डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-६०
मागील भागात:-
"काय रे चेहरा का उतरला आहे तुझा? काही प्राॅब्लेम आहे का?" त्यांनी चिंतेने विचारले.
"डाॅक्टरांनी सांगितले की ही खूपच वीक झाली आहे. तिचे सिझेरीन करायला लागेल. पण त्यातही खूप काॅम्प्लिकेशन येईल." तो गंभीर आवाजात म्हणाला.
"काय सिझेरीन?" फादर डोळ्यावरचा चष्मा काढत चिंतीने म्हणाले.
आता पुढे:-
"हो, फादर." श्याम चिंतीने म्हणाला आणि दुर्गाकडे पाहू लागला.
ती खाली मान घालून उभी राहिली होती.
"अरे पण श्याम, डिलीव्हरीची डेटला तर एकच वीक उरला आहे ना. मग हे तू मला आत्ता सांगत आहेस. ही गोष्ट डाॅक्टरांनी आधीच सांगितली नव्हती का रे? उम्म.." फादर पुन्हा डोळ्यांवर चष्मा चढवत विचारले.
"तीन महिन्यांपूर्वीच सांगितले होते, फादर. त्यांनी दिलेले मेडिसीन्स, टाॅनिक किती समजावून, विनंती केली करून सांगितले हिला घ्यायला तरी ही वेळेवर घेत नाही. काहीच ऐकत नाही आमचं. बळजबरीने दिले तर थूकून टाकते. पाप बिचारीला तिची कंडिशन कळत नाही." श्याम तिच्याकडे पाहत गांभीर्याने सांगत होता.
फादरांना तिच्यावर खूप राग आला. ते मनात खदखदत होते. पण श्याम समोर त्यांना तिला काही बोलता येत नव्हते. म्हणून ते श्यामला म्हणाले,"अरे श्याम त्या काळे डाॅक्टरांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. मी बोलवले म्हणून त्यांना सांगून येशील."
श्यामने तिच्याकडे पाहिले.
"तिची काळजी करू नकोस. मी तिला समजावून सांगून तुझ्या घरी सोडतो." फादर त्यांच्या मनातील ओळखून म्हणाले.
"ठीक आहे, फादर." असे म्हणून तो निघून गेला.
"काय गं बाळा! त्या दिवशी श्यामपासून लांब जाईन असे म्हणाली होतीस ना तू. आता काय जगातून निघून जाण्याचा निर्धार केला आहेस की काय?" फादर दुर्वाला रागात म्हणाले.
तिला खूप भरून आले होते. श्यामबद्दल तिच्या मनात खूप आदर तर तिला आधीपासूनच होता. पण या सहा-सात महिन्यात ती त्याच्यावर प्रेम करू लागली होती. कधी कसे हे तिलाही कळलं नाही.
फादरच्या बोलण्याने तिच्या आसवांचा बांध फुटला. ती स्फुंदू लागली.
"मेडीसीन न घेऊन तू तुझ्या जीवावर का उठली आहेस? वेळेवर मेडिसीन घेतले नाही तर कसे होईल? अगं बाळा, आता तुझा जीव एकटीचा नाही गं. तू दोन जीवांची आहेस. तुझ्या उदरात एक छोटा जीवही वाढतोय." फादर तिला समजावत म्हणाले.
"सगळं कळलंय फादर, मला. पण माझ्या हातून होतं नाहीये." ती रडत म्हणाली.
"नो..नो.. होतं नाही असं नाही गं, करायचं नाहीये तुला, असं तू निर्धारच केला आहेस. तुझ्या मनाच्या साक्षीला घाबरून तूच स्वतःला शिक्षा करून घेत आहेस. पण तुझ्या अशा करण्याने याची शिक्षा तुला मिळत नाही; नकळत श्यामला मिळत आहे. तुला तर माहीतच आहे त्याने तुझ्याशी का लग्न केले? तुझ्यावर प्रेम आहे, कोणती अपेक्षा आहे किंवा कोणत्यातरी मोहाला बळी पडून त्याने हे लग्न केले नाही. तू एक पोरकी आहेस, त्यात तू प्रेग्नंट आहेस म्हणून कशाचाही विचार न करता फक्त तुला नवीन जीवन देण्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याने त्याग केला." फादर कळवळून म्हणाले.
तिला आता अश्रू अनावर झाले होते. ती खाली मान घालून अश्रू गाळत होती.
"पण एक गोष्ट आता साध्य होईल, दुर्गा. तू वेडीच नाटकं करता करता, माझ्या श्यामला वेड करून टाकशील." शेवटचं वाक्य बोलताना त्यांना गहिवरून आलं. ते चष्मा काढून हात घेत डोळे पुसत तेथून निघून गेले.
त्यांच्या बोलण्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या दिवसापासून ती खूप शांत राहू लागली. श्यामला फसवतोय यांचं शल्य तिच्या मनाला टोचत होतं. कित्येक वेळा तिचं मन तिला सगळं सत्य सांगून टाक म्हणायचं पण तिची हिंमतच होत नव्हती.
दोन दिवसांनी अभयची माणसे त्याला घेऊन श्यामच्या घराजवळ आले. कार थोड्या अंतरावर उभी केली. त्याच्या माणूस श्यामच्या घराकडे बोट करून म्हणाला,"सर, हेच ते घर आहे."
"हो का, भारीच." अभय कारच्या खिडकीतून घराकडे पाहत छद्मी हसत म्हणाला.
आणि कारमधून उतरून त्या घराच्या दिशेने चालू लागला.
क्रमशः
दुर्गा त्याला ओळख देईल का? अभय घेऊन जाईल का तिला त्याच्यासोबत?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा