अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १३

अनामिका तो मोबाईल डोळे विस्फारुन बघू लागली. कारण शशांक त्यात एका दुसर्‍याच मुलीसोबत प्रणयक्रिडेमध्ये तल्लीन झालेला होता. “खोट आहे हे.” अनामिका चिडून बोलली. “ह्म्म वाटलं मला.” परी मोबाईल खिशात ठेवत बोलली. “तू आता ही जाऊन लॉजवर बघू शकतेस.
मागील भागात.

“तुला ती बातमी आठवते का? बारा तेरा वर्षापुर्वी एका केमीकल कंपनीला आग आगलेली होती.” अनामिका विचार करत बोलली. “एवढी मोठी आग लागुन सुध्दा फक्त ते ऑफीस ऑफीस जळाल होत. त्या ऑफीसला लागुन असणारी केमीकल लॅब मात्र जशीच्या तशी होती.”

“हं.. हो.” शशांक “त्यामुळेच तर ते न्युजला खुपच पसरल होत.”

“त्या लॅबमध्ये काम करणा-या मिस्टर लोखंडेवर खोटे आरोप लावुन, त्यांची चुक नसताना ही त्यांना जेलमध्ये टाकल होत. त्यात त्यांचा झालेला हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यांना जामिन तर मिळाला होता. पण काहीच चुक नसताना केलेल्या आरोपामुळे त्यांना एक दिवस हार्टअ‍ॅटॅक आला होता. त्या दिवसच्या बरोबर चार दिवसांनी त्या केमीकल कंपनीच ऑफीस जळून राख झाल होत. ती आग लागली की लावली गेली, हे आजवर कोणालाच कळलेल नाही. पण जे ओळखतात त्यांना मात्र माहीती आहे की ती आग ह्या भुतावळीनेच लावली होती. कारण ही विद्या त्यांचीच मुलगी.”

“पण लॅब कशीकाय वाचली?” शशांकला आश्चर्य वाटलं.

आता पुढे.

“ती तिच्या वडीलांप्रमाणेच केमीकल एक्सपर्ट आहे. लहानपणापासुन वडिलांसोबत ती बरचं काही शिकली होती.” अनामिका “तेव्हाच काही केमिकल्स वापरुन आग ही लावली होती आणि बाजूला असणारी लॅब ही वाचवली होती. नंतर एक पोलीस आला होता चौकशीसाठी विद्याच्या घरी. तेव्हा ही तो बरचं काही नको नको ते बोलुन गेला होता. दोन दिवसांनी त्याच पोलिसाची अश्लील क्लिप व्हायरल झाली होती.”

आता शशांकच्या भुवया उंचावल्या गेल्या.

“तो एका लॉजवर रेडच्या नावाखाली हफ्ता घ्यायला गेला होता. तेव्हा अभिनवने त्याला माहीती असलेल्या झोपेच्या गोळ्या त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये टाकल्या. त्या कशा टाकल्या? हे त्या देवालाच माहीत. पण जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा एका वेश्यासोबत होता. तोपर्यंत मायकलने त्याच काम केलेल होत.”

आता शशांकला ही घाम फुटला.

“तेव्हा ते प्रकरण चांगलच अंगाशी येता येता राहील होत.” अनामिका “म्हणुनच मग आजोबांनी सर्वांना एकत्र यायला मनाई करून त्यांच्या त्या खोलीला कायमचं बंद करायला सांगीतलं होत. तेव्हा पासुन ती खोली आणि यां सगळ्यांची खोडी बंद झाली होती.”

अनामिका बोलत राहीली होती. तर शशांक मात्र त्याच्याच विचारात हरवला होता.

‘मी हिचा फक्त वापर करत आहे. हे जर हिला समजलं आणि तिने तर त्यांना सांगीतलं तर?’ शशांक मनातच विचार करू लागला. ‘नाही. असं होऊच शकत नाही. तिच्या मनात अनामिकेबद्दल तर रागच आहे ना. ती काहीच नाही करणार.’ तो मनातच कुत्सीत हसला. ‘जोपर्यंत हे फुल जवळ आहे तोपर्यंत तर त्याचा सुगंध घेऊया.’ तो मनाशीच काहीतरी ठरवत बोलला. अनामिकेला धीर देण्याच्या निमित्ताने तो तिला परत बेडरूममध्ये घेऊन गेला होता.

दोन दिवसांनी अनिमिकेने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसची तारीख होती. त्या दिवशी अनामिकाने न्यायालयात ती केस मागे घेत असल्याचा अर्ज दाखल केला. तिच्या अशा अचानक घेतलेल्या निणर्याने तिचा वकील ही आश्चर्यचकित झाला.

अनामिकेवर कोणताही दबाव अथवा भिती नसल्याचे तिला विचारून न्यायालयाने ती केस काढून टाकली. ती न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर पडलीच होती की तिला समोर परी दिसली. जी तिचीच वाट बघत उभी होती. तशी अनामिका जरा घाबरतच तिच्याजवळ गेली.

“पप.. प.. परी.” अनामिकेने आवाज दिला. तशी परी मागे वळुन तिच्याकडे बघू लागली.

“भैरवी. तुझ्यासाठी भैरवी मॅडम.” परी चिडून बोलली. “परी फक्त माझ्या आपल्या माणसासाठी.”

“स..सॉरी मॅडम.” अनामिका “मी ती केस घेतली मागे.”

तशी परी तिरकस हसली. “न घेऊन सांगते कोणाला?” परी कडक आवाजात बोलली. “ती साक्ष ही मागे घ्यायची आणि नंतर तु स्वतःच डिव्होर्स केस फाईल करायची आणि माझ्या प्रसादच्या आयुष्यातून लांब जायचं.”

“हो.” आता अनामिका जरा ठसक्यात बोलली. “असाही मला माझा जोडीदार मिळाला आहे.”

“तो शशांक का?” परी आता कुत्सीत हसत बोलली. “तुला वाटतं तु साक्ष मागे घेतल्यावर तुझा तो शशांक तुला जवळ ठेवेल?”

“हो.” अनामिका आता चिडून बोलली. “त्याच माझ्यावर खरचं प्रेम आहे.”

“हो का?” परीने तिचा मोबाईल काढला आणि तिच्यासमोर धरला. “हे बघून तरी असचं वाटेल का?”

अनामिका तो मोबाईल डोळे विस्फारुन बघू लागली. कारण शशांक त्या व्हिडिओमध्ये एका दुसर्‍याच मुलीसोबत प्रणयक्रिडेमध्ये तल्लीन झालेला होता.

“खोट आहे हे.” अनामिका चिडून बोलली.

“ह्म्म वाटलं मला.” परी मोबाईल खिशात ठेवत बोलली. “तू आता ही जाऊन लॉजवर बघू शकतेस. फक्त प्रसादच्या शोधाची ब्ल्यू प्रिंट काढण्यासाठी त्याने मित्तलच्या सांगण्यावरून तुला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होत. आता तु ही एवढी बावळटं आहेस. तु त्याला वाटलं तेव्हा सगळचं देत बसलीस. त्याला ही तेच हवं होत. जरा आठवुन बघ, त्याच काम झाल्यावर तो तुला किती प्रेमाने बोलला असेल?”

आता अनामिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला आता तो शशांक आठवुन लागला जो तिच सौंदर्य उपभोगल्यानंतर तिला काहीच न सांगता सरळ घराबाहेर जात होता. पण जेव्हा त्याला गरज वाटायची तेव्हा तो बरोबर लाडीगोडी लावत तिच्याकडून हवं ते करून घेत होता. त्याने वारंवार ब्ल्यू प्रिंट बद्दलही अनामिकेला विचारलं होत. पण त्याबद्दल तिला ही काहीच माहीत नव्हतं. मग मित्तलने ही तिचा विषय सोडायला लावला होता. पण शशांकला तर तिच्या शारिरीक सौंदर्याची भुरळ पडली होती. म्हणून त्याने अजून तरी तिला सोडलेलं नव्हतं.

अनामिकेसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आजवर खोटे अश्रु आणणाऱ्या अनामिकेच्या डोळ्यात आज खरोखरचे अश्रु उभे राहीले होते.

“प्रसादने सगळचं मागे टाकुन तुला स्विकारलं होत.” परी “पण तुलाच ते घेता आलं नाही. प्रेम म्हणजे शारीरिक गरज नाही तर मनाला जपण असतं. ते तुला कधी समजलचं नाही. तुला खरचं काही त्रास होता का गं त्या घरात? दारात येणारी भाजीवाली, भांडेवाली यांना कधीच चहा पाजल्याशिवाय त्या माऊलीने सोडलं नाही आणि तिने तुला उपाशी ठेवलं असेल? आता मुकाट्याने त्याच्या आयुष्यातून लांब जायचं. नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणी असणार नाही.” परी कडक आवाजात बोलून तिथून निघून गेली.

शेवटची एक आशा म्हणून अनामिका त्या लॉजवर गेली. पण ती आशा ही मातीत मिसळली. जेव्हा शशांकला त्या लॉजमधून एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवत, मध्येच तिला किस करत बाहेर पडताना तिने बघोतलं होत. ते बघून अनामिका पुर्ण कोलमडून गेली. ती त्याला जाब विचारायला ही जाणार होती. पण शेवटी ती स्वतःहुन तर त्याच्याजवळ गेली होती. आता कोणत्या तोंडाने ती जाब मागणार होती? जे तिने प्रसादसोबत केल. आज तिच्याच कर्माने तिच्या वाटेला आलेल होत. शेवटी तिने मनात काहीतरी ठरवलं आणि त्या लॉजपासुन जवळच असणाऱ्या नदीच्या पुलाकडे निघून गेली.

दुसरीकडे पोलीसांनी परत सगळेच साक्षीदार, पुरावे याची उलटतपासणी करायला सुरवात केली. साईराजने जेवढ्या गोष्टींवर बोट ठेवून त्यांची भर कोर्टात तासली होती. त्या प्रत्येक गोष्टीवर अभ्यास करायला सुरवात केली. ज्या जागेवर सरकारी अधिकारीला चाकु लागला होता. तिथे जाऊन परत ती घटना तयार करून पाहीली आणि एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या होती लाजला. पण तो साटमनी उघड करू दिला नव्हता. तो मिळालेला चाकू साटम स्वतः फोरेन्सिक लॅबमध्ये घेऊन गेले. तिथे विद्याला पाहुन त्यांना चांगलाच धक्का बसला. तिने ही तिची बदली इथल्या जिल्हय़ात करून घेतली होती. तो चाकु तिच्याकडे देत साटम तिथून बाहेर पडले आणि डिएसपी साहेबांना फोन लावला.

“साहेब.” साटमने फोन उचलल्या उचलल्या बोलायला सुरवात केली. “त्या मित्तलसोबत जर काही साटलोट केल असेल तर ते लगेच थांबवा.”

“का?” डिएसपी साहेब

“भैरवी मॅडमनी त्यांचीच माणसे सगळीकडे पेरलेली आहेत.” साटम “आता तो काही सुटणार नाही या केसमधून.”

“मग तर तो मित्तल अजून चिडेल.” डिएसपी साहेब “हॉस्पिटलमध्ये आपली माणस वाढवा. आता मला पण मित्तलवर संशय यायला लागला आहे.”

“ओके सर.” साटमने फोन ठेवला आणि पुढच्या तपासासाठी निघून गेले.

महिनाभरात प्रसाद आता निट चालु आणि फिरू शकत होता. हाताला चांगलच फ्रॅक्चर झालेल असल्याने, हातात प्लॅस्टर अजुन दोन ते तिन महीने निघणार नव्हतं.

या महिनाभराच्या कालावधीत पोलीसांनी त्या शोध लागलेल्या विद्युत उपकरणाचा बराच अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातली सिस्टीम त्यांना समजुन आली नव्हती. पोलीसांनी मित्तलला देखील त्या उपकरणासाठी बोलावलेले होते. पण मित्तल नुसतेच वेळकाढूपणा करत ते टाळायला बघत होते.

एक दिवस परी हॉस्पिटलमध्ये प्रसादला भेटायला आलेली असताना त्याचवेळेस मयंक देखील तिथे येऊन पोहोचलेला होता. प्रसादच्या घरचे, ऋतुजाच्या घरचे मयंकला चांगलेच ओळखत होते. त्यानेही बरीच मदत केलेली होती. म्हणून घरातले त्याच्यासोबत चांगल्या पध्दतीने वागत होते.

परीची बाहेर पडायची वेळ आणि ऋतुजाची मयंकला भेटण्याची वेळ एकच झाली. मयंक आणि ऋतुजाला एकत्र प्रसादच्या रुमकडे जाताना बघून परी एका दाराआड लपली. ते दोघेही जसे प्रसादच्या रुममध्ये गेले. परी देखील त्यांच्यामागे हळुच गेली.

मयंक आतमध्ये प्रसादसोबत हसत खेळत बोलत होता. तिथेच राजन ही उभे होते. तर आजोबांना प्रसादने यायला मनाई केलेली होती. राजनने दोन तिन वेळा ब्ल्यू प्रिन्टचा विषय काढलेला होता. पण मयंकने तो शिताफीने बदललेला होता.

“दादा तु लवकर बरा हो.” मयंक प्रसादला हसवून बघत होता. “तुझ्या त्या गद्दार मित्राला आपण दोघे मिळून तुडवु.”

“त्याची गरज नाही लागणार.” प्रसाद तिरकस हसत बोलला.

“अस कस?” मयंक खोटा खोटा चिडत बोलला. तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर हात पडला. तसा त्याच्याच तंद्रीत बोलणारा मयंक पडलेल्या हाताकडे बघुन पुढे बोलला. “त्याला अस थोडीच सोडायचं? बरोबर ना दिदी.”

मयंक हसुन बोलला खरा. पण पुढच्याच सेकंदाला त्याचा भीतीने पाचावर धारण बसली. तिकडे ऋतुजा ही जरा घाबरली. कारण परीने मागुन येत त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला होता.

“तुला मारामारी करायला जाम आवडते ना रे.” परी टोमण्यांच्या सुरात बोलली.

“त.. त.. तस नाही दि…” मयंक पुढे बोलणार तोच परी बोलली.

“दिदी नाही मॅडम.” परी कडक आवाजात बोलली. “तु इथे काय करत आहेस? आणि ऋतुजासोबत कसा?”

तस मयंकने ऋतुजाकडे पाहील आणि मनातच बोलला. ‘देवी मय्या बचा लो तेरा इस गरीब बंदे को.” पण ती देखील तितकीच घाबरलेली दिसत होती.

“अगं परी.” विमला बोलल्या. “आपल्या ऋतुच्या वर्गातला तिचा मित्र आहे. त्याची ही बरीच मदत झाली आपल्याला.”

“अच्छा.” परी “पण अशी रस्त्यावर मारामारी करतात का मवाली मुलांसोबत.” आता परी चिडून बोलली.

“तस नाही दि… सॉरी मॅडम.” मयंक “मी तर सोडवायला गेलो होतो. पण मग माझ्याच….” मयंक गालाला हात लावुत बारीक तोंड करुन बोलला.

“बँक मॅनेजर कांबळेचा मुलगा ना तु?” परी

परीच्या प्रश्नावर मयंक आणि ऋतुजा तिनताड उडाले. ते दोघेही डोळे विस्फारुन परीला बघत होते.

“पुर्ण जिल्ह्याची खबर ठेवते मी.” परी “माझ्या बहीणीची नाही ठेवणार का?” परीचा आवाज चढला.

आता मात्र दोघांनाही घाम फुटायला लागला. बाकी जण गोंधळून गेले होते. तर प्रसाद मंद स्मित करत होता.

“प्रसाद आता चालु शकतो.” परी “दोन ते तिन दिवसात निकाल लावते याच्या केसचा आणि मग तुमच्याकडे बघते.” परीचा निश्चय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती.

नंतर प्रसादसोबत थोडफार बोलत ती तिथून निघुन गेली. इकडे आतमध्ये सर्व ऋतुजा आणि मयंककडे बघत राहीले.

“काय बोलुन गेली आता परी?” विमला जरा टेन्शनमध्ये येत बोलल्या. “दोघांकडे बघणार आहे म्हणजे?”

ऋतुजाची ततपप चालुच होती. ते बघून प्रसादने बोलायला सुरवात केली.

“मावशी दोघ एकमेकांना आवडतात.” प्रसाद “त्यांच प्रेम आहे ऐकमेकांवर.”

विमला आणि सरला ऋतुजाकडे डोळे विस्फारून बघायला लागल्या. तशी ऋतुजा प्रसादच्या बाजुला जाऊन उभी राहीली. त्याच्यापुढे कोणीच काही बोलणार नाही याची खात्री होती तिला.

“म्हणजे तुला ही माहीत होत?” विमला गंभीर होऊन बोलल्या. त्या आता मयंककडे वळाल्या. त्या मयंकला काही बोलणार तोच प्रसादने बोलायला सुरवात केली.

“माझी मानलेली बहीण म्हणुन जेव्हा तिला कॉलेजमध्ये त्रास दिला गेला ना तेव्हा हाच मुलगा तिच्या पाठीशी खंबीर उभा राहीला होता.” आता प्रसाद जरा कडक आवाजात बोलला. “तुम्हाला माहीत नसेल….”

“दादा नको ना.” प्रसाद सगळेच काही सांगणार म्हणुन मयंक त्याला अडवून बघत होता. पण प्रसाद मात्र थांबला नाही.

“तो स्वतः नोकरी करतो. ऋतुजाची कॉलेजची राहीलेली फी देखील त्याने त्याच्या नोकरीच्या पैशातून भरलेली आहे.” प्रसाद बोलत राहीला. “एकदा काकांच्या हाताला पट्टी बांधलेली होती. आठवत का?”

तशा विमलांनी होकारार्थी मान हलवली.

“खरचटले नव्हतं.” प्रसाद “चांगले बाईकवरून पडले होते. हाच घेऊन गेल होता त्यांना हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तर फक्त ओळख होती. तरी तुम्हाला शंका येत असेल, तर मग मी काहीच बोलणार नाही.”

मग विमला जरा शांत झाल्या. ते बघून मयंक त्यांच्याजवळ गेला. त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात धरले. “एका मुलीवर आई बाबां इतकं प्रेम तर कोणीच करू शकत नाही. पण इतक वचन नक्की देतो की तिला कधीच कशाची कमी पडू देणार नाही.”

विमला त्याच्या चेहर्‍याकडे बघत बसल्या.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all