Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-६३ अंतिम)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. ते कसे ते जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-६३ (अंतिम भाग)

मागील भागात:-

तिचे डोळे तुडुंब पाण्याने भरून आले ती हुंदका देत हात घट्ट धरून म्हणाली,"माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे, श्याम."

तो खूप खुश झाला. पण तिच्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. ती पोटाला धरून जोरात विव्हळली,"आह ऽऽ"

तिला पटकन ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. श्यामचा जीव काळजीने तुटू लागला.


आता पुढे:-

"अहो सर ती आपली दुर्वाच होती मग तुम्ही .." अभयचा माणूस त्याला विचारत होता तोच अभय त्याच्या खेकसला,"तुला मी का तेवढा मूर्ख वाटतो रे? एकशे एक टक्का ती माझी दुर्वाच आहे. हे मला माहिती आहे."

"मग तुम्ही ती आमची मुलगी नाही असे का म्हणालात?" दुसऱ्या गुंडाने विचारले.

"आता फक्त गायीला आणण्यात काय अर्थ आहे, दोन चार दिवस जाऊ दे, गायीसोबत वासरूही घेऊन येऊ." अभय छद्मी हसत म्हणाला.

"ते कसे, सर?" टाकल्या गुंडाने विचारले.

"ते एक सीक्रेट आहे. वेट अँड वॉच!" अभय विचार करत म्हणाला.

"देवा पांडुरंगा! माझ्या लेकराला वाचव रे बाबा." वैजयंती पांडुरंगाला साकडे घातले.

श्याम आणि फादर यांचे डोळे ऑपरेशन थिएटरच्या दिव्याकडे लागले होते.

काही वेळाने हिरवा दिवा लागला आणि सगळे धावतच तिकडे गेले.

"काॅंग्रॅच्युलेशन श्याम, बेबी बाॅय झाला आणि बाळाची आईही सुखरूप आहे." हातातील गोंडस बाळ दाखवत नर्स म्हणाली.

वैजयंतीने पटकन तिच्या हातातून बाळ घेतलं आणि ओठ टेकवत आनंदाने म्हणाली,"देव पांडुरंग पावला बघ. माझा नातू बघा फादर किती गाॅड हाय. श्याम तुझं पोरगं बघ किती देखणं हाय."

"हो आई, मी दुर्गाला भेटून येतो. आण बाळाला." आनंदाने श्याम बाळाला स्वतःच्या हातात घेत म्हणाला.

"व्हयं, घेऊन जा. म्या बी येतेय तिला बघून घरून जाऊन तिच्यासाठी खायला घेऊन येते." ती श्यामला बाळ देत म्हणाली.

श्यामने बाळाच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. एकदा फादरकडे पाहिले. त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनीही त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि नजरेने पाहत जा म्हणाले.

तो बाळाला घेऊन दुर्गाजवळ गेला. तिच्या कुशीत बाळाला ठेवले. दोघांनीही तिची चौकशी केली. तिने ती ठीक असल्याचे सांगितले. वैजयंती घरी जाऊन तिच्यासाठी जेवणं बाळासाठी कपडे घेऊन आली.

आठ दिवसांनी तिला घरी आणले. श्याम महत्त्वाचे काम आहे म्हणून आला नव्हता. वैजयंतीनेच तिला रिक्षाने घरी आणले.

तिने बाळाला दुर्गाकडे सोपवले आणि म्हणाली,"तू बाळाला घेऊन दारात उभी राहा, म्या औक्षणाचं ताट घेऊन येते."

तिने होकारार्थी मान डोलावली. कुलूप उघडायला ती पुढे जात होतीच.

एक कार हाॅस्पिटलच्या आवारात उभी राहिली. त्यातून अभय हसत त्याच्या साथीदारांसह बाहेर आला.

दुर्गा घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. तो तिच्याजवळ आला आणि तिच्या कुशीतील बाळाला पाहून म्हणाला,"वा! किती गोंडस बाळ आहे, अगदी माझ्यासारखाच आहे."

वैजयंती हातात औक्षणाचे ताट घेऊन आली. समोर त्याला पाहून ती जागीच थांबली.

तो तिच्याकडे पाहत म्हणाला,"अहो काकू, बरं झालं ते औक्षणाचं ताट घेऊन आलात. तिथंच का थांबलात? या पटकन औक्षण करा म्हणजे मी ह्या दोघांना घेऊन जायला मोकळा होईन."

"काय म्हणालास तू? ह्यांना तुझ्या घरी नेणार तू?" वैजयंती ताट कट्ट्यावर ठेवून पुढे येत त्याला म्हणाली.

"हो, कारण ही तुमच्या घरची सून नाही, माझ्या घरची सून आहे, माझी बायको आणि हे बाळही माझं आहे. तू औक्षण केलं तर बरं होईल कारण माझ्या घरी माझी आई नाही. आई होती पण हिने तिचा खून केला." तो दात ओठ खात म्हणाला.

वैजयंतीसाठी हे सगळं धक्कादायक होतं.

"हे सगळं ऐकून मला चक्कर यायला लागली." ती डोकं धरून म्हणाली.

तिला सावरायला दुर्गा बाळाला सावरत "आत्या" म्हणत पुढे आली. तर तो म्हणाला,"तुझी आत्या तर कधीच वर गेली."

तो आता वैजयंतीला म्हणाला,"ही कोण आहे काय आहे, सगळं सांगतो, जरा बाजूला या. तुमच्या मर्यादेचा, इज्जतीचा प्रश्न आहे."

ती जरा बाजूला झाली. तो तिला सांगू लागला,"ही माझ्या मामाची मुलगी. मोठ्यांनीच आम्हांला नवराबायको म्हणून लहानपणीच आमच लग्न ठरवलं. मग वयात आल्यावर आमच्याकडून ही चूक झाली. त्याचच फळ आहे हे बाळ."

"नाही आत्या हा खोटे बोलतोय. माझ्या संपत्तीचा याला मोह आहे. ती बळकावण्यासाठी तो लहानपणापासूनच माझ्या मागे लागला होता. जेव्हा मी नकार दिला तेव्हा माझी मर्जी नसताना याने आणि याच्या आईने झोपेच्या गोळ्या दुधात मिसळून मला बेअब्रू केले. चुकून माझ्याकडून तिचा खून झाला." दुर्गा रडत सांगू लागली.

"ते ठीक आहे, झालं ते झालं, पण मी हिला लग्न कर म्हणून म्हणत होतो पण हिने काय केले. इथे वेड्याच नाटक करू राहिली. तुमच्या भोळ्या भाबड्या पोराला फसवून त्याच्याशी लग्न केलं. हे बरोबर आहे का? " तो म्हणाला.

"नाही आत्या, फक्त माझ्या बाळासाठी मी श्यामशी लग्न केले. पण बाळाच्या जन्मानंतर मी दूर निघून जाणार होते." दुर्गा म्हणाली.

"ते काही असो, तुमच्या मुलाला शिक्षा होणार, तेही चोवीस वर्षांची जेल. कारण एका वेडीशी लग्न करायचे नसते ते त्याने केले आणि दुसरे म्हणजे त्याने एका खुन्याला आश्रय दिला. एवढंच नाही तर माझ्या बाळाला तो त्याचं लावून हिची संपत्ती बळकावण्याचा उद्देश आहे. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आता काकू तुम्ही सांगा हिला बाहेर काढताय की तुमच्या मुलाला खडी फोडायला पाठवू. मी पोलिसांना सोबत घेऊन आलेलो आहे." तो म्हणाला.

वैजयंती विचार करत होती तर तो तिला म्हणाला,"जास्त विचार करू नका पटकन.." तो पुढे बोलायच्या आधीच तिने तिच्या कानाखाली मारली आणि म्हणाली,"कायद्याच्या गोष्टी कोणाला सांगतोस रं. काय जरी झालं तरी ही माझी सून हाय अन् हा नातू बी माझा हाय. तू स्वतःला पुरूष म्हणून घेतोस व्हयं रं. खरा पुरूष तर माझा पोरगा हाय. ज्याने स्त्रीचा मान राखण्याची हिच्याशी लग्न केलं. दुर्गा, पोरी या नराधमाने तुला शिवून बाटवल ना. त्याच्या नावाची अंघोळ करं. तू तुझ्या जिंदगानीला, एका असाहय्यतेचा फायदा घेतलास तू?"

"म्हतारी आहेस पण लय जोर आहे तुझ्या अंगात." असे म्हणत तो तिच्यावर धावून आला आणि हात उचलला पण तेवढ्यात श्याम तिथे आला.

त्याने त्याची सगळी कुंडली काढून आणली होती. सोबत तो पोलीसांनाही घेऊन आला होता. त्याला कोणीतरी फोन करून आधीच सांगितले होते की अभय इथे आला आहे. म्हणून तो पूर्ण तयारीनिशी आला होता. तो म्हणाला,"म्हाताऱ्या माणसांवर हात उचलायला तुला लाज वाटत नाही का रे, नीच माणसा? तुला संपत्ती हडपायची होती म्हणून तू तुझ्या आईचा खून झाला नाही तर तिचा ॲक्सिडेंट झाला असे पोलिसांना खोटे पुरावे दाखवून केस बंद केलेस. दुर्गाला बेअब्रू केलेस. हे तू मगाशीच तू कबूल केलेस. इन्स्पेक्टर साहेब, खरा गुन्हेगार तुमच्यासमोर आहे. अरेस्ट करा याला."

पोलिस अभयला आणि त्याच्या साथीदारांना पकडून नेले.

वैजयंतीने दुर्गाला मोठ्या मनाने माफ केले. सगळे गुण्यागोविंदाने राहू लागले.

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all