अनुभव एक, किस्से अनेक- भाग ८
नर्वस ब्रेक डाउन
नमस्कार ईरा वाचकहो,
मागच्या भागात आपण बघितले वल्लरी सगळ्यांना भेटते...
चला पुढे पाहू...
अमेरिकेत येऊन वल्लरी ला जवळपास साडेसहा महिने झाले. कंपनी मध्ये तिच्या खेळकर स्वभावामुळे आणि कामामुळे ओळखली जाऊ लागली होती. अचानक काही मदतची आवश्यकता लागली, तर ऽऽ ....मॅडम जी लगेच तयार असायच्या.
एलोरा ...वल्लरी कडेच शिफ्ट झाल्याने दोघींचा वेळ सोबत खूप छान जायचा. जस जसे दिवस सरकत होते तसे दोघींची मैत्री अजून घट्ट होत होती. रेहान बद्दल एलोरा ला समजले. वल्लरी नक्की कोणत्या मानसिक त्रासातून जात आहे. किती काही गोष्टींशी स्वतः च डील करतेय ह्याचा विचार करूनच तिला खूप त्रास होऊ लागला होता. वल्लरी ला ह्या त्रासातून बाहेर काढायचेच करून मनाशी निर्धार केला.
एकदा सगळ्यांनी मिळून ट्रिप जायचा प्लॅन केला. प्लॅन ऐकून वल्लरी ने नाही करून नकारघंटा चालू केली. सगळ्यांना कळेच ना की...हिला काय झालं? नेहमी फिरायला जायच म्हंटलं की...सगळ्यात पुढे असणारी ही....आज नाही म्हणतेय. निकि, वेरोनिका, जोआना आणि मॅक्सिम् सकट एलोरा ला सुद्धा प्रश्न पडला.
संध्याकाळी बोलू करत सगळे आपापल्या कामाला लागले.
\"काय मग माय डिअर लव ...आज घरी जायचा विचार आहे की नाही?.\"...एलोरा ने टेबलावर टक टक करून, वल्लरी ला कामात गढून गेलेल बघून विचारल...तशी वल्लरी भानावर आली...लॅपटॉप बाजूला करून एलोरा कडे वळली ...तशी एलोरा बोलली ....\" तुझे डोळे बघ, खूप थकल्या सारखे वाटत आहेत. जरा तरी आराम द्यायचा ना बिचार्या त्या सुंदर तपकिरी डोळ्यांना...किती केविलवाणे बघत आहेत बघ...\"...
\"...हं?...\"...एकदम भांबावून वल्लरी एलोरा कडे बघत होती आणि तिच्या लक्षात आले की घरी जायची वेळ झालीये.
\" चल निघू...आणि जाता जाता ग्रोसरी पण खरेदी करुयात....\"...बॅग खांद्याला घेत वल्लरी म्हणाली तसे दोघी ऑफिस च्या बाहेर पडल्या...
\"..हुश्श ऽऽ पोहचलो एकदाचे घरी...\" ...वल्लरी आल्या आल्या सोफ्यावर जवळपास स्वतःला झोकून देत बसली. खूप सार्या गोष्टी घेतल्याने Walmart ची ग्रोसरी शॉपिंगने दोघी दमून गेल्या. पुढच्या दिवशी सुट्टी असल्याने जरा जास्तच निवांत झाल्या दोघीही.
घराच्या मागच्या बागेत व्हाइट टेबल खुर्च्या आणि कूल व्हाइट लाइट च्या माळा सोडलेल्या होत्या. स्पीकर वर सॉफ्ट इंग्लिश म्युझिक प्ले करून दोघी ही निवांत वाइन घेत गप्पा मारत बसल्या. थंडी सुद्धा बरीच होती.
\" ए लव ...ऐक ना ऽऽ\" ...एलोरा...वल्लरी कडे बघत म्हणाली...डोळे मिटून वल्लरी गाणी ऐकत होती. चेहर्यावर एकदम शांत भाव...
\" हो..बोल..ऐकतेय मी...\" डोळे मिटूनच वल्लरी बोलली...
\" चल ना ...आमच्या सोबत ट्रीप ला...सगळे किती उत्साही आहेत बघ...परत तू भारतात गेलीस की कधी येशील नाही माहिती...कमीतकमी माझ्या लग्नाला तरी येशील ना? .\"...एलोरा ने मस्त इमोशनल करत तिला म्हणाली...
झाल..वल्लरी एकदम भावूक झाली...\" मी आले असते गं...पण...\"
\"पण काय...? बोल ना.....\"
\"मला पोहता येत नाही...\" वल्लरी एकदम चेहरा पाडून बोलली..
\" अच्छा...एवढच होय...अग काही होत नाही...तू चल तर आधी...नाहीतर जबरदस्ती पण नेऊ शकतो तुला आम्ही. \"...एकदम बारीक डोळे करून...एकाबाजूने ओठांवर हसू ठेवत एलोरा.. वल्लरी कडे बघत बोलली...
एक भुवयी वर करत वल्लरी प्रश्नार्थक नजरेने बघत होती...\" नाही..ती जहाज बुडाली म्हणजे? मला नाही जायचे बाबा इतक्यात वरती...एकतर शादी के लड्डू पण नाही खाल्ले अजून मी...\"
झालं असं...सगळ्यांनी मिळून बारा दिवसांची एक मस्त क्रूझिंग् करायच प्लॅन केल. जाताना मोठ्या जहाजाने जाऊन येताना विमानाने यायचे करून सगळ्यानी ठरवले. आता वल्लरी ला पोहता येत नाही म्हणून ती नाही करत होती.
एलोरा अजून काही बोलायच्या आधी वल्लरी ला आई चा फोन आला.
\" हाय माझी आईली...! कशी आहेस ग्गं? आज आठवण आली तुला ना..!..\" वल्लरी
\" गधडे...आज सकाळीच केला होता ना मी तुला फोन...तू तर अशी बोलतेय जणू काही मी किती तरी वर्षानी फोन केला...\" ..आई बुक्का मारायची अॅक्शन करत बोलली...
वल्लरी सुद्धा...आऽऽ करून लागल्याची अॅक्टींग करत बोलली...\"बोल ना आई...काय झालं?..तुझा चेहरा जरा सिरियस दिसतोय..\"...वल्लरी चा चेहरा सुद्धा काळजीयुक्त झाला...
आई ने जास्त ताणून ना धरता बोलू लागली...\"..परवा रेहान घरी येऊन गेला. लग्नाच कधी ठरणार करून. घरचे सारखे विचारत आहेत.\"
जरा विचार करून वल्लरी बोलली ...\" बाबा काय म्हणाले मग?\" कारण अलीकडेच तिने रेहान चे बदलले वागणे नोटिस केले होते ...
\"त्याने जॉब सोडला हे माहिती आहे का तुला? कुठे जॉब शोधत आहेस का म्हणून विचारले तर हो करून बोलला. मला तर त्याचे मनसुबे चांगले नाही दिसत. बघ अजून ही वेळ नाही गेली विचार कर माझी वाघोबा...\"...आई ने तिला अगदीच सोप्या शब्दात सांगितले .
हे ऐकून वल्लरी ला चक्कर यायचीच बाकी होती. तिला ह्यातलं काहीच माहिती नसल्यामुळे आई ला तिने काहीच प्रतिक्रिया नाही दिली. विषय बदलत तिने फोन ठेवून दिला आणि खुर्ची ला रेंगाळून डोळे मिटून बसुन राहिली. डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ उडाला होता. काहीच कळत नव्हते...तेवढ्यात रेहान चा फोन आला...तिने पण विचारांच्या गर्तेत लगेच उचलला...
\" हॅलो...कोण बोलतय?\"...वल्लरी ने फोन कोणाचा आला ते ना बघताच उचलला.
रेहान ने नेहमी प्रमाणेच...\" कोण बोलतयं? एवढ्या लवकर विसरलीस पण तू? वाह...तिकडे गेलीस काय तुझे तर रंगच बदलले...आणि का नाही बदलणार...अमेरीकन जे झालीस ना आता...\"
वल्लरी ने सुद्धा .\"तुला जे समजायचे ते समज \"...करून उत्तर दिले आणि ती वाट बघत होती रेहान कधी बोलेल की जॉब सोडलाय ते ...
\" बर ऐक मी ट्रिप ला जाणारे 12 दिवसांसाठी. खरंतर सगळे चल चल करत आहेत तर जाणार आहे. तेवढेच अजून वेगळे देश फिरून होतील तिकडे परत यायच्या आधी...\" वल्लरी ने सांगायचे म्हणून सांगून टाकले
\" तू जातेयस ना...मग जा ना? सगळे काही फिक्स केल्यावर मला का विचारतेय?\"...रेहान अगदी रागातच बोलला
\" हे बघ तूला मी सांगतेय. विचारत नाहिये आणि तुला विचारायला तू माझा नवरा नाही झालास. मी काही बाहुली नाहिये तू म्हणशील तसे करायला आणि ऐकायला...समजलं? \" ...अगदी शांतपणा वल्लरी ने सुद्धा उत्तर देऊन टाकले ...
रेहान चिडक्या आवाजात....\" तुझ्यामुळेच मी जॉब सोडला...सगळे मला विचारात होते माझा का झाले नाही? मी का गेलो नाही? कधी जाणार? अशी कशी एकटी गेली?...मी सोडला मग जॉब...तसं पण असा काय फरक पडणार...आता कार आणि बाइक चे हफ्ते भरायचे आहेत..( आवाजात अगदी उदासी पणा आणून बोलला)...पण तू आहेस ना मग टेंशन नाही मला...हाहाहा...\"...
कसेही करून उत्तर द्यायलाच पाहिजे नाहीतर आपण ना केलेल्या गोष्टीला आयुष्यभर सुनावले जाईल ह्या विचारानेच तिला क्रोध आणि दुःखाने ग्रासले...आलेला हुंदका आतल्या आत दाबून...स्वतःला सावरून वल्लरी ने ह्यावेळी जरा रागातच उत्तर दिले.......
\" हे..हे बघ...तुला मी नाही बोलले जॉब सोड म्हणून...सगळे बोलतात म्हणून तू सारासार विचार ना करता एकतर जॉब सोडलास आणि माझ्यावरच आरोप करून मोकळा झालास...मी जबाबदार नाहिये तुझ्या जॉब सोडायच्या निर्णयाला. तू मला विचारुन केलं नव्हतं जे की माझ्यावर आरोप करत सुटला आहेस आणि मी का म्हणून भरू तुझे हफ्ते? निर्णय तुझा होता. गाड्या घेताना विचारला होतास का मला? नाही ना. गरज नसताना घेतलास आणि मी आहे म्हणजे काय रे? काय म्हणायचं तुला?..आणि हो...मी काही बोलत नाही ह्याचा अर्थ हा नाही की तुझ काही पण बोलणं ऐकून घेईन. एवढाच माज आहे ना तुला...मग जा शोध दुसरा जॉब...\"\"\"
\" हेच की तू आहेस..आता तुला एवढा चांगला पगार आहे. मग काही दिवस मी आराम करतो. तुला पाहिजे तेवढे वर्षे काम कर. आपण त्याच पैशांनी तुज्या नावावर प्रॉपर्टी करू आणि मग तू घरी राहून घरच्यांनकडे लक्ष दे. मी कामाला जाईन. येणार्या प्रॉपर्टीचे भाडे चा तू मला हिशोब दे जा....\" रेहानने सगळीच बुद्धी गहाण टाकली बहुतेक जे असा बोलत सुटला होता...जराही वल्लरी च्या मनाचा विचार ना करता बोलतच सुटला होता...त्याच्या आवाजात आलेला माज तिला क्षणोक्षणी त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. तिला त्याने पूर्णपणे गृहीत पकडले होते...
हे ऐकून वल्लरी डोके भयंकर दुखू लागले होते...अगदीच हताश झाली...जणू काही कोणीतरी तिच्यातली ऊर्जा काढून घेतल्यासारखे ती गळून गेली बसल्या ठिकाणी..त्याचे शब्द नि शब्द मनावर आघात करत होते...तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले... एलोरा बाजूलाच गाणी ऐकत बसली होती..तीच लक्ष गेलं तशी तिने तिला थोपट होती. तिला असं बघून एलोरा चा जीव कासावीस झाला होता. ..
आता तर रेहान आवाजात दुःखी करून बोलला...\" तू आलीस आणि मी नवीन जॉब ला लागलो तर मला सुट्टी पण नाही घेता येणार. इथे भांडण करून निघालो म्हणून कोणी जॉब पण देईना. कंपनी चे ज्या दुसर्या कंपनी सोबत करार आहेत त्यांना पण माहिती पडले...\"
हे ऐकून वल्लरी ने काहीच ना बोलता फोन कट करुन बंद करून टाकला. रेहान च दुतोंडी बोलणं तिला विचार करायला भाग तर पडलच ...पण त्याचे शब्द जे जिव्हारी लागले ते आठवून तर डोळ्यातले अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. \"डिअर जिंदगी\" मुव्ही मधल्या गाण्याच शब्द न् शब्द लागु होत होता...
यहाँ से कहाँ जाऊ
कहाँ मैं छुप जाऊ
ये आधा सा दिल
मैं कैसे लगाऊ
हूँ खुद से जुदा मैं
हूँ खुद से अलहदा
ये आधा सा दिल
मैं कैसे बसाऊ
ओ रूठे दिल, रूठे दिल, रूठे दिल
ओ झूठे दिल, झूठे दिल, झूठे दिल
ओ टूटे दिल, टूटे दिल, टूटे दिल
है क्या तेरी मुश्किल
ओ just go to hell दिल
Just go to hell
ओ दिल... just go to hell
दिल... just go to hell
ओ दिल... just go to hell दिल
है मेरी ग़लती
या खुद की खता तू
शर्मिंदा दिल बस इतना बता तू
के अब क्या पाना
के अब क्या खोना
शर्मिंदा दिल बहुत हुआ रोना
रूठे दिल, रूठे दिल, रूठे दिल
ओ झूठे दिल, झूठे दिल, झूठे दिल
टूटे दिल, दिल, टूटे दिल
है क्या तेरी मुश्किल
ओ just go to hell दिल
Just go to hell
ओ दिल... just go to hell
दिल... just go to hell
ओ, ओ दिल... just go to hell दिल
दर्दों की आदत सी लग गयी है
आँसू भी मेरी हँसी उड़ाए
देती हूँ खुद को मैं खराशें क्यूँ नयी…
ओ रूठे दिल, रूठे दिल, रूठे दिल
झूठे दिल, झूठे दिल, झूठे दिल
टूटे दिल, टूटे दिल, टूटे दिल
है क्या तेरी मुश्किल
ओ just go to hell दिल
ओ just go to hell
ओ दिल just go to hell
दिल... just go to hell
ओ दिल just go to hell दिल
Just go to hell
ओ दिल... just go to hell (just go to hell)
Just go to hell ओ दिल... just go to hell दिल
अशीच काहीशी हालत झाली वल्लरी ची...
एलोरा पण तिला मायेने जवळ घेऊन थोपटले...तिचे मन मोकळे होई पर्यंत रडू दिले...
त्याक्षणी एलोरा ने ठरवले की हिला ह्यातून बाहेर काढायचेच. त्यासाठी योग्य व्यक्तीची मदत लागणार होती. हे काम इतके सोपेही नव्हते...पण करावे लागणार होते...
क्रमशः
तुम्हाला काय वाटते वाचकहो? वल्लरी जाईल का सगळ्यांसोबत ट्रीप वर? तिकडे अजून काही होईल का? नक्की कळवा comment मध्ये...
© पूजा आडेप.
अनुभव एक, किस्से अनेक- भाग ७ भेटी
नमस्कार ईरा वाचकहो,
सॉरी भाग उशिरा ....खूपच उशिरा टाकला...खरंच सॉरी....:-(....पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करेन....:) ...ह्या गेल्या काही दिवसात बरीच कामे एकदम आली त्यामुळे उशीर झाला...आशा करते की समजून घ्याल....
मागच्या भागात पाहिले की कसे एलोरा मस्त दाल खिचडी ची सरप्राइज देते...आणि तिची आणि नंदिनी ची भेटीचे वर्णन सुद्धा करते...दिवस पूर्ण वल्लरी चा सुंदर नक्कीच होता...पण संध्याकाळ मात्र तळमळ गेली...रेहान च्या टोचून बोलण्याने...चला तर पाहूयात वल्लरी चा पहिला दिवस आणि भेटी...
पुढे...
\" टिरीक् ऽऽ टिरीक्ऽऽ....टिरीक्ऽऽ टिरीक्ऽऽ....अलार्म वाजला तसा किलकिल्या डोळ्यांनी अलार्म पाच मिनिटांवर सेट करून परत वल्लरी झोपून गेली...
पाच मिनिटे करता करता जाग आली तर वीस मिनिटे झाली... उबदार अंथरूणातून बाहेर पडायला जीवावर आले होते...कसेबसे बेड मधून बाहेर पडून तयार होण्यास गेली...
तयार होऊन ब्रेकफास्ट संपल्या बरोबर एलोरा चा फोन आला.
\" गुड मॉर्निंग लव , झाली का तयारी? \" ...एलोरा ने वल्लरी ला हसून विचारले तसे तिने सुद्धा उत्तर दिले...
\" व्हेरी गुड मॉर्निंग एली...झाली माझी तयारी...तू कधी पर्यंत येतेस? \"
\" पाचच मिनिटे दे...आलेच मी \"..एलोरा
वल्लरी ने तिचा आवडता लांब बाह्यांचा, क्लोज नेक व्हाइट कॅज्युअल टी शर्ट आणि त्यावर प्लेन ब्लॅक कलर चा गुढगा पर्यंत येणारा पेन्सिल स्कर्ट, पायात ब्लॅक पॉईंट टो स्टिलेटो हील बूटस् , डाव्या हातात स्मार्ट वॉच,उजव्या हातात नाजूक हिर्याचे ब्रेसलेट, कानात सिम्पल स्टड्, केस मोकळे सोडून एका बाजूला पिन अप करून, नेहमीची रुबि वू रेड lipstick आणि डोळ्यात भरून लावलेले काजळ...तिच्या डार्क ब्राऊन डोळ्यांना खुलवत होते...
एलोरा आली तशी पटकन हँडबॅग आणि ओव्हरकोट घेऊन बाहेर पडली...
कार मध्ये बसत वल्लरी ने विश केलं तसं एलोरा ने तिला हसून..\" सुंदर दिसतेस \" करून प्रशंसा केली...तशी वल्लरी खुश झाली. एक सेल्फी आईला आणि रेहान ला पाठवून फोन बॅग मध्ये सायलेंट वर करून ठेवून दिला.
मस्त बाहेरची थंड हवा अनुभवत drive-thru वरुन कॉफी घेत दोघींचा प्रवास गप्पा मारत चालू होता...थोड्याच वेळा मध्ये ऑफिस वर दोघी पोहोचल्या तशा, एलोराच्या फ्रेंड्स नी येऊन त्यांना दोघींना विश केलं आणि एक बुके वल्लरी ला देऊन वेलकम केले तशी ती खुश झाली...तिला तिचे आवडणारे वॉटर लिली आणि रोझेस् जे होते त्यात...सगळ्यांशी ओळख करून घेत असताना, तिच्या जवळ एकाने येऊन...
\"यु नो व्हाॅट? यु नीड टू इट मोअर...\"...हा होता निकि...किडकिडीत बांध्याचा, चष्मा घातलेला, गोरा , निळे डोळे, उंच आणि सोनेरी कुरळे केस...ग्रीक...त्याचे कुरळे केस तो ग्रीक चा असल्याचे खुणा दाखवत होत्या...
वल्लरी ने एकवार त्याचा कडे पहिल...चेहर्यावर कसेनुसे भाव ठेवून...किंचित हसून मान डोलावली...पण मनातच ...\" स्वतः कडे बघावे आधी...माझ्यापेक्षा पण बारीक आहे...आणि म्हणे मी खूप खायला पाहिजे...आला मोठा...शहाणा..\"...निकि मोठाच होता वल्लरी पेक्षा...
पाठीमागून वेरोनिका ने येत सगळ्यांना...\" हाय गायज्...वेलकम मिस...वल्लरी..\"...एकदम चेहर्यावरचे हावभावच बदलून गेले वल्लरी च्या...डोळे एकदम मोठ्ठे करून बघतच होती की...वेरोनिका पुढे बोलू लागली...\" काय ग...काय झालं? अशी का एकदम स्तंभित झालीस? तुझे नाव नीट उच्चारले म्हणून का? ..\"
सवयी प्रमाणे परत वल्लरी ने मान डोलावली ...पण ह्या वेळेस तिने...हो म्हणून सांगितले...तिचे ते मान डोलावने बघून बाकीच्यांना म्हणजेच निकि, वेरोनिका, जोआना आणि मॅक्सिम ऊर्फ मॅक्स...या सगळ्यांना गम्मत वाटत होती आणि कुतूहल पण होते. कारण त्यांनी बर्याच भारतीयांना मान डोलावून बोलताना बघितले होते. एवढ्या सगळ्या मध्ये निक आला...
निक ...अमेरीकन...ह्या सगळ्यांचा बॉस...वय साधारण पन्नाशीच्या आसपास...भारदस्त व्यक्तिमत्त्व...एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व...काही व्यक्तिगत त्रास असेल तर खूपच छान समजावून सांगणार...कामाच्या बाबतीतही तेच...डोळ्यांवर चौकोनी फ्रेम ची नजरेत भरेल असा चष्मा, भुरे रंगाचे डोळे, उंच, पोट थोडे सुटलेले, सोनेरी ब्राऊन केस... ब्लॅक चा शर्ट त्यावर एक साजेशी टाय आणि त्या टाय ला एक साजेशी पिन... आणि प्लेन क्रीम रंगाची पँट...वल्लरी कडे येऊन शेक हँड करून तिला वेलकम केले...जुजबी गोष्टींची चौकशी करून सगळ्यांना परिचय करून दिला....
वल्लरी सगळ्यांना भेटून स्वतः च्या जागेवर बसली. छान मोठा टेबल त्यावर काच, लेगो डाॅटस् च पेन आणि पेपर क्लिप होल्डर, बाजूलाच वेलकम नोट असलेला एक छोटासा तळव्यावर मावेल असा फ्लॉवर पाॅट. दोन-दोन कॉम्प्युटर डेस्क, की बोर्ड, वायरलेस व्हाइट माऊस...\"Bollywood\" करून ठळक पणे दिसेल असा मोठ्ठा कॉफी मग...अश्या बर्याच गोष्टी वापरून तिचा डेस्क सजवलेला होता. डेस्क ला लागूनच मोठी काच होती ज्यातून बाहेरच सुंदर दृश्य दिसत होता.
एक दीर्घ श्वास घेऊन डेस्क च्या इथेच छोटीशी सुंदर अशी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती ठेवून नमस्कार करून...कामाचा श्री गणेशा केला.
.
.
.
दिवस पटकन संपला कामाच्या गडबडी मध्ये. एलोरा तिला घरी सोडत होती की ...वल्लरी ने तिला तिच्याकडे शिफ्ट म्हणून सांगितलं. तेवढीच सोबत होईल दोघींना करून. नाहीतरी एक रूम तशी पण रिकामीच होती.
एलोरा...\" काय मग कसा गेला आजचा दिवस? \"
\" छानच होता...\"...वल्लरी बोलली नाही की तिचा फोन हातातच होता तो रिंग झाला. फोन वर नाव बघून तिच्या मनामध्ये आलेली उदासी चेहऱ्यावरही आली. एलोरा ने तिचे भाव अचूक टिपले. पण साध्या काही विचारायला नको आणि एकदा का तिच्याकडे शिफ्ट झालो की विचारू करून तिला घरी सोडले.
\"बाय एली...भेटूयात उद्या..\" करत वल्लरी पटकन आत गेली...दार व्यवस्थित बंद करून सोफ्यावर पहुडली...आणि परत फोन रिंग झाला...ह्यावेळेस फोन उचलत...\" हॅलो...\"
पलीकडून...\" काय मग कोणासाठी इतकी सुंदर तयार झालीस ते? \"...रेहान
\" स्वतःसाठीच झाले तयार...का होऊ नये का? तुझ्या घरातल्या स्त्रिया नाही होत का सुंदर तयार?...\" वल्लरी ने सुद्धा प्रतिप्रश्न केला....
\" किती लोक झाले फिदा तुज्या डोळे आणि स्मायल वर? जे भेटले त्यांना तर आलिंगन देत गेलीस असणार तू? लोकांना काय चान्स पाहिजे असतो. ते पण तुज्या सारख्या असतील तर मग बघायलाच नको..\"...रेहान ने टोमणा मारला...
\" तुला जे समजायचे ते समज जा...आणि माझ्यासारख्या म्हणजे काय म्हणायचं तुला?\"...वल्लरी ने थोड्या रागाने पण शांत पणे विचारल...
रेहान ने सुद्धा तिला हिणवून बोलला..\" तुझ्यासारख्या म्हणजे बारीक शरीरयष्टीच्या...सांभाळून रहा...कोणीतरी तुझा शारीरिक गरजा साठी वापर करून घेईल, नाहीतर एखादी मुलगी तुज्या वर जबरदस्ती करायची वैगरे...हाहा हाहा \"
त्याचे हसणे ऐकून तर वल्लरी च्या डोक्यात एकच सणक गेली...तिने फोन कट केला...पुढे तिला काही बोलावेसे वाटलेच नाही...सांगावेसे पण नाही वाटले की तिने एलोरा ला सोबत राहण्यासाठी बोलवले...
दिवस पूर्ण सुंदर गेला. उदास होऊन घरी फोन केला. आईने चेहरा बघतच विचारले ..\"काय झाले माझी लेझी पांडा ला बरे? इतकी उदास दिसतेय ..?\"
\" काही नाही ग आई...दिवसभराचा थकवा आलाय...\" म्हणत वेळ मारून नेली. पण आईचे मन ते...असच थोडीच मानणार...पण वेळ द्यावा करून जास्त काही विचारले नाही.
सगळ्यांशी बोलून फ्रेश होऊन...झोपायचा प्रयत्न करत होती. ...
रेहान...ज्याच्यामुळे ती मानसिकरीत्या अडकून पडली...विचित्रपणे...मानसिकरित्या खचून जात होती पण चेहर्यावर असलेल्या हसू ने सगळे झाकून टाकत होती...रात्री उशिरा कधीतरी मानसिक रित्या थकल्यामुळे झोप लागली....
\"प्रत्येक माणसाची एक दुखरी नस असते. त्यावर कधीही बोट ठेवा...ताज्या जखमे सारखी भळाभळा वाहायला लागते.\" हेच नको होतं तिला...म्हणूनच चेहर्यावर नेहमीच एक सुंदर मोहक हसू असे ....
बघूयात पुढे काय होते...तुम्हाला काय वाटते वाचकहो?
नक्की कळवा comments मध्ये...
क्रमशः
© पूजा आडेप.
अनुभव एक, किस्से अनेक- भाग ६, सायंकाळ
नमस्कार ईरा वाचकहो,
मागच्या भागात आपण बघितले, वल्लरी ची सोनेरी पहाट घरातल्यांशी बोलून किती छान झाली...त्यानंतर एली उर्फ एलोरा सोबतची शॉपिंग...तुम्हाला नक्कीच खूप सारे प्रश्न पडले असतील ना? रेहान आणि वल्लरी च संभाषण म्हणा...किंवा..एली सोबतची मैत्री...हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल....चला तर मग पुढे पाहूयात वल्लरी ची बॅक टू वर्क मोड च्या आधीची एक सायंकाळ .... आणि थँक्यू मेघा अमोल...?
मस्त ताणून दिल्यामुळे दोघींना खूप फ्रेश वाटू लागले होते. आता डिनर ला काय बनवायचं करून वल्लरी विचार करतच होती की, तितक्यात एली ने...ऐलान केलं की ती स्वयंपाक करेल....तोपर्यंत तुझ्या आवडीचा एखादा कार्यक्रम बघत बस...
एलोरा ने आधीच ठरवून ठेवले होते...वल्लरी आली की तिला \"दालखिचडी\" सरप्राइज देणार... तिला किचन मधून वल्लरी काय करत आहे ते दिसत होते...