Login

अनपेक्षित यश- भाग 2 (अंतिम)

Unexpected Success

मागच्या भागात आपण पाहिले समू आणि राधा चे बोलणे......आता पुढे......!!

अग समू बघना आपल्या कॉलेजमध्ये हि स्पर्धा आहे.....
समू राधाला म्हणाली द्यायचे का परत आपण तुझे नाव तिथे??  राधा म्हणाली काहीतरीच तुझं! अग मला इतका वेळ कुठे आहे?घर,मुली आणि सासू सासरे???.....कधी अन कसा ग वेळ काढू???.......समू तिला म्हणाली अग एकेकाळी आमची ग्रुप मधील नृत्य विशारद असणारी तू आणि आज हे ग काय म्हणतेस??????

एका जमान्यात तू आपल्या ग्रुपची जान होतीस आणि तू स्वतःला आज संसार आणि गृहस्थी मध्ये अडकवून घेतलंस....आज तू फक्त आई,सून आणि बायको बनून राहिलीस.......ती बोलकी, लाघवी, डॅशिंग व बोल्ड आमची अष्टपैलू राधा या सगळ्यात कुठेतरी हरवलीय...... आणि मी तुला अस अस्तित्व हरलेली नाही पाहू शकत ग  डिअर......समू म्हणाली......राधाला कॉलेजमधील दिवस आठवले व तिला त्या आठवणी आल्या डोळ्यासमोर पण डोळ्यांच्या कडा भिजल्या......जणू काही ते दिवस तिला साद घालत होते, तिला आर्जवे करीत होते, राधाचे अंतर्बाह्य मन तिला सांगत होते.......राधा उठ आणि दाखवून दे तू कोण आहेस ते सगळ्यांना.......तिच्या मनाने जणू उठाव केला अन तिला कॉलेजमध्ये असताना कोणीतरी म्हंटलेल्या या ओळी आठवल्या......

सावळी, काळी, गोरी,

मी कशीही आहे,

मी माझ्या विचारांनी,

शुभ्र, सफेद आहे…

मी अशी, मी तशी,

मी कशीही आहे,

प्रेम, वात्सल्य भावनेने,

मी समृद्ध आहे …..

मी कुणाची आवडती,

कुणाची नावडती आहे,

फिकीर त्याची ना मला,

मी मुळातच ग्रेट आहे ….

मी खुले पुस्तक जणू,

स्पष्टवक्तेपणाची धार आहे,

सुसंस्कार लाभलेली,

मी एक संस्कारी नारी आहे…

मी असे आनंदी,

जरी सुखावर स्वार आहे,

माझ्या मनातल्या तळाशी,

जरी भावभावनांचा कल्लोळ आहे…..

मीच माझी सखी,

मीच माझी प्रेरणा आहे,

चांगल्याचा ध्यास घेतलेली,

मीच माझी फेव्हरेट आहे…......!!

राधा समुला म्हणाली खरच मी इतके दिवस फक्त संसार सागरात अडकून पडले होते तू मला योग्य दिशा दाखवलीस.............मला माझी नव्याने ओळख करून दिली...... माझ्या स्वप्नांना भरारी घेण्याचे बळ आणि मला मोकळे आभाळ दिलेस.....आजच मी निखिल कडे माझी हि इच्छा व्यक्त करते.....निखिल घरी आला...राधाने आज त्याच्या सगळे आवडीचे पदार्थ बनवले होते........कारण कोणीतरी म्हंटले आहे आपल्याला काही हवे असेल तर समोरच्याला खुश करावे पण त्या गोष्टीचा मार्ग पोटात होऊन हृदया कडे जातो.....सासू, सासरे,निखिल जेवायला बसले होते, राधा ने योग्य वेळ पाहून मनातील हि इच्छा व्यक्त केली.....निखिल चमकला क्षणभर.....आज चक्क राधा अस म्हणतेय.....जेव्हा तो सांगत होता तेव्हा नाही ऐकले आता समू म्हणाली तर पटकन ऐकले......मैत्रीची जादू निखिल ने हसत तिला टोमणा दिला........सासू सासरे व मुली या तिच्या निर्णयामुळे खुश झाले......अन मग सुरू झाला तिच्या अमर्याद स्वप्नांचा प्रवास..........

राधाने अखेर कॉलेज मधील नृत्य स्पर्धे मध्ये आपले नाव दिले.....आणि अखेर स्पर्धेच्या दिवशी तिचे नृत्य पाहायला सगळी घरची मंडळी आली, तिचा उत्साह अजून द्विगुणित झाला......आज हा दिवस तिच्यासाठी  अविसमर्णीय होता.....तिने ही स्पर्धा देखील जिंकली, तिला ह्या साठी ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले.........राधा खुश झाली जणू तिने काही दुर्मीळ गोष्ट प्राप्त केली........निखिलला बाबा म्हणाले पोरीने आज मान आमची उंचावली..... सासूने तिला मायेने जवळ घेतले. समू ने तर निखिलला चिडवीत म्हंटले नृत्य विशारद मॅडम यांचे पती श्री. निखिल.....सारे हसू लागले......राधाला जणू अस वाटले आज ती आणि आभाळ यांत दोन बोटांचे अंतर आहे....राधाला हे अनपेक्षित यश मिळाले त्यामुळे तिचे आयुष्य इंद्रधनू सम कलरफुल झाले ................अश्या या तिच्या अनपेक्षित सुखामुळे तिचे स्वप्न पूर्ण झाले......तिने  निखिलच्या साहाय्याने नृत्य अकॅडमी सुरू केली.....सासू सासरे पण आनंदून गेले... तिने त्याला नाव दिले "राधा नृत्य अकॅडमी"......
तिच्या या यशामुळे निखिल ची पण मान ताठ झाली.....त्याला तिचा खूप अभिमान वाटत होता....

तिच्या या यशाच्या वाटचाली मध्ये नवरा, समू सारखी सखी आणि नवरा, मुली या सगळ्यांच्या खूप मोठा वाटा आहे....खरच आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात पण आपल्या स्वप्नांना योग्य मार्गदर्शक लाभला व घरच्यांची साथ असेल तर असे अनपेक्षित सुख सुद्धा सगळ्यांना सुखावह असते........एक स्त्री जीची अनेक रूप आहेत....तिला जर आपल्या माणसांची साथ असेल तर ती बहरते....व तिच्या मुळे घराला घर पण येत....

राधाला या अनपेक्षित सुखाने तिची नवी ओळख मिळवून दिली, अन एक प्रश्न तिच्या मनात डोकावून गेला तो म्हणजे माझ्या सारख्या असंख्य महिला असतील ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करता येत असतील का?? त्यानां मिळत असेल का कुटुंबातील लोकांची साथ?? अन असा विचार करत असताना राधाला या ओळी आठवल्या...........

मी स्त्री...........

माझी आहेत अनेक रूपं

आई, बहीण,पत्नी आणि या नात्यांची कितीक

मीच आहे सप्त स्वरूप

निस्वार्थ कर्तव्याची गाथा मी सांभाळते

जीवनाच्या सगळ्या परीक्षा हसत देते.

माझ्या सर्व रुपात रंग भरले मी आनंदाचे

मायेने माझा संसार चालतो सुखाने

नाही,मी डगमगत नाही

मी नाही  थांबत

संघर्षाच्या पावलांनी पुढे पुढे  राहते चालत

मीच चिडते मीच रडते

स्वतःला विसरते

पण सदैव सगळ्यांच्या विश्वात रमते

जिंकलात तुम्ही तर

ओल्या डोळ्यांनी हसते

हारलात तुम्ही, तर हिम्मत देते

सृष्टीने दिली मला

प्रचंड सहनशीलता

माझ्यात आहे क्षमता व ममता

करते सृष्टीकर्त्याला वंदन

सुखी राहो सकळ संसार

हेच माझ्या हृदयी स्पंदन

हां.. मी स्त्री आहे,

आणि याचा मला गर्व आहे...


कसा वाटला लेख? जरूर कळवा,
अभिप्राय द्या!!

©®श्रावणी देशपांडे
गोष्टी मनातल्या♥️

0

🎭 Series Post

View all