Login

अनूप-16

Anup
रात्री 10 वाजता सिधांत घरी आला, आई न सिधांत त्याचा रूम मध्ये जाऊन बोलत होते..मनस्वीला कशिश सोबत झोपण्यास सांगितल...अनूप ची नजर दारावर होती एखाद्या वेळेस रितेश आला तर..त्याचे मन सांगत होते, हे शक्य नाही.. पण मनाचा काय दोष?"
  इकडे सिधांत अणि त्याची आई बोलत होते,
सिधांत:"आई त्या लोकांना इतका राग बसलाय कशिश बद्दल, त्यांना जेव्हा मी सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, तिला पण रितेश सोबत जाळून टाकायचे ना?"
   तुमच्या भावाचे भोग आम्ही नाही सांभाळणार..तुम्हाला  तिचे न तिच्या लेकरांचे काय करायचे ते करा..
आई:"म्हणून या दोघांवर ओरडले लग्न करून आल्यावर.."
सिधांत:"आई झाल ते जाऊ दे, आता समोर काय विचार करायचा ते ठरव."
आई:माझ डोकं चालत नाही."
सिधांत:"तिची डिलेवरी होई पर्यन्त काही नको बोलायला, नंतर पाहू...
आई:"सिद्धार्थला सांगितले का, शोभात्याला सोबतच घेऊन  जा म्हणून."
सिधांत:"हो" जाऊ का मी झोपायला!
आई:ह्म्म जा तू!
आई, रितेश कोणत्या धर्म संकटात टाकले बाळा तू..
सकाळी शोभात्या आल्या..तिचे नाटकी रडणे झाले...त्या आईला दुसर्‍या रूम मध्ये नेऊन...
शोभात्या:"सुमे तिच्या माहेरचे आले का?"
आई: नाही!
शोभा त्या:"मग काय करणार तिचे? आता रितेश नाही तर तिला ठेऊन तर काय उपयोग?"
आई:"काय बोलताहेत तुम्ही, तो जरी नसला तरी लेकर आपले आहेत ना!"
शोभा त्या:"अग मी कुठे नाही म्हणते, उद्या लेकर झाले का, तीह्याच धर्माचा एखादा बघून लग्न लावून दे...तुम्ही 1 लेकरू ठेवा, दूसर तिला द्या...ती येईल अधून मधून भेटायला...
आई:"अत्या,काय बोलता हे!"
शोभा त्या:"अग खरं तेच बोलते, घरात बिनलग्नाचा पोरगा आहे, विचार कर!"
   आई रूम मधुन बाहेर येते..जाऊन बसते तेवढ्यात तिथे असलेल्या अनूप च्या फोनवर रिचाचा कॉल येतो...आई  कॉल  रिसीव करते,
   तो रिचाचा कॉल होता, रिचा आपल्याच धुंदीत होती, अनूप  मी बाबांना बोलले ते आपल्यासाठी फ्लॅट बूक करणार आहे ..तुला मस्त Hondacity घेणार...
  आईने फोन कट केला...
आई:"सिद्धार्थ जेवण करून शोभा वंसना घेऊन जा..
सिद्धार्थ:"हो"
  
अनूप मनाशीच हिला काय झाले? सुमिचे असे बोलणे एकूण शोभात्या बडबड करत होत्या, राघवेन्द्र बघ कशी बोलती तुझी बायको..खरं माणसाला पचत नाही..
बाबा:"सिधांत रिक्षा बोलाव."
शोभात्या रागात निघून गेली...
रात्री आईने अनूपला आपल्या खोलीत बोलावले..अनूप आला त्याने पाहिले कशीश तिथे उभी होती, अनूप ने ईशराने कशिश ला विचारले काय झाले?
   तिने मान हलवून विचारले माहीत नाही...
अनूप:"आई बोलावले होते?"
आई:"ह्म्म, बोलायचे."कशिशच पुढे काय, करणार?
अनूप:"काय करणार म्हणजे?"
आई: कशिश तू काय ठरवल?"
कशिश:"आई, मी जॉब शोधेल!"
आई:" या स्तिथित!,तुला काय वाटत अनूप?"
अनूप:"कशिश होऊ दे डिलेवरी, मूल वर्षाची झाले की कर जॉब!"
आई:"सर्वाच्या खर्च कोण करेल?"
अनूप:"मी करेन!"
आई:"उद्या रिचा सोबत लग्न करून, निघून गेल्यावर हिने काय करायचे."
अनूप:"मूल 1 चे होईल तोवर मी नाही करणार लग्न!"
आई:"तिची तब्यात,तिच्या गरजा कोण पुरवणार?"
अनूप:"आई आपण सर्व आहोत ना!"
आई:कोणी नाही अनूप,काल तिला त्रास होताना कोणी नव्हत तिच्या जवळ, ती एकटीच सहन करत होती, खर आहे ना!"
अनूप:"हो"
आई:"मरताना रितेशने, तुझ्या कडे काय मागितल?"
अनूप:"गोल,गोल बोलू नको काय जे बोलायच ते स्पष्ट बोल?"
आई:" रितेशला वचन दिल्या प्रमाणे कशिश जबाबदारी घे! नवरा म्हणून!"
अनूप:"काय, काहीही काय बोलतेस ?"तुझ्या जीभेला काही लगाम लाव!"
आई:" तिचे आयुष् तिने कसे जगावे?, मूल वर्षाचे झाले तरी ती कुठे अणि कशी नोकरी करणार, मुलांच काय? त्याची काळजी कोण घेणार,
अनूप:"आई, आपण सगळे आहोत ना! तू बाबा, सिधांत-मनस्वी.. एवढे सगळे आहोत,
आई:  "फक्त नावालाच, अरे रितेश सारखी तरुण पोरं गेली, तिथे आमची काय बाब.! सिधांत अमेरिकाला जाणार पुढे तू. आमचे आयुष्य कधी पण संपेल...ती मूर्ख रिचा कोणाशी संबंध ठेऊ देणार नाही, पण कशिशचे काय?"
     तिला दोन्ही मुली झाल्या तर, बाहेर पाहिल ना काय चालू आहे ते, ही त्या मुलांना घेऊन कसे सांभाळणार?"
   तुझ्या पाया पडते, रितेशला मुक्ति दे. घे कशिश न बाळांची जबाबदारी...
अनूप: आई मी अशीपण घेणारच आहे..हव तर मी रिचा सोबत लग्न नाही करणार...पण असे बोलू नको...
  अनूप रागाच्या भरात निघाला, दाराच्या बाजूला कशिश होती, तिच्या डोळ्यातून पाणी येत होते...
   रूम च्या बाहेर सगळे होते,
अनूप:"सिधांत ला पाहत, पागल झाली ती, समजाव तिला, मला तर हिच्याशी बोलायचे पण सुचत नाही..
   हिला त्या शोभात्या ने बोललं असेल, हिच्या तेच खुळ हिच्या डोक्यात..
   बाबा हीच डोक ठिकाणावर येईपर्यंत मी या घरात राहण योग्य नाही...
  तिला समजावून सांगा, जेव्हा समजेल तेव्हा मला बोलवा,
अनूप रागारागात बॅग भरून आणतो..
आई:"कुठे,चालला?"
अनूप:"कुठेही जाईल!"
आई:"थांब, असे म्हणून कशिशला रूम मधुन आणते, जायच  ना तुला, हिला जिथून आणले तिथे सोडून दे, असे म्हणून कशिशला अनूपच्या पुढे ढकलले...
      अनूप कशिशला आपल्या दोन्ही हातांनी पकडतो..तिला बाजूला करून त्याचा आईला बोलतो..
अनूप:"आई, ती पडली असती ना! थोड डोक भानावर ठेवून वाग! शेवटी स्वार्थी झालीस ना, मुलगा गेला, आता त्याचे मुल
आपण का सांभाळणार" हो ना...नाहीतर मी रिचासोबत लग्न  करू नये ह्या साठी हा आकांडतांडव करतेस...


🎭 Series Post

View all