Login

अनुप-19

Anup
सगळे कार्यक्रम झाल्यावर अनूप तडक आपल्या रूम मध्ये निघून गेला.
आई सिधांतला बघत,"त्याला समजाव..

सिदंधात,"आई,काळजी करू नको, मी आज रात्री बोलेल दादाला ..

रात्री सिधांत अनूप साठी कॉफी घेऊन जातो,
सिधांत: दादा आत येऊ का?
अनूप: ये!
सिधांत: काय अवरतो?
अनूप: कपाट, मातोश्रीची आज्ञा...
सिधांत: बिचारी कशिश! कसे adjust करावे लागणार.
अनूप: रिचा सोबत लग्नाच स्वप्न पाहिल, अन कराव काय लागतंय,पहा.
सिधांत: पण दादा यामुळे एक चांगल झाल का रिचा तुझ्या आयुष्यात येणार नाही.

अनूप: सिध्द, प्लीज मला राग देऊ नको..
सिधांत: दादा तुला रिचाच खरं रूप दिसत नाही, का तुला बघायच नाही?
अनूप: कोणत रूप रे? आज मला बळजबरीने जसे बोहल्यावर चढवतात. तसेच तिला पण तिचा घरचांनी केल असेल..
सिधांत:तुझी न तिची परिस्थिती वेगळी होती...प्लीज कशिश समोर हे शो करू नको.
अनूप: मी तिला काही बोलो अथवा जाणवू दिल नाही... कळल.
सिधांत:दादा हे बघ जे होतय त्याला एक्सेप्ट कर, आता परत त्याच गोष्टी आयुष्यात होऊ देऊ नको.
हे बळजबरीने लग्न म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊ नको. प्लीज आम्हाला तुझी गरज आहे. अन मला खात्री आहे वेळ गेल का तू सगळ स्विकार करशील..मूल झाले ना सगळ व्यवस्थित होईल...

अनूप सिधांतला मधेच थांबवत म्हणाला,"जी माझ्या रितेशसाठी पत्नी म्हणून आणली, तिच्याशी लग्न कराव लागत, तीलाच पत्नी म्हणून कस स्विकार करू सांग?"
सिधांत अनूप जवळ येत,"दादा होईल सर्व नीट काळजी नको करू. तूला आपले लोक म्हणून आम्ही सगळे आहोत. पण तुला कशिशच व्हाव लागणार आहे.
अनूप: मी प्रयत्न करतो, बर उद्या किती वाजता मंदिरात जायच.
सिधांत: गुरुजीने सकाळी 10 चा मुहूर्त दिला..
अनूप:म्हणजे आईसाहेब चारला उठवेल..
 
दोघेही हसतात...चल गुड नाइट..जाताना सिधांत अनूपच्या गळ्याला पडतो, बेस्टऑफलक, दादा.
अनूप: ह्म्म, मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करेल...जा झोप..

अनूपला झोप येत नव्हती, तो विचारात होता, तेवढ्यात त्याला कशिशचा msg आला,
कशिश: "सॉरी."
अनूप: "कशासाठी."
कशिश:" माझ्यामुळे तुम्हाला तुमचे सगळे निर्णय बदलावे लागत आहे."
अनूप:"यात तुझा दोष नाही, सतत स्वतःला ब्लेम करण बंद कर."
  कशिशचा काही फीडबैक येत नाही, अनूप विचार करतो आपण रागात बोललो का.? तो परत msg करतो

अनूप: कशिश तुला माहित आहे,मल राग लवकर येतो, मी चिडचिड जास्त करतो. प्लीज या गोष्टी समजून घे.
कशिश:हो,
अनूप: अजून ही जागीच आहे?, जास्त जागू नको झोप घे..
कशिश: हो.
अनूप: गुड नाइट!
कशिश: गुड नाइट!
          
सकाळी 8 वाजता मंदिरात जायचे होते, जवळचे  15-20 नातेवाईका एवढेच निमंत्रित होते. सिधांतने अनूप, आईबाबांना मंदिरात सोडले, थोड्याच वेळात कशिश अणि मनस्वीला घेऊन आला, लग्नाचे एक-एक विधी पार पडत होते.
    सारे लग्नविधी पार पाडले. घरी येताच मनस्वी अणि आई ने अनूप न कशिशला ओवाळले..आईबाबांना नमस्कार केला.
कशिश मनस्वी जवळ आली. तिच्या गळ्याला पडून खूप रडली,. हे पाहून सर्व खूप भावूक झाले.
  कशिश आपल्या रूम मध्ये फ्रेश होण्या साठी जाणार, तेवढ्यात
आई: कशिश आजपासून अनूपची रूम तुझी रूम आहे. तुझ समान ठेवलय तिकडेच..
कशिश तिकडेच गेली.. सिधांत मनस्वीला म्हणाला तू पण आराम कर थोडा, मुलांना झोपव, चल
आई ने अनूपच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली," तू पण फ्रेश होऊन घे."
  अनूप तासभर तिथेच घुटमळत होता, नंतर तो कसाबसा रूम मध्ये गेला, तिथे पाहिले तर, कशिश कोपर्‍यात चटई वर झोपलेली होती,
अनूप तिच्या जवळ जाऊन तिला उठवेल
अनूप: कशिश, इथे काय झोपते, उठ.
कशिश: कसेबसे उठाती, काय झाले.
अनूप: अश्या अवस्थेत खाली झोपत जाऊ नको, वरती झोप.
कशिश: ह्म्म, झोपते.
अनूप: मी चेंज करून येतो.
कशिश: मी, माझ सामान कुठे ठेऊ?
अनूप: केलाय मी माझ कपाट रिकाम,त्यात ठेव. मी आपल्याला कॉफी घेऊन येतो!
कशिश: मी बनवून आणू का?
अनूप: तुला आज जर कॉफी करताना पाहिल तर आई कॉफी च्या ऐवजी मलाच उकळल.
   कशिश हसते,अनूप रूमच्या बाहेर जातो, कशिश आपले कपड़े लावायला घेते, कपडे लावताना, बॅग मधुन रितेशचा फोटो काढते...तू ऐकल नाही कधीच माझ..लांब झालास शेवटी... अस म्हणून ती तो फोटो साड्या खाली ठेवते..
तेवढ्यात अनूप येतो,
अनूप: तो फोटो लपवायची गरज नाही. तू कोठेही ठेऊ शकतेस..
कशिश: आई....त्या...
अनूप: मी बोलतो तिच्याशी...अन हे काय तुझी एकच बॅग!
कशिश: हो...निघून येताना येवढेच सामान आणलं होतं..
मी कॉफी घेऊन बाहेर जाऊन बसते, मनस्वी ताईला काही मदत लागली तर...
अनूप: हो,
कशिश रितेशचा फोटो टेबलवर ठेऊन जाते..रितेश किती adjust केल होतं कशिश ने तुझ्यासाठी, तुला कधी काही मागितले नाही..


🎭 Series Post

View all