गळ्यातील टाय पुन्हा एकदा व्यवस्थित करून सोहम ऑफिसला निघाला.
हे काय सोहम आज ऑफिसला कुठे निघालास ? आज सुट्टी घेणार होतास ना ?
शुभदाचा प्रश्न न कळून सोहम तसाच उभा राहिला.
अरे तूच माझ्या दादाला सांगितलं होतस ना की मित्राच्या ओळखीवर कोर्टाचं काम करून देतो म्हणून.
आता घरीच थांब . दादा येईल 1 तासात.
पाहिजे तर हाफ डे ने जा.
आता घरीच थांब . दादा येईल 1 तासात.
पाहिजे तर हाफ डे ने जा.
सोहम - शुभदा अगं खरंच लक्षात नाही माझ्या. पण सॉरी आज मला जावं लागेल. आधीच 2 जण सुट्टीवर आहेत सो मला सुट्टी घेता येणार नाही.
घेता येणार नाही तर कशाला उगाच लोकांना आशा दाखवायची . बिचारा दादा सकाळी 7 लाच गाडीत बसला आहे. आता तासाभरात ठाणे स्टेशन ला पोचेल. शुभदा चिडून म्हणाली.
त्यापेक्षा दादाला तिथे जाऊन मला फोन करायला सांग. 5 मिनिटात काम होऊन जाईल.
शुभदाला बोलण्याची संधी न देताच सोहम पटकन निघून गेला.
शुभदाला बोलण्याची संधी न देताच सोहम पटकन निघून गेला.
सोहम एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा तर शुभदा गृहिणी होती.
सहा महिन्यांपूर्वी ते शहरात स्थायिक झाले. पण इथे आल्यापासून सोहमला एक वाईट खोड लागली. नातेवाईकांना मोठ्या मोठ्या बाता मारून शहरात कसे पटकन काम होईल हे सांगत बसायचं आणि प्रत्यक्षात मात्र शुभदाच्या भरवश्यावर ढकलून द्यायचं. त्यातूनही त्या दिवशी ते काम होईलच याची खात्री नसायची. परिणामी शुभदाला वेळ फुकट घालवल्याबद्दल थोडेफार ऐकून घ्यावे लागायचे. याउलट काम झालं तर सोहमच्या वाट्याला कौतुक यायचं.
आताही तेच घडलं.

शुभदाच्या भावाचे २ महिन्यांपासून एक काम कोर्टातल्या सहीसाठी रखडले होते. त्यासाठी त्याला बरेच हेलपाटे मारावे लागले. शेवटी माझ्या मित्राची ओळख आहे. कोर्टात तुमचं काम करून देतो गुरुवारी जाऊ. असं सांगून सोहम ने दादाला बोलावलं पण स्वतः मात्र कामाला निघून गेला.
शुभदानें दादाला फोनवर निरोप दिला आणि परस्पर तिथूनच कोर्टात जायचे सुचवले.
त्यानंतर तिने दिवसभरात ५-६ फोन केले पण प्रत्येकवेळी अजून झालं नाही काम हेच उत्तर मिळत राहिलं.
शेवटी दादाला वाईट वाटू नये म्हणून शुभदा घरातली कामं आटपून गेली. तिथे गेल्यावर तिला समजलं की सोहमने ज्या मित्राच्या भरवश्यावर काम होईल अस सांगितलं तो मित्रच सुट्टीवर होता.

परिणामी नेहमीप्रमाणे दादाला दिवसभर ताटकळत उभं राहावं लागलं आणि हताश होऊन तो
जाताना म्हणाला , शुभदा दाजींना सांग , पुढच्यावेळी नीट चौकशी करा आणि मगच मला बोलवा.
जाताना म्हणाला , शुभदा दाजींना सांग , पुढच्यावेळी नीट चौकशी करा आणि मगच मला बोलवा.
दादांचं बोलणं शुभदाच्या जिव्हारी लागलं.
चौकशी न करता त्याने दादाला बोलावलं आणि तसंच परत जावं लागलं.
चौकशी न करता त्याने दादाला बोलावलं आणि तसंच परत जावं लागलं.
एकदा तर स्वस्तातल्या खरेदीची लालुच दाखवून आत्याला बोलवलं पण प्रत्यक्षात मात्र सगळ्या वस्तू दुप्पट भावात मिळाल्या.
शेवटी शुभदाने याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं.
लवकरच ती वेळ आली. पुढच्या आठवड्यात पुण्यात राहणाऱ्या तिच्या नणंदेचा म्हणजेच सोहमच्या मोठ्या ताईचा फोन आला.
खरं सांगताय का ताई? थांबा मग तुम्हीच बोलून घ्या.
असं म्हणत शुभदाने ताईंचा म्हणजेच नणंदेचा आलेला फोन सोहमकडे दिला.
मग पुढची १० मिनिटं ताईने सोहमला परदेशात निघालेल्या नोकरीची आणि तिप्पट पगाराची लालुच दाखवली. आणि जर इंटरेस्ट असेल तर तातडीने पुण्यात यायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे सोहम ने ऑफिसला सुट्टी टाकली आणि पुण्यात पोहोचला पण नेमकं त्यावेळी इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला दुसरे महत्वाचे काम आले आणि इंटरव्ह्यू दुसऱ्या दिवसावर ढकलला.
ती रात्र सोहमने ताईकडे मुक्कामी काढली.
दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर त्याला समजले की परदेशातल्या त्या पोस्टची जागा २ महिन्याआधीच भरली आहे.
ती रात्र सोहमने ताईकडे मुक्कामी काढली.
दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर त्याला समजले की परदेशातल्या त्या पोस्टची जागा २ महिन्याआधीच भरली आहे.
ताईच्या या अर्धवट माहितीमुळे विनाकारण हेलपाटा मारावा लागला म्हणून सोहमला राग आला पण स्वतःवर ताबा ठेवून तो पुन्हा आपल्या घरी आला.
काही दिवसांनी दुसरीकडे राहणाऱ्या सोहमच्या मित्राचा बऱ्याच महिन्यांनी फोन आला.
मित्राने त्याला मोक्याच्या ठिकाणी एक प्लॉट कमी किमतीत मिळत असल्याचे सांगितले आणि व्यवहार करायचा असेल तर २ दिवसात लगेच यायला सांगितले.
मित्राने त्याला मोक्याच्या ठिकाणी एक प्लॉट कमी किमतीत मिळत असल्याचे सांगितले आणि व्यवहार करायचा असेल तर २ दिवसात लगेच यायला सांगितले.
फायद्याचा व्यवहार म्हणून सोहम मित्राने सांगितलेल्या ठिकाणी पोचला.
तासभर वाट पाहून शेवटी मित्र आला तेव्हा त्यांना समजलं की सर्व प्लॉट्सचे बुकिंग ऑलरेडी झाले आहेत.
यावर मित्राला तरी कसं दोष देणार म्हणून मनाशी चरफडतच सोहम घरी आला.
तासभर वाट पाहून शेवटी मित्र आला तेव्हा त्यांना समजलं की सर्व प्लॉट्सचे बुकिंग ऑलरेडी झाले आहेत.
यावर मित्राला तरी कसं दोष देणार म्हणून मनाशी चरफडतच सोहम घरी आला.
लोकांना ना दुसऱ्यांच्या वेळेची किंमतच नाही. माहिती न घेता बोलवायचं आणि शेवटी काम नाही झालं तर हात वर करायचे.
घरात येताच सोहम मोठ्याने बडबड करू लागला.
घरात येताच सोहम मोठ्याने बडबड करू लागला.
काय झालं सोहम ? व्यवहार
जमला नाही का ? शुभदाने विचारलं.
जमला नाही का ? शुभदाने विचारलं.
व्यवहार जमायला आधी प्लॉट असायला तर हवा ना. सगळे आधीच विकले गेले आहेत. फुकटची खेप मारावी लागली मला. सोहम रागात म्हणाला.
शुभदा - अरे पण तूसुद्धा हेच करत असतोस ? मग दुसऱ्यांनी केलं तर कशाला दोष द्यायचा ?
म्हणजे ? मी काय केलं ?
म्हणजे ? मी काय केलं ?
शुभदा - दुसऱ्याच्या भरोश्यावर, मित्राच्या ओळखीवर, तर कधी अर्धवट माहिती सांगून तू नातेवाईकांना इथे बोलवतोस शिवाय ते माझ्यावर ढकलून पसार होतोस.
बिचारे लोकं काम होईल या आशेनं तुझ्या बोलण्यावरून लांबून येतात पण त्यांना रिकाम्या हाती जावं लागतं तेव्हा किती वाईट वाटत असेल ? जसं तुला आता वाटतंय.
बिचारे लोकं काम होईल या आशेनं तुझ्या बोलण्यावरून लांबून येतात पण त्यांना रिकाम्या हाती जावं लागतं तेव्हा किती वाईट वाटत असेल ? जसं तुला आता वाटतंय.
या मागे तुझा हेतू जरी चांगला असला तरी त्यांचा वेळ वाया जातो . काही तर हातची कामं सोडून येतात मग त्यांना किती मनस्ताप होतं असेल ?
यावर मात्र सोहम निरुत्तर झाला आणि इथून पुढे त्याने पूर्ण माहितीच्या आधारेच नातेवाईकांना मदत करायचं ठरवलं.
तर दुसरीकडे शुभदाने ताई आणि मित्राला सक्सेसफुल असा msg टाकला.
तर दुसरीकडे शुभदाने ताई आणि मित्राला सक्सेसफुल असा msg टाकला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा