अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १५

“नाही कळलं का?” अभिनव हसतच बोलला. “तिने एवढ्या प्रेमाने तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तुला काही जाणवल नाही का?” आता शशांक पुरता हादरला. लगेच त्याने स्वतःला घाबरत घाबरत खालच्या बाजुला तपासुन पाहीलं. तसा त्याचा चेहरा पांढराफटक पडला.
मागील भागात.

तो आता विद्यापासून लांब पळु बघत होता. पण त्याच्या पायाला चांगलच लागलं असल्याने त्याला पळता येत नव्हतं. आपण जर हिच्या हाती सापडलो तर आपल नक्कीच काही खरं नाही. हे विद्याच्या क्रुर हसण्यावरून शशांकला चांगलच जाणवत लागलं.

“अरे बस जरा.” विद्या त्याचा हात पकडत बोलली. “तुला मी हॉस्पीटलमध्ये घेऊन जाते. माझ्याकडून गाडी आहे.”

विद्याच्या बोलण्याने जमा झालेली मंडळी लगेच पुढे सरसावली आणि शशांकला उचलू लागली. शशांक घाबरुन घामाने पुर्ण भिजला होता. तसाच त्याचा बीपी वाढला आणि तो बेशुद्ध पडला. मग विद्याने काही माणसांच्या मदतीने त्याला ह्याच हॉस्पीटलमध्ये आणलं होत.

(आता.)

“काही टेन्शन नका घेऊ.” विद्या त्या रुममध्ये येत बोलली. “त्याच्यावर उपचार करायलाच इथे मी घेऊन आली आहे.”

“नका रे त्याच्या जिवाशी खेळु.” सरला काळजीने बोलल्या.

“का?” परी चिडून बोलली. “आजवर त्याने इतक्या मुलींच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे त्याच काय? त्यापैकी काही मुली तक्रार करायला तयार झाल्या आहेत. त्याला ही खेळ काय असतो ते समजू दे.”

आता सरला शांतच बसल्या. ही लोक कोणाचचं ऐकणार नाही हे त्यांना समजून गेलं होत. आता तर आजोबाही नव्हते. ते असते तर त्यांच्या समजावण्याने तरी थोडा फरक पडला असता.

“विद्या.” परीने विद्यावर नजर टाकली. तशी विद्या त्या रुमच्या बाहेर पडली.

“मावशींना टेन्शन का आलं आहे?” मयंक हळुच ऋतुजाच्या कानात पुटपुटला. “काय करतील त्या मुलासोबत?”

ऋतुजाने फक्त खांदे उडवत वर पाहीले. “देव जाणे.” तशी मयंकला धडकीच भरली.

आता पुढे.

काही वेळातच शशांकला दाखल केलेल्या ऑपरेशन थिएटरचा दिवा बंद झाला. शशांकला लगेच जनरल वॉर्डला शिफ्ट केलं गेलं. पुढच्या अर्ध्या तासातच त्याला शुध्द आली. त्याने डोळे उघडून पाहील तर समोरच विद्या बसली होती.

“सॉरी मिस्टर.” विद्या तिचा चेहरा अगदीच निरागस करत बोलली. “पप्पांची परी आहे ना मी आणि तुम्ही ही अचानक समोर आलात. मग धडकली मी.”

“असचं पाहीजे ओ अशा रोंग साईड गाडी चालवणाऱ्या लोकांना.” त्यांच्या सोबत आलेला माणुस चिडून बोलला. त्याने जे झाल ते पाहीले होत. त्या मुलीला म्हणजेच विद्याला मदत म्हणुन ते सोबत आलेले होते.

तिथे एक हवालदार ही आला होता. पण नाही शशांकची हिम्मत झाली विद्या विरुध्द तक्रार करण्याची आणि नाही विद्याने त्याच्या विरुध्द तक्रार केली. कारण त्यांनी ठरवलेली शिक्षा तर पुर्ण झालेली होती. फक्त शशांकला त्याची जाणीव नव्हती.

तो माणुस आणि पोलीस गेल्यावर शशांक रागातच विद्याला बघु लागला. कारण विद्याने जाणुनबुजुन फिरवलेल स्टेअरिंग शशांकने पाहीलेल होत.

“अनामिका उगाच तुम्हाला घाबरते.” शशांक कुत्सीत हसत बोलला. “तुम्ही तर मागुन वार करणारे नेभळट निघालात.”

“अय्या हो का?” विद्या घाबरायच नाटक करत बोलली. “तु मुलींना स्वतःच्या जाळ्यात ओढुन त्यांच्या इज्जतीबरोबर खेळतोस त्याला काय म्हणायचं?” विद्या चिडून बोलली.

“मर्द आहे ना तो.” अभिनव त्याच्याजवळ येत बोलला.

“हो का?” विद्याचा सुर अजूनही तसाच होता.

“एकदा भेट मला.” शशांक वासनेच्या नजरेने विद्याकडे बघत बोलला. “सांगतो तुला कसा मर्द आहे मी.”

तस विद्या आणि अभिनव हसायला लागले. तर शशांक त्यांना गोंधळून बघत राहीला.

“ज्या मर्दपणाच्या जोरावर तु बोलत आहेस ना.” विद्या त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत बोलली. “जर तेच नसेल तर?” विद्या एक बोट गालावर ठेवुन विचार करण्याच नाटक करत बोलली. अभिनव हसतच बाजुची पाण्याची बॉटल उचलून त्यातल पाणी प्यायला लागला.

शशांक अजूनही गोंधळूनच बघत होता.

“नाही कळलं का?” अभिनव हसतच बोलला. “तिने एवढ्या प्रेमाने तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तुला काही जाणवल नाही का?”

आता शशांक पुरता हादरला. लगेच त्याने स्वतःला घाबरत घाबरत खालच्या बाजुला तपासुन पाहीलं. तसा त्याचा चेहरा पांढराफटक पडला. तिथे त्याला फक्त एक बारीक नळी लावलेली जाणवली. आता त्याला त्याच्यासोबत झालेल्या प्रकाराची जाणीव झाली. त्याच्यातील पुरुषत्वच काढून घेतल गेलेल होत. जीव न घेताही एखाद्याचा जिव कसा घ्यावा याच मुर्तीमंत उदाहरण तो स्वतःमध्ये बघायला लागला.

“किती तावातावात बोलला होतास ना?” विद्या आता भयंकर चिडून बोलली. “त्याला जेलमध्ये सडवणार म्हणुन. आता तु स्वतः सुखात जगण्याचा प्रयत्न करुन बघ.”

“म्हणजे तुम्ही जाणुनबुजुन केलं ना?” शशांक ही आता चिडून बोलायला लागला. “तुमच्या विरुध्द मी तक्रार करेल. काही कारण नसताना तुम्ही हे सगळंच केल आहे. मेडीकल तपासणीमध्ये तर दिसेलच ना ते.” शशांक मनातच येईल ते बडबड करायला लागला.

“तुझ नशीब ही एवढं खराब आहे ना की त्यानेच आम्हाला हा उपाय दाखवला.” अभिनव बोलायला लागला. “तुझा जो अपघात झाला ना त्यात तुझ्या कमरेखालच्या त्या भागाला जास्तच मार बसला होता. मग तो ऑपरेशन करून काढावा लागला. त्यामुळे पुढे मेडिकल तपासणी जरी तु करून घेतलीस तरी त्यात तेच दिसणार.”

अगदी छोटासा ताप आल्यासारखं अभिनवने त्याला सहज सांगीतलं होत. सोबतीला तो क्रुर हसरा चेहरा होताच.

शशांक आता जाणिवेच्या पलीकडे निघुन गेला. त्याच्यासोबत घडलेली ही घटना त्याला चांगलाच मानसीक धक्का देऊन गेली. त्याच्या चेहर्‍यासमोर आता कितीतरी मुलींचे हतबल झालेले चेहरे यायला लागले. त्यांची हतबलता त्याला आता जाणवायला लागली. ते बोलतात ना ज्याच जळतं त्याला कळतं. तेच शशांक सोबत घडत होत. काल पर्यंत मग्रुरीत जगणारा शशांक आता भित्रा ससा झाला होता.

तेवढ्यातच परी पण तिथे येऊन पोहोचली. शशांकचा हतबलतेने भरलेला चेहरा बघून तिच्या मनाला त्याच्याबद्दल जरा कळ जाणवली. पण त्याने आजवर केलेल्या कृत्याने ती कळही कुठल्यातरी कोपऱ्यात लपली गेली. तिने फक्त एक तुच्छतेची नजर शशांकवर टाकली आणि तिच्या मोबाईलवरून फोन लावला.

“काय साटम?” परी “तुमचे साक्षीदार इथे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. तरी तुम्हाला माहीत नाही का?”

तसा तिकडे साटमने डोक्यालाच हात लावला आणि तिथे पोहचत असल्याचे परीला सांगीतले. मोबाईल ठेवल्यावर परीने शशांककडे पाहीले. त्याच तोंड स्वतःच्या हाताने दाबत ती बोलायला लागली.

“पुढे काय करायचं आहे ते तुला आता समजलं असेलच.” परी चिडून बोलली. “नाहीतर हा फक्त ट्रेलर होता, लक्षात ठेव.” त्याचा चेहरा स्वतःच्या हातातुन तिने जोरात झटकला.

शशांकने फक्त होकारात मान हलवली. अभिनवने तिथल्या नर्सला शशांकच्या मेडिसीन आणि पथ्य बाबत माहीती दिली आणि ते तिघेही तिथून बाहेर पडले.

मयंक हे सर्व लांबूनच बघत होता. हा सगळा प्रकार बघून तो ही पुरता बिथरला होता. ‘बाप रे! काय खतरनाक माणस आहेत ही.’ तो मनातच बोलला. त्या तिघांना बाहेर गेलेल बघून मयंक ही परत प्रसादच्या रुमकडे गेला. तिथुन सरला आणि विमलांना सोबत घेत त्यांना घरी सोडलं आणि तो परत कॉलेजकडे निघून गेला.थोड्याचवेळात ऋतुजा ही कॉलेजला जाऊन पोहोचली. आता प्रसादजवळ फक्त सोनीया होती. राजन ही तिथुन निघून गेले. परी आणि विद्या ही त्यांच्या कामावर निघून गेल्या. तसा तिथे अभिनव होताच. पण तो बाकी पेशन्ट आणि इतर कामात व्यस्त झालेला होता.

“अगं ती माणस आहेत का मस्करी?” कॉलेजला पोहोचलेल्या ऋतुजाला मयंक टेन्शनमध्ये येत विचारतं होता.

“माणसच आहेत ती.” ऋतुजा “फक्त कोणी गरजेपेक्षा जास्त डिवचल की जनावर होतात.”

“काय करून ठेवलं त्या माणसाच?” मयंक “ना धड पुरुष ठेवला आणि नाही धड स्त्री. जगेल कसा तो?”

“जगेल की.” ऋतूजा काहीच मोठ न झाल्यासारखं बोलत होती. “जिवंत आहे ते पुष्कळ आहे त्याच्यासाठी. इज्जतीला घाबरुन कोणी मुलगी पुढे येत नव्हती म्हणुन त्याच फावलं होत. एका मुलीची तर व्हिडिओ व्हायरल करून तिला आयुष्यातून उठवलं होत. मग त्याच्यासोबत अजून काय करायला हवं होत?” ऋतुजा आता चांगलीच चिडून बोलली. “अस ही दिदीने काही मुलींना तयार केल आहे. ज्यांच्यासोबत त्याने …” बोलता बोलता ऋतुजा थांबली. तिला बोलायलाही कसेतरीच झालं होत. “जास्त दिवस बाहेर नाही रहाणार तो.”

“म्हणजे लग्नानंतर तुझ्या चुका ही मला हसत हसत पोटात घालाव्या लागतील.” मयंक कसतरी हसत बोलला.

“काश ऐसा होता.” ऋतुजा वर बघून बोलली.

“म्हणजे?” मयंक गोंधळला.

“ती लोक केलेल्या चुका कधीच पोटात घालत नाही. “ ऋतुजा “कोणी मुद्दाम खोट ठरवुन त्रास द्यायला लागली की मग ते कोणाला सोडत नाही. मी चुक केली तर दिदी पहीले माझे कान उपटेल.”

“चला.” मयंक निवांत झाला. “म्हणजे तु कोणालातरी घाबरतेस.” तस ऋतुजाने डोळे विस्फारून मयंककडे पाहीलं. भावनेच्या भरात ती खरं बोलून गेली होती. कारण आजवर घरात ऋतूजाचा आवाजचं जास्त चालत होता. ती कोणालाच घाबरत नाही अस मयंकला वाटतं होत. ती मयंककडून तिचे सगळेच लाड पुर्ण करून घेत होती. पण आता त्याच्या हाती ऋतुजाचा विक पॉइंट लागला होता. ऋतुजाने तिच तोंड वाकडं केल आणि ते दोघेही क्लासरुमकडे निघून गेले.

दुसरीकडे मित्तल साहेबांच्या ऑफीसच वातावरण चांगलच गरम झालेलं होत. आज परमारांनी सकाळीच त्यांच्यासाठीच्या दोन वाईट बातम्या त्यांना सांगीतल्या होत्या.

एक म्हणजे “साहेब आपला एक साक्षीदार फुटला. दुसरा साक्षीदार गायब झाला आहे.”

आणि दुसरी म्हणजे “पोलीसांच्या हाती सरकारी अधिकरी सावंतच्या मृत्युबाबात एक ठोस पुरावा लागला आहे. कुठला तो माहीत नाही.”

हे ऐकुन मित्तलला काय करू? अस झालेल होत. एकतर या उपकराणासाठी त्यांनी बाहेरच्या कंपनीसोबत करोडोंचा व्यवहार ठरवलेला होता. ज्याने त्यांच्या कंपनीला खूप फायदा होणार होता. आता त्यांना प्रसादला कंपनीतुन काढल्याचा पश्चाताप होऊ लागला होता. काहीही करून हे उपकरण त्यांना स्वतःच्या नावाने करुन घ्यायचं होत. मग त्या साठी साम दाम दंड भेद काहीही करायला ते मागेपुढे बघणार नव्हते.

“एक काम करा.” मित्तलच्या चेहऱ्यावर आता क्रुर भाव उमटले. “काहीही करुन आजची रात्र प्रसादची शेवटची रात्र झाली पाहीजे.”

“पण त्या भैरवीने सगळीकडेच टाईट करून ठेवलं आहे.” परमार विचार करत बोलले.

“रात्रीची वेळ बघा.” मित्तल चिडून बोलले. “दोन, अडीच वाजेनंतर कुंभकर्णाची वेळ असते. आता सगळचं सांगायला हवं का?”

मग परमार ही त्यांचा घाम पुसत निघून गेले.

दोन दिवसांनी प्रसादला न्यायालयात हजर करणार होते. त्याच्या फक्त हातलाच प्लॅस्टर होत. बाकी त्याची तब्येत व्यवस्थित झालेली होती. या दोन दिवसात परमारांना काही प्रसादजवळ पोहोचताच आलेल नव्हतं.

आज साटम पुर्ण तयारीतच आलेले होते. न्यायालयात जाणार म्हणजे साईराज ही तिथे असणारच होता. त्यामुळे त्यांना परत कोणताही हलगर्जीपणा करून आपलं हसं करून घ्यायच नव्हतं.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रसादला घेऊन ते न्यायालयात पोहोचले. प्रसादच्या सुरक्षेसाठी आज बराच फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. प्रसादला त्याची केस चालु असलेल्या न्यायालयाच्या कक्षेसमोर आणून बसवलं गेल. त्याची शारीरिक अवस्था बघता त्याची केस लवकर घेण्याची विनंती साईराजने न्यायालयात केली होती.

आजच्या बोर्डावर केसेची संख्या खूपच होती. ज्या केस खुपच महत्वाच्या आणि चालवण्यासाठी अगदीच गरजेच्या होत्या. त्याच केसेसना आज प्राधान्य देण्यात आलेल होत. बाकी केसेसला तारीखच देण्याची ऑर्डर न्यायमूर्ती साहेबांनी त्यांच्या क्लर्कला दिलेली होती.

जे काही महत्वाचे युक्तीवाद, उलटतपासणी, पुरावा दाखल यासाठी न्यायमूर्ती साहेबांनी ज्यांना त्यांना आजची वेळ वाटुन दिली आणि प्रसादची केस बोर्डावर घेण्यात आली.

“इतकी गर्दी?” सरला आश्चर्यचकित झाल्या. इतके दिवस फक्त आपल्या मुलाच्या काळजीपोटी इतरत्र कुठेच न बघणाऱ्या सरला आज कोर्टातील गर्दी बघून गोंधळून गेल्या होत्या. म्हणून त्या साईराजला हळुच विचारत होत्या.

“हो नेहमीच असते.” साईराज “अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतात. ज्या बोलून मिटण्यासारख्या असतात. पण नाही, भांडतात आणि कोर्टात येतात. यामुळेच तर जास्त वेळ लागतो.” साईराज दिर्घ श्वास घेत बोलला.

पोलीसांनी त्यांना मिळालेला ठोस पुरावा न्यायालयात दाखल केला. बाकी केसच्या ॲडजस्टमेन्ट केल्यावर न्यायमूर्तींसाहेबांनी प्रसादची केस बोर्डावर घेतली. पोलीसांचा तो पुरावा बघून न्यायमूर्ती साहेब पोलिसांकडे बघू लागले.

“मग आधीच निट का तपास केला नाहीत?” न्यायमूर्ती साहेब “उगाच डबल डबल काम करावी लागली नसती. हा दुसरा चाकु तिथेच भेटला. त्यावर सावंत साहेबांचे ब्लड सॅम्पल आणि काही शरीराच्या मांसाचे तुकडे भेटले. बरोबर?”

“हो साहेब.” साटम “आधी जो चाकु भेटला त्यावर प्रसादच्या हाताचे ठसे होते. पण ते मारण्याच्या ॲक्शनमधले नव्हते. त्या चाकुवर रक्त पसरवले गेलं होत आणि जो नंतर मिळाला त्यानेच हा प्रकार झाला आहे. तसा फॉरेन्सिक रिपोर्ट करुन आणलेला आहे.”

“याचा अर्थ ऐकच होतो.” साईराज “की माझ्या अशिलाचा या गुन्ह्यात काहीच हात नाही.”

“पण बाकी गुन्हे तर अजून बाकी आहेत की.” सरकारी वकील मध्येच बोलले.

“माझ बोलणं अजून संपलेल नाही.” साईराज कडक आवाजात बोलला. “त्यामुळेच मध्येच अडवून तुमचा आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवु नका.”

“म्हात्रे साहेब.” न्यायमूर्ती साहेब “तुम्ही बोला.”

“आता दुसर्‍या विषयावर येऊयात.” साईराज “जे उपकरण जळाल. त्याची तपासणी होणे बाकी आहे. सरकारी माणसांना ती जमली नाही आणि ज्यांनी त्यावर हक्क सांगीतला आहे, त्यांना पोलीसांनी बऱ्याच वेळा बोलावलं होत. पण त्यांनी फक्त टाळाटाळ केलेली आहे. याच कारण एवढचं की ते उपकरण, त्याची माहीती ही फक्त आमच्या अशिलाकडेच आहे. जर मेहेरबान न्यायालयाने परवानगी दिली तर माझे अशील त्या उपकरणाची सगळीच तपासणी करून त्याचा निकाल न्यायालयात दाखल करू शकतात.”

“ऑब्जेक्शन साहेब.” सरकारी वकील “प्रसाद एक गुन्हेगार आहे…”

“ऑब्जेक्शन.” सरकारी वकील पुढे बोलण्याआधी साईराज जरा जोरातच गरजला. प्रसादला गुन्हेगार बोलण साईराजला सहनच झालं नाही. लागलीच तिथे पिन ड्रॉप शांतता झाली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

सॉरी भाग जरा उशीराच पोस्ट होत आहे. एकतर चॅम्पियन्स स्पर्धा चालु आहे आणि पावसात भिजल्याने मी आजारी पण पडलो होतो. त्यामुळेच भाग पोस्ट करायला उशीर झाला. यापुढे उशीर होणार नाही.

🎭 Series Post

View all