याविरुद्ध कान भरण्याची एकही संधी ते दोघे सोडत नसतं.
प्रत्येक वेळी काही नाही ना त्याची तक्रार ते फादरकडे करत. आजही ते दोघांना त्याने सर्वांना मैदानावर आणलेले पटले नव्हते. तेव्हा ते दोघे फादर जात होते तर त्यांना अडवले.
प्रत्येक वेळी काही नाही ना त्याची तक्रार ते फादरकडे करत. आजही ते दोघांना त्याने सर्वांना मैदानावर आणलेले पटले नव्हते. तेव्हा ते दोघे फादर जात होते तर त्यांना अडवले.
दोघे एक साथ त्यांना "गुड मॉर्निंग" विश केले.
त्यांनीही हसून त्यांना "गुड मॉर्निंग" विश केले.
मंगेश त्यांना म्हणाला,"बघा फादर, त्या श्यालला काही कळतच नाही. ड्युटीच्या वेळी वेड्यासारखे कपडे घालून कसे वावरतोय, वागतोय बघा. वेड्यांना कसे मोकळ्या मैदानात फिरवतोय?"
नरेश लगेच पुढे होऊन म्हणाला,"हो ना, फादर. यातला कोणी नजर चुकवून पळून गेला किंवा कोणी वेड्याच्या भरात कुणाला मारलं तर काय करणार ना. त्याला बोलणारा, विचारणारा कोणी नाही म्हणून तो शेफारलाय, फादर. त्याचं काही तरी करा."
फादर शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत पेशंटना सांभाळणाऱ्या श्यामकडे पाहत होते.
क्रमशः
यावर काय बोलतील फादर?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा