Login

अनूप-15

Anup

रितेश: दादा,आज कशिशला तुझ्या सोबत घेऊन जा, मला आज वेळ नाही...
अनूप: असा काय बिझी झाला.. तिला वेळ दे थोडा..
रितेश: दादा काही चुका वेळतच टाळायला पाहिजे...पण
आपण फक्त पैसाकडे पाहतो...माझेही तेच चुकले दादा.. आता बाहेर ही रास्ता नाही न दूसरीकडे पण नाही...

सिधांत:अरे डायलॉग बंद कर, काय प्रॉब्लेम आहे, आपण त्यांना त्यांचे पैसे परत करून देऊ...

अनूप: मी,जातो त्यांना सांगतो, हे असे लफडी नको करू...
तू नको जाऊ संध्याकाळी मी जाऊन भेटून येईल त्यांना, OK काळजी नको करू
रितेश: "घरात सगळे टेंशन मध्ये येतात, तेवढ्यात रितेश मोठ्याने हसतो, काय आला जीव कंठाशी?" हसावं वातावरण चांगल राहत!"
आई:" अनूप,सिधांत याला तुम्ही दोघे मिळून मारता का मी एकटी मारू"
सिधांत:सगळे मिळून मारू!
बाबांचा चेहरा पडलेला पाहून मनस्विनी विचारले, "काय झाले बाबा?"
  बाबा उत्तर देतात, "एवढ्या आनंदाची सवय नाही ग!"

मनस्वी:"बाबा काही पण काळजी करता! अहो उद्या आपले जुळे येणार घरभर फिरणार, तेव्हा तर विचार करा, किती आनंदमय वातावरण राहील, या चौघांनी घर कसे गोकुळ होईल!"
बाबा:"खरे आहे,माझ्या एवढा नशिबी मीच!"
अनूप: मनस्वी, चला आवारा, यायचय ना माझ्या सोबत!
मनस्वी: कशिश आवारा लवकर!
कशिश:"हो, आवरते!
रितेश: "कशिश,तुला न वाहिनीला मी घ्यायला येईन!
सिधांत: अरे, मनस्वीला मला घेऊन बँकेत जायचय, आम्ही जातो हॉस्पिटलला कशिशच चेक-अप झाल्यावर आम्ही जातो..तू ये कशिशला घ्यायला ठीक आहे, दादा तुझी कार घेऊन मी बँकेत जातो, रितेशसोबत तू ये!
अनूप: ठीक आहे!
  कशिशला घेऊन हॉस्पिटलला येतात,चेकअप होतो..सिधांत बाहेर बसलेला असतो, तासाभराने त्या दोघी येतात..
सिधांत:कसे आहेत प्रिंस,प्रिन्सेस?
कशिश: "ग्रोथ चांगली आहे म्हणते."
चल अनूप दादाला सांगून निघू या, मला अजुन काम आहे..
सिधांत अनूपची चौकशी करतो,
रिसेप्शनला असलेल्या नर्सने सांगितले, सर ऑपरेशन मध्ये बिझी आहेत.. एक तास लागेल..
कशिश:" सिद्धांत भाऊजी तुम्ही व्हा पुढे रितेश ला लावेल फोन तो येतो म्हणला तू आला की आम्ही पण येतो."
सिद्धांत:" ठीक आहे तू जर आला नाही तर मला कॉल बँकेतून येतायेत मी येईल घ्यायला तुला."
मनस्वी: "पण तोपर्यंत एकटी कशी राहशील."
कशिष:" ताई राहील प्रितेश येतो म्हणलाय."
   कशिशला सोडून मनस्वी,सिद्धांत बँकेत निघून जातात.. 

      अनुपच्या ऑपरेशन साठी हे दोन तास लागते..तोपर्यंत कशिश वेटिंग रूम मध्ये बसलेली होती ती सारखी रितेश ला फोन लावत होती.
अनुप: "हे काय कशिश एकटीच बसली आहे का! तू रितेश नाही आला का?"
कशिश: नाही, किती वेळ झाला फोन लावते पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय."
अनूप:"ठीक आहे! तू माझ्या केबिनच्या मागे रूम आहे तिथे आराम कर, माझे चार पाच पेशंट तपासली त्यानंतर मी लावेल फोन, नाही तर आपण दोघे जाऊ या घरी."
     कशिष अनुपच्या कॅबिन रूम मध्ये जाते अगदी एका पुरता आराम करायची, रूम नीटनेटके आणि स्वच्छ होती.

         अर्ध्या तासाने पेशंटची तपासणी केल्यानंतर,अनुप कशिशला बाहेर बोलवतो...
     दोघेही रितेश ला एकामागून एक फोन करतात पण  उपयोग नसतो! रितेश चा फोन स्विच ऑफ येतो..
       तेवढ्यात केबिनच्या दार उघडून रिचा आत मध्ये येते..
रिचा:" कशिशल पाहुन सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं. अरे पण तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं त्यासाठी आले,
अनूप:" हे रिचा मी खरच खुप कामात आहे, तुला काय बोलायचे ते बोल अणि हो बाहेर!
रिचा:"आज मी कामा निमित्त तुझ्या घराकडे गेले, येता येता तुझ्या आई वडिलांना भेटून आले!".
अनूप: "याचा अर्थ तुझा जिद्दी पण अजून गेलेला नाही."
         रिचा कशिशकडे पाहून म्हणते एस्क्युज मी तुम्ही बाहेर व्हा. आम्हाला काही पर्सनल बोलायचं!"
     कशीश बाहेर निघणार तेवढ्यात अनुप म्हणतो, "इथेच बस,रिचा तू खरंच निघ तुला जर आपले भांडण होऊ नये वाटत असेल तर.!"
रिचा रागाच्या भरात बाहेर निघून जाते, अनूप स्वतालाच म्हणतो घरी गेल्यावर आता प्रवचन आहे!"
कशिश म्हणते काही बोललात का? काही नाही, जाऊ घरी!मी टॅक्सी मागवतो...

   अनूप,कशिश घरी येताच अनूप मनस्वीला विचारतो झाशीची राणी कुठे आहे? रागात आहे माझ्यावर?"
मनस्वी:"कॉटन टाका कानात, त्यांनी जेवढ रिचाला बोललं त्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकव लागणार!" आपल ठरल होत ना.!
अनूप:"पण तिला दम कसा पडेल."
मनस्वी:"कशिश प्लीज आईबाबांना हा चहा दे. तुला पाहून तुझा मूड चेंज होईल"!
कशिश: हो ताई"
अनूप:"कशिश आईने माझ्याबद्दल बोललं तर सांग, हॉस्पिटल मधुन येताना त्यांचा डोक्यात हातोडी पडली, त्यामुळे त्यांची यादाश्त गेली, कसबसं तुमच्या मुलाला घरी आणल..
  अनूप,मनस्वी,कशिश हसतात..तेवढ्यात आईबाबा येतात
आई:"आले राजे, वचन देऊन. पाहणा चार वर्षापूर्वी दोघांना नव्हत लग्न करायच. म्हणून रिचा निघून गेली अमेरिकेला..
आता आली डिवोर्स घेऊन वापस...सरांना लगेच द्या आली..निघाले अनूपशी लग्न करायला...
अनूप: आई,अग मी बोलणारच होतो
खबरदार अनूप त्या पोरीला घरात आणले तर...आज लग्नकरणार उद्या दोघे एकमेकांना सोडणार..आई रागात बोलत होती...तिची B.P वाढत होती...
अनूप: चिडून बस ना आता, अग माझ आयुष्य आहे. मला काही निर्णय घेऊ देत जा! सतत आपला, असे नका करू, हेनको,त्याला असे बोलू नको, अग 35शीला आलो,पण एक दिवस आठवत नाही, कोणता निर्णय मनाने घेतला, सतत तुम्ही स्वतः टुमणं लावता..परत तुम्हाला काही बोलता येत नाही..तुमची b.p. त्याच टेंशन...अरे तुमच्या विचारापाई आम्ही आमचे आयुष्य गमावून बसलो...आता माझ लग्न विषय बंद.....
आई: त्या काटीशि तुझ लग्न होऊ देणार नाही...अनूप रागारागाने आपल्या खोलीत जातो...खाडकन दार लावायचा आवाज येतो...
इकडे कशिश रितेश ला फोन लावते, त्याचा फोन बंद येतो.. अनूप बाहेर येतो, कशिशला विचारतो रितेश
कशिश:"सकाळपासून switchoff आहे त्याचा फोन...."
अनूप: रितेशला सतत फोन लावतो, पण त्याचा फोन लागतच नाही..
  तेवढ्यात सिधांत येतो..अरे वा घरात अभूतपूर्व शांतता,काय झालं, तू काही बोलला का, दादा?
अनूप:"खूप काही, पण आता टेन्स मध्ये आहे तो रितेश फोन उचलत नाही याचा...तुझ त्याच काही बोलण झाल होतं?
सिधांत:"नाही रे! आपण उद्या त्या क्लायंटच ऑफिस  पाहू..
अनूप:"अरे आता रात्रीचे 9 वाटताहेत, एव्हाना आल पाहिजे..
कशाशी सतत घड्याळ पाहत, चकरा मारत होती...
  अनूप बोलतो कशिश तू चकरा मारल्याने तो येईल का?
तेवढ्यात अनूपला कॉल येतो,
अनूप:"काय, कधी, मी लगेच निघतो, सगळ्याना घेऊन येतो. अनूप रडत सिधांतला सांगतो, शर्माचा कॉल होता, रितेश सिटी हॉस्पिटलला अ‍ॅडमिट आहे...त्याला सगळ्याशी बोलायचे...
  कशिशला भोवळ येते..मनस्वी तिला पाणी देते चल, म्हणून  ती  तिच्या दोन्ही मुलांना घेऊन निघते..
  आई रडते, अरे त्याला बोल रितेशला अ‍ॅडमिट करून घ्यायला..इलाज लगेच चालू कर म्हणाव...
  सिधांतला गाडी चालवायची सुधरत नाही कसेबसे तो गाडी चालवत होता...
बाबाचे अंग थरथरू लागले, हॉस्पिटल आले..सर्वजण पळत हॉस्पिटल मध्ये आले , अनूप शर्माला कॉल करतो, तेवढ्यात कशिश, रितेश म्हणून आईसीयू च्या दिशेने जाते, तिच्यामागे सर्व जण जातात...
  तिथे रितेश पडलेला होता...ऑक्सिजन लेवल कमी-कमी होत होती..रितेश कशिश त्याच हात हातात घेऊन रडत होती..तो तिला जवळ घेऊन रडला...आपले स्वप्न अर्ध्यातच सोडून चालों...
सिधांत:"तुला काही होऊ देणार नाही, लागेल ते करतो, दादा बोलाव ना डॉक्टर!"
अनूप: हो बोलवले रे, रडत होता...आई बाबा त्याला काही बोला ना!
   आई बाबा तर रितेश चे हाल पाहून जिवंत मृतात्म्यां बनले.
मनस्वी:रितेश, असे काय बोलतो, बोल ना तुला काही त्रास होत नाही ते..लगेच चल ना आमच्या बरोबर...
रितेश:"वहिनी, माझ्या लेकराची काळजी घे! आई मी तुला दादा सिधांत सारखं कमाऊ नाही दाखवल! बाबा तुम्ही बरोबर बोललात..पैसेपाई जीव गमावत आहे...
   तेवढ्यात डॉक्टर येतात, अनूप त्यांना बोलतो, तो आउट ऑफ dangerous आहे?
डॉक्टर: आम्ही त्याचे M.R.I. केला. इंटरनल मार खूप लागला, कमरेखालची बॉडी शरीरा वेगळी झाली..त्यामुळे   रक्तस्त्राव खूप झाला.."वी आर सॉरी".
सिधांत थरथराया हाताने त्याच्या पायावर चे पांघरुन काढतो.. सगळे जण चिरकतत...
रितेश अनूपला आपल्या जवळ ईशराने बोलवतो..त्याचा ऑक्सिजन लेवल कमी होत होता...
रितेश:"(अडखळत) सगळे म्हणतात ना, मी माझी जबाबदारी तुझ्यावर टाकून मोकळा होतो, दादा मी आज माझी मोठी जबाबदारी कशिश, माझी 2 लेकर तुझ्या जबाबदारी टाकून चालों..माझ्या कशिशला माझ्या शिवाय कोणी नाही..तिला स्व....का.... र..
  अन रितेश शांत झाला कायमचा....सगळ वातावरण स्तब्ध...
डॉक्टर, नर्स सर्वांना बाहेर काढून चेक करतात...
शर्मा अनूप जवळ येतो...त्याला म्हणतो, रितेश गेला, गेला...
आईबाबांनी जोरात हंबरडा फोडला...मनस्वी आपल्या दोन लेकरांना सांभाळत कशिशला सांभाळत होती...सिधांत.. आईबाबां चया गळ्यात पडून लहान मुलां प्रमाणे रडत होता...
तेवढ्यात नर्स आली, Mr.अनूप हॉस्पिटल चे प्रोसेस पूर्ण करा..त्यानंतर बॉडी ताब्यात घ्या..एम्बुलेंस आली का डेड बॉडी घेऊन जा...पोलिस पंचनामा, संध्याकाळी झाला होता..शर्मा समोर अनूप खूप रडला...
शर्मा:"अनूप तूच जर खचला, याना कोण सांभाळणार? बघ लहान मुलां प्रमाणे रडत आहेत...अजून त्याचे सर्व सोपस्कार पार पाडायचे...खूप खराब झालाय रे त्याचे शरीर...
  सिधांत कडे पाहून अनूप हतबल झाला,त्याला तर तटस्थ व्हावे लागले...सगळ्या नातेवाईकास कॉल करुन सांगता सांगता..त्याचा जीव कंठाशी आला मित्राना बोलावून सगळ्याना घरी पाठवायची तयारी करत होता..बळजबरीने त्याने त्या सर्वांना घरी पाठवले..नातेवाईक येऊन जमले.. ते ह्या सर्वांना सांभाळत होते..
   अनूप सगळे डॉक्युमेंट प्रॉसेस करत होता...सर्व डॉक्टर त्याचा ओळखीचे असल्यामुळे त्याला काही अडचण आली नाही...शर्मा म्हणल,अनूप,बॉडीला घरी न्यायच?"
अनूप:"काय बोलतो, सकाळी बोलून गेला माझ्यासोबत..रात्री  त्याची बॉडी नेऊ..अरे जीव होता घराचा तो..त्याचा खांद्यावर आम्ही जायच न तोच आमच्या खांद्यावर...म्हणून अनूप जोरजोरात रडत होता....शर्मा एक काम कर मी त्याला सकाळी घेऊन जातो..त्याला अश्या हालत मध्ये पाहून सगळे मरतात रे!
  सकाळ होताच शर्माने अनूपच्या मित्राना फोन केला सर्व तयारी करण्यासाठी सांगितले...
  अनूप एम्बुलेंस मधुन 'बॉडी'घेऊन आला...कशिश भोवळ येऊन पडली...आई,मनस्वी च्या रडण्याने घर आक्रंदत होत... सिधांत न बाबा तुटून पडले...तासाभराने अनूपने मित्र,सिधांत याना उचलायला सांगल..लगेच कशिश ने रितेश ला पकडले...नको याला नेऊ नका... उठ, उठ,आपल्या बाळासाठी उठ रितेश! आई हा तुमच ऐकतो, त्याला उठवा..
बायकांनी तिला बाजूला केले...
   अंतिमसंस्कारच्या विधी साठी बाबांचे हात धजावत नव्हते. अनूप ने पुढे येऊन सगळे विधी केले...अग्निडाग दिल्यावर सिधांत न बाबा अनूपच्या गळ्याला पडून रडत होते...
   आम्हाला घरी सोडून नातेवाईक आपआपल्या मार्गी गेले...नाही म्हणायला दोघ-तिघे राहिले...तेच आई कशिश ला जेऊ घालत होते...
पण कोणाच्या घश्यात घास उतरत नव्हत...15 दिवस तर घर रडण्याचा आवाजने गुदमरून गेला..सिधांत थोडा सावरला.. मी सिधांत मिळून सगळ्याना सावरायचं प्रयत्न करू लागलो..पण जेव्हा दोघे गच्ची वर बसायचो तेव्हा त्याचा आठवणीत हुंदका यायचा...15 दिवसाचे सव्वा महीने झाले..
    उद्या घरी उदक शांतीची पूजा होती...आईने सकाळीच सांगितले शोभात्या येणार आहे..त्या काही जरी बोलल्या, तू काहीच बोलू नको...
अनूप:"फक्त त्यांनी माझ्या भावाला काही बोलायचे नाही..
आई: ऐक कधीतरी...
   तेवढ्यात दारावर बेल वाजली मनस्वी जाऊन दार काढते..दारात रिचा होती मनस्वी, अनूप भाऊजी,रिचा आली.
अनूप, अपराधी नजरेने आई कडे पाहतो..
     रिचा आई,कशिश,मनस्वीला भेटून निघते, तिच्या मागे अनूप जातो..
रिचा:"खूप वाईट झाल! रहावत नव्हते म्हणून आले..तू हॉस्पिटल जात नाहीस का?"

अनूप:"नाही, घरचे आशा कंडिशन मध्ये आहेत त्यामुळे त्यांना सोडून जाता येत नाही
  रिचा:" मला माहित आहे तुम्ही काय गमावले ते पण आता तुमच्या सगळ्यांना प्रॅक्टिकल व्हायची गरज आहे..बरं ते  जाऊदे, अनुप तू आपल्या लग्नाचा घरच्यांना कधी बोलणार आहेस?"
अनुप:" ही काय बोलायची वेळ आहे का?तू पण ना तुला वेळ काळ काही भानच नाही!"
रिचा:"सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं, तू गैरसमज करून घेऊ नको.
        तुला वाटेल तेव्हा बोल आणि हो पैशाची किंवा कशाची गरज लागली तर मला एनीटाईम कॉल कर. ठीक आहे उद्या तू हॉस्पिटलला आल्यावर आपण भेटूया, बाय!
 
    अनुप खाली बोलायला गेल्यानंतर आईने सिद्धांतला तिच्या रूममध्ये बोलवलं. सिद्धांत तुला कशिशचे माहेर माहित आहे का?
सिद्धांत: "आई माहीत नाही, पण रितेश आणि कशिश ची जी फ्रेंड आहेत स्वरूपा. तिच्याकडून घेईल मी कशिशच्या घरचा ऍड्रेस.
आई: "हो तसे कर,  आजच त्यांच्या घरी जा!
सिद्धांत: "आई पण आता त्यांना काय सांगायचं? रितेश गेला तेव्हा तर आपण त्यांना सांगितलं नाही. आता त्यांना वाटेल की कशिशची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडेल...
आई:" सिद्धांत, मला काही निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे म्हणतीये तू तिच्या घरी जाऊन, तिच्या आई-वडिलांना तीची सध्याची परिस्थिती, रितेश चे जाणे, तिची जुळे याबद्दल कल्पना दे! तिला स्वीकारायला तयार आहेत का? त्यांना सांग आपणही कशीशच्या मागे उभे आहोत!
          हे बोलून येईपर्यंत कोणालाही कळू देऊ नको, अनुपने आणि रितेशने नको ते कारभार केला, आता आपल्यालाच निस्तराव लागणार आहे!
सिद्धांत:" ठीक आहे! मी कॉल करतो आणि तिच्या घरी जाऊन येतो!
आई:"सिद्धांत त्याने काय बोललं ते येऊन फक्त मला सांग! कोणालाही काही सांगू नकोस..
सिद्धांत:"ठीक आहे.
  सिधांत निघालाच तेवढ्यात
अनूप:" कुठे चालला आहे तू?"
सिधांत:"उद्याचे समान आणायला!"
अनूप:"पैसे आहे का!"
सिधांत:"आहे, काय म्हणत होती, ती!"
अनूप:"मूर्ख आहे ती, जाऊ दे!"
दादा तू आई कडे लक्ष दे,मी येतो जाऊन.!
अनूप घरात आला, त्याला कशिशच्या खोलीतून तिचा कण्हत  असल्याचा आवाज येत होता..
मनस्वी, कुठे आहे तू?"
मनस्वी::भाऊजी, आर्या तापला, बघा ना मांडीवर झोपला, तुम्हाला काही हव का?"
अनूप:"नाही नको, त्याला औषध दिलाय का?
मनस्वी:"हो"
अनूप आई च्या रूम मध्ये जातो, ते दोघेही पडले होते..
अनूपला कशिशचा आवाज येतो, तो शेवटी आत जातो,
काय झाल कशिश,,काय  होत.?
कशिश:"माइग्रेन चा त्रास सुरू झाला, खूप डोक दुखतेय
अनूप..गोळ्या कुठे तुझ्या?"
कशिश:"तिथे?" तिने बोटाने दाखवले,
अनूप ने तिला गोळी दिली, मी चहा करून आणतो..त्याने चहा आणून दिला..तो हॉल मध्ये होता..कशीश चे कन्हने तो ऐकत होता, हतबल पणे!