\"अनुभव एक किस्से अनेक - प्रारंभ \" भाग 2
नमस्कार ईरा वाचकहो,
प्रत्येक भागासाठी एक व्यक्त होणारा उप-शब्द आहे. \"अनुभव एक किस्से अनेक-\" हा कथेचा मुख्य शीर्षक आहे.
आपण मागच्या भागात पाहिले होते की, कशी वल्लरी मायदेशी वर्षभराने परतली. तिची हुरहुर थोडक्यात आपण बघितलीच आहे. आता कथा थोडीशी मागे जाणार आहे. सुरुवातीच्या दिवसांत म्हणजेच कसा प्रारंभ झाला तिच्या प्रवासाचा...
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट, वल्लरी आणि रेहान दोघे एकाच कंपनी मध्ये सोबत काम करत होते. दोघे ही पाच वर्षे झाली रिलेशनशीप मध्ये होते. घरीही दोघांच्या एकमेकांबद्दल माहिती होते. दोघांनीही कंपनी भविष्याच्या दृष्टीने अमेरिकेमधील कंपनी साठी प्रयत्न सुरू केले.
नशिबाने म्हणा किंवा देवाची इच्छा वल्लरी ची निवड झाली. आपसूकच रेहान च्या मनामध्ये एक इर्षे सोबतच असुरक्षितता निर्माण झाली. ज्यापासून वल्लरी अनभिज्ञ होती.
वल्लरी ने ठरवले की मागे वळून नाहीच पहायचे आणि थांबायचे पण नाही. कारण तिच्यासाठी अमेरिका चा जॉब एक पळवाट सोबतच एका घुसमटून जगत असलेल्या मनासाठी शांतता होती. तिला कोणीच म्हणजे कोणीच नको होतं. अगदी आई वडील आणि बहीण सुद्धा!
जस- जसे कागदपत्रांची पूर्तता होत आली तशी वल्लरी ची उत्सुकते सोबतच धडधड ही वाढू लागली होती. ती तिचा अमेरिका व्हिसा चा अनुभव रेहान ला सांगत होती खूप उत्सुकतेने, पण रेहान वेगळ्याच विचारात हरवून गेला होता. मनामध्ये खूप काही चालू होतं त्याच्या...
शेवटी रेहान बोललाच तिला - \" झालं तुझ्या मनासारखं ना? तुझी तर मनापासून इच्छा नव्हती ना माझे पण तुझ्यासोबत व्हावे म्हणून? तू नक्कीच मनापासून प्रार्थना नसशील केली असणार म्हणूनच नाही झाल माझं.\"
वल्लरी - \"...अं?\" मिश्र नजरेने त्याला बघत ऐकत होती.
रेहान - \" तुझं काय आता! तू आता मुक्त पक्षी आहेस. तिकडे गेलीस की काही पण करा. कोणी विचारणारे नाही की बोलणारे नाही.\"
वल्लरी च्या डोक्यात एकच कळ गेली. तिरीमिरीतच रेहान ला बोल्ली,\" खबरदार रेहान! एक अजून शब्द नाही. एवढ्या वर्षांच्या नात्यामध्ये तू मला एवढेच ओळखतोस का? मी एकदा ऐकून आणि खपवून घेतलं तुझ्या शिव्या आणि माझ्याशी अनादरनीय वर्तन. आता अजिबात नाही.\"
तीच उत्तर ऐकून रेहान चा रागाचा पारा अजून वाढला.
\" तुला जॉब मिळाला म्हणून तुझी जीभ पण खूप बोलायला लागलीये. माझ्यामुळेच तुला हा जॉब लागला.\"
हे ऐकून तर वल्लरी चक्कर येऊन पडायची बाकी होती. तिने सुद्धा आता प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. परिणामांची चिंता न करता.
वल्लरी - ( रागातच) \" हाहा...तोंड पहा आरशात. म्हणे तुझ्या मुळे जॉब लागला. असं कोण होतं रे तुझ्या ओळखीच तिकडे? चल मी मानते की होतं कोणीतरी तर मग तुला का नाही लागला बरं? मुलाखत मी दिली. मेडिकल माझं झालं. व्हिसा साठी मुलाखत मीच दिली. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता सुद्धा मीच एकटीने केली. तू काय केलंस? काहीच नाही शिवाय एक मुलाखत ती पण सोबत आलास फार मोठे उपकारच म्हणायचे.\"
रेहान ला तिचे बोलणं अक्षरशः झोंबत होतं. ती बोलत असलेलं प्रत्येक वाक्य खर असलं तरी त्याने तिला टोचून बोलणं अजिबात कमी केला नाही. आधीच वल्लरी च्या मनातून जवळपास उतरलेला रेहान अजूनच जास्त उतरत होता. रेहान च्या मते वल्लरी च पान पण नाही हलू शकत त्याच्या शिवाय. यामुळेच कदाचित तो अजून जास्तच नियंत्रण करू पाहत होता.
अगदी तुसडेपणाने रेहान तीला ,\" चल निघ तू. मला तुझे तोंड पण नाही पहायचाय.\"
क्रमशः
पाहूयात पुढच्या भागात वल्लरी काय करते? तुम्हाला काय वाटते वाचकहो? नक्की टिप्पणी करा.
©️ पूजा आडेप.