अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १६

“हे भामटे एकत्र आले का आम्हाला नेहमीच वाळीत टाकतात.” सोनीया तक्रारीच्या सुरात बोलली. तर ऋतुजाचेही फुगलेले गाल आत्ताशी यांनी पाहीले होते. “अरे बापरे हे ॲटम बॉम्ब तर विसरूनच गेलो होतो.” प्रसाद हळुच बोलला. तस परी, अभिनव, मायकल हलकेच हसले. “काय हे प्रसाद?” सरला आता जरा चिडून बोलल्या.
मागील भागात.

“आता दुसरा विषयावर येऊयात.” साईराज “जे उपकरण जळाल. त्याची तपासणी होणे बाकी आहे. सरकारी माणसांना ती जमली नाही आणि ज्यांनी त्यावर हक्क सांगीतला आहे. त्यांना पोलीसांनी बऱ्याच वेळा बोलावलं होत. पण त्यांनी फक्त टाळाटाळ केलेली आहे. याच कारण एवढचं की ते उपकरण, त्याची माहीती ही फक्त आणि फुटाच्या अशिलाकडेच आहे. जर मेहेरबान न्यायालयाने परवानगी दिली तर माझे अशील त्या उपकरणाची सगळीच तपासणी करून त्याचा निकाल न्यायालयात दाखल करू शकतात.”

“ऑब्जेक्शन साहेब.” सरकारी वकील “प्रसाद एक गुन्हेगार आहे…”

“ऑब्जेक्शन.” सरकारी वकील पुढे बोलण्याआधी साईराज गरजला. प्रसादला गुन्हेगार बोललेल साईराजला सहनच झालं नव्हतं. त्याच्या गरजण्यामुळे तिथे पिन ड्रॉप शांतता झालेली होती.

आता पुढे.

साईराजने पुढे बोलायला सुरवात केली. "न्यायमूर्ती साहेब, सरकारी वकीलांना इतकी जाण तर असायला हवी की गुन्हा सिध्द झाल्याशिवाय कोणालाही गुन्हेगार बोलता येत नाही.”

“वकील साहेब.” सरकारी वकीलाकडे बघत न्यायमूर्ती साहेब बोलले.

“माफी असावी.” सरकारी वकील नरमाईने बोलले. “प्रसाद हा संशयीत आरोपी आहे. तो तपासणीच्या नावावर पुरावा नष्ट करू शकतो.”

“उपकरण जळालेलं आहे.” साईराज “त्यामुळे त्यात अशी सिस्टीम आहे की जे काही घडलं फक्त तेवढचं दाखवेल. त्यात काहीच हस्तक्षेप करता येत नाही. यंत्र आहे ते. जे असेल तेच दाखवतो. ते कधीच माणसासारखं धोका देत नाही. हवं तर न्यायमूर्ती समोर ही तपासणी करता येईल.”

न्यायमूर्ती साहेबांनी विचार केला आणि पुढे बोलले. “ठिक आहे. तारीख सांगा.”

“लवकरात लवकर.” साईराजने एक क्षणाचा विलंब न करता सांगीतल. “आम्ही तर उद्या ही तयार आहोत.”

न्यायमूर्ती साहेबांनी सरकारी वकील आणि पोलीसांकडे पाहीलं.

“पण मी उद्या नाहीये.” सरकारी वकील

“असही त्यात तुमच काही काम नाही.” साईराजला जाणवल की तो वकील वेळ काढण्यासाठी लांबवत आहे. “पोलीस असतील, स्वतः न्यायमूर्ती साहेब असतील.”

“कुठे आहात उद्या?” न्यायमूर्ती साहेबांनी सरकारी वकीलांना विचारलं.

“ते केस नंबर ****/**** आहे ना त्यातली कागद बघायला पोलीस स्टेशनला जायचं आहे.” सरकारी वकील

“ते तपासणी झाल्यावर जाऊ शकता.” न्यायमूर्ती साहेबांनी निर्णय सुनावला. “उद्या ठिक दुपारी १२ वाजता उपकरणाची तपासणी करण्यात येईल.”

प्रसादची केस बाजुला ठेवणार इतक्यातच सरकारी वकील बोलले. “प्रसाद पुर्ण बरा झाला आहे तर त्याला पोलीस कस्टडीत पाठवण्यात यावं.”

“सरकारी वकील फक्त कागदच गोळा करायलाच जातात काय? ते वाचून बघतात की नाही?” साईराज आता हसतच पण चिडून बोलला. “पोलीसांनी प्रसादच मेडीकल सर्टीफिकेट जोडलेल आहे. ज्यात स्पष्ट उल्लेख आहे की त्याला अजुन मेडीकल ट्रिटमेंटची गरज आहे. ते ही सरकारी डॉक्टरांचचं आहे.”

“बघा जरा निट.” न्यायमूर्ती साहेब ही वैतागुनच सरकारी वकीलांना बोलले.

“ह.. हो.. माफी असावी.” सरकारी वकील चाचरत बोलला.

प्रसादच्या केसला पुढची तारीख पडली. यानंतर लगेचचं न्यायमूर्ती साहेबांनी दुसर्‍या केसची सुनावणी सुरू केली. पोलीस प्रसादला घेऊन न्यायालयाच्या बाहेर पडले. प्रसादला ॲम्ब्युलन्स मध्ये बसवण्यात आलं. बाकी सरला आणि सोनीया साईराजच्या गाडीतुन हॉस्पिटलकडे रवाना झाले.

“हे असं किती दिवस जाव लागेल कोर्टत?” सरला टेन्शनमध्ये येत बोलल्या.

“नका काळजी करू मावशी.” साईराज सरलांना आश्वस्त करत बोलला. “दुसरी चार्जशीट दाखल होण्याआधी आपला प्रसाद निर्दोष सुटेल. हा थोडा वेळ तर जाईल. पण त्याला पुन्हा जेलची पायरी चढू देणार नाही.” साईराज निश्चयाने बोलला.

जेव्हापासून ही बाकी मुल येऊन प्रसादसोबत खंबीरपणे उभी राहीली तेव्हापासूनच सरलांनी प्रसादची चिंता सोडलेली होती. फक्त यासर्वांमधून प्रसाद कधी बाहेर पडेल इतकचं टेन्शन त्यांना होत. थोड्याचवेळात ते सगळेच हॉस्पिटलला पोहोचले. प्रसाद परत त्याच्या बेडवर पसरला. न्युज रिपोर्टर त्याचा इंटरव्हयु घेण्याचा प्रयत्न करत होते. पण अभिनवने त्या सगळ्यांनाच बरोबर लांब ठेवलेलं होत.

इकडे मित्तल साहेबांच्या ऑफीसमध्ये मित्तलसाहेबांनी टेबलावर जोरात हात आपटला होता. त्यांच्या कानावर सतत निगेटिव्ह बातम्या ज्या पोहोचत होत्या. आधीच हॉस्पिटलचा सगळाच स्टाफ बदलला गेला होता. त्यानंतर त्यांचा एक साक्षीदार फुटला होता. तर एक अजूनही गायब होता. त्याचा शोध सगळीकडे चालु होता. पण तो सापडत मात्र नव्हता. त्यातच आता जी माणस आगीत सापडली होती. त्यांनीही आग कशी लागली यावर प्रश्न उपस्थित करायला घेतले होते. जे आधी ‘आग फक्त त्या विद्युत उपकरणामुळे लागली.’ असे स्पष्ट सांगत होते. कारण स्पार्कींगची सुरवात त्या उपकरणाच्या बाहेरुन झाली होती. असं त्या सर्वांना आता आठवायला लागलं होत.

म्हणुन मित्तल साहेबांचा राग आता अजूनच वाढू लागला होता. त्यांनी परमारांना ताबडतोब यायला सांगीतलं. तसे परमार अर्ध्या तासात तिथे पोहोचले.

“एक काम तरी निट करणार आहात की नाही?” मित्तल रागात बरसले. "तो प्रसाद अजून जिवंत कसा?”

“काय करू साहेब.” परमारही वैतागून बोलला. दोन रात्री ते झोपुच शकले नव्हता. “एवढा कडक बंदोबस्त आहे की अनोळखी माणसाची चौकशी केल्याशिवाय रात्री कोणालाच आतमध्ये जाण्याची परवानगी मिळत नाहीये.”

“काय?” मित्तल “अरे ती काय बँक आहे का?” मित्तल चिडूनच इकडून तिकडे येरझारा मारत होते. “बरं मग ती आगीत सापडलेली माणसांनी त्यांच स्टेटमेंट का चेंज केल?”

“खात्रीशीर माहीती तर नाही.” परमार “पण कोणीतरी वासुदेव त्यांना भेटून गेला. अस ऐकायला आलं.”

“व्हॉट?” मित्तल गोंधळून गेले. “आता हा वासुदेव कोण? काय चाललं आहे यार?” मित्तल आता त्यांची विचारशक्ती हरवत चालले होते.

“ते नाही समजलं.” परमार निराश होत बोलले.

“सीसीटीव्ही असतील ना?” मित्तल

“ते बंद पडले होते.” परमार

“ह्या मुलीला मी हलक्या घेण्याची चूक तर नाही केली?” मित्तल विचार करत बोलले. त्यांचा मेंदु परत धावू लागला. “एक काम कर ज्या माणसाने हातमिळवणी केली ना सुरवातीला. त्यालाच सांग एकतर आमचं काम कर नाहीतर त्याच भांड फोडलं जाईल.”

“ठिक आहे.” परमार बोलून जाणार. तोच मित्तल यांनी परत परमारला आवाज दिला.

“त्यांच्या ग्रुपपैकी कोणाला उचलता येत का ते बघा.” मित्तल खिडकीबाहेर बघत बोलले.

तसा परमारांच्या अंगावर सरकन काटा आला. त्यांना आता त्यांचा फुटलेला साक्षीदार आठवायला लागला. जो त्यांनी हॉस्पीटलमध्ये पोहोचवून व्यवस्थित त्याचा कार्यक्रम उरकलेला होता. ‘आपणही जर त्यांच्या कचाट्यात सापडलो तर?’ हा प्रश्न परमारांच्या चेहऱ्यावर परमारांना चिडवत नाचू लागला. त्यांनी ही मनाशी काहीतरी ठरवत तिथून निघून गेले.

“उद्या प्रसादने त्या उपकरणाला तपासल आणि त्यात खरचं काही सापडलं तर?” हा विचार करूनच मित्तल आयुष्यात पहिल्यांदाच घाबरले होते. हा व्यवहार निट झाला तर त्यांची सात पिढींनी फक्त पैसे उडवले तरी त्यांना ते कमी पडणार नव्हते. पण हा व्यवहार फिस्कटला तर ते सरळ रस्त्यावर येणार होते.

सरला रात्रीच जेवण बनवण्यासाठी घरी गेलेल्या होत्या. साईराज ही प्रसादला हॉस्पिटलला सोडल्यानंतर थोडावेळ थांबून निघून गेला होता. आता प्रसादसोबत सोनीया, ऋतुजा आणि मयंक होता. राजन ही घाईघाईत येऊन परत निघून गेले होते. परी रात्री प्रसादला भेटायला आली. सोबत मायकल ही होताच. जेव्हा कधी अभिनवची ड्युटी सकाळची असली की मायकल रात्री यायचा. तो दिवसा झोपा काढत होता. तर रात्री हॉस्पिटलमध्ये प्रसादला सोबत म्हणुन जागरण करत होता.

अभिनव ही त्याची ड्युटी संपवून प्रसादला भेटायला आला. तर तिथली नर्स वैतागून तिथे आलेल्या अभिनव जवळ गेली.

“सर तुमच्या पेशन्टमुळे एक दिवस गोत्यात येऊ आम्ही.” नर्स आठ्या पाडून प्रसादला बघत बोलली.

“का? काय झाल?” अभिनव ही प्रसादला बघू लागला.

“ह्या मॅडम आल्या की तुमचा पेशन्ट हात फ्रॅक्चर झाल्याच विसरून जातो.” नर्स एक वेळेस परीकडे तर दुसर्‍या वेळेस प्रसादकडे रोखून बघत बोलली.

तसे बाकी सगळे हलकाच हसले होते. तर अभिन प्रसादला चिडून बघू लागला.

“तुला खरोखरची जाणीव करून हवी आहे का?” अभिनव चिडून बोलला. तसा प्रसाद हलकेच त्याचे कान पकडत सॉरी बोलला. “केस संपली की एकमेकांच्या उरावर चढून तुम्ही दोघांनी मारामारी जरी केली ना तरी मी तुमच्यात पडणार नाही. पण आता या गरीब माणसासाठी जाणिव ठेव. प्लिज.”

“सॉरी ना यार.” प्रसाद

“पण मग करत काय होते?” अभिनव बारीक डोळे करत विचारू लागला.

“अरे एक हात पकडून ठेवला होता आणि म्हणे हिम्मत असेल तर क…” प्रसाद पुढे बोलणार तोच परीने त्याच तोंड दाबलं.

“अरे काहीही काय?” परी लाजून त्याला डोळ्यांनीच दटावून लागली. पण समझदार लोगोंको इशारा काफी होता है. या उक्तीप्रमाणे त्यांचा कारनामा सगळ्यांनाच समजून गेला.

“बरं उद्या मी स्वतः तुझ्यासोबत येणार आहे.” अभिनव प्रसादकडे बघून बोलला.

“अरे पण इथे तु लागशील ना?” प्रसाद

“तुमची वहिनी येणार आहे उद्या.” अभिनव “ती इथे थांबेल आणि मी तुझ्यासोबत.”

“अरे वा!” प्रसाद “म्हणजे तुझी तक्रार करायला माणुस आला.”

मग काय? अभिनव ही जरा लाजला आणि बाकीच्यांकडून हलकाच हशा पिकला.

“विद्या नाही आली?” प्रसाद

“काय माहीत.” परी “मला मेसेज टाकला की घरी चालली आहे अर्जंट.”

“ठिक आहे.” प्रसाद “घरी जाता जाता तिच्या घराकडे चक्कर टाकून.”

यांच बोलण चालुच होत. तेवढ्यातच सरला आणि विमला जेवण घेऊन आल्या होत्या.

“तुम्ही तिघ असे का लांब थांबले आहात?” सरला सोनीया, ऋतुजा आणि मयंककडे बघत बोलल्या.

“हे भामटे एकत्र आले का आम्हाला नेहमीच वाळीत टाकतात.” सोनीया तक्रारीच्या सुरात बोलली. तर ऋतुजाचेही फुगलेले गाल आत्ताशी यांनी पाहीले होते.

“अरे बापरे हे ॲटम बॉम्ब तर विसरूनच गेलो होतो.” प्रसाद हळुच बोलला. तस परी, अभिनव, मायकल हलकेच हसले.

“काय हे प्रसाद?” सरला आता जरा चिडून बोलल्या.

“अगं कामाच बोलत होतो. त्यात उगाच त्यांना टेन्शन नको.” प्रसादने त्याचा मुद्दा स्पष्ट केला.

“मयंक या दोघींना घरी सोड.” परी सोनीया आणि ऋतुजाकडे बघत बोलली.

परीच बोलण ऐकुन मयंक ही लगेच तयार झाला. तो अजूनही परीपासून जरा लांबच रहात होता. या ग्रुपची त्याने धास्तीच तेवढी घेतली होती. ही केस संपेपर्यंत तरी मयंक ऋतुजाच्या बाबतीत काहीच हालचाल करणार नव्हता. तर सरला आणि विमलांना परी तिच्या गाडीने घरी सोडणार होती. मयंक त्या दोघींना घेऊन गेला. ते गेल्यावर ह्या सगळ्यांनीच जेवणावर ताव मारला होता. जेवण आटोपल्यावर सरला आणि विमला घरी जायला निघाल्या. परीने ही एकदा प्रसादच्या कपाळावर किस केल आणि तिथुन बाहेर पडली. मायकल त्यांना सोडून परत प्रसादजवळ जाऊन बसला.

क्रमशः

कस वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all