अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ८

“मला वाकड्यात शिरायला भाग पाडु नका मिस्टर अधीकारी.” परी मोबाईल वर कडाडली होती. तसे हॉस्पिटल बाहेर पडणारे साळवे गरकन मागे फिरले होते. त्यांना आज परीचा पुर्ण चेहरा दिसला होता. ‘तोच चेहरा, तोच आवाज, तोच करारीपणा ही तर तिच आहे.’ साळवे मनातच बोलले. ‘पण ही याच्यासोबत काय करत आहे?"
मागील भागात.

"आन्स्पेक्टर साहेब.” डॉक्टरांनी साटमला अडवलं. “त्याला फक्त शुध्द आली आहे. अजुन काही विचारुन त्यांना प्रेशर देऊ नका. नाहीतर परत कोमात जाईल तो.”

“इथे माझ्यावर किती प्रेशर आहे माहीती आहे का?” साटम वैतागुन बोलला.

“पण पेशटं ची परिस्थिती कोर्टात समजली तर तुमच्या फाईल केलेल्या चार्जशीटला काहीच अर्थ राहणार नाही.” डॉक्टर

प्रसाद पुर्ण शुध्दीत आला होता. फक्त शरीराची हालचाल करायला त्याला फक्त त्रास होत होता.

“हा काय पुर्ण शुध्दीत आला.” साटम डॉक्टरकडे बघत बोलले. “तुम्ही फक्त वाचता, लिहीता आल्याच आणि शुध्दीत असल्याच सर्टिफिकेट रेडी करा. बाकी मी बघुन घेईल.”

“काय बोलत आहात?” डॉक्टर गोंधळून बोलले.

“तो पुर्ण शुध्दीत तर आला आहे ना?” साटम बोलले तस डॉक्टरने मान हलवली होती. “मग तुम्ही तयार करा बाकी मी बघुन घेईल.”

मग डॉक्टरही निघुन गेले होते. इन्स्पेक्टर साटमने काही कागद प्रसादसमोर ठेवली आणि त्यावर सही करायला सांगीतली. प्रसादनेही काहीच न विचारता त्यावर सही केली होती. तस साटमच्या चेहऱ्यावर हसु उमटलं होत.

आता पुढे.

तो सही झालेला कागद घेऊन साटम लगेच वॉर्ड बाहेर देखील पडले होते. एकदा का चार्जशीट फाईल झाल की पुढे कितीही तारखा पडल्याचा त्यांना फरक पडणार नव्हता. पुढच्या कारवाईसाठी त्यांना बराच वेळ मिळणार होता.

त्यांच्या पाठी चलणा-या साळवेंना मात्र परीकडे बघुन काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटायला लागलं होत. मग त्यांनी पुढे चालणाऱ्या साटमला आवाज दिला.

“साहेब ऐका ना.” साळवे

“हा बोला पटकन.” साटम पटापट पाय उचलत बोलत होते.

“चार्जशीट फाईल करण्याची घाई करु नका.” साळवे

साळवेंच्या बोलण्यावर साटम जरा थबकलेच होते. कारण ते कधीही विनाकारण टोकत नव्हते. आजवरचा त्यांचा अनुभवाने बऱ्याच केस सॉल्ह्व करण्यास मदत झाली होती.

“का?” साटम

“काहीतरी राहील आहे.” साळवे “त्या मुलीला कुठेतरी पाहील आहे मी.”

“कोणती मुलगी?” साटम वैतागुन बोलले. “वय झाल तुमच आता मुली बघण शोभत नाही तुम्हाला.”

“तस नाही साहेब.” साळवे विचार करत बोलला. “तिचा चेहरा मला त्या लेडीज ऑफिसरसारखा वाटतो.”

“तुमचं ना काहीतरीच असतं.” साटमने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल आणि परत चालायला सुरवात केली.

“पण यामध्ये अजून बरीच माहिती टाकायची बाकी आहे.” साळवे

“जे महत्वाच आहे ते टाकलं आहे.” साटम “बाकी नंतर टाकता येईल. असही त्याने सही तर केलीच आहे.” बोलता बोलता ते दोघेही निघुन गेले होते.

इकडे परीने फोन फिरवला होता. तर राजन ही पटकन तिथे पोहोचला होता. परीची संशयी नजर आजही त्याच्यावर स्थिरावलेली होती. पोलीस गेल्यावर ते सगळेच प्रसादजवळ जाऊन बसले.

प्रसाद अजुनही शांतच बसलेला होता. त्याने त्याची एक नजर फक्त परीवय टाकली होती. तशी ती फोनवर बोलता बोलता बाहेर गेली होती.

“किती दिवस असा शांत बसणार आहेस?” सरला त्यांचे अश्रु आवरत विचारत होत्या.

प्रसाद फक्त त्यांना बघत राहीला होता. ना त्याच्या डोळ्यात कुठली आशा होती आणि नाही अपेक्षा. ते बघुन सरलांनी प्रसादला जवळ घेतलं होत. घरी शांत झालेले डोळे हॉस्पीटलला आले की सारखे भरुन येत रहायचे.

“मला वाकड्यात शिरायला भाग पाडु नका मिस्टर अधीकारी.” परी मोबाईल वर कडाडली होती.

तसे हॉस्पिटल बाहेर पडणारे साळवे गरकन मागे फिरले होते. त्यांना आज परीचा पुर्ण चेहरा दिसला होता. ‘तोच चेहरा, तोच आवाज, तोच करारीपणा, ही तर तिच आहे.’ साळवे मनातच बोलले. ‘पण ही याच्यासोबत काय करत आहे? याचाच केस संबंधीत आली असेल तर साहेबांना चार्जशीट फाईल करण्यापासून थांबवल पाहीजे.’ एवढा विचार करुन ते पटापट साटमच्या मागे गेले होते.

परी मोबाईल वर बोलता बोलता बाहेर आली होती.

“तो ऐकतच नाही आहे.” पलीकडून आवाज आला. तस परीने तिचे डोळे घट्ट मिटले. “मीच बघते.” एवढं बोलुन तिने तो फोन कट केला आणि दुसरा नंबर डायल केला. दोन ते तिन रिंग नंतर तो फोन उचलला गेला होता.

“काय साहेब?” परी शक्य तितक्या शांत आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होती. “आता गरीबाच एवढं पण काम करणार नाही का?”

“काय करता मॅडम?” अधिकारी “साहेबांना सध्या वेळ नाही ना.”

“तुम्हाला गरज असते तेव्हा आम्ही वेळ काढतोय ना.” परी

“ते झाल तुमचं म्हणणं.” अधिकारी “पण काही प्रोसिजर असते की नाही. सगळंच स्वतःच्या मतानुसार होत नाही.”

“तुमच्या मनानुसार होतात ना.” परीचा आवाज आता चढायला लागला होता. पण तिने तो खुप कष्टाने आवरला होता.

“तुम्हाला कळतयं का तुम्ही काय करायला सांगत आहात?” अधिकारी ही चिडुन बोलला. “अस काही कायद्याच्या विरुध्द जाऊन करता येत नाही. त्यात तुमचा रेकॉर्ड तर बघायलाच नको.”

“आता तुम्ही आमचे रोकॉर्ड बघणार का?” परी आता चांगलीच तापली होती, पण आवाज अजुनही शांतच ठेवला होता. “आम्ही पण तुमचे रेकॉर्ड ठेवले आहेत.”

“तु मला ब्लॅकमेल करतेस?” अधीकारी आता खुपच चिडुन बोलला. परीच्या शांत आवाजाला त्याने खुपच हलक्यात घेतलं होत. त्याला कारण ही तसचं होत. आजवर तिने कोणावरही आवाज चढवलेला नव्हता. जे काही आहे ते शांततेत निपटारा करत होती. “समजतेस काय तु स्वतःला?”

“मला वाकड्यात शिरायला भाग पाडु नका मिस्टर अधीकारी.” परीचा मुळ स्वभाव आता बाहेर पडला होता.

तिचा तो कडक आवाज ऐकुन मिस्टर अधीकारी जरा घाबरलाच होता. तरी तो उसन अवसान आणुन बोलला. “काय करशील काहीच नाही केल तर?”

त्याच्या या वाक्यावर परीने तिचे डोळे घट्ट मिटले. ‘सॉरी आजोबा, तुमची तत्व आज मोडत आहे मी. काय करु? आज विषय प्रसादच्या आयुष्याचा आहे.’ तिने तिचे डोळे उघडले आणि तसच मायकलवर नजर टाकली. तिच्या त्या रागाने भरलेल्या नजरेने मायकलला काय करायचे आहे ते समजुन गेल होत. तो कॉम्प्युटर इंजीनियरिंग झालेला एक प्रोफेशनल हॅकर होता. मग त्याने ही आसुरी स्मित करुन त्याचा लॅपटॉप उघडला होता. त्या लॅपटॉपवर काही सेकंदासाठी बोट फिरवल्यावर मायकलने परीकडे पाहील आणि ओकेचा इशारा केला.

“मिस्टर अधीकारी जरा तुमचा मोबाईल बघा.” परी कडक आवाजात बोलली.

“काय आहे त्याच्यावर?” अधीकारी तुसड्यात बोलला. त्याने मोबाईल पाहीला आणि त्याचे डोळेच पांढरे झाले होते. तो खाडकन जागेवरुन उभा राहीला.

“मॅडम आपण जरा बसुन बोलुया.” अधिकारीच्या बोलण्याचा सुरच बदलुन गेला होता.

“मी सांगीतलं आहे तेवढचं करायचं.” परी कडक आवाजात बोलली. “या आधी मी कधी तुमच्या रस्त्यात आली नव्हती. आता तुम्ही माझ्या रस्त्यात येऊ नका.”

एवढं बोलुन तिने फोन ठेवुन दिला होता. तिने मायकलवर नजर टाकली आणि ते दोघेही परत प्रसादच्या रुमकडे निघुन गेले.

साळवे पटापट साटमजवळ पोहोचण्याचा प्रयत्न होते. पण साटम तर कधीच त्यांच्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचले होते.

“चला हे एक काम चांगल केलत.” डिएसपी साहेब साटमकडची सगळी कागदपत्र बघुन बोलले.

“पण साहेब यात बरीच माहीती नाही आहे.” साटम जरा चाचरत बोलला. “म्हणजे ते उपकरण जळल्याची, उपकरणाची, सावंत साहेबांबद्दलची. फक्त त्याने केल एवढाच कबुलनामा आहे.”

“तिथल्या माणसांची, त्या कंपनीच्या मालकाची, प्रसादच्या सहका-याची, त्याच्या बायकोचे स्टेटमेंट आहेत ना?” डिएसपी साहेब साटमकडे बघत बोलले.

“हो ते आहेत.” साटम माहिती पुरवत बोलले. “जी माणस आगीत जखमी झाली आहेत, त्यांचे ही घेतले आहेत.”

“बरं मग बाकी ते करता येईल नंतर.” डिएसपी साहेब “एकदा चार्जशीट फाईल झाली की बाकीच प्रेशर कमी होईल. आपली ही फायदा होईल, चौकशीसाठी पाहीजे तेवढा वेळ घेता येईल. जामिन तर भेटणार नाहीच त्याला. असही कोणताही वकील पुढे येत नाहीये. त्यामुळे हा काही सुटणार नाही. तुम्ही बिनधास्त चार्जशीट फाईल करा.”

साटमनेही कडक सॅल्युट ठोकून लागलीच कोर्टाकडे प्रस्थान केल होत. यानंतर साळवे डिएसपी साहेबांच्या ऑफीसमध्ये पोहोचले होते. आता साटमला चार्जशीट फाईल करण्यापासून रोखण साळवेंना कठीण वाटायला लागलं होत. मग ते त्यांच्या स्टेशनला निघुन गेले होते.

साटम गेल्यावर डिएसपी साहेबांनी त्या कंपनीच्या मालकाला फोन लावला.

“आज चार्जशीट फाईल होऊन जाईल.” डिएसपी साहेब

“अरे वा.” नाईक “खुपच फास्ट काम केलत. फक्त तो सुटला नाही पाहीजे.”

“नाही सुटणार.” डिएसपी “फक्त तुमची यात काही चुक नसुद्यात.” डिएसपी साहेब ही इशारा देत बोलले.

“नाही ओ साहेब.” नाईक “खरचं आमचं होत ते. त्याने चोरल आमच्याकडून.”

“बरं.” डिएसपी साहेबांनी फोन ठेवुन दिला होता.

आता ते सगळेच निवांत झालेले होते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सगळेच प्रसादजवळ बसले होते. त्याच्या डाव्या हाताला अजुनही पट्ट्या बांधलेल्या होत्या. कपाळालाही पट्टी बांधलेली होती. तो अजुनही शांतच बसलेला होता.

“आता तरी बोलशील का?” सरला प्रसादला विनंती करत बोलल्या. “नक्की काय झाल? कसं झालं?”

तरी प्रसाद गप्पच होता. त्याने त्याच्या आजोबांकडे पाहीले. तशा सरला चिडल्या.

“तु पण तत्वांनाच धरुन बसणार आहेस का?” सरला “मला एवढं तर माहीती आहे तु जे काही केल असशील ते विनाकारण नक्कीच झालं नसेल. पण म्हणून जे चाललं आहे ते चालु देणार आहेस का?”

एवढं बोलुनही प्रसाद गप्पच बसला होता. तो फक्त त्याच्या आजोबांना बघत होता. आजवर फक्त त्यांच्या संस्कारांवर, तत्वावर चालणारा होता तो. आता ही जणु काही तो त्यांच्याच बोलण्याची वाट बघत होता. पण ते ही गप्पच बसले होते.

तशा सरला अजुनच चिडल्या. त्या आजोबांकडे वळल्या आणि चिडुन बोलायला लागल्या. “महाभारताचे उदाहरण देतात ना तुम्ही. त्याच महाभारतात अर्जुनाने जेव्हा शस्त्र टाकली होती ना तेव्हा तोच कृष्ण त्याच तत्व, वचन मोडायला निघाला होता. आपण तरी माणस आहोत.”

यावर आजोबांनी फक्त त्यांच तोंड फिरवुन घेतल होत. पुढच्याच क्षणाला ऋतुजाचा फोन वाजला होता. तो तीने बघीतला आणि घाबरुनच सगळ्यांवर नजर टाकली आणि पटकन बाहेर गेली होती. इथे रुममध्ये परत शांतता पसरली होती. तेवढ्यातच परीचा मोबाईल देखील वाजला होता. ती देखील रूमच्या बाहेर पडली होती. फोनवरच बोलण ऐकुन तिच्या चेहर्‍यावर एक आसुरी स्मित झळकल होत.

ती परतच होती की तिला ऋतुजा दिसली जी कोण्या मुलासोबत बोलत होती. पुढच्याच क्षणाला त्या मुलाने ऋतुजाला एका बाजुने हलकेच मिठीत घेतलं होत. ते बघुन परीच्या कपाळावरच्या आठ्या गडद व्हायला लागल्या होत्या. ती तशीच ऋतुजाजवळ जायला निघाली. तेवढ्यातच तिचा फोन परत वाजला आणि ती ऋतुजावर नजर टाकुन फोनवर बोलायला लागली होती. तिच बोलण होईपर्यंत ऋतुजा त्या मुलाला भेटून तिथुन निघुन गेली होती. मग तिच्याशी नंतर बोलु हा विचार करुन ती परत प्रसादच्या रुमकडे गेली होती.

इकडे साटम निवांत बसलेले असताना त्यांचा पोलीस स्टेशनमधला फोन वाजला होता. तो त्यांनी उचलला आणि त्यांच्या चेहर्‍यावर लगेच घाम सुटायला सुरवात झाली होती. ते पटकन तिथुन उठले आणि तडक डिएसपी साहेबांच्या ऑफिसला पोहोचले होते.

“अस कस झाल?” साटम गोंधळून विचारतं होते.

“आता तिकडे गेल्यावरच कळेल.” डिएसपी साहेब “चला पटकन जाव लागेल. साळवे पण आहत ना या केसवर, त्यांनाही बोलावुन घ्या.”

तस साटमने साळवेला फोन करुन डायरेक्ट हायकोर्टात यायला सांगीतलं होत.

सकाळी जिल्हा न्यायालयात फाईल झालेली चार्जशीट, दुपारपर्यंत उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आली होती. त्यानंतर लगेच संबंधीत केससंदर्भात असलेल्या सगळ्यांना बोलावण्यासाठी उच्च न्यायालयातून डिएसपी साहेबांना फोन गेला होता. मग डिएसपी साहेबांनी लगेच या केस संदर्भात असलेल्या सगळ्यांना फोन करुन यायला सांगीतलं होत. ही केस नक्की कोणी घेतली? हाच प्रश्न ह्या सगळ्यांनाच पडला होता.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरु नका.

🎭 Series Post

View all