जलद कथालेखन स्पर्धा
सावित्री आपल्या मुलाला अशोकला बोलवायला म्हणून त्याच्या खोलीपाशी आली तर त्याच्या खोलीचं दर बंद होतं. अशोक हसत-खिदळत कोणाशीतरी फोनवर बोलत होता. तासान-तास त्याचं फोनवर बोलणं खरतर सावित्रीला आवडत नसे,पण काय करणार आताची पिढी ऐकते कुठे? सावित्रीच्या मनात हे आलं आणि ती नाराजीनं निघून जाणार तेवढ्यात तिच्या कानावर काहीतरी पडलं आणि ती थबकली.
ती अजून दाराजवळ सरकली आणि ऐकू लागली. जसं-जसं अशोकचं बोलणं ,हसणं तिच्या कानावर पडू लागलं तसं-तशी सावित्री मुळापासून उखडत गेली. ती जे ऐकत होती त्यावर आणि स्वत:च्या कानावर तिचा विश्वास बसत नव्हता इतकं ते नीच पातळीवरचं बोलणं होतं. सावित्री आतून इतकी हादरली होती कि तिला तिथे क्षणभरही उभं राहणं जमत नव्हतं. ती कशीबशी थरथरत्या अंगानं स्वयपाकघरात आली आणि भिंतीच्या आधारानी भिंतीला टेकवलेला पाट खाली पाडला नि त्या पाटावर धपकन बसली. बसता-बसता तिचा तोल गेला पण नाशीब ती पडली नाही.
तोंडात पदराचा गोळा कोंबून हमसून-हमसून रडू लागली. डोळ्यातून वाहणा-या पाण्याला अडवण तिला जमलं नाही. रडता-रडता तिच्या मनात आलं इतकं काळं विद्रूप मन आहे आपल्या मुलाचं ! इतकं घाणेरडं कृत्य करतांना त्याच्यावर आम्ही केलेले संस्कार तो कसा विसरला? असा कसा वागला तो?.......सावित्री उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि रडत होती.
सावित्रीला तो दिवस आठवला. जो सुवर्णाक्षरांनी तिच्या मनावर कोरल्या गेला होता.
अशोकच्या जन्मा नंतर आपल्या सासरी सगळे आनंदाच्या शिखरावर आरूढ झाले होते. सोन्या चांदीने सगळ्यांनी या बाल जीवाला मढवून टाकलं.
आसन्न मरण अवस्थेत असलेल्या आजे सासऱ्यांच्या डोळ्यात कौतुकाची फुलं होती जी त्यांनी नवजात बाळावर उधळली. या बाळ कृष्णाला बघीतल्यावर त्यांनी शांतपणे आपला देह ठेवला.
आत्तापर्यंत घरातील लोकांच्या आयुष्यात येणऱ्या अडचणी हळू हळू दूर होऊ लागल्या होत्या. सगळ्यांना हा अशोकाचा पायगुण वाटला त्यामुळे तो सगळ्यांचा जास्तच लाडका झाला.
सावित्री अशोकच्या बालपणात रमली पण थोड्याच वेळात ती भानावर आली.
सावित्री अशोकच्या बालपणात रमली पण थोड्याच वेळात ती भानावर आली.
ब-याच वेळानं तिचा उमाळा शांत झाला. काहीतरी निश्चय करून ती उठली, चेहे-यावर पाण्याचे हबके मारले, चेहरा पुसला आणि मनाशी काहीतरी ठरवून. ती घराचा उंबरठा ओलांडणार तोच अशोकची
‘आई’ अशी हाक कानावर आणि सावित्रीला अंगावर पाल पडल्यासारखं वाटलं.तिचा चेहरा कठोर झाला.
तिनं मागे वळूनही बघितलं नाही,कारण तिला अशोकचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नव्हती.
‘आई कुठे चालली?......सावित्री गप्प होती.
‘आई मला भूक लागली आहे .....आता कुठे चाललीस तू?’ अशोकने पुन्हा विचारलं.
सावीत्रीनी कसाबसा घशात आवाज गोळा केला नि म्हणाली ‘मला सुंदर आत्याकडे महत्वाचं काम आहे मी चालले’ एवढं बोलून तिला धाप लागली कारण आत्यंतिक तीरास्कारानी तिची वाचाच बसल्यासारखी झाली होती.इतकं बोलून सावित्री घराबाहेर पडली.
अशोकला आश्चर्य वाटलं कारण एरवी त्यानं भूक लागली आहे म्हटलं की सावित्री अशी वागत नसे.आज काय झालाय तिला याचं उत्तर त्यानं शोधण्याचा प्रयत्न केला पण काही वेळाने ‘जाऊ दे ....’ म्हणत तो स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यासाठी काहीतरी शोधू लागला.
__________________________
__________________________
क्रमशः अपमान
अशोक असं काय बोलला की सावित्रीला एवढा राग आला.
बघू पुढील भागात.
अशोक असं काय बोलला की सावित्रीला एवढा राग आला.
बघू पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा