अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १२

“ज्या मुलीने गृहमंत्र्यांना झुकवुन स्वतःची बदली करून घेतली.” साळवे तिरकस हसत बोलले. “तुम्हाला वाटतं की तुम्ही तिची बदली करू शकाल?” आता मित्तल जरा विचारात पडले.
मागील भागात.

संशोधनाबद्दल घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. ती कंपनी कसा त्यावर दावा करत आहे? हे देखील त्यांना माहीत नव्हतं. त्या कंपनीचा आणि अनामिकेचा काय संबंध होता? ते देखील कोणाला समजत नव्हतं. कारण त्या कंपनीच्या साक्षीदारांमध्ये अनामिकेच ही नाव होत.

(वर्तमानकाळ)

बोलता बोलता सोनीया परत रडायला लागली होती. तस परीने तिला तिच्या कवेत घेतलं.

“खूप त्रास दिला गं तिने आईला.” सोनीया हुंदके देत बोलत होती.

आता ऋतुजा ही येऊन पोहोचली होती. तिला ही ते सर्व आठवून गलबलून आलेल होत. कधी एक अश्रुही न गाळणा-या साईच्या डोळ्यात ही अश्रुंनी गर्दी केली होती. थोडावेळ असाच शांततेत गेला. ऋतुजाने सोनीयाला प्यायला पाणी दिलं.

“आपला वासुदेव नाही आला?” मायकल घड्याळ बघत बोलला.

आता पुढे.

“त्यांनी परमीशन दिलेली आहे.” साईने हाताची मुठीत वाळुन अंगठा दाखवला.

“त्या कंपनीचा दावा तर मी मुळासकट शोधून काढेल.” परीने विद्याकडे पाहीलं. “तु उद्या मावशींना सोबत घेऊन जा आणि त्या अनामिकेचे बंगले पाड.”

“हो जाईल की मी.” विद्या “तु गेलीस तर नक्कीच तिचा मर्डर करून येशील. वरून बोलशील तिच चाकूवर पडली.”

विद्याच्या बोलण्यावर सगळे हलकेच हसले होते.

“सायकल.” विद्या अजून खोडकर होत बोलली. “तिचा पत्ता शोधला असशीलच. पाठव बरं मला.”

“मायकल नाव आहे, समजलं.” मायकलने तिची केस ओढली. “पत्ता आधीच पाठवला आहे.”

“सोड ना.” विद्या आठ्या पाडून बोलली.

“तुमचं नक्की काही कनेक्शन नाही ना?” परी बारीक डोळे करत बोलली.

“ओ भैरवी मॅडम.” विद्या तिची केस उडवत बोलली. “तुझी पोलीसगीरी तिकडेच. इकडे मी पण मगं हं….” विद्या धमकी देत बोलली.

“तुझी धमकी सध्या उद्यासाठी ठेव.” परी “नाही ऐकली तर मीच जाईल.”

“त्याची गरज वाटेल अस वाटतं नाही.” विद्या

मग ते सगळेच थोडीफर चर्चा करुन त्या खोलीबाहेर पडले. दुसर्‍या दिवशी साटम आणि साळवे परत हॉस्पिटलला पोहोचले. आजवर विनवणी करणारी, काहीही खायला मनाई करणारी सरला आज मस्त आनंदात नाश्ता करत होती. तिथले बसलेले वॉर्डबॉय आणि नर्स बघून ते दोघे अजुनच गोंधळात पडले. बदली झालेच तर एखाद दोन माणस बदली होत होती. पण इथे पुर्ण स्टाफच बदलला होता. त्या गोंधळातच ते प्रसादकडे चालले होते. तोच त्यांच्यासमोर एक वॉर्डबॉय येऊन थांबला. त्याचा प्रश्नार्थक चेहरा बघून साळवे बोलले.

“प्रसादकडे चौकशीसाठी आलो आहे.” साळवे “पण तु का अडवलं आहेस?”

“डॉक्टरांची परमीशन घेतली?” वॉर्डबॉयने विचारलं. तस दोघांना त्याच्यावर रागच आला. आजवर त्यांना अस कोणी अडवलं नव्हतं. पण नियमानुसार डॉक्टरांची परवानगी ही आवश्यक होती.

“त्यांना माहीती आहे.” साटम कडक आवाजात बोलले.

“डॉक्टरसाहेबांची बदली झालेली आहे.” वॉर्डबॉय “नवीन डॉक्टर खूप स्ट्रिक्ट आहेत. जा त्यांना आधी विचारुन या.”

आता मात्र दोघांना ही चांगलाच झटका बसला होता. तेवढ्यातच सरला त्या रुममधुन बाहेर पडल्या. त्या दोघांना ही स्मित करत त्या चालल्या गेल्या होत्या. विद्या खाली त्यांची वाट बघतच होती.

आज सकाळीच त्यांचा शेवटचा सवंगडी त्याच्या युनिफॉर्ममध्ये आला होता. त्याला आलेल बघून सरला त्यांच्या टेन्शनमधून पुर्ण मोकळ्या झाल्या होत्या.

“आधीच सांगायला काय झाल होत?” तो चिडून रमांना बोलला.

“आता तुझ्या ह्या पेशंटला विचारा डॉक्टर अभिनव साहेब.” रमा हसतच बोलल्या.

“काय मावशी तु.” अभिनव “साहेब काय? फक्त ऑर्डर कर, कोणाला आणि कुठे इंजेक्शन द्यायचं आहे.”

“तेच आता द्यायला जाणार आहे.” सरला

अभिनवने प्रसादला पाहीले. “तु बरा हो बराच हिशोब घ्यायचा आहे तुझ्याकडून.” त्याला तपासता तपासता अभिनव बोलला.

“तुझाच पेशंट आहे आता.” प्रसाद आता ही सुचक बोलला. “जे काही करायचं आहे ते करा.”

तस अभिनवच्या चेहऱ्यावर ही हास्य पसरलं होत. त्याला तपासुन तो इतर पेशंटकडे निघून गेला. प्रसादच्या चेहऱ्यावर आलाल हसु बघून सरला निवांत झाल्या होत्या. मग त्या विद्यासोबत अनामिकेकडे जायला निघाल्या. जाताना साटम आणि साळवे दिसले होते. त्यांच्याशी काहीही बोलायच्या भानगडीत त्या पडल्या नाहीत. फक्त त्यांना एक स्मित करत त्या तिथून गेल्या होत्या.

मग साटम आणि साळवे बदली झालेल्या डॉक्टरकडे गेले. तेव्हा अभिनवने ही त्यांच्या सोबत येत असल्याचे सांगीतले होते.

आज प्रसाद मनमोकळेपणाने पोलीसांसोबत बोलत होता.

“तो शोध फक्त माझाच आहे.” प्रसाद नजर रोखत बोलला. जणु त्याला आता कसलीच भिती नव्हती. “माझ्या सहका-याला मी फक्त सांगीतला होता. मग त्याने माझ्या कंपनीत पार्टनरशिप घेतली. एवढचं काय त्याच काम होत. हो आधी त्या कंपनीत मी जॉबला होतो. त्यांना माझ संशोधन दाखवलं ही होत. पण ते तेव्हा त्यांना पटलं नाही आणि आता जेव्हा ते लोकांच्या पसंतीस उतरलं तेव्हा ते त्याच्यावर दावा करत आहेत. त्याचे सगळेच पुरावे माझ्या वकिलामार्फत मी न्यायालयात सादर करेल. राहीला विषय त्या सरकारी अधीकारीचा तर ते मी केल नाही. त्याला आधीच तो चाकू लागलेला होता. त्याला वाचवण्याच्या गडबडीत मी तो उचलला. म्हणुन त्यावर माझ्या हाताचे ठसे आहेत. राहीला विषय आग लागल्याचा, तर माझ्या उपकरणात आधीच आगीसाठी सिस्टीम करून ठेवलेली होती. किंचीत ही शॉर्टसर्कीट सारखं झालचं तर चालू असलेला विद्युत पुरवठा लगेच बंद व्हायला पाहीजे होता. पण तो बंद झालाच नाही. त्यामुळेच आग वाढत गेली.”

दोन दिवसापूर्वी काहीही न बोलता फक्त सही करणारा प्रसाद आज नजर रोखून कडक आवाजात बोलत होता. त्यामुळे आता केस लढायला मजा येईल. अस साटमच्या डोक्यात फिरू लागलं होत. यानंतर अजून काही विचारपूस प्रसादकडे करत राहीले होते.

“तु हे जे सगळेच बोलत आहेस याला पुरावा काय?” साटम “एकतर तुझी बायको आणि तुझा एक सहकारी यांनीच तुझ्यावरच्या स्टेटमेंट दिलेले आहेत.”

हे ऐकुन प्रसाद तिरकस हसला. त्याच्या ह्या गुढ हसण्यात बराच काही अर्थ लपलेला दोघांना जाणवला.

“ते पुरावे मी मझ्या वकीलाकडे दिलेले आहेत.” प्रसाद बेडवर पसरत बोलला. “कोर्टात तुम्हाला मिळतीलच.”

“त्याची कॉपी आम्हाला ही हवी आहे.” साटम “ती तुमच्या वकीलांना द्यायला सांगा.”

“मला वाटत पुष्कळ वेळ झाला आहे.” अभिनव कडक आवाजात बोलला. “त्याला गोळ्या द्यायची वेळ झाली आहे.”

‘तुम्ही गेलात तरी चालेल.’ हे त्या डॉक्टरच्या बोलण्यामागचा अर्थ साटमला समजून गेला होता. मग ते दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडले.

तिकडे सरला आणि विद्या अनामिकाला भेटल्यापासुन तिची ही पाचावर धारण बसली होती. एकवेळ सरला, सोनीया, ऋतुजा ह्या तिघी चालल्या असत्या. पण विद्या, भैरवी, साई यांना टक्कर देणे तिच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती.

“साहेब सगळं काही बदललं आहे.” परमार त्याचा घाम पुसत बोलला. मित्तल साहेबांनी सांगीतलेल काम त्यांनी पुर्ण केल की नाही हे विचारायला परमारांना मित्तल साहेबांनी ऑफीसवर बोलावुन घेतलं होत.

“बदललं म्हणजे?” मित्तल गोंधळून बोलले.

“अगदी गेटवरच्या शिपायापासून सगळ्याच माणसांची बदली झालेली आहे.” परमार “अगदी त्याच्यापर्यंत पोहोचण ही आता खूप अवघड झालं आहे.”

“बदली?” मित्तल अजुनच गोंधळात पडले. “कस शक्य आहे मध्येच?”

“तेच समजत नाहीये.” परमार

“बाकी माणस तर आपल्या बाजुने आहेत ना?” मित्तल

“अजून तरी.” परमार

“ह्म्म.” मित्तल “एक काम कर साळवे आता निवृत्त होतच आहेत ना. पेन्शनवर तरी किती खर्च भागवतील. बोलावून घ्या त्यांना.” मित्तल तिरकस हसत बोलला.

“ठिक आहे.” परमार एवढं बोलून निघून गेला.

“आजवर आलेल्या प्रत्येक काट्याला सहज उपटून फेकुन दिल आहे मी.” मित्तल चिडून बोलले. “पण हाच मुलगा खूप जड जात आहे.”

ड्युटी संपल्यावर साळवे परमारांसोबत मित्तल साहेबांच्या ऑफीसवर जाऊन पोहोचले.

“बोला गरिबांची कशी आठवण काढलीत?” साळवेंना कशासाठी बोलावलं असेल याचा अंदाज आलेलाच होता.

“काय मस्करी करता साहेब.” मित्तल हसतच बोलले.

“काय काम आहे?” साळवेंनी मुळ मुद्द्याला हात घातला.

“आता चार महीन्यात तुम्ही निवृत्त व्हाल. पुढचा काही विचार केला आहे की नाही?” मित्तल

“त्याची किळजी तुम्ही नका करू.” साळवे हलकेच स्मित करत बोलले. “कशाला बोलावलत ते सांगा.”

“बरं.” मित्तल “मला प्रसाद पाहीजे.”

“तो देवळात मिळेल.” साळवे ही काहीच न समजल्यासारखं बोलले.

“तो नाही. आमचा गुन्हेगार प्रसाद. जो हॉस्पिटलमध्ये पुर्ण बरा होऊन फक्त वेळ वाया घालवत आहे.” मित्तल चिडून बोलले.

“तो होय.” साळवे “तो कशाला हवा? सगळेच पुरावे तर तुमच्या बाजूने आहेत ना? त्याला शिक्षा होणारच आहे.”

“त्याला शिक्षा मिच देणार.” मित्तल टेबलावर हात मारत बोलले. “त्याला फक्त तिथून बाहेर काढा. पुढचं आम्ही बघू.”

तस साळवेंना हसायला आलं. “मी कायद्या विरुध्द काम करत नाही.”

“हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे.” मित्तल

“तरीही काही फायदा होणार नाही.” साळवे

“ते आम्ही बघून घेऊ.” परमार ही चिडून बोलले. “नाहीतर आम्हाला ही वाकड्यात घुसायला जमतं.”

तस साळवे अजून मोठ्याने हसले. “काय करणार तुम्ही? त्याला मारणार?” साळवे तुच्छतेने हसले. “तो आता अशा सिक्युरिटीमध्ये गेला आहे ना, जिथे तुम्ही त्याच्या केसालाही धक्का लावु शकत नाही.”

“त्या काल आलेल्या मुलीच्या जीवावर तुम्ही उडत आहात ना?” मित्तल रागात बोलले. “असे किती आले आणि गेले. कोणीच माझ काहीच वाकडं करू शकल नाही. पण मी मात्र बरचं काही केलेल आहे.”

“मग लावा जोर.” साळवे आता गंभीर होऊन बोलले. “तुम्ही पण आहात आणि मी पण इथेच आहे.”

“बघायचं आहे का?” मित्तल मोबाईल उचलत बोलले. “आत्ता तिची बदली करतो.”

“ज्या मुलीने गृहमंत्र्यांना झुकवुन स्वतःची बदली करून घेतली.” साळवे तिरकस हसत बोलले. “तुम्हाला वाटतं की तुम्ही तिची बदली करू शकाल?”

आता मित्तल जरा विचारात पडले.

“डॉक्टरची बदली ही अशीच झाली अस वाटतं का तुम्हाला?” साळवे “हॉस्पीटलचा पुर्ण स्टाफ अगदी सहज बदलला गेला?”

परमार आणि मित्तल दोघेही साळवेकडे बघत राहीले.

“ते फक्त आणि फक्त प्रसादासाठी आलेले आहेत.” साळवे खुर्चीला रेटून बसत बोलले. “आपल्या मैत्रीणीच्या वडिलांवर खोटा आरोप लावुन त्यांना अपमानित केल. तो अपमान सहन न झाल्याने त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. त्याला जबाबदार म्हणून पुर्णच्या पुर्ण दोन मजल्याच ऑफीस आगीच्या भक्ष्यस्थानी टाकणारी कॉलेजमधली मुल होती तेव्हा ती. आता तर कायदेशीर अधिकार आहेत त्यांच्याकडे. उगाच त्यांच्या वाटेला जाऊ नका. जर तुम्ही काही चुकीच केल असेल तर आत्ताच ॲक्सेप्ट करा. नाहीतर तुम्हाला नंतर कोणीच वाचवू शकणार नाही.”

मित्तल आणि परमार दोघेही गंभीर झाले.

“माझ्या ऑफीसमध्ये येऊन मलाच धमकी देत आहेस?” मित्तल फणकारुन बोलले.

“मी तेवढं तरी सांगत आहे.” साळवे “ती पोरगी धमकी देण्याचे ही कष्ट घेत नाही.” साळवे बोलले आणि सरळ उठून तिथून बाहेर पडले.

मित्तलने टेबलावर हात आपटले. “त्या विद्युत उपकरणाचे ब्ल्यू प्रिंट?”

“ते नाही भेटले अजून.” परमार चाचरत बोलले. “त्यांना अजुन ही ते भेटले नाहीयेत. घरात नाही ठेवले म्हणे.”

“तो त्यांच्या घेतला माणुस आहे ना?” मित्तल “तरी त्याला भेटले नाही.” मित्तल चिडून केसावरून हात फिरवु लागले. “काही कामाची नाही ही माणस.”

थोडा विचार करुन परत मित्तल बोलले. “आपल्या बाजुने साक्षीदार त्यांना भेटता कामा नये. जे आहे ते पोलिस स्टेशन आणि कोर्ट. या व्यतिरिक्त कोणीही त्यांना भेटणार नाही. याची सोय करा.”

परमारांनीही होकारात मान हलवली आणि आपल्या कामाला लागले. तर दुसरीकडे विद्या आणि सरला भेटून गेल्यानंतर घाबरलेल्या अनामिकेने शशांकला सांगायला सुरवात केली.

“तुला ती बातमी आठवते का? बारा तेरा वर्षापुर्वी एका केमीकल कंपनीला आग आगलेली होती.” अनामिका विचार करत बोलली. “एवढी मोठी आग लागुन सुध्दा फक्त ते ऑफीस ऑफीस जळाल होत. त्या ऑफीसला लागुन असणारी केमीकल लॅब मात्र जशीच्या तशी होती.”

“हं.. हो.” शशांक “त्यामुळेच तर ते न्युजला खुपच पसरल होत.”

“त्या लॅबमध्ये काम करणा-या मिस्टर लोखंडेवर खोटे आरोप लावुन, त्यांची चुक नसताना ही त्यांना जेलमध्ये टाकल होत. त्यात त्यांचा झालेला हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यांना जामिन तर मिळाला होता. पण काहीच चुक नसताना केलेल्या आरोपामुळे त्यांना एक दिवस हार्टअ‍ॅटॅक आला होता. त्या दिवसच्या बरोबर चार दिवसांनी त्या केमीकल कंपनीच ऑफीस जळून राख झाल होत. ती आग लागली की लावली गेली, हे आजवर कोणालाच कळलेल नाही. पण जे ओळखतात त्यांना मात्र माहीती आहे की ती आग ह्या भुतावळीनेच लावली होती. कारण ही विद्या त्यांचीच मुलगी.”

“पण लॅब कशी काय वाचली?” शशांकला आश्चर्य वाटलं.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरु नका.

🎭 Series Post

View all