अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १४

“नका रे त्याच्या जिवाशी खेळु.” सरला काळजीने बोलल्या. “का?” परी चिडून बोलली. “आजवर त्याने इतक्या मुलींच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे त्याच काय? त्यापैकी काही मुली तक्रार करायला तयार झाल्या आहेत. त्याला ही खेळ काय असतो ते समजू दे.” आता सरला शांतच बसल्या. ही लोक कोणाचचं ऐकणार नाही हे त्यांना समजून गेलं होत.
मागील भागात.

“दादा नको ना.” प्रसाद सगळेच काही सांगणार म्हणुन मयंक त्याला अडवून बघत होता. पण प्रहाद थांबला नाही.

“तो स्वतः नोकरी करतो. ऋतुजाची कॉलेजची राहीलेली फी देखील त्याने त्याच्या नोकरीच्या पैशातून भरलेली आहे.” प्रसाद बोलत राहीला. “एकदा काकांच्या हाताला पट्टी बांधलेली होती. आठवत का?”

तशा विमलांनी होकारार्थी मान हलवली.

“खरचटले नव्हतं.” प्रसाद “चांगले बाईकवरून पडले होते. हाच घेऊन गेल होता त्यांना हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तर फक्त ओळख होती. तरी तुम्हाला शंका येत असेल, तर मग मी काहीच बोलणार नाही.”

मग विमला जरा शांत झाल्या. ते बघून मयंक त्यांच्याजवळ गेला. त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात धरले. “आई बाबांना प्रेम तर कोणीच करू शकत नाही. पण इतक वचन नक्की देतो की तिला कधीच कशाची कमी पडू देणार नाही.”

विमला त्याच्या चेहर्‍याकडे बघत बसल्या.

आता पुढे.

“द्या हो परवानगी.” सरला “किमान काही चुकलचं तर कान तरी धरता येतील. नाहीतर आमच पाहीलतं ना?” सरला जरा भावुक झाल्या.

“तो विषय काढायलाच पाहीजे का आई?” सोनिया तोंड वाकडं करत बोलली.

“ठिक आहे.” विमला विचार करत बोलल्या. “पण हिच्या बाबांसोबत पण बोलाव लागेल ना.”

“ते परी बोलली आहे त्यांच्यासोबत.” प्रसादने बॉम्ब टाकला.

“अरे!” विमला आता चिडून बोलल्या. “कसली आगाऊ कार्टी आहेत ही. आता लग्न ही तुम्हीच ठरवुन टाका. म्हणजे माझी गरजचं नाही ना.”

तसा प्रसाद खळखळुन हसला.

“बरा हो रे तु.” विमला “मग बघते तुझ्याकडे.”

“ऋतु बोलली होती.” मयंक पुन्हा विमलांकडे बघत बोलला. “तुमचा दोघांचा आशिर्वाद असेल तरचं पुढे जायचं.”

विमला आता कौतुकाने त्यांच्या लेकीकडे बघायला लागल्या. त्यांनी ऋतुजाला जवळ बोलावले. तशी ऋतुजा जरा चाचरतच त्यांच्याजवळ गेली.

ते काय आहे ना? भारतीय आईची एक खासीयत आहे. "मारणार नाही, जवळ ये." अस बोलुन जवळ बोलावतात आणि जवळ आला की दुपटीने मारून मोकळ्या होतात.

ऋतुजालाही हीच भिती होती. कारण बऱ्याच वेळा अस घडलेलं होत. पण आज त्यांनी तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

“कशा भरभर वाढुन जातात ना ह्या लेकी.” विमलांचा गळा बोलता बोलता भरून आला. “आता कुठे शाळेत जात होती. आता लग्न ही करून जाईल.”

आता सगळे गंगा जमुना बाहार काढणार हे बघून मयंकने सुरवात केली.

“म्हणजे मी होकार समजू ना?” तो आनंदाने विचारत होता.

“अरे! अजून परीच बघण बाकी आहे.” विमला त्याला घाबरवत बोलल्या. तसा त्याचा चाहरा लगेच पडला.

“कशाला ओ मावशी त्याला घाबरवत आहात.” प्रसाद हसतच बोलला. मग मयंक परत हसला.

“अजून एक छोटीशी गोष्ट.” मयंक चाचरत बोलला.

“आता काय?” विमला

“ते.. त्या मॅडमचं म्हणजे ऋतुजाच्या मोठ्या बहिणीच टोपण नाव जरा बदला ना.” मयंक “ते परी नाव तिला अज्जिबात सुट होत नाही. परी काय कधी एवढं टेन्शनमध्ये टाकते का कोणाला?”

मयंकच्या या वाक्यावर काय बोलावं? कोणाला काहीच सुचत नव्हतं. कारण मागे परी येऊन उभी राहीलेली होती आणि तिने मयंकच सगळचं बोलण ऐकुन घेतलेलं होत. सगळेच मागे बघत आहेत म्हणुन मयंक ही मागे वळाला. तिथा परीला पाहुन तो तिथेच चक्कर येऊनच खाली पडला.

“अरे! एवढ्या नेभळट मुलाला माझ्या बहीणीचा हात मी देऊच देणार नाही.” परी चिडून बोलली.

तसा चक्कर येण्याच नाटक करणारा मयंक पटकन उठून परीच्या पायावर पोहोचला. “सॉरी ना मेडम आता अस परत नाही बोलणार. पण तिला माझ्यापासुन दुर नका करू.” आता मयंक थांबायचं नावच घेत नव्हता.

त्याची ती हालत बघून परीला खुपच हसायला येत होत. ऋतुजा परीला बारीक तोंड करून बघायला लागली. मग तिने मयंकला शांत करून उभ रहायला लावलं.

“तु तिला कधीच सोडणार नाही या माझ्या शब्दावर मामा तयार झाले आहेत.” परी “जर मामांची तक्रार माझ्या कानावर आली. तर मग…”

“नाही येऊ देणार.” मयंक आता गंभीर होऊन बोलला. “शपथ घेऊन बोलतो मॅडम. एकही तक्रार ऐकायला येणार नाही.”

“ठिक आहे.” परी “आणि मॅडम नाही. दिदी बोलायचं.”

“बरं काम झाल वाटतं.” प्रसाद गुढ होत बोलला. तस परीने तिचे डोळे मिचकावले.

“आता काय केलत?” सरला

“कर्म केलेत ना.” परी तिरकस हसत बोलली. “हिशोब तर द्यावाच लागेल. सुरवात झालीये त्याची.”

तेवढ्यातच बाहेरून जरा गोंधळाचा आवाज ऐकु यायला लागला. तस प्रसाद सोडुन सगळेच बाहेर बघायला पळाले. तर परीने रिकामी झालेली खुर्ची घेतली आणि प्रसादजवळ जाऊन बसली.

“आता जर परत बोललीस ना की लग्न करून घे. तर तुझी हि जिभच कापुन टाकेल.” प्रसाद चिडून बोलला. तस परीने तिचे हलकेच कान पकडले.

“सॉरी रे बच्चा.” परीने प्रसादचे हात हातात घेतले. “आता नाही जाणार कुठे आणि तुला ही जाऊ देणार नाही.”

“बरं माझी शंका फक्त शंकाच राहील ना?” प्रसाद विनंतीच्या स्वरात बोलला.

“आता काहीच सांगु शकत नाही.” परी ही गंभीर होऊन बोलली. “पण त्याचे चान्सेस पण कमी आहेत रे.” अस प्रसाद अजून गंभीर झाला.

“तु नको टेन्शन घेऊस रे आम्ही आहोत ना.” परी त्याच्यातच केसावरून हात फिरवत बोलली.

“फक्त तुम्हीच आहात यायचं टेन्शन आलं आहे मला.” प्रसाद आठ्या पाडुन बोलला.

“किती नाटकी आहेस रे तु.” परी गाल फुगवुन बोलली.

प्रसाद पुढे होऊन परीला किस करणार तोच दोघांना आवाज आला.

“अय लैला मजनू.”..

तसे प्रसाद आणि परी दोघेही पटकन वेगळे झाले. त्यांनी पाहीलं तर अभिनव हाताची घडी घालुन उभा होता.

“हे ओयो हॉटेल नाहीये रोमान्स करायला.” अभिनव जरा चिडून बोलला. “माझ हॉस्पिटल आहे.”

“बरं चूकी झाली डॉक्टरसाहेब.” दोघेही एकत्रच नाटकी आवाजात बोलले

“तुम्ही ना सुधरूच नका.” अभिनव हसत बोलला. “एवढ्या गंभीर अवस्थेतही कसकाय कॉमेडी सुचते रे तुम्हाला?”

“तुम्ही आहात की सोबत.” प्रसाद मंद स्मित करत बोलला. “मगं कसल टेन्शन.”

“बरं बरं, जास्त मस्का नको मारूस.” अभिनव “ते कार्टुन आणलं आहे. त्याच काय करायचं?”

“काय करायचं म्हणजे?” परी चिडून बोलली. “जे ठरलं आहे तेच. विद्या ही तिच सामान घेऊन पोहोचेलचं.”

“पोहोचेल?” अभिनव नकारार्थी मान हलवत बोलला. “तिच त्याला सोबत घेऊन आली आहे.”

“मग कसली वाट बघता.” प्रसाद “वासुदेवाने आपले हात मोकळे केले आहेत. विसरलास का?”

“कन्फर्म करत होतो.” अभिनव डोक खाजवत बोलला. “चला. त्याचा मर्दपणा गाजवुया.” एवढं बोलून तो तिथुन चालला गेला. त्यानंतर लगेचच सरला आणि विमला आत आल्या.

“अरे! त्या शशांकचा अपघात झाला आहे रे.” सरला टेन्शनमध्ये येत बोलल्या. “बेशुद्ध पडलेला दिसला.”

(काही वेळा पुर्वी.)

शशांक एका बागेतून बाहेर पडत होता. त्याच्यामागे एक मुलगी रडत रडत त्याला काहीतरी विनंती करून बघत होती. पण त्याला त्याचा काहीच फरक पडलेला नव्हता. त्याने त्या मुलीकडे दुर्लक्ष करत त्याची पार्किंग मधली बाईक काढली. तशी ती मुलगी त्याच्या पायाला धरुन बसली. आजुबाजुचे लोक ही बघत होते. पण त्याच्या ओळखीची वा नात्यातली असेल अस समजून कदाचीत तिच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. त्याने काही पैसे तिच्याकडे टाकले आणि तिच्या हाताला झटका देत त्याची बाईक चालु करून निघाला.

विद्याला डायरेक्ट हॉस्पिटलला यायला सांगीतलेल होत. ती तिकडेच येत असताना तिला शशांक दिसला होता. त्याच्या पायाशी रडत बसलेल्या मुलीकडे पाहुन विद्याला शशांकचा अजूनच राग आला. म्हणून ती त्या बागेजवळच थांबुन राहीली होती. जशी त्याने त्याची बाईक काढली विद्याही तिची कार घेत त्याच्या मागे निघाली. शशांक बाईक चालवताना जरा गडबडलेला दिसला. त्याने त्याची बाईक जवळच्याच गॅरेजवर नेली. तसा विद्याने स्टेअरिंग वर जोरात हात मारला.

“अशा हरामखोरांच नशीब इतकं चांगल का असतं?” विद्या स्वतःशीच बडबड करत राहीली.

शशांक नजर ठेवलेल्या माणसांनी त्याच्या बाईकचा ब्रेक फेल करून ठेवलेला होता. पण ब्रेक लागत नसल्याचे शशांकला लगेच जाणवल होत. म्हणुन तो डायरेक्ट गॅरेजवर गेला होता. त्या गॅरेजवाल्यानं शशांकला सांगीतले देखील होते की बाईकचा ब्रेक कोणीतरी जाणूनबुजून काढलेला आहे. पण शशांकने त्याकडे गांभीर्याने पाहील नाही. बाईकचा ब्रेक निट करुन तो तिथुन निघाला.

यावेळेस बाईकवरून निघताना शशांक उलट्या दिशेने जाऊ लागला. मागचा चौक त्याला जवळ दिसला होता. विद्याने संधी साधली आणि संधीच सोन करताना तिची कार पटकन काढली. जसा तो रस्ता क्रॉस करायला लागला तस विद्याने तिची कार अशी आणली की त्यात शशांक अचानक तिच्या गाडीसमोर आला असल्याचे दिसत होते. विद्याने जाणुनबुजुन गाडीला रेस देत त्याच्या बाईकला धडक दिली आणि शशांक रस्त्याच्या डिव्हाईडरवर आपटला.

विद्या घाबरुन पटकन गाडीतुन उतरली आणि शशांक जवळ गेली.

“सॉरी मिस्टर.” विद्या आणि तिचा तो घाबरण्याचा अभिनय. “तुम्ही अचानक उलट्या बाजुने इकडेच याल हे समजलंच नाही मला.”

विद्याच्या ह्याच वाक्यावर सगळी चुकी शशांकची होती हे जाहीर झालं होत. कारण बाजुच्या बघणा-यांनाही शशांकला उलट्या बाजुने जरा वेगानेच जाताना पाहील.

शशांक कसाबसा उभा राहीला. त्याने सॉरी बोलणा-या मुलीकडे नजर टाकली आणि त्याच्या बुध्दी काम करणं बंदच केल. ती सॉरी बोलताना ही त्याला चिडवत असल्याचा भास त्याला होऊ लागला. त्याला लगेच घाम फुटु लागला. “बाईक का ब्रेक किसीने जानबूझकर निकाला है.” हे त्या गॅरेजवाल्याच वाक्य त्याच्या कानात घुमायला लागलं. त्यापाठोपाठ त्याला अनामिकेचे शब्द आठवु लागले.

‘कोणत्याही क्रिमीनलपेक्षा कमी नाहीयेत ती. आपण केस मागे घेऊयात.’

तो आता विद्यापासून लांब पळु बघत होता. पण त्याच्या पायाला आणि कमरेखालच्या भागाला चांगलच लागलं असल्याने त्याला पळता ही येत नव्हतं. आपण जर हिच्या हाती सापडलो तर आपल नक्कीच काही खरं नाही. हे विद्याच्या क्रुर हसण्यावरून शशांकला चांगलच जाणवू लागलं.

“अरे बस जरा.” विद्या त्याचा हात पकडत बोलली. “तुला मी हॉस्पीटलमध्ये घेऊन जाते. माझ्याकडे गाडी आहे.”

विद्याच्या बोलण्याने जमा झालेली मंडळी लगेच पुढे सरसावली आणि शशांकला उचलू लागली. शशांक घाबरुन घामाने पुर्ण भिजला होता. तसाच त्याचा बीपी वाढला आणि तो बेशुद्ध पडला. मग विद्याने काही माणसांच्या मदतीने त्याला ह्याच हॉस्पीटलमध्ये आणलं होत.

(आता.)

“काही टेन्शन नका घेऊ.” विद्या त्या रुममध्ये येत बोलली. “त्याच्यावर उपचार करायलाच इथे मी घेऊन आली आहे.”

“नका रे त्याच्या जिवाशी खेळु.” सरला काळजीने बोलल्या.

“का?” परी चिडून बोलली. “आजवर त्याने इतक्या मुलींच्या आयुष्याचा खेळ मांडला, त्याच काय? त्यापैकी काही मुली तक्रार करायला तयार झाल्या आहेत. त्याला ही खेळ काय असतो ते समजू दे.”

आता सरला शांतच बसल्या. ही लोक कोणाचचं ऐकणार नाही हे त्यांना समजून गेलं होत. आता तर आजोबाही नव्हते. ते असते तर त्यांच्या समजावण्याने तरी थोडा फरक पडला असता.

“विद्या.” परीने विद्यावर नजर टाकली. तशी विद्या त्या रुमच्या बाहेर पडली.

“मावशींना टेन्शन का आलं आहे?” मयंक हळुच ऋतुजाच्या कानात पुटपुटला. “काय करतील त्या मुलासोबत?”

ऋतुजाने फक्त खांदे उडवत वर पाहीले. “देव जाणे.” तशी मयंकला धडकीच भरली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all