Login

अज्ञात कवचाच रहस्य

एलिव्हेटर गेम
पायल आजही घरी उशिरा आली आणि नेहमीप्रमाणे लिफ्टने जाणार तर तिला अचानक तीन वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आठवली तर लगेच ती लिफ्टपासून  दोन पावले मागे सरकली.. ती जशी सरकली तस अचानक त्या लिफ्टमधून आवाज आला.. कोणीतरी खूप जोरात लिफ्टचा दरवाजा ठोकत होत.. त्या आवाजाने ती क्षणभर घाबरली आणि पळतच पटपट पायऱ्या चढून तिच्या फ्लॅटजवळ उभी राहिली.. धापा टाकत थरथरत्या हाताने तिने दरवाजा खोलला आणि पटकन आत येत लगेच दरवाजा बंद केला... ती दरवाज्याला टेकून स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती , थोड्यावेळाने नॉर्मल झाल्यावर तिथे हॉलमध्येच असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली..


तिने डोळे मिटले तर तिला दोन वर्षांपूर्वीची घटना आठवायला लागली..

दोन वर्षांपूर्वी पायल आणि तिची मैत्रीण माया दोघी एकाच फ्लॅटमध्ये राहत होत्या.. ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती त्याच ऑफिसमध्ये तिची मैत्रीण पण कामाला होती.. दोघी एकत्र मज्जा मस्ती करत जीवन जगत होत्या..

एक दिवस माया आपण एलिव्हेटर गेम खेळू म्हणून पायलच्या मागे लागलेली , मायाने कोणाकडून तरी ऐकल होत म्हणून ती पायलकडे तो गेम खेळण्याचा हट्ट करत होती.. माया एवढी मागे लागल्याने पायल तो खेळायला तयार झाली.. तर त्यांनी रविवारच्या दिवशी रात्री बारा वाजता खेळण्याची वेळ ठरवली..

वाट बघता बघता रविवार आला.. रात्रीचे बारा वाजता दोघी ग्राउंड फ्लोअरच्या  लिफ्टसमोर उभ्या होत्या.. माया लिफ्टचा बटन दाबल्यावर लिफ्ट उघडली गेली सोबत दोघीही पटकन लिफ्टच्या आत आल्या.. आत आल्यावर मायाने पटकन ४,२,६,२,१०,५ बटन दाबले , तशी लिफ्ट हळू हळू दहाव्या फ्लोअरवर येऊन थांबली.. लिफ्ट थांबली आणि दरवाजा उघडला गेला सोबत दोघी पण पटकन बाहेर आल्या पण लिफ्टचा दरवाजा तसाच उघडा होता.. दोघी बाहेर आल्या तस दोघींना नकारात्मकता जाणवू लागली.. पायलला जाणवू लागल की पाठीमागे कोणीतरी आहे.. नंतर अस वाटायला लागल की पाठीमागे आपल्या खूपच जवळ कोणीतरी उभ आहे.. पण पायलने मागे वळून खूप मोठी चूक केलेली.. ती जशी मागे वळली
तस तिला एक भयानक आकृती दिसली.. ती आकृती पायलला आपल्याकडे खेचणार तस मायाने बंद होत आलेल्या लिफ्टमध्ये पायलला ढकलल त्यामुळे पायल त्या शैतनाच्या दूनयेत जाण्यापासून वाचली..


अचानक कसला तरी आवाज आल्याने पायल भानावर आली ती हुंदके देतच अडखळत " सॉरी माया मी तुला नाही वाचवू शकले.."
पण तिला माहित नव्हत की ती आकृती तिच्या पाठीमागे आहे.. जणू तिला ते एलिव्हेटर गेम खेळण्यासाठी मागे लागली आहे..