अनुला आताशा तेजसच्या वागण्याची सवय झाली होती. आत्ता पर्यंत हे असं अनेकदा घडलं होतं. आजही सकाळी तिने तिच्या प्रमोशनची बातमी सांगितली आणि त्याची तणतण सुरू झाली. घर धड नसतंच कधी, कोणतीच गोष्ट वेळेवर हातात मिळत नाही,सापडत नाही , तुझं घरात लक्षच नसतं, जरा आमच्यासाठीही वेळ ठेवा बाईसाहेब! अशी त्याची मुक्ताफळं सुरू झाली आणि तिच्या डोळ्यासमोर एकदम तिचा भूतकाळ येऊ लागला .. त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. अनु लग्नाच्या आधीपासून बँकेत कामाला होती. तिला बँकेतून यायला जरा उशीर झाला होता. तेजसच्या आवडीची फुलं आणि केक घेऊन ती गडबडीने घरी येत होती आणि सगळं सावरता सावरता साडीत पाय अडकून पडली. ती भरभर चालू शकत नव्हती पण मनाने केव्हाच घरी तेजसच्या मिठीत शिरली होती. तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं, तिचं प्रमोशन झालेलं तिला सर्वात आधी त्याला सांगायचं होतं. कशीबशी लंगडत ती दारातून आत येताच तिने तेजसकडे आणि सासऱ्यांकडे पाहिलं, नेहमीसारखं हसून तिचं स्वागत करायला दोघेही पुढे आले नाहीत. तरी तिने हसत हसत तेजसला फुलं दिली आणि मस्त जेवायला जाऊयात ना बाहेर असं हळूच कानात विचारलंही. पण तेवढ्यात सासरे कडाडले, ही काय वेळ आहे घरी यायची? साडे पाचची बँक आज साडे सातला सुटली का? काही ताळतंत्र आहे की नाही? तेजसनेही तिचे अजिबात ऐकून घेतले नाही, लंगडतेस का म्हणूनही विचारले नाही. लग्नाचा पहिलाच वाढदिवस असा विचित्र घालवला. तिने मग घरीच स्वयंपाक केला आणि जेवता जेवता तिच्या प्रमोशनची बातमी सांगितली. त्यावरून तर एकच गोंधळ घातला तेजसने. तो स्पष्ट म्हणाला, जमणार नाही म्हणून सांग, नसत्या जबाबदाऱ्या नकोत, इथे घरचं सगळं नीट झालं पाहिजे, तुझ्या पैशाची गरज नाही आम्हाला. आणि प्रमोशन घ्यायचं नाही कुठलंही, घराजवळ नोकरी आहे, आहे तशीच करायची करू देतो नोकरी हेच खूप झालं. असं सगळं ऐकल्याने तिने दरवेळी मिळालेलं प्रमोशन नाकारलं होतं. तेच सगळं आठवून तिला क्षणभर भरून आलं पण दरवेळी हेच ऐकायला मिळत असल्याने तिने सवयीने दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. लग्न झालं तेव्हा वडिलांच्या प्रतिष्ठेपायी तिने तेजसशी जुळवून घेतलं, श्रीमंत तोलामोलाचा जावई म्हणून त्याचं केवढं कौतुक होतं माहेरी आणि तिच्या वडिलांनाही फारसं पसंत नव्हतंच तिची नोकरी करणं. तिनं ते सगळं आहे तसे स्वीकारले होते पण आज इतक्या वर्षांनी तिला जाणवत होती तेजसची जुनाट मानसिकता. त्यांचा मुलगा त्याचं शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला गेला होता, तो परत यायचा होता, त्याच्या लग्नासाठी स्थळ बघणं चालू होतं आणि इकडे अनुच्या मनात वेगळीच जुळवाजुळव चालली होती. आज आपल्या बडबडीकडे अनुचं लक्ष नाही हे एव्हाना तेजसच्या लक्षात आलं होतं. त्याने वस्तूंची फेकाफेक सुरू केली होती. तरीही तिची काहीच प्रतिक्रिया नाही हे पाहून त्याने विचारलं, या घरात राहतेस, माझी बायको म्हणवतेस मग स्वतःची कर्तव्य पार पाडता येत नाहीत? तुझ्या कोणत्या गुणांकडे बघून मिळतं गं तुला प्रमोशन की साहेबांना खुश करत असतेस त्यासाठी? तेजसच्या तोंडून हे असले उद्गार ऐकून अनुच्या मनातला निर्णय अजूनच ठाम झाला. शांतपणे त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं वागले, प्रमोशन नाकारली, घर ते बँक नि बँक ते घर खाली मान घालून हेच केलं आयुष्यभर, तुमच्यासाठी. तुमच्या मते मी कोण तर घर सांभाळायला आणलेली आणि मुलं जन्माला घालायला आणलेली दासीच, स्वतःला वाटेल तेव्हा आनंद घ्यावा, नको तेव्हा लाथाडावं. पण आता हे असं चालणार नाही. मुलगा लग्नाला आला आता आपला. आता तुमचं ऐकून घ्यायची नाही मी. तिचं हे वाक्य ऐकून तेजसचा हात उठलाच होता तिला मारायला तेवढ्यात तिने त्याच हातात कागद ठेवले. डीव्होर्सचे. तेजसही चवताळला आणि म्हणाला डिव्होर्स हवा ना घे पण एक कवडी मिळणार नाही तुला. घर सोडून चालती हो आणि मोठी म्हणतेस ना बँकेत नोकरी करते तर नोकरी करणाऱ्या बाईला पोटगी पण द्यायची गरज नसते. शांतपणे अनु म्हणाली दरवेळी सारखा आततायीपणाच करा परत. काय लिहिलंय त्यात ते किमान वाचा तरी.
मी अनु तेजस पाटील घटस्फोटासाठी अर्ज करते आहे.
घटस्फोटाची कारणे
सतत आत्मसन्मानास ठेच पोचवणे
घरातील कोणत्याही निर्णयात सहभागी न करणे
शारीरिक बळजबरी करणे
सतत अपमान करणे
बायको सारखे न वागवता मोलकरणी सारखे वागवणे
मानसिक छळ करणे
डिव्होर्स एकमेकांच्या सहमतीने मिळावा. पोटगी म्हणून एक रुपया सुद्धा नको.

केलेल्या आरोपांना कुठल्या तोंडाने सामोरे जाणार होता तो? तरीही म्हणाला की मुलापुढे हाच आदर्श ठेवणार का? अनुला हेच हवं होतं तिने लगेच उत्तर दिलेच...हो हाच आदर्श ठेवायचा आहे, बायकोशी कसं वागावं, एक माणूस म्हणून तिचा सन्मान करावा नाहीतर हे असं होतं हेच सांगायचंय त्याला.
इतक्या वर्षांनी आपलं निमूट ऐकून घेणारी अनु असं काही करेल असं तेजसला वाटलंच नव्हतं. त्याला एकदम धक्का बसला, अंगाला दरदरून घाम फुटला. तरीही तो म्हणलाच आत्ता देतो डिव्होर्स, जा निघ, राहशील कुठे पण? बँकेत ? अनुनेही आधीच भरून ठेवलेली बॅग उचलली, बांगडया मंगळसूत्र तिथेच काढून ठेवलं आणि धडधड जिना उतरू लागली. ती खरंच गेलीय हे तेजसच्या पटकन लक्षातच आले नाही. आणि जिच्या जिवावर आपण राजासारखे जगलो, जिने आपला कोणता शब्द कधी खाली पडू दिला नाही तीच अशी अचानक गेलेली पाहून त्याला खरोखरच हार्ट अटॅक आला आणि तो जोरात खाली कोसळला, त्याच्या धक्क्याने शेजारची खुर्ची, पाण्याचा तांब्या सगळं खाली पडलं...अनुच्या टॅक्सीच्या आवाजातही तिला बरंच काही पडल्याचे आवाज आले पण त्याची नेहमीची आदळआपट ऐकायला ती तिथे अजिबात थांबली नाही. ती तिथून गेली पण अनु तेजस पाटील हे नाव बदलायचे तिचे स्वप्न पूर्ण झालेच नाही कारण तिला डिव्होर्स देण्याआधीच तेजसने या जगाचा निरोप घेतला होता.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा