रात्री अनूपला यायला एक वाजले नेमके आज तो लॉच ची की विसरला होता, घरी सर्व झोपले असतिल त्यामुळे तो सिधांत ला कॉल करतो, पण त्याचा फोन स्विच ऑफ येतो..
तो बाबा, मनस्वी ला कॉल करतो पण कोणीच कॉल उचलत नाही..त्याचा कडून रितेशला कॉल जातो...त्याला एकदम लक्षात येत.. डोळे पाणावतात, बेल जाते..तो कॉल कट करतो..एवढ्या रात्री मी जर बेल वाजवली तर हे सर्व उठतील.. त्यामुळे तो बाहेर थांबला.. पाच मिनिटात दार उघडल, दारात कशिश होती.
तिने दार काढले, अनूप आत मध्ये आला..
कशिश:"रितेशच्या फोन वर कॉल केला, फोन माझ्या जवळ होता...
अनूप:"सॉरी, लक्षात नव्हत आल.. तू झोपली नाही..
कशिश:"नाही झोपते आता."
कशिश ओल्या डोळ्याने रूम मध्ये गेली, अनूप अणि कशिश एकमेकांना नजरा पण मिळवत नव्हते...
सकाळी सगळे उठायचा आतच, अनूप हॉस्पिटलला निघून गेला..तो घरात जे चालत आहे..त्याचा मनाविरुद्ध त्याबद्दलचा मूक निषेध करत होता..
अनूप स्वतःला आपण तरी आपला विरोध दर्शविला, दोन दिवसा पासुन सगळ्याना टाळाटाळ करतोय,
पण कशिश कसे हॅन्डल करत असेल? आपण आज बोलायच का तिला, पण काय बोलाव? तिला जर हे लग्नच करायचे नसेल तर?
पण सध्या ऑप्शन पण नाही...आता फ्री असेल का ती?
अनूप कशिशला कॉल करतो,
अनूप: हैलो, एकटीच आहे का?
कशिश: "नाही, हॉल मध्ये आहे!"
अनूप"एकटी असताना बोल.
कशिश: आले,म्हणून ती तिच्या रूम मध्ये येते.
अनूप: तू खरच तयार आहेस, या लग्नाला?
कशिश:"ह्म्म,"
अनूप: नक्कीच आईने 'तयार' केले..कशिश हे बघ तू सध्या काही काळजी करू नको,
ह्या दोन वर्षात मी तुला सेटल करेन, तेव्हा तू तुझ्या आयुष्याचा हव तो निर्णय घे.. तेव्हा तुला कोणी अडवणार नाही.. आता तुझी न मुलांची काळजी घे"
कशिश: 'रिचा, ती म्हणते...'
अनूप: समजावतो तिला..काही त्रास तर नाही होत ना..
कशिश:नाही..
अनूप रात्री झोपत जा..नको येवढी काळजी करू..ठेवतो.
कशिश:ह्म्म...हो..
तेवढ्यात आई येते..कशिश तुमच्या लग्नाला लागणार सगळ सामान घेऊन आले, पहा ना!
आता अनूपला फोन लावते, उद्या हळद, लगेच मेहंदी..परवा लग्न त्याला सांगते, दोन दिवस सुट्टी घे म्हणून..
आईचे बोलणे चालूच होते, कशिश तिच्या गळ्याला पडून रडते..आई पण खूप रडते...
आई संध्याकाळी अनूपला कॉल करते, अनूप आज लवकर येतो का घरी?"
अनूप:"हो येतो, आयुषभर तू जे म्हणशील तेच तर करणार आहे."
आई: असा चिडू नकोस रे, तुला मी चुकीची वाटत असेल, पण तुला नंतर जाणवेल, माझा निर्णय कसा योग्य होता!
अनूप:आई,प्लीज, मला माझे काम करू दे..
आई:उद्या हळद न मेहंदी आहे.. दोन दिवस सुट्टी घे.मग तुला हव तस कर..
अनूप: दोन दिवस कशाला, अगदी महिनाभर घेतो, लग्नानंतर हनिमूनला पाठवशील ना आई?"
आई: एवढ कडवं बोलू नको रे.!
अनूप: मला किती एकाव लागेल याचा विचार कर, उद्या मी सोसायटीत लग्न करणार, गावभर बायकोला घेऊन फिरणार तेव्हा लोक काय म्हणतील?,
बघा, भाऊ जाऊन दोन महिने झाले नाही, याने त्याचा बायकोसोबत लग्न केले! तेव्हा काय उत्तर देऊ आई?"
आई काही बोलणार येवढ्यात अनूप ने कॉल कट केला.. आई ने सिधांतला कॉल केला, तू काही समजाव न त्याला, तो काहीही बोलतो,
सिधांत: आई तो झाला ना लग्नाला तयार, आता त्याला हे एक्सेप्ट करायला वेळ दे. कशिश मुलगी आहे. तिला कोणी बोलायच हक्काच माणूस नाही..त्यामुळे ती तिची नाराजी, राग बाहेर काढत नाही,
पण दादाला सगळे हक्काचे आहोत, तो एरवीही चिडायच आपल्यावर...आई कशिशला अजून तिच्या मनाविरुद्ध करायला भाग पाडू नको..
आई:तुमच्या सगळ्याना मीच दोषी वाटते, सगळ विचार करून करते, वरुण तुमचे बोलणे एका..
सिधांत: आई सोड आता ते, माझ्यासाठी काय काम आहे ते सांगा, सुट्टी घेतो..
रात्री अनूप मुद्दाम उशिरा आला, तो आपल्या रूम मध्ये जात होता, तेव्हा त्याने पाहिले कशिश रितेशचा शर्ट आपल्या पाठीवर अडकून त्याचे दोन्ही भाया आपल्या भोवती गुंडाळून गुपचुप रडत होती,
तो तिला समजाव म्हणून जाणार तेवढ्यात स्वतःला अडवतो, तिला रडायचे अधिकार आहे. उद्या पासून रितेश साठी तिला रडू दिले जाणार नाही. आजच्या दिवस तरी मोकळ रडून घेऊ दे तिला...
सकाळी अनूप उशीराच उठला. कॉलनी तिल, पाहुण्यातिल आशा 6-7 बायका आल्या होत्या. आईने अनूपला तयार होण्यास सांगितले, तो बाहेर येऊन बसला, दोन बयानी कशाशीला आत मधुन आणले...
कशिश बिना कुंकवाची आली होती, अनूपला तिला कुंकू लावण्यास सांगितले, तो थरथरत कुंकू लावला..
कशिशच्या डोळ्यात पाण्याचे थेंब येऊ लागले...त्यानंतर चूड़ा भरला..कशिशने मेंदीचे फक्त चार ठिपके लावले...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा