चॅम्पियन ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक: अनुत्तरित भाग-२
मावशी गडबड करतच तिथून घरी जाण्यासाठी निघाली होती.
शमाने दरवाजा फक्त पुढे ढकलला होता, त्यामुळे मावशीला दरवाजा उघडता आला.
घरामध्ये आल्यावर मावशीला शमा काही बाहेरच्या खोलीत दिसली नव्हती आणि आतमध्ये तर स्वयंपाकघर होते, तर तिथेच ती असेल म्हणून मावशी आवाज न देता
स्वयंपाकघरामध्ये जाण्यासाठी निघाली, परंतु स्वयंपाकघर आणि खोलीच्या मध्ये दरवाजा असल्याने तो बंद असलेला बघून मावशीच्या कपाळावर आठ्या आल्या.
स्वयंपाकघरामध्ये जाण्यासाठी निघाली, परंतु स्वयंपाकघर आणि खोलीच्या मध्ये दरवाजा असल्याने तो बंद असलेला बघून मावशीच्या कपाळावर आठ्या आल्या.
तेवढ्यात तिला जळण्याचा वास यायला लागला, म्हणून स्वयंपाकघर आणि खोलीच्यामध्ये छोटीशी खिडकी होती तिथून तिने आतमध्ये शमा आहे का म्हणून बघितले.
जसे समोरचे दृश्य बघितले तसे मावशीने ओरडायला सुरुवात केली.
" शमा ssss अगं पोरी, दार उघड लवकर." असं म्हणून लगेच त्या स्वयंपाकघराच्या इथे जे दार होतं, ते ठोठावून उघडण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु ते आतूनच बंद होते.
मावशी खूप घाबरलेल्या होत्या कारण समोर शमा पेटलेली दिसत होती. जोरजोरात हलवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता तो उघडत नाहीये असे समजून मावशी धावतच आजूबाजूच्या लोकांना ओरडून तिने मदतीसाठी बोलावले.
" लवकर दार उघडा. माझ्या सुनेला वाचवा." असे म्हणून ती घरामध्ये आलेल्या लोकांना सांगत होती.
लोक जोर लावून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण मजबूत दरवाजा असल्याने तो तोडायला उशीर लागला.
आतमध्ये शमाचे शरीर पेटलेले होते आणि तिच्या कानठळ्या बसणाऱ्या किंकाळ्या सुद्धा ऐकू येत होत्या.
त्यातल्याच एका व्यक्तीने तेवढ्यात नीलच्या कामावर फोन करून त्याला तातडीने घरी यायला सांगितले.
जेव्हा स्वयंपाकघराचे दार तोडून आतमध्ये सगळ्यांनी प्रवेश केला, तेव्हा घोंगडीने तिच्या शरीराला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु सगळ्यांना कळूनच चुकलेले होते की, शमाचे पूर्ण शरीर जास्त भाजलेले होते आणि ती खाली कोसळली होती.
तातडीने सगळ्यांनी नीलची येण्याची वाट न बघता तिला डॉक्टरांकडे नेले.
हे सर्व काय चालू आहे, याची कल्पनाच कोणाला नव्हती, कारण असे काही होईल, हे कोणाला सुद्धा अपेक्षित नव्हते.
नील घरी आल्यावर त्याला झालेला प्रकार समजला तसा ज्या हॉस्पिटलमध्ये शमाला घेऊन गेले होते, तिथे तो लगेच गेला.
डॉक्टरांनी शमाकडे बघितले आणि लगेच तिला मृत घोषित केले.
हे सर्व मावशीने ऐकल्यावर तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि तिथेच ती चक्कर येऊन पडली.
नीलला सुद्धा काहीच समजत नव्हते की, हे असे अचानक कसे झाले आणि जसे डॉक्टरांनी त्याची बायको या जगात नाहीये, असे सांगितले तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली होती.
नवीनच सुरू झालेला त्यांचा संसार आणि शमा मात्र अर्ध्यावरच त्याची साथ सोडून निघून गेली होती.
" तुम्ही परत एकदा नीट तपासा डॉक्टर, असे होऊ शकत नाही. तुम्ही काही पण करा आणि तिला वाचवा. अहो, आमचे नुकतेच लग्न झालेले आहे." नीलला कोणतेच भान राहिले नव्हते आणि आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचे पाय सुद्धा धरले.
" हे बघा, आम्हाला माफ करा ; पण खरंच जास्त भाजल्यामुळे तुमच्या बायकोला इथे आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला सांभाळा." असे म्हणून डॉक्टरांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
चाळीतील जी लोकं आलेली होती, ते सगळे कुजबूज करत होते. त्यांना खूप वाईट होते, कारण ते सर्व खूप आधीपासूनच नील आणि मावशीला ओळखत होते. मावशी सुद्धा शमाशी नीटच वागत होती, त्यामुळे शमाने असे पाऊल का उचलले हे त्यांना समजतच नव्हते.
हे सर्व टेलीफोनद्वारे शमाच्या घरी सांगण्यात आले आणि त्यामुळे गावावरून लगेच तिची माहेरकडची माणसे मुंबईकडे येण्यासाठी निघाले.
जसे त्यांना आपली मुलगी आता जिवंत नाही, हे समजले तसे तिच्या आई-वडिलांनी आक्रोश करत रडायला सुरुवात केली.
" आमच्या पोरीचे हे काय झाले ? आता कसे होणार ? मागच्याच आठवड्यामध्ये तर तिला आम्ही इकडं पाठवलेलं होतं आणि असं कसं झालं ? " असं म्हणून तिची आई आपल्या मुलीच्या मृत शरीरावर डोकं ठेवून रडत होती.
लवकरच अंत्यविधी करावी लागणार होती, त्यामुळे इतर नातेवाईक ती तयारी करत होते.
" थांबा sss" शमाचे वडील नील आणि मावशीकडे बघून संतापाने ओरडले.
क्रमशः
शमाच्या वडिलांनी का थांबवले असेल?
© विद्या कुंभार.
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा