Login

अनुभव चॅम्पियन ट्रॉफीचा

अगदी हृदयातून....
अनुभव चॅम्पियन ट्रॉफीचा

नमस्कार..


नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा एक अती महत्वाचा अध्याय संपला. दरवर्षी ईरा व्यासपीठ वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करते.आणि या स्पर्धेतून नव्या लेखकांना दर्जेदार लिखाणाची संधी देते. ईरा व्यासपीठाचा मला खरोखरच अभिमान वाटतो. ईरा वर लिहिणाऱ्या लेखक लेखिका यांच्यात अशा स्पर्धेदरम्यान खूप जवळच आपुलकीचे नाते तयार होते. ईरा समूहाच्या हेड असलेल्या संजना मॅडम वेगवेगळे संघ पाडून अनेक स्पर्धांची सुरुवात करतात. इतकंच नाही तर स्पर्धा सुरू होई पर्यंत त्या सर्व टीम वर जातीने लक्ष घालून प्रेतेक टीम मेंबरना पडलेले प्रश्न सोडवून त्यांचं निरासन देखील करतात. संसार, घर, मूल आणि एवढा मोठा ईरा समूहाचा व्याप अतिशय संयमी राहून संजना मॅडम सांभाळतात. त्या खरतर स्वभावाने खूप प्रेमळ आहेत. सर्वांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवण्याचं जे कसब लागतं ना ते संजना मॅडम यांच्याकडे पुरेपूर भरलेलं आहे.

जून महिन्यात आमची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात झाली. खरतर मी २०२२ पासून ईरा व्यासपीठाचा एक भाग आहे.२०२२ च्या स्पर्धेत ईरा कोल्हापूर टीम मध्ये मी होते आणि आमची टीम २०२२ ची उपविजेता ठरली होती.गेल्या वर्षीच्या स्पर्धेत देखील आमची टीम उपविजेता ठरली आहे.

ईरा लेखिका म्हणून या व्यासपीठाचा मला अभिमान वाटतो. ईराने मला आजपर्यंत खूप प्रेम देऊ केलंय आणि नेहमी प्रोत्साहन मिळत आहे. ईराचे हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही.

यंदाची चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जाहीर झाली आणि लिखाणाला उधाण आलं. या स्पर्धेत भाग घ्यायचा का नाही हे प्रश्न चिन्ह माझ्यासमोर होतं. याचं कारण म्हणजे माझा मेडिकल प्रॉब्लेम. तशी मी आजारी होते. एका छोट्या ॲक्सीटंट मधून मी नुकतीच बरी होत होते.आणि दुसरीकडे पोट दुखीने हैराण झाले होते. अशा अवस्थेत ही स्पर्धा आपल्याकडून पूर्ण होईल की नाही याबद्दल मी सांशक होतेच. त्यामुळे माघार घ्यायचा विचारही मनात डोकावला. एक मन म्हणत होतं “एक चांगली संधी चालून आली आहे. वेळ न दवडता सहभागी हो.” दुसरं मन म्हणायचं “आताच तर अपघातातून बरी झाली आहेस आणि तरीही सहभागी का होत आहेस? तुला स्पर्धेच्या सर्व फेऱ्या पूर्ण करता येतील का? नको सहभागी होऊ” दोन मनाच्या वादात सापडलेली मी अक्षरशः वैतागून गेले होते. नुकतीच सुशीला ही कथा मी लिहायला हाती घेतली होती. अर्धवट सोडणे जीवावर आलेलं. काहीही होऊ दे..मी ही कथा पूर्ण तर करणारच पण ह्या स्पर्धेत सहभागी देखील होणारच.माझ्या मनाने अखेर कौल दिला अन् मी स्पर्धेत सहभागी झाले.

संजना मॅडमनी संघ निवडले. एकूण दहा संघ तयार झाले. प्रत्येकी दहा दहा मेंबर एका टीम मध्ये आले. आता प्रत्येक टीमला त्यांचा कॅप्टन निवडायचा होता. मी ज्या टीम मध्ये होते. त्यात माझ्या मागच्या वर्षीच्या स्पर्धेतील टीम मधील दोन मेंबर होते. तृप्ती कोष्टी आणि रुपाली हंबर्डे या माझ्या गतवर्षीच्या सहस्पर्धक होत्या. त्या माझ्याच टीम मध्ये आहेत म्हणून मला खूप हायसे वाटले.

आमच्या टीम मध्ये दहा मेंबर मध्ये उज्ज्वला राहणे ताई असल्याचं कळल्यावर खरचं मी खूप खूष झाले होते. गेल्या वर्षीच पुण्यात झालेल्या टूगेदर दरम्यान आमची प्रत्यक्ष भेट झाली होती.तेंव्हा त्याचा प्रेमळ स्वभाव आणि खोडकर पणा यामुळे मी प्रभावित झाले होते. त्याचं दिलखुलास वागणे पाहून मी तर तेंव्हा अचंबित झालेले. वयाने जरी मोठ्या असल्या तरी उज्ज्वला ताई दिलखुलास वागण्याने नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करणाऱ्या आहेत. पहिल्याच दिवशी आल्या आल्या त्यांनी टीमला कडक शब्दात सुनावले “मी कुणाची मनमानी खपवून घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना लिहायला फेऱ्या पूर्ण करायला भाग पाडनार आहे. कोणाचीही मनमानी माझ्यापुढे चालणार नाही.” त्यांचं बोलणं बघून क्षणभर मी देखील घाबरले. पुण्यात भेटलेल्या दिलखुलास प्रेमळ उज्ज्वला ताई नेमक्या इतक्या कडक असतील अस स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या यावेळी दुबई मध्ये वास्तव्यास असल्याने तिथले नेटवर्क या नेटवर्कशी कनेक्ट होने शक्य नाही.तसेच लेखन नेटवर्क प्रॉब्लेम मुळे पोस्ट करायला जमणार नाही. या कारणाने त्यांनी पहिल्याच दिवशी यास्पर्धेतून माघार घेतली. आता उरलो आम्ही नऊ मेंबर..अजून एक मेंबर काही कारणाने संघातून बाहेर पडला.आणि आता आठ जन राहिलो. सर्व संघासाठी कॅप्टन नेमणे अनिवार्य असल्याने आता कॅप्टन कोण होणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. खरं सांगायचं तर प्रत्येक स्पर्धेत टीम प्रमुख नवोदित असावा असा ईराचा नियम आहे. त्यामुळे आमच्या संघातील कॅप्टन म्हणून तृप्तीची ईच्छा असूनपन तिला ते शक्य नव्हतं. तसे तिने बोलूनही दाखवलं होतं. बाकी कोणीही कॅप्टन व्हायला तयार होत नव्हतं. तिकडे मॅडम कॅप्टन निवडीसाठी टाईम लाऊन बसल्या होत्या.आणि इथे आमचं तू नाही मी नाही सुरू होतं. आता मात्र मॅडम एक मिनिट…दोन मिनिट…तीन मिनिट…चार मिनिट…. मॅडम चार मिनिटावर आल्या तरी कोणी पुढाकार घेईना.मग मात्र मलाच पुढाकार घ्यावा लागला अन् मॅडमनी पाच मिनिट बोलायला मी माझं नाव कॅप्टन म्हणून सांगितलं.अन् कॅप्टन पदाची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली. तिथूनच माझ्या ‘सविता टीम ७’' चा स्पर्धेचा प्रवास सुरू झाला.

टीम मध्ये साठी ओलांडलेल्या छाया राऊत याचबरोबर अवघे विशी पार केलेल्या सेजल पुंजे यांच्यासारख्या प्रतिभवान लेखिका माझ्या टीमला लाभल्या हेच खरं तर आमच्या टीमचे भाग्य!

स्पर्धा सुरू झाली पहिली फेरी सुरू झाली आणि माझ्या पोटदुखी ने अक्षरक्ष डोकं वर काढलं. उठता बसता येईना इतका त्रास होऊ लागला. स्पर्धा कोणतीही असू दे अनेक संकटे पार केल्याशिवाय यश मिळत नाही.आणि हा माझा पूर्वानुभव आहे. आजअखेर मी इतक्या संकटांचा सामना केलाय की विश्वास बसणार नाही.

माझ्या टीम ने मला खूप प्रेम देऊ केलं आहे.सर्व फेऱ्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच भरभरून योगदान देऊ केलं आहे. एक कॅप्टन या नात्याने माझ्याकडुन काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा.

आमच्या टीम साठी अथक परिश्रम घेणाऱ्या माझ्या सख्या…

छाया राऊत _ छाया राऊत या आमच्या टीम मधील सर्वात वयस्कर व्यक्ती वयाची साठी ओलांडली असली तरी अजूनही त्या मनाने टवटवीत अगदी तरुण आहेत. त्याचं बोलणं, राहणीमान,सर्व फेऱ्या अतिशय आनंदाने पूर्ण करण्याचा त्याचा आत्मविश्वास बघितलं की आम्हाला आमच्या कडे बघून हसू येतं. म्हणजे एवढे वय होऊनही अगदी विशीतल्या मुलीला लाजवेल अशीच त्यांची प्रतिभा आहे. पेशाने रिटायर शिक्षिका असल्या तरी कुठेच शिक्षिका असल्याचा गर्व त्यांच्या स्वभावात आम्हाला दिसला नाही.आणि त्यांच्याकडे गर्व नावाची गोष्ट कुठेच पाहायला मिळाली देखील नाही. छाया मावशीनी अलक, रहस्यकथा, रिल्स,आणि नाटिका यामधून आपली प्रतिभा अतिशय सुंदर रित्या पार पाडली आहे. त्याचं मला खूप खूप कौतुक वाटतं. छाया मावशी माझ्याकडुन काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ कर..


तृप्ती कोष्टी _ एक सुंदर अप्सरा देखील तृप्ती समोर फिकी पडेल इतकं सुंदर देखणेपण तसेच स्वभावात देखील प्रेमळ स्वभावाचा गोडवा भरभरून लाभलेली आणि गतवर्षी आमच्या टीमची कॅप्टन म्हणजेच तृप्ती. तल्लख बुद्धी,प्रेमळ स्वभाव याबरोबर तृप्ती कडे लिखाणाची ठासून भरलेली प्रतिभा आहे. कोणतीही गोष्ट आवडतं नसेल तर मागे पुढे न बघता त्या गोष्टीला विरोध करून आपल्याला हे पटत नाही हे ठासून सांगणारी तृप्ती म्हणजे एक व्यक्तिमत्वाचा सुंदर चेहरा आहे. अलक, रील, दीर्घ कथा यासारख्या फेरीत तिचा सहभाग कौतुकास पात्र आहे. तृप्ती माझ्या कडून काही चुका झाल्या असतील तर भल्या मनाने माफ कर…


रुपाली हंबर्डे_ पेशाने एक शिक्षिका असून देखील लिखाणाची असलेली आवड. कविता उत्तम सादर करणारी.एक प्रेमळ सखी म्हणजेच रुपाली. कधीच कोणत्या गोष्टीचा राग नाही. नेहमी हसतखेळत राहणाऱ्या रुपलीची प्रतिभा इतकी आहे की कधी कधी मला रुपालीच्या प्रतिभेचा गर्व वाटतो. स्वतः ची शिक्षिका पेशा सांभाळून काव्यात रमलेली ही सखी मनाने अगदी स्वच्छ आणि दिलखुलास आहे. प्रेमकथा, अलक, रील, अद्भुत माहिती, नाटिका यासारख्या फेऱ्यात रुपालेने दमदार कामगिरी करून आमच्या संघासाठी स्वतचे योगदान दिलं आहे. रुपाली नकळत का असेना माझ्याकडुन कधी दुखावली असशील तर मनापासून क्षमत्व:..

मृनालिनी पाटील खोत_ जेंव्हा मी २०२२ च्या चॅम्पियन करंडक स्पर्धेत सहभागी झाले होते.त्या संघात मृणालिनी देखील होती. सुंदर लिखाना बरोबरच एक प्रेमळ सखी म्हणून मृणालिनीचे कौतुक वाटतं. मितभाषी असली तरी अतिशय प्रेमळ आणि दुसऱ्यांचा आदर, विचार करणारी मृणालिनी म्हणजे आमच्या संघाची भिंत म्हणता येईल. अलक, अद्भुत माहिती,प्रेमकथा आदी फेऱ्या मृणालिनी ने उत्तम प्रकारे पार पडल्या आहेत. मृणालिनी माझी काही चूक मुक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ कर..


मयूरी NR_ प्रेमळ आणि रोख ठोक स्वभाव याचं उत्तम उदाहरण म्हणजे मयुरी. अतिशय हुशार तितकीच तल्लख कोणतीही अवघड गोष्ट असो सहज त्यावर उपाय शोधणारी. मयुरीने केलेल्या रील आणि नाटकातील कामावर मी भलतीच खुश आहे. तिने साकारलेली मोलकरीण नेहमी लक्षात राहील.एक आदर्श लेखिका आणि प्रेमळ सखी एक सुंदर अभिनयाचं कसब पेलणारी माझ्या मनातली अभिनेत्री ही मी तिला दिलेली उपाधी आहे. कारण तिच्यात अभिनयाचा टॅलेंट ओतपोत भरलेला आहे. प्रेमकथा, अलक, रील, नाटिका या फेरीत उत्तम अभिनयासोबत मयुरीने आपली नवी ओळख आम्हाला देऊ केलीय. मयुरी माझ्याकडुन काही त्रास किंवा चूक झाली असेल तर मनापासून माफ कर..


भाग्यश्री हर्षवर्धन_भाग्यश्री म्हणजेच माझी भगु अतिशय प्रेमळ.मनाला जे पटत नाही ते समोरासमोर बोलणारी.आणि समोरचा चुकत असेल तर त्याची प्रेमाने समजूत काढणारी ही माझी बहिण. अतिशय गोड आणि लाघवी स्वभाव यामुळे कधी माझ्या हृदयात बसली समजलेच नाही. अलक,प्रेमकथा, रहस्य कथा, यासारख्या फेरीत उत्तम लेखन भाग्यश्री ने केले आहे.तिचे मला नेहमीच कौतुक वाटते. भाग्यश्री माझ्याकडुन काही चूक झाली असेल तर माफ कर…


सेजल पुंजे _मूर्ती लहान कीर्ती महान ही म्हण तंतोतंत या माझ्या लाडक्या बाळासाठी लागू पडते. सगळ्यात खूप लहान असलेली सेजल म्हणजे आमच्या संघाची तटबंदी असून सेजलच्या बुध्दी कौशल्याला जेवढा सलाम करावा तेवढं कमीच आहे. संघात लहान असूनही तिचे डावपेच, तिच्याकडे असलेली बलाढ्य प्रतिभा आणि संघासाठी तिने घेतलेली मेहनत याला खरच तोड नाही. दीर्घ कथा सोडली तर जवळ जवळ सगळ्याच फेऱ्या सेजलच्या बुद्धिचातुर्याने प्रकाशमान झाल्या आहेत. रिल मध्ये तिने केलेली सून बाईची भूमिका तसेच रिल आणि नाटिका याच्या तिने लिहिलेल्या क्रिप्स्ट एकदम भारी आहेत. सामाजिक विषय हाताळण्यात सेजल नेहमीच वरचढ असून तिच्या बुद्धी कौशल्याचे मला खरच अप्रूप वाटतं. आमच्या संघासाठी सेजल म्हणजे तेजस्वी असा दिवाच आहे.सेजल तुझ्या या मोठ्या बहिणीकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कर…


सविता रेडेकर _ मी थोड स्वतः विषयी लिहावं म्हणते.या स्पर्धेने खूप मोठा अनुभव दिला आहे.या स्पर्धेदरम्यान या सख्या मला मिळाल्या.अनेक नाती दृढ झाली.मला ऐकायला येत नसतानाही कोणतीही कुरबुर न करता सगळ्याजणीनी प्रेमाने समजून घेतलं.या सर्वांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाहीच. या स्पर्धेदरम्यान तयार झालेल्या या गोड नात्याला मी कायम जपणारं आहे. पोटदुखी जेंव्हा असह्य होऊ लागली तेंव्हा नुकतीच दुसरी फेरी सुरू झालेली.अन् पोट दुखण्याचे प्रमाण अधिक वाढू लागलेलं. साधं बसता येईना अशा बिकट परिस्थिती मध्ये दीर्घ कथेचे भाग मला पूर्ण करायचे होते.पण सलाईन लावलेल्या हाताने लिखाण सुद्धा जमत नव्हतं. त्यात एक दोन दिवस आड असा दीर्घ कथेचे भाग पोस्ट करण्याचा नियम होता. जेंव्हा पोटाची सोनोग्राफी करून पाहिली तेंव्हा आतड्यांना सूज आल्याचे निदान झाले अन् अक्षरक्ष: रडू कोसळलं.कारण मध्येच हे एक संकट उभ राहिलं होतं. त्यात माझी अवस्था अशी बिकट. रहस्य कथा टीम मधून तू नाही मी नाही म्हणता म्हणता चौघी तयार झाल्या.पण चारच कथा लिहिल्या जाणार होत्या. रहस्य कथा अधिक लिहिल्या जाव्यात म्हणून मग त्रास होत असतानाही दोन कथा लिहून टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटच्या दिवशी सेजल ने अजून एक रहस्य कथा पोस्ट करून जणू मला आणि संघाला भक्कम पाया घालण्यास मोलाची साथ दिली.

प्रेम कथेच्या फेरीत देखील त्रास सहन करतच दोन कथा कशाबशा पूर्ण करू शकले. नाटिका, रिल या दोन फेरीमधून मी स्वखुशीने माघार घेतली. पण माझ्या टीम ने सुंदर नाटिका तयार केली. नाटिका जेंव्हा पोस्ट झाली तेंव्हा सर्वांनी आमच्या नाटिकेचे कौतुक केलं. टीम मध्ये रुपाली मयुरी भाग्यश्री या खरतर जॉब करतात आपल्या दिवसभराच्या कामाच्या व्यापातून या तिघींनी या स्पर्धेसाठी टीमला खूप मोलाची साथ दिली आहे. वयाचा विचार केला तर छाया मावशीची लिखाणाची शैली आणि सर्वात लहान कॉलेज गर्ल असलेल्या सेजलच्या प्रतिभेने खरच मी थक्क झाले. या संपूर्ण स्पर्धेत सेजलचा खारीचा वाटा आहे. आणि टीमचा भक्कम पाया देखील तीच आहे.खूप खूप कौतुक आहे या लेकीचं. अद्भुत माहिती लिखाणात सेजल ने खूप मोठी बाजी मारली आहे . आपल्या देशातल्या कोणाला माहित नसलेल्या अनेक अद्भुत माहित्या लिहून ती कौतुकास पात्र झाली आहे. दोन महिने चाललेल्या या स्पर्धेने खूप चांगले वाईट अनुभव दिलेत आणि त्या अनुभवातून काही ना काही शिकायला मिळालं आहे.


राघवाचा धमाकेदार व्हिडिओ कायम लक्षात राहील.. सर्व कॅप्टन आणि इराचे परीक्षक आणि संजना मॅडम या सर्वांवर आधारित असलेला धम्माल व्हिडिओ खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर आनंद देऊन गेला.या व्हिडिओ मुळे स्पर्धेचे दडपण काही अंशी कमी झाले होते हे विशेष!


एकमेकीचा आदर आणि सन्मान करणारी एकदम कुल अशी आमची कॅप्टन टीम…

स्पर्धा सुरू झाली. सर्व संघाचे कॅप्टन नेमले गेल्यावर संजना मॅडमनी सर्वांना कॅप्टन टीम मधे अड केले.ती एक अशी टीम होती. ज्यात फक्त प्रत्येक फेरीबद्दल संजना मॅडम सगळ्या कॅप्टनना वेळोवेळी सूचना, सर्वसघाचे निरासन,नियम वेळोवेळी सांगितले जात होते. आता सर्व संघाचे कॅप्टन म्हटले तर वाद हा कॉमन आहे.आणि आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धेत कॅप्टन टीम मध्ये बरच वाजतं असं मी ऐकून होते. त्यामुळे सुरवातीलाच मी सावध पवित्रा घेतला.कारण जरी आम्ही कॅप्टन असलो तरी आम्हाला आमच्या टीम महत्वाच्या होत्या.आणि त्यांच्या हिताच् आम्ही सर्वजण बघणार होतो.पण झालं उलट अस की आमच्या या कॅप्टन संघात एक साधा मामुली वाद देखील झाला नाही.हे एक आश्चर्य आहे. खुद्द मॅडमनी देखील आमची आम्हा सर्वांची प्रशंसा केली. कारण सर्वांनीच एकमेकींना अगदी प्रेमाने समजून घेतलं. अख्खी स्पर्धा होई पर्यंत आमच्यात खूप हास्य विनोद आणि प्रेमाचं संभाषण चालू होतं. इतकं की एकदा तरी आम्ही सर्वांनी भांडूया ग अस सर्वजण बोलत होतो. महत्वाची बाब म्हणजे कॅप्टन टीम आणि माझी टीम या दोन्हीत ही लेडीजच आहेत त्यामुळे बोलणं अगदी सोप होऊन गेलं. एखादा पुरुष असेल तर बोलताना मर्यादा येत जाते.पण इथे सर्वजणी मनमोकळे पणाने बोलत होतो तेही न संकोचता.. संजना मॅडम,वृंदा, खुशी,प्रणाली,ऋतुजा, रेश्मा, जानकी, श्रीसध्या,अपर्णा, आर्या या सर्वजनीचा मला खूप अभिमान वाटतो.या सर्वांनी मला प्रेमाने समजून घेतलं. माझे प्रेमभराने कौतुक सुद्धा केलं. या सर्वांच्या प्रेमाने मी या स्पर्धेत न्हाऊन निघाले. अशीच साथ कायम भेटू दे सख्यानो …आपल्याला नळावरची भांडणे अजून पूर्ण करायची आहेत..नक्कीच पुढचे टुगेदर आपल्या कोल्हापुरात व्हावं आणि आमचं हे नळावर भांडायचे स्वप्न पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आहे..काही चुकलं असेल तर माफ करा गं !!


ईरा समूहाच्या सर्व स्टाफ आणि सीईओ संजना मॅडम याचे मनापासून आभार व्यक्त करून हे मनोगत इथेच थांबवते….


©® सविता पाटील रेडेकर
( सविता टीम ७)