अंतरंग:- (भाग 5)
आईने त्याच्याकडे बघण्याच्या आतच तो आत गेला आणि त्याने पटकन शर्ट बदलून टाकला. आवरून फ्रेश होऊन आईसमोर आला.
आई म्हणाली " काय रे आज उशीर झाला?"
"हो ना ग, , कॉलेज मधल्या एक फ्रेंड चा आज थोडा अक्सिडेंट झाला म्हणून त्या गडबडीत होतो."
" अशीच, सगळ्यांना मदत करत जा! चल जेऊन घेऊ या."
"हो आई मला खूप जोराची भूक लागली आहे चल."
आईबरोबर जेवत असताना त्याची चुळबुळ सुरूच होती.
आई म्हणाली " काय रे काय झालं आज?"
"काही नाही ग आई, एवढ्या वेळ काही खाल्ले नाही म्हणून थोडा अस्वस्थ होतो."
"नीटजेव हो पोळी घे अजून आणि भात पण जास्त घे."
त्याने फटाफट जेवण उरकलं आणि त्याच्या बेड वर जाऊन बसला.
फोन ची बॅटरी बरीच ड्रेन झाली होती म्हणून मोबाइल चार्जिंग ला लावला आणि लावत असतानाच मेसेज केला" HI"
दुसऱ्या सेकंदात पलीकडून रिप्लाय आला " HI".
" झोपली नाहीस?"
"नाही, वाट पाहत होते तुझ्या मेसेज ची."
"उशीर केला का मी मेसेज पाठवायला ?"
"उलट लवकर पाठवलास!"
"अच्छा मग नंतर पाठवू का?"
"ए ! मी अपेक्षेपेक्षा लवकर पाठवला अस म्हणले याचा अर्थ नंतर पाठव असा नसतो."
त्याने स्मायली ची ईमोजी पाठवली तिकडून पण smile आली.
"मग कसे वाटतंय?"
" एकदम मस्त, छान ! मला असं वाटतंय की मला खूप दिवसानंतर रेस्ट मिळाली आहे. तू उद्या येणार आहेस ना मला भेटायला?"
"आता उद्या कशाला यायला पाहिजे आज तर होतो ना मी दिवसभर?"
" ते काही मला माहित नाही तू उद्या पण इथे ये आणि दिवसभर इथेच थांब!"
" ही भलतीच जबरदस्ती तुझी. आज मी थांबलो ठीक आहे उद्या ही मी थांबलो तर तुझे आईबाबा म्हणतील हा नक्की आहे कोण आणि काय करतोय?"
"आईबाबांना काय सांगायचे ते मी मॅनेज करते पण तू उद्या ये आणि एक काम कर उद्या डबा न घेता ये."
"म्हणजे आजची लेक्चर बुडाली तशी उद्याची पण बुडवायची?"
"ऑफकोर्स माझी पण बुडतात आहेच ना!"
"अगं तू तर आधीपासूनच लेक्चर बुडवायची ग पण मी तर लेक्चर अटेंड करायचो न!"
"हे बघ तुला लेक्चर महत्वाची आहेत की माझ्या इथे येणे ते तू ठरवं. उदयानंतर मला डिस्चार्ज मिळून जाईल मग मी काही तुला बोलावणार नाही उद्याच्या दिवसाचे मी बोलावते आहे."
"बरं, किती वाजता येऊ?"
"लेक्चर 7.30 ला सुरू होत तू 7.25 ला ये!"
" अग ए, एवढ्या लवकर कसे येणार? एवढ्या लवकर आलो तर तुझे बाबा किंवा आई जे कोणी असेल ना ते म्हणतील काय हा पोरकटपणा?"
"बरं ठीक आहे, किती वाजता येतोस?"
"9 पर्यंत येतो!"
"9 ?"
"अग 9 त्यातल्या त्यात लवकर नाही का?"
"अजून लवकर ये"
"बरं ठीक आहे लवकर येण्याचा प्रयत्न करतो!"
"प्रयत्न नाही तर लवकर यायचेच आहे तुला!"
तू एवढ्या पटापट कसे टाईप करतेस ग?"
"सवय आहे मला!"
"चाट करायची?"
"अंहं....मेसेज करायची!"
"तुला एक गंमत सांगू?"
"सांग ना!"
"आज मी जेवण लवकर उरकलं!"
"का ?"
"आज मला तुझ्याशी चॅट करायचं होतं ना! तुला मेसेज पाठवायचा होता."
" रिअली? चला माझ्याशी बोलण्यासाठी कधी नव्हे ते तू तयार झालास!"
" माहिती नाही देविका पण आजचा सगळं दिवस मला त्रास झाला...."
"कसला?"
"जे तुझ्यासोबत झालं ते माझ्यामुळे झालं हे फीलिंग जे आहे न ते मला खूप त्रास देतंय."
"तू वेडा आहेस विवेक! सेल्फ गिल्ट हा जो प्रकार असतो ना तो कधीच बरा होणारा नसतो आणि तू या गिल्ट मध्ये राहू पण नकोस. तू मला बोलून निघाला म्हणून मी रडण्याची रिऍकशन दिली. मी नसते रडले तर हे असं झालं नसतं."
"हा तुझा मोठेपणा आहे पण मी बोललो नसतो तर तू रडली पण नसती ना!"
" हे बघ आपलं काही या गोष्टीबद्दल तुझं की माझं हे थांबणार नाही.त्यामुळे तू ठरव की तुला यामधून किती लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे."
"मला आज असं वाटले की तुझी काळजी मी घ्यावी खरोखर अगदी मनापासून सांगतोय."
" कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत माझ्या बोलण्याकडे लक्ष न देणारा तू, आज लगेच काळजी घ्यावीशी वाटली?"
" हो कारण तुझ्या परिस्थिती ला मी जवाबदार आहे हे असं राहून राहून वाटत होतं न म्हणून."
"आणि म्हणूनच तू मेसेज केलास का मला?"
"हो!"
" ठीक आहे मग नको बोलू माझ्याशी."
"अगं अस नाही"
"मग कसे. तुला काळजी वाटते म्हणून तू मेसेज केला बोलायची ईच्छा नव्हती."
"असं नाहीय ग तू समजून घे!"
"काय समजून घेऊ ? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत काय समजण्यासारखे असते तुला?"
"अगं तू वाद नको घालूस तुला बरे नाही आहे!"
"मला सगळं बरं आहे! तुझ्याशी मी बोलतेय कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू बोलतोय कारण काय तर तुझ्यामुळे मला काहीतरी झालं म्हणून तू बोलतो आहेस."
" अंग अस नको म्हणू मला तुझ्याशी बोलायचं आहे."
" काय बोलायचं आहे?"
"हेच की तू कशी आहेस?"
" मला हे नाही बोलायचे..."
"मग काय बोलायचे आहे..?"
" तुला माहिती आहे की मला काय बोलायचं आहे."
"आतां रात्री?"
" नाहीं, जेव्हा भेटशील तेव्हा, उद्या!"
" कशाबद्दल?"
"तुझ्याबद्दल!"
"म्हणजे कशाबद्दल ?"
" तुझ्या वागण्याबद्दल!"
"आता तर मी नीट वागतोय ना!"
" नाही ! हे माझ्या अपघात चे कारण झाले म्हणून तू वागतोयस. तू असा नाहीच आहेस तू काहीतरी वेगळा आहेस! तू आहेस एक आणि वागतोयस वेगळं ."
"ए बाई दिवस तर वाईट गेला आता रात्र पण अशीच घालवते की काय माझी?"
तिचा स्मायली चा मेसेज आला " हो रात्रभर चॅट करायचं माझ्याशी!"
"म्हणजे मी उद्या येऊच शकणार नाही मग!"
"का? काय झालं रात्रभर चाट करून मी नाही का उद्या सकाळी उठणार!"
" अंग बाई तू हॉस्पिटलमध्ये झोपली आहेस तुला काही धावपळ नाही करायची उलट तुझ्यासाठी सगळे धावपळ करणार आहेत. मी आता नाही झोपलो तर उद्या येऊच शकणार नाहींय!"
"ते काही मला माहित नाही, आत्ता तर रात्रीचे फक्त 11.30 वाजलेत तू माझ्याशी कमीत कमी 2 पर्यंत चॅट करायचं आहे."
"त्याने कपाळाला हात लावलेला ईमोजी पाठवला तर त्यावर तिचा डीवचणार स्मायली आला.
"झोपू का आता देविका..?"
"नाही... बोल काय जेवलास?"
"माझी सगळ्यात आवडती गोष्ट!"
"काय?"
"खिचडी, कढी, पापड, खाराची मिरची आणि लोणचं!"
" अरे वा मस्त!आजारी मी आणि खिचडी जेवतोयस तू!"
"अंग अस नाही माझ्याआईच्या हातची खिचडी मला खूप आवडते!"
"उद्या आणशील का माझ्यासाठी?"
" हो आणेन की पण तू म्हणाली ना डबा नाही आणायचा!"
" डबा तुझ्यासाठी नाही आणायचा, माझ्यासाठी आणला तर चालेल...आणि खिचडी खायला काय हरकत आहे?"
" बरं आणेन पण मग थोडा उशीर लागला तर चालेल?"
"नाही वेळेतच यायचं आणि सकाळी 9 लाच खिचडी आणायची! ती आणल्यावरती मी खाणार आणि ती खातानाच तुझ्याशी बोलणार."
" बरं मी सांगतो आईला गरम गरम खिचडी करायला आणि तुझ्या करता खास मिक्सर मधून काढून आणेन."
"का मला दात नाहीत का?"
" असं नाही तू आजारी आहेस ना, तर तुला खायला खूप छान वाटेल आणि वरून तुपाची धार सोडून !"
" बरं हरकत नाही, मग नक्की 9 वाजता येणार आहेस?"
" हो येईन ना!"
" अच्छा तुझा मला एक फोटो पाठव."
"काय! फोटो कशाला?"
" असंच तू किती दमला आहेत हे मला पाहायचं आहे."
"मी काही दमलो नाही."
" बरं नसशील दमला, असा विचार कर की मला हे पाहायचं की तू व्यवस्थित पोचला ना ? तुला जाताना काही लागलं नाही ना? कुठे धडपडला नाहीस ना?" अस म्हणून तिने हसण्याची स्मायली पाठवली.
त्याने ........ .....असा मेसेज केला की यावर त्याच्याकडे बोलण्यासारखे काही नाही.
ती परत हसली.
त्याने विचार केला की हिला खरंच कळले का की मी पडलो की काय ते.
" चल ना पाठव रे पटकन."
"नाही".
" ए तू पाठवं बर का! आजारी माणसाची ईच्छा पूर्ण करायची असते. उद्या मला काही झाले तर...?"
"ए बाई पाठवतो पाठवतो."
परत तिचा हसणारा डीवचणारा स्मायली आला...
त्याने एक फोटो काढून पाठवला केस विस्कटलेले आणि डोळ्यावर झोप. तो फोटो पाहुन ती खूप हसायला लागली
" हा फ़ोटो ना मी जपून ठेवणार आहे"
"का?"
"अरे या फोटो मध्ये दिसतायत की माझ्यासाठी कष्ट घेतल्यावर तू किती दमलेला दिसत आहेस!"
त्याने चूप बसणारा ईमोजी पाठवलं " आता झोपू का खरच? उद्या येईन ना सकाळी ."
"खरच झोपायचं आहे का तुला?"
" हो मग?"
"ए तुला गाणं म्हणता येत?"
" नाही मला कुठली गाणी म्हणता येत नाही आणि लोरी बिरी पण म्हणता येत नाही."
"कसला आहेस तू आजारी माणसाला....."
" ए बाई...सारखे काय आजारी आजारी म्हणून माझयाकडून काम करून घेतेस ग... . प्रत्येक गोष्ट आजारी माणसाची ऐकायची की काय ?"
"बरं ठीक आहे...तू असं बोललास ते लक्षात ठेवेन मी...
आणि सारखे काय मला ए बाई असे म्हणतोस हे पण लक्षात ठेवीन...चल बाय गुड नाईट."
"अंग... असं काय ऎक तर!"
"बाय म्हंटल ना एकदा! बाय आता मी नेट ऑफ करतेय उद्या सकाळी भेटू गुड नाईट!"
तिचा गुड नाईट चा मेसेज आल्यावर त्याने मेसेज टाईप केला पण तो तिच्यापर्यंत पोचलाच नाही....
कपाळाला हात आपटला तर तो नेमका मोबाईल चा हात होता...त्यामुळे जोरात लागला
"आता काय उद्यापर्यंत वाट पहायची आहेच तर झोपावे..."
असे म्हणून झोपायला गेला तर ब्लॅंकेटचे टोक त्याच्या डोळ्यात गेले...
डोळे चोळत चोळत म्हणाला...
"अरे काय दिवस आहे का काय हा माझा पिच्छाच सोडत नाही भिंतीवर तारीख लिहून ठेवतो " असे म्हणून त्याने भिंतीवर तारीख लिहिली आणि सगळ्यात वाईट (कंसात प्रश्नचिन्ह) दिवस असे लिहिले....आणि मग स्वतःशीच म्हणाला की खरच वाईट गेला की वेगळा गेला?
हा विचार करत करत आणि सकाळची खिचडीचा डबा स्वप्नात पहात त्याला झोप लागली....
क्रमशः
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा