मोहित विमलबाईंचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं लग्न ठरलं होतं.
विमलाताईंच्या आयुष्यात नवं प्रकाशपण उतरलं.
त्यांना अवनी अतिशय आवडली होती—सुशिक्षित, नोकरी करणारी, आत्मविश्वासपूर्ण आणि आधुनिक विचारांची मुलगी.
“आमच्या घरात प्रकाश आणणारी सून ,” असं त्या जिथे तिथे सांगत होत्या.

जेव्हा जेव्हा विमलाताई नातेवाईकांना लग्नाची बातमी सांगत, तेव्हा त्यांच्या आवाजात एक वेगळीच चमक असायची.
“आमची सून मोठ्या कंपनीत काम करते… चांगला पगार… चांगलं घर… चांगलं कुटुंब!”
असा अभिमान त्यांच्या बोलण्यातून अक्षरशः वाहत असे.
असा अभिमान त्यांच्या बोलण्यातून अक्षरशः वाहत असे.
कधी कधी हा आनंद ‘अभिमान’ ओलांडून ‘श्रेष्ठत्व’ दाखवण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचत होता, पण त्यांना स्वतःला ते जाणवत नव्हतं.
अवनी लग्न करून घरात आली तेव्हा वातावरण सुवासिक फुलांनी भरून गेल्यासारखं होतं.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी — सगळेजण तिचं स्वागत करत होते.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी — सगळेजण तिचं स्वागत करत होते.
विमलाताईंच्या डोळ्यांत उत्साह तर होता, पण एक अव्यक्त भीतीसुद्धा होती—
“सूनेला काही कमी पडू नये.”
ही भीतीच पुढे जाऊन अनेक गैरसमजांची बीजं रोवेल, हे त्यांना कुठे ठाऊक होतं?
“सूनेला काही कमी पडू नये.”
ही भीतीच पुढे जाऊन अनेक गैरसमजांची बीजं रोवेल, हे त्यांना कुठे ठाऊक होतं?
अवनीचं सासरी येणं जणू राजवाड्यात राणी येण्यासारखं होतं.
“तू काहीही करू नकोस.
काम आम्ही पाहतो.
तू फक्त विश्रांती घे.
दमून आली असशील."
काम आम्ही पाहतो.
तू फक्त विश्रांती घे.
दमून आली असशील."
घराचे कामं करायला बाई ठेवली होती.
सासूबाई जेवण स्वतः प्रेमाने बनवायच्या.
अवनीला आवडणाऱ्या पदार्थांची यादी करून ती रोज बदलून मेनू बनवायची.
इतक्या आवडीने केलेली सेवा सुरुवातीला अवनीलाही गोड वाटली.
ती कॉलेजपासून नोकरीत असलेली, स्वतःच्या मेहनतीने जगलेली, स्वतःचं जग स्वतः उभारलेली होती.
सासरी मिळणारे हे अतिमायेचे क्षण तिला काही काळ ‘विश्रांती’ वाटले.
सासरी मिळणारे हे अतिमायेचे क्षण तिला काही काळ ‘विश्रांती’ वाटले.
आता ती पण सतत सासूला काही ना काही कामं करायला लावायची. आणि विमलाताई पण सगळं प्रेमानी करायच्या.
लग्नाला दोन महिने झाले.
अवनी नेहमी ऑफिस, मिटिंग्स, प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असायची.
सासरी फक्त रविवारी ती शांतता शोधायची.
पण त्या दिवशी पण तिला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता.
सासऱ्यांचे मित्र येत राहणे.
विमलाताई सतत, “हे खा, ते खा” म्हणत राहणे.
तिच्या आवडी-निवडीचं अतिचोखंदळ निरीक्षण.
“तू थकली असशील” या नावाखाली तिच्या प्रत्येक पावलामागे सावली बनून चालणारी काळजी.
विमलाताई सतत, “हे खा, ते खा” म्हणत राहणे.
तिच्या आवडी-निवडीचं अतिचोखंदळ निरीक्षण.
“तू थकली असशील” या नावाखाली तिच्या प्रत्येक पावलामागे सावली बनून चालणारी काळजी.
हे सारं तिच्यासाठी प्रेम नव्हतं, तर बंधन वाटू लागलं.
ती स्वभावाने स्वतंत्र होती—
आणि इथे तिच्या स्वातंत्र्याच्या अवकाशाला सीमा पडू लागली.
ती स्वभावाने स्वतंत्र होती—
आणि इथे तिच्या स्वातंत्र्याच्या अवकाशाला सीमा पडू लागली.
ती आता सासूकडून कामं करून घ्यायची पण तिच्यासोबत कधी नीट बोलायची नाही. ती स्वतःला खूप मोठी समजू लागली.
जास्त चिडचिड करू लागली.
विमलाताईंनी हे पाहिलं, पण त्यांच्या मनात एकच विचार—
“सूनेला कसं खुश ठेवू?”
पण ज्याला त्या ‘खुश ठेवण्याचा’ प्रयत्न म्हणत होत्या,
त्याचाच परिणाम अवनीच्या मनात उलटं होऊ लागलं. तिला वाटायला लागलं ती खूप काम करते आणि सासूबाई घरी बसून स्वयंपाक करतात त्यात काय येवढं.
एका संध्याकाळी मोहित अवनीला म्हणाला—" तू आजकाल कसं पण वागते आईसोबत.स्वतःची सगळी कामं तिला करायला लावते."
अवनी रागाने म्हणाली—
“तुझी आई हे जे करते ना… ते मी दहा हजाराची बाई ठेवली तरीसुद्धा करवून घेईन.
मी इथे बंधनात राहिला नाही आले.
आणि तुझे बाबा आदर करतात ते मी कमावते म्हणून!”
“तुझी आई हे जे करते ना… ते मी दहा हजाराची बाई ठेवली तरीसुद्धा करवून घेईन.
मी इथे बंधनात राहिला नाही आले.
आणि तुझे बाबा आदर करतात ते मी कमावते म्हणून!”
मोहितला हे ऐकून धक्का बसला.
तो आवाज चढवू शकला नाही, पण त्याच्या मनात वेदनेने वादळ उठलं.
तो आवाज चढवू शकला नाही, पण त्याच्या मनात वेदनेने वादळ उठलं.
“अवनी , माझ्या आईसाठी ते प्रेम आहे.
ती मनापासून करते —”
तो म्हणाला.
ती मनापासून करते —”
तो म्हणाला.
ती त्याला म्हणाली—
“प्रेम?
मला श्वासही घेऊ देत नाहीत!
कधी उशिरा उठले की माझ्या मागे, तुला काही होतंय का.. झोपली नाही का.. घरात नाही खाल्लं की बाहेरच का खाल्लं.. उशिरा घरी आले की कामं असतात इतके मग का दमते बाहेर राहून..
रविवारी नातेवाईक बोलवून घेतात.. एक रविवार पण शांतता नाही.
एकटी बसूच दिला नाही कधी..अवनी बाळा हे खा. हे बघ..
अरे काय हे सारखंच.
बाबा पण सारखंच हे असं कर, तसं कर.
मला माझं जगूच देत नाही."
'मग मी सांगते त्यांना काही ना काही करायला आणि ते करतात पण कारण त्यांना मी कमवलेले पैसे दिसतं असतील.'

विमलाताई दाराजवळून हे सगळं ऐकत होत्या.
त्यांनी कधी विचारही केला नव्हता की त्यांच्या प्रेमाला ती अशी व्याख्या देणार.
दुसऱ्या दिवशी, रविवार.
दिनेशकाकांनी शांतपणे मोहित आणि अवनीला हाक मारली.
दिनेशकाकांनी शांतपणे मोहित आणि अवनीला हाक मारली.
त्यांच्या हातात काही कागद होते.
त्यांनी टेबलावर कागद ठेवले आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाले—
त्यांनी टेबलावर कागद ठेवले आणि अगदी हलक्या आवाजात म्हणाले—
“हा नवीन फ्लॅट तुमच्या नावावर केला आहे.
तुम्ही दोघे तिथे राहा.
तुमच्या पद्धतीने.
तुमच्या मर्जीने.
तुमच्या वेळेनुसार.”
तुम्ही दोघे तिथे राहा.
तुमच्या पद्धतीने.
तुमच्या मर्जीने.
तुमच्या वेळेनुसार.”
क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं.
मोहित दचकून उठला—
“काय? बाबा, असं कसं?”
“काय? बाबा, असं कसं?”
अवनीच्या चेहऱ्यावर मात्र एकाच वेळी आश्चर्य आणि सुटकेची भावना होती.
विमलाताईंच्या डोळ्यात दाटलं—
“कशाला हे?
लोक म्हणतील—मुलांना दूर केलं.”
“कशाला हे?
लोक म्हणतील—मुलांना दूर केलं.”
दिनेशकाका तिच्या जवळ बसले.
तिचा हात हातात घेत म्हणाले—
तिचा हात हातात घेत म्हणाले—
“विमला…
आपली चूक कुठे झाली ते आता कळतंय.
जास्त माया केली…
जास्त जपलं..
जसं चहात जास्त साखर टाकली तर चहा प्यावासं वाटत नाही…
तसंच प्रेमाचंही.
आपण जास्त गोडी घातली,
आणि त्याचे दुष्परिणाम आता दिसतायत.”
आपली चूक कुठे झाली ते आता कळतंय.
जास्त माया केली…
जास्त जपलं..
जसं चहात जास्त साखर टाकली तर चहा प्यावासं वाटत नाही…
तसंच प्रेमाचंही.
आपण जास्त गोडी घातली,
आणि त्याचे दुष्परिणाम आता दिसतायत.”
विमलाताईंचं हृदय भेदलं गेलं.
त्या विचारू लागल्या—
त्या विचारू लागल्या—
“मी चुकीचं काय केलं?
मी तर फक्त आपुलकी वाढवू इच्छित होते…”
मी तर फक्त आपुलकी वाढवू इच्छित होते…”
दिनेशकाका शांतपणे म्हणाले—
“आपुलकी म्हणजे सारखं पुढे करणे किंवा अति काळजी करणं नसतं."
तिने काही चुकीचं म्हटलं नाही…
फक्त तिचा दृष्टिकोन वेगळा आहे.
आणि आपली माया—तिला प्रेम नव्हे, दडपण वाटत आहे.”
फक्त तिचा दृष्टिकोन वेगळा आहे.
आणि आपली माया—तिला प्रेम नव्हे, दडपण वाटत आहे.”
अवनी आणि मोहित निघून गेल्यानंतर घरात शांतता पसरली.
गेल्या पावलांचे आवाज अजूनही दाराशी थबकलेले भासले.
त्या रात्री विमलाताईंना झोपच नाही आली.
बिछान्यावर पडल्या की मनात विचारांची तांडव.
बिछान्यावर पडल्या की मनात विचारांची तांडव.
“मी कुठे चुकले?
प्रेम केलं, जपलं…
आणि त्याचं ओझं तिला जाणवलं?”
प्रेम केलं, जपलं…
आणि त्याचं ओझं तिला जाणवलं?”
पहाटेच्या वेळी त्या सूर्याकडे पाहत बसल्या.
त्या क्षणी त्यांच्या मनात एक सत्य चमकलं—
“चांगली सून फक्त शिक्षण आणि नोकरीनं होत नाही…
तर तिच्या मनातल्या मानानं, प्रेमानं होत असते.”
त्या क्षणी त्यांच्या मनात एक सत्य चमकलं—
“चांगली सून फक्त शिक्षण आणि नोकरीनं होत नाही…
तर तिच्या मनातल्या मानानं, प्रेमानं होत असते.”
त्यांना आठवल्या साध्या परिवारातील त्या सुना—
ज्या जास्त शिकलेल्या नाही,
कधी ऑफिसचं कार्ड गळ्यात घातलेलं नाही,
पण सासू-सासऱ्यांना उंचीवर बसवतात.
ज्या जास्त शिकलेल्या नाही,
कधी ऑफिसचं कार्ड गळ्यात घातलेलं नाही,
पण सासू-सासऱ्यांना उंचीवर बसवतात.
साधेपणातून नाती फुलतात…
आणि जास्त अपेक्षांतून नाती कोमेजतात.
आणि जास्त अपेक्षांतून नाती कोमेजतात.
त्या दिवशी विमलाताईंना पहिल्यांदाच जाणवलं —
प्रेमाची सीमा नसावी, हे खरं…
पण प्रेमामध्ये पण श्वास घेऊ देणारी जागा हवी.
प्रेमाची सीमा नसावी, हे खरं…
पण प्रेमामध्ये पण श्वास घेऊ देणारी जागा हवी.
काही महिन्यांनी,
मोहित आणि अवनी अधूनमधून घरी येऊ लागले.
अवनीच्या वागण्यात सौम्यता आली होती,
कारण तिला आता अवकाश मिळालं होतं.
आणि तिला ही तिची चूक कळली होती—
आणि त्या अवकाशाने प्रेमाच्या मूल्याची ओळख करून दिली होती.
अवनीच्या वागण्यात सौम्यता आली होती,
कारण तिला आता अवकाश मिळालं होतं.
आणि तिला ही तिची चूक कळली होती—
आणि त्या अवकाशाने प्रेमाच्या मूल्याची ओळख करून दिली होती.
विमलाताईही बदलल्या.
अवनी आली की ती म्हणायची —"मी चहा करते, तुम्ही बसा."
विमलाताई पण तिला करून द्यायचा. तिच्या पुढे पुढे करायचा नाही.
तिला मोठी मॅडम नाही घरातली एक समान सदस्य मानायला शिकल्या.
अवनी आली की ती म्हणायची —"मी चहा करते, तुम्ही बसा."
विमलाताई पण तिला करून द्यायचा. तिच्या पुढे पुढे करायचा नाही.
तिला मोठी मॅडम नाही घरातली एक समान सदस्य मानायला शिकल्या.
दूर गेल्यावर जवळीक वाढली…
अंतरांनी मनातील धूळ झाडली…
आणि नातं जास्त मजबूत झालं.
अंतरांनी मनातील धूळ झाडली…
आणि नातं जास्त मजबूत झालं.
विमलाताई मनात म्हणाल्या—
“ नात्याची गोडी वाढवण्यासाठी
कधी कधी अंतरही आवश्यक असतं.”
कधी कधी अंतरही आवश्यक असतं.”
समाप्त.