अंतिम मुदत : भाग २

एक रहस्यमय कथा!
"अनामिका या अशा मुसळधार पावसात तुम्ही एकट्याचं या कठड्यावर उभे राहून कायं करताय? अहो तुम्हाला भीती नाही का वाटतं?" अभयने विचारले.

"आता कशाचीही भीती उरली नाहीये मला" तिने अगदी शांत उत्तर दिले तसा अभय मात्र चक्रावून गेला. त्याची पाऊले अनामिकेच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागली.

"हे बघा मॅडम आज वातावरण खूप वेगळं आणि भयानक आहे. इतका वारा सुटला आहे इथे दूरपर्यंत कुठलाही प्रकाशाचा कवडसा दिसतं नाहीये चुकून तोल वगैरे गेला तरऽऽ"

"तर कायं जीव जाईल हेचं म्हणायचे आहे ना तुम्हाला?" पुन्हा तिचा निर्विकार चेहरा. तिचे बोलणे ऐकून अभय अचंबित झाला. मोबाईलचा टॉर्च ऑन करून अभय अनामिकाच्या जवळ आला तसा तिचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला. अभय एकटक तिच्याकडे पहायला लागला.

'चेहर्‍यावरून तर एखाद्या चांगल्या घरातील वाटतेय‌ ही मुलगी पण मगं एवढ्या रात्री ती इथे कायं करतेय ती ही एकटी? नक्कीच कोणाचीतरी वाट पाहत असणार.' अभय एकटक तिच्याकडे पहायला लागला होता.

"मी दिसायला तशी चांगल्या घरातील पण इथे एवढ्या रात्री कायं करतेयं हाच प्रश्न तुम्हाला पडला आहे हो ना?" अनामिकाचे बोलणे ऐकून अभय डोळे विस्फारून तिच्याकडे पहायला लागला.

"तुम्हाला कसे??"

"अहो एवढ्या रात्री एकट्या मुलीला असे पाहून कोणालाही असाच प्रश्न पडेल." जणू काही अनामिकाने अभयच्या मनातील प्रश्न ओळखला होता.

"मॅडम तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का?" अभयने त्याच्या मनात इतकावेळ घोंगावत असलेला प्रश्न विचारला.

"होऽऽ" तिच्या उत्तराने वातावरणात पुन्हा एकदा गारवा वाढला तसे अभयने शर्टाची फोल्ड केलेली बाजू व्यवस्थित केली आणि स्वतःचे दोन्ही हात झाकून घ्यायचा निष्फळ प्रयत्न केला.

"हो मी वाट बघतेयं."

"कोणाची?" अभयने अगदी अधीरतेने विचारले.

"मी तुमचीच वाट पाहत होते." तिच्या उत्तराने अभय आता चांगलाच गोंधळला.

"मॅडम आपण एकमेकांना ओळखत देखील नाही. मी तर माझे ऑफिस बंद करून घरी निघालो होतो पण तितक्यात मला खिडकी मधून तुमची अस्पष्ट आकृती दिसली आणि मनातील कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून मी इथे आलो." अभय जरा रागातच बोलला.

"अभय उर्फ ब्लॅक डेव्हिल मी तुम्हाला कशी ओळखते किंवा तुम्ही मला ओळखता की नाही मुळात या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. मी तुमची वाट पाहत होते कारण फक्त तुम्हीच मला मदत करू शकता नाहीतर माझ्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही." त्या वातावरणात अनामिकाचा आवाज गुंजत होता.

" हे बघा मला एकतर तुमच्या बोलण्याचा काहीच संदर्भ लागत नाहीये. तुम्ही कोणं, इथे कशा आणि माझे नाव कसे माहित ते ही ठाऊक नाही मला पण सध्या एकच प्रश्न पडतोय की तुमच्यासारख्या तरूण आणि सुंदर मुलीच्या आयुष्यात इतके कायं घडले आहे की तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटतेयं? आणि या सगळ्यात तुम्हाला माझी कायं मदत हवी आहे? " अभयच्या चेहर्‍यावर निर्माण झालेल्या आठ्या एकूणच त्याच्या गोंधळलेल्या मनाची अवस्था दर्शवत होत्या.

अनामिका अभयकडे पाहून हसली आणि तिने पुन्हा एकदा आकाशाकडे नजर वळवली.

"मॅडम मी तुमच्याशी बोलतोय " अभयला तिची ही शांतता सहन होत नव्हती.

"मला न्याय हवा आहे आणि तो फक्त तुम्हीच देऊ शकता."

"हे पहा तुम्ही स्पष्ट बोला मला खरंच काहीही लक्षात येत नाही आहे की नेमके कायं म्हणायचे आहे तुम्हाला? न्याय मी कसा मिळवून देऊ शकतो? मी वकील नाही त्यासाठी तुम्हाला वकिलांकडे जावे लागेल पण असा कुठला अन्याय घडला आहे तुमच्यावर? " अभयला आता अनामिकाबद्दल जाणून घ्यायची खूपच उत्सुकता लागली होती.

" नाही कुठलेही न्यायालय किंवा कुठल्याही वकिलांना नाही जमणार ते. मला न्याय तिथे नाही मिळू शकतं तो फक्त तुम्हीच देऊ शकता. "अनामिकाने अभयकडे पाहून एक कटाक्ष दिला तेव्हा तिची ती नजर अभयला खूप काहीतरी सांगू पाहत होती.

"ठीक आहे मॅडम मी न्याय मिळवून देईन पण कृपया तुमच्यावर नेमका कुठला अन्याय झाला आहे ते सांगितले तर बरं होईल " अनामिकाच्या कोड्यात बोलण्याने अभय चांगलाच वैतागला होता.

"बलात्कार झाला होता माझ्यावर आणि नुसता बलात्कार नाही तर माझ्या शरीराचे लचके तोडले गेले. कशासाठी? मी केवळ एका मुलाचे प्रेम नाही स्वीकारले म्हणून त्याचा पुरूषी अहंकार इतका दुखावला गेला की त्याने त्याच्या मित्रांसोबत माझ्यावर असा सूड उगवला.

तो दिवस तसा नेहमीसारखाच होता पण ती रात्र माझ्या आयुष्यात भयाण काहीतरी घेऊन येईल याची मला जराही कल्पना नव्हती. त्या दिवशी असाच मुसळधार पाऊस बरसत होता. कॉलेज सुटल्यावर मी नेहमीसारखीच माझ्या मैत्रिणीसोबत घरी निघाले होते पण त्या लोकांनी मला भर रस्त्यात गाठले आणि....." बोलता बोलता अनामिका थांबली तसे अभयने तिच्या हातांवर हात ठेवला तेव्हा तिचा तो थंडगार स्पर्श त्याच्या नसानसांत कंप भरून गेला.

क्रमशः

अभय उर्फ ब्लॅक डेव्हिल हा कायं प्रकार आहे? अनामिका अभयला कशी ओळखते आणि नक्की अभय तिला न्याय कसा मिळवून देईल हे कथेच्या पुढील भागांत कळेल त्यासाठी कथा वाचत रहा.

🎭 Series Post

View all