नात्यांतील अंतर - भाग-1
कोकणातलं एक लहानसं गाव – निवळी,. नारळाच्या आणि आंब्याच्या बागांनी भरलेलं, तिथेच राहत होता "मकरंद साने" निवृत्त तहसीलदार आणि त्याचा एकुलता एक मुलगा - आशय, आशयची आई त्याच्या लहानपणीचं वारली होती.
आशय अभ्यासात हुशार होता, चांगली प्रगती करत होता, आयुष्यात पुढे जातं होता.
पण एक गोष्ट मकरंदरावांना सलत होती – त्यांच्या आणि आशयमधलं वाढत चाललेलं अंतर.
आशय शाळेत हुशार होता, पण त्याच्या मनात शिक्षणापेक्षा वेगळीच स्वप्नं होती. त्याला मुंबईत जाऊन मोठं काहीतरी करायचं होतं. त्याच्या मनात कला, अभिनय आणि छायाचित्रण याचं वेड होतं. पण वडील मात्र त्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायचं स्वप्न बघत होते.
एके दिवशी आशयने ठामपणे सांगितलं, "बाबा. मला अभिनय शिकायचाय." मकरंद चिडले, आशयला खूप ओरडले.
आशयने चिडून, रागाच्या भरात वडिलांच्या अपेक्षांपासून आणि त्यांच्या कट्टर विचारांपासून दूर जायचं ठरवलं. तो शांतपणे त्याच्या खोलीत गेला, आणि दुसऱ्या दिवशी पहाटे गाव सोडलं.
मुंबईच्या गर्दीत हरवलेला आशय आता स्वतःच्या आयुष्याचं स्वप्न पाहत होता. दिवसभर कामं करून, रात्री थिएटरमध्ये काम करत होता. दिवस कठीण होते, पण त्याला स्वतःवर विश्वास होता.
गावात मात्र, मकरंदराव दिवसेंदिवस एकटे होत चालले होते.
मध्यंतरीच्या वर्षांमध्ये आशयने एकदाही फोन नाही, पत्र नाही. नात्यांत फक्त अंतर वाढत गेलं.
मुंबईमध्ये आशयचा संघर्ष अधिक तीव्र झाला. दिवसा तो एका फोटोग्राफी स्टुडिओमध्ये शिकाऊ म्हणून काम करायचा. संध्याकाळी थिएटर ग्रुपमध्ये छोट्या भूमिका करत राहायचा. झोपायला एक खाट नव्हती, स्टेशनवर रात्री काढायच्या. पण त्याच्या डोळ्यांत एकच स्वप्न – स्वतःचं नाव, स्वतःची ओळख.
गावाकडे मकरंदराव विचार करत राहातं असतं, रात्री अंथरुणावर गेल्यावर ते पापण्यांवरून ओघळणारे अश्रू लपवू शकत नव्हते.
तीन वर्षांनी आशयच्या आयुष्यात एक वळण आलं. एका छोट्याशा लघुपटासाठी त्याची छायाचित्रण कला निवडली गेली. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लोक त्याच्या नावाची चर्चा करू लागले. त्याला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची जाहिरात फिल्म मिळाली – आणि तिथून त्याच्या करिअरला उधाण आलं.
त्याचं नाव आता टीव्हीवर झळकत होतं.
एके दिवशी तो एका मुलाखतीमध्ये म्हणाला –
"माझं सर्व श्रेय माझ्या वडिलांना जातं. त्यांनी मला शिकवलं, पण ते मला समजले नाहीत. आणि मी त्यांना."
"माझं सर्व श्रेय माझ्या वडिलांना जातं. त्यांनी मला शिकवलं, पण ते मला समजले नाहीत. आणि मी त्यांना."
गावात मकरंदसरांनी टीव्हीवर आदित्यचं नाव पाहिलं. त्यांचं मन दाटून आलं, पण तोंडावर पुन्हा तीच वाक्यं – "सोडून गेला तो. यशाने काय उपयोग?"
एक दिवस आशयने बाबांना एक पत्र लिहिलं.
प्रिय बाबा,
खूप वर्ष झाली भेटून. पण मनाने मी तुमच्याजवळच आहे.
मी जे बनलो ते तुमच्यामुळेच. तुमचं शिकवणं, तुमची शिस्त – तीच माझी दिशा होती.
पण एक गोष्ट सांगायची आहे – मला तुमची उणीव वाटते. खूप.
मी लवकरच येतोय. एक मुलगा म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून तुम्हाला भेटायला.
तुमचा आशय.
हे पत्र पाहून मकरंदराव स्तब्ध झाले. वर्षांच्या वेदना, राग, अहंकार… सगळं कुठेतरी विरघळून गेलं.
आठ वर्षांनी आदित्य गावात परतला. सगळं बदललेलं होतं, पण वडिलांचं जुनं घर तसंच होतं. दाराशी उभा राहिला, धडधडत्या हृदयाने बेल वाजवली.
दार उघडलं. समोर मकरंदराव थोडे वाकलेले, केस पांढरे झालेले, पण डोळ्यांत – ओळख.
क्षणभर दोघे शांत. मग आशय म्हणाला, "बाबा..."
आणि इतक्या वर्षांनी, मकरंदरावांनी त्याला मिठीत घेतलं.
आणि इतक्या वर्षांनी, मकरंदरावांनी त्याला मिठीत घेतलं.
डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्या मिठीत अंतर विरघळलं होतं.
आशय काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला,
"बाबा, यश मिळालं, नाव झालं… पण त्या सगळ्या गर्दीत तुमचं स्थान रिकामंच राहिलं. माझं घर असावं, पण त्यात तुमचं आशीर्वाद नसेल, तर ते घर कसले?"
"माझीही चूक होती," ते म्हणाले. "मी तुझं ऐकलं असतं, तुझं स्वप्न समजून घेतलं असतं, तर कदाचित हे अंतर इतकं वाढलं नसतं."
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा