अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब अंतिम भाग

दुसर्‍याच दिवशी परत एक न्यूज झळाकायला सुरवात झाली. “आपल्या मुलाला एक मुलगी आवडली म्हणुन मुलाच्या आईने त्या मुलीला किडनॅप केल.” हा मेसेज पउठलाचया आईच्या मोबाईलवर झळकला आणि परीच्या घरी एक कल्लोळ उठला. परीच्या आईने तसाच विमलांना फोन लावला.
मागील भागात.

आज सगळेच काही स्पष्ट झालं होत. न्युजवाल्यांसाठी तर ही ब्रेकींग न्युज होती. फक्त साहेबांच्या आदेशाची वाट बघत होते.

“न्यायमूर्ती साहेब.” साईराज उठला. “मित्तलसाहेबांवर अजून बरेच काही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी या आधी ही अशाच खूप तरुणांचा बाई घेतलेला आहे. त्यांच्या केसची फाईल ही यासोबत घ्यावी. या सगळ्यांत प्रकरणात माझ्या अशिलाला विनाकारण फक्त गोवा गेलेल आहे. त्याचा या घटनेशी काहीच संबंध नाही. हे या चार्जशीट वरून स्पष्ट झालेले आहे. तरी माझ्या अशिलाची निर्दोष मुक्तता करावी. एवढीच मेहेरबान न्यायालयाला माझी विनंती आहे.”

साईराज बोलून बसला. तर तिकडे सरला जाणिवेच्या पलीकडे गेलेल्या होत्या. त्याच काय? विमला, ऋतुजा, तिचे वडील, सोनाया, रिया या सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसलेला होता. राजन प्रसादचा सख्खा मामा होता आणि त्याचाच या गुन्ह्यामागे हात असलेल बघून सगळेच शॉकमध्ये गेलेले होते.

“का?” सरला हुंदका आवरत कशातरी राजनकडे बघून बोलल्या. “का? वागला तो असा?” त्यांच्या चेहर्‍यावर खूपच राग चढला आणि त्या राजनजवळ जायला बघणार तोच परीने त्यांना घट्ट धरून ठेवलं.

आता पूढे.

“इथे नाही.” परी “आपण कोर्टात आहोत.” तशा सरला जरा शांत झाल्या.

न्यायमूर्ती साहेबांनी सगळेच कागद आणि स्टेटमेंट पाहीले आणि बोलले.

“चार्जशीट फाईल करून घेत आहे.” न्यायमूर्ती साहेब “चार्जशीटमधली नव्याने दाखल झालेल्या गुन्हेगारांना चौकशीसाठी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात येते. प्रसादच्या विरुध्द कोणताही सबळ आणि ठोस पुरावा नसल्याने हे न्यायालय त्याला निर्दोष मुक्त करत आहे.”

हेच तर ऐकायचं होत सगळ्यांनाच. ते ऐकुन मनात किती समाधान पसरलं असेल हे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने सहज दिसून येत होत.

तिकडे प्रसादाने ही समाधानाने दिर्घ श्वास घेतला होता. बाकीची प्रोसीजर साईराज करून घेणार होता. आता सगळेच न्यायालयाच्या बाहेर आले. सरलांनी प्रेमाने प्रसादला मिठी मारली. मायकल, विद्या, परी, अभिन या सगळ्यांनीच प्रसादला घट्ट मिठी मारली.

नंतर सोनीया ही प्रसादला बिलगली. मयंक ही आलेला होता. मग त्यानेही प्रसादला हलकेच मिठी मारली. अश्रुंचे पुर ही वाहू लागले. थोड्याचवेळात पोलीस ही सगळ्याच गुन्हेगारांना घेऊन बाहेर आले. त्यात राजनला बघून सरलांचा शांत झालेला राग परत विकोपाला गेला. त्या रागारागात राजनजवळ गेल्या आणि सटासट राजनच्या कानाखाली वाजवायला लागल्या. तेवढ्याने समाधान नाही झाल म्हणुन दोन्ही हातांनी त्यांच्या छातीवर मारायला लागल्या.

त्या थांबतच नव्हत्या ते बघून तिथल्या महीला पोलीसांनी सरलांना अडवायला सुरवात केली. बाकी जण तर जाणुनबुजुन त्यांना अडवायला गेले नव्हते. कारण राजन वयाने मोठे होते. त्यांच्यावर हात उचलणं बरोबर वाटलं नसतं. मग सरलांच्या हातून तरी त्यांना मार पडायला हवा म्हणून बाकी तरूणाई फक्त गम्मत बघत उभी होती. पण पोलीसांनी सरलांना कसेतरी आवरलं होत. मग त्या मारायच्या थांबल्या आणि बोलायला लागल्या.

“माझा सख्खा भाऊ होता ना रे तु?” सरला रागात बोलल्या. “प्रसाद तुझा सख्खा भाचा होता ना. तुला असं वागायला लाज नाही वाटली?”

“सॉरी गं.” राजन खाली मान घालून बोलायला लागला. “पैशांच्या मोहापायी सगळेच विसरायला झालं गं.”

“पैसा एवढा महत्वाचा झाला होता का तुला?” सरलांचा संताप त्यांच्या शब्दांतून बाहेर पडायला लागला. “तुझ्या लाडक्या बहिणीपेक्षा ही?”

“नाही गं सुचलं काहीच.” राजन “पहीले वाटलं प्रसाद परदेशी जाईल आणि माझी पोरगी सुखात राहील. पण नंतर तो इथेच राहीला आणि अनामिकाची चिडचिड व्हायला लागली. नंतर मित्तलने फोन केला. करोडो रुपयाची लालच दाखवली. म्हटल प्रसादजवळ नाही तर माझ्या घरात तरी ती सुखात राहील म्हणून त्याला मदत करायला लागलो.”

“पण तुमच्याच विचाराने तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली.” प्रसाद “ते नाही दिसल का? आता आजोबा होते म्हणुन ती जिवंत तरी आहे. पण आता काय करणार?”

राजन ही रडत होते. पण त्यांच्या अश्रुचा काडीमात्र ही फरक कोणालाच पडलेला नव्हता. पोलीस त्या सगळ्यांच आरोपींना घेऊन गेले. अनामिका ही सरलांसोबत बोलायला आली होती. पण सरलांनी त्यांचा चेहरा फिरवून घेतला.

ज्या दिवसाची एवढी वाट पाहीली तो दिवस आज उजाडला होता. ते सगळेच समाधानाने घरी जायला निघाले. घरी जायच्या आधी ते सगळेच पोलीस स्टेशनला गेले. साईराजने न्यायालयाच्या आदेशाची प्रत तिथे जमा केली. तस तर त्या आदेशाची प्रत न्यायालयाकडून पोलीसस्टेशनला पुरवली जाते. पण साईराजने ते काम स्वतःच्या हस्ते केलं होत.

साटम तिथे आधीच पोहोचलेले होते. या सगळ्यांनाच बघून ते हलकेच गालात हसले.

"एक मिनीट." साटमना काहीतरी आठवलं. त्यांनी प्रसादकडे पाहील तर त्याच्या हाताला बांधलेल शेवटचं प्लासटर ही दिसत नव्हतं. "तु तर हॉस्पिटलमध्ये ॲडमीट आहेस ना?"

"दिला की त्याला डिसचार्ज मी." अभिन तो-यात बोलला.

मग साटम यांना समजलं की फक्त प्रसादला जेलमधूये जाव लागू नये म्हणुन नावलाच त्येला प्लास्टर केलेल होत. तस साटमनी या सगळ्यांनाच हात जोडले.

“असे मित्र प्रत्येकाला मिळो.” साटम आदेशाची प्रत हातात घेत बोलले. “मॅडम आता तरी आम्ही मोकळे झालो ना?” साटम परीकडे बघत बोलले.

तशी परी खुदकन हसली होती. तिने आल्यापासून या सगळ्यांनाच कामाला लावलेलं होत.

“बोलली होती ना मी.” परी मंद स्मित करत बोलली. “फक्त एकाच केस साठी आली होती. आता तुम्ही मोकळे.”

“काय?” सरला आश्चर्याने बोलल्या. “फक्त एकाच केस साठी एवढ्या लोकांना कामाला लावले.”

मग परी अजूनच हसली. मग चेहऱ्यावर सुंदर अस स्मित घेत सगळेच घरी पोहोचले. सोनीया आणि ऋतुजाने पटकन चहा नाश्ता करायला सुरवात केली. बाकीच्यांनी पटकन फ्रेश होऊन घेतलं. आता सगळेच निवांत बसले होते. हसत खेळत गप्पा चालु झाल्या होत्या. आजोबा भरल्या डोळ्यांनी त्यांचा उभारलेला हा संसार कौतुकाने बघत होते.

थोड्याचवेळात सोनीया आणि ऋतुजा चहा आणि गरमागरम कांदाभजी घेऊन आले. त्यावर ताव मारता मारता दुपार उलटून गेली. त्यानंतर परी, मायकल, विद्या आणि अभिन त्यांच्या घरी जायला निघाले.

परी आणि प्रसाद या दोघांचे बरेचसे नजरेचे खेळ चालु होते. ते सरलांनी बरोबर हेरले होते. ते सगळेच निघत असताना सरला परीजवळ गेल्या. त्यांनी तिचे हात आपल्या हातात घेतले. ते बघून परी गोंधळून गेली.

“मागे मीच तुला प्रसादच्या आयुष्यातून जायला सांगीतलं होत.” सरला हळव्या झाल्या. “पण आज मीच तुला परत बोलवत आहे.”

सरलांच वाक्य ऐकुन सगळेच शॉकमध्ये गेले. परीच ह्रदय ही लागलीच भरून आलं. खूप मुश्किलीने तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि बोलायला सुरवात केली.

“मला ही आवडलं असत.” परी “पण….” परी बोलता बोलता थांबली.

“पण काय?” सरलांना खूपच टेन्शन आलं.

“आई बाबांनी मुलगा बघीतला आहे.” परी प्रसादवर तिरका कटाक्ष टाकत बोलली. “फक्त माझी घरी यायची वाट बघत आहे.”

परत सगळ्यांनाच धक्का बसला.

“नको गं बोलूस अस.” सरला हवालदिल झाल्या. “माझा मुलगा परत तुटेल गं.”

“नको काळजी करू आई.” प्रसाद हलकेच हसत बोलला. “मागच्या वेळेस तिने माझी अडचण सोडवली होती. मग आज मी तिची अडचण सोडवतोय. तिला जाऊ दे.”

प्रसादच्या बोलण्यावर आता मायकल, विद्या, अभिन आणि साईराज चांगलेच चिडले. एवढचं काय? सोनीया आणि ऋतुजा ही चिडून परीला बघू लागल्या. मयंक फक्त गोंधळून बघत राहीला होता.

विमलासाठी पण हा धक्काच होता. कारण तिच्या भावाने विमलांना याबद्दल काहीच सांगीतलेल नव्हतं. त्या देखील ऋतुजाच्या वडिलांकडे बघत राहील्या. पण त्यांना ही याबद्दल काहीच कल्पना नव्हती.

“बाळा परत एकदा विचार कर.” आजोबा परी आणि प्रसादकडे बघत बोलले.

“मागे जे झाल. ते ऐकुन त्याना खूपच वाईट वाटलं.” परी तिचे येणारे अश्रु हातानेच परत ढकलायचा प्रयत्न करत बोलली. “मग त्यांनीच आता मुलगा शोधलेला आहे. ते नाही ऐकणार आता.”

“तु फक्त हो बोल.” साईराज जरा कडक आवाजात बोलला. “उद्याच्या उद्या दोघांच लग्न लावुन देतो.”

“अस नाही चालत रे.” प्रसाद “लग्न म्हणजे दोन कुटूंबाच मिलन असतं. अस जबरदस्ती करून कोणतही नात टिकत नाही. तिला जाऊ दे. नका अडवू तिला.” एवढं बोलुन प्रसाद त्याच्या रूमकडे चालला गेला.

त्याला जाताना बघून परीच मन ही खूप तुटायला लागलं. मग ती ही पटकन तिथून बाहेर पडली. तिची गाडी सोबत आलेलीच होती. त्यात बघून ती तिच्या क्वाटर्सकडे निघून गेली.

आता बाकी सगळेच एकमेकांकडे बघत राहीले.

“माझा मुलगा परत असा तुटलेला मला चालणार नाही.” सरला सगळ्या ग्रुपकडे बघत जरा ओरडूनच बोलल्या. नंतर आजोबांवर ही नजर टाकली.

त्यानंतरचा अर्धा तास त्यांची खलबत चालु राहीली होती. त्यानंतर ऋतूजाला परीचा फोन आला की ती आज रात्रीच तिच्या घरी निघून जाणार आहे. मग परत पुढचा अर्धा तास चर्चा झाली.

दुसर्‍याच दिवशी परत एक न्यूज झळाकायला सुरवात झाली. पण टिव्हीवर नाही हं, तर मोबाईलवर.

“आपल्या मुलाला एक मुलगी आवडली म्हणुन मुलाच्या आईने त्या मुलीला किडनॅप केल.”

हा मेसेज परीच्या आईच्या मोबाईलवर झळकला आणि परीच्या घरी एकच कल्लोळ उठला. परीच्या आईने तसाच विमलांना फोन लावला.

“अहो वन्स प्रसादच्या आईने आमची मुलगी पळवली.” परीची आई टेन्शनमध्ये बोलल्या.

“हो माहिती आहे मला.” विमला तोऱ्यात बोलल्या.

“काय?” परीची आई आश्चर्याने बोलल्या.

काल परी आणि प्रसाद एकमेकांना सोडून देण्याचा विचार करून तिथून निघून गेल्यावर सरला चांगल्याच चिडल्या. त्याच काय? तिथे उपस्थित सगळेच दोघांवर चिडलेले होते. मग त्यांनी आजोबांकडे पाहीलं. त्यांनीही हसतच परवानगी दिली आणि त्यांची पर खलबत सुरू झाली.

परी पहाटेच तिच्या घरी पोहोचली होती. तिच्या मागे दोन तासांनी सगळीच तरुणाई तिच्या घराजवळ जाऊन पोहोचली. ऋतुजा, रिया आणि सोनिया परीच्या घरात गेले. तर बाकी जरा लांब उभे राहीले.

या तिघींना अचानक घरी आलेल बघून परी या तिघींना बारिक डोळे करून बघू लागली. तिच पोलीस डोक लगेच चालु झालं. पण या तिघींच्या प्रेमळ गप्पांना परीच काय? तिच्या घरातले सगळेच भुलले. रिया आणि सोनीया परीच्या आई बाबांसोबत बोलत राहीले. ऋतुजा परीसोबत तिच्या रूममध्ये गेली.

आता परीला सगळचं विचीत्र वाटायला लागलं होत.

“काय किडे करण्याच्या प्रयत्नात आहात?” परी संशयाने ऋतुजाकडे बघत बोलली.

“मी आणि किडे??” ऋतुजा ओठ बाहेर काढून बोलली. “ते ही द ग्रेट ऑफीसर भैरवी विरुध्द.”

आता तर परीचा संशय आणखीनच बळावला. ती अजूनच बारीक डोळे करून ऋतुजाला बघू लागली. तेवढ्यातच परीच्या बेडरुमच्या खिडकीतून जोरदार शिट्टी वाजायचा आवाज आला. तशी ऋतुजा सावध झाली. परीला तिचा संशय खरा वाटायला लागला.

“खरं सांगतेस का मार खायचा आहे?” परी कडक आवाजात बोलली.

“सांगते ना.” ऋतुजाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक परीला दिसत होती. “सॉरी दी. तुमच्या दोघांना एकत्र करण्यासाठी मला हे करावचं लागत आहे.”

“म्हणजे?” परी गोंधळून बोलली.

"तुझ्यासाठी स्पेशल परफ्युम."एवढं बोलून ऋतूजाने तेवढ्यातच तिच्या चेहर्‍यावर विद्याने स्पेशल तयार केलेला एक स्प्रे मारला.

“ऋतु.” परी डोळे पुसत बोलली. “काय मारलंस मला?”

ऋतूजाच्या जागी दूसर कोणी असतं. तर परी आधीच सावध राहीली असती. पण ऋतुजा तिची लाडकी बहीण होती. म्हणुन ती बेसावध होती. यासाठी ऋतुजाला हे काम करायला दिल होत. पुढच्याच क्षणाला परी बेशुद्ध पडली. ऋतुजाने तिला निट बेशुद्ध झालेल पाहील आणि तिच्या बेडरुमच्या खिडकीतून खाली उभे असलेले मायकल, अभिन आणि मयंक ह्या तिघांना इशारा केला. तसे ते पाईपावरून बेडरूममध्ये आले. मायकलने तिला उचलून घेतलं आणि आलेल्या खिडकीतून ते सगळेच पसार झाले. ऋतुजा ही पटकन खाली हॉलमध्ये आली. सोनीया आणि रियाला काम झाल्याचा इशारा केला.

तशा त्या तिघी ही परीच्या आई वडीलांचा निरोप घेत तिथून निघाल्या. परीचे आई वडील गोंधळून गेले होते. ह्या तिघी अशा अचानक उगवल्या काय? आणि अशाच अचानक पसार झाल्या काय?? त्यांना काहीच समजत नव्हतं.

थोड्याचवेळात सरलांनी परीच्या आईच्या मोबाईलवर ती न्युज टाकली. तो मेसेज वाचून परीची आई लागलीच परीच्या बेडरूममध्ये गेली. तिथे ती दिसली नाही म्हणुन लगेच त्यांनी विमलांना फोन लावला होता.

“त्यांच एकमेकांवर प्रेम आहे माहीत नव्हतं का तुम्हाला?” विमला जरा चिडून बोलल्या. "लगेच दुसरा मुलगा पाहीला? आम्हाला पण सांगास वाटलं नाही?"

“माहीती होत.” परीची आई “म्हणुनच तर त्याच्याच घरी परीसाठी मागणी घालायला जाणार होतो.”

“काय?” आता धक्का लागायची पाळी विमलांची होती.

“हो, परी बोलली नाही का?” परीची आई गोंधळून बोलल्या.

“नाही.” विमला “म्हणुन तर एवढा खटाटोप केला.”

तसा परीच्या आईने डोक्यालाच हात लावला. “असु दे आता. ति तिच्या सासरीच असेल ना आता? आम्हीच आलोच उद्या.”

“हो, इथेच आहे.” विमला आता हसतच बोलल्या. “झोपलेली आहे अजून. ऋतु आणि सोनीया दोघी लपून बसल्या आहेत तिला घाबरून.”

तशी परीची आई पण हसली. “मग विचारायचं ना आधी. आता म्हणा भोगा आपल्या कर्माची फळ.” आता मात्र दोघी खळखळुन हसल्या होत्या.

विमलांनी फोन ठेवला ही तेवढ्यातच ऋतूजा आणि सोनिया पुढे पळत येताना दिसल्या. तर परी दोघींच्यामागे काठी घेऊन येत होती.

“आईऽऽऽऽऽ.” ऋतुजा हसत ही होती आणि घाबरत ही होती. ती विमलांच्या भोवती गोल गोल फिरायला लागली. तिच्या मागे सोनिया आणि त्या दोघींच्या मागे परी.

“एवढ्या मोठ्या झालात की” परी चिडून बोलत होती. “मला किडनॅप केलत? तुम्हाला सोडतच नसते आता.”

“आई सांगा ना.” ऋतुजा “तुमची प्लॅनिंग सगळी आणि मार फक्त मिच खाऊ?”

"मी पण." सोनीया मध्येच बडबडला.

आता परी दचकून थांबली. “आत्तु तु पण?” परीने बारीक तोंड केल.

“मग कशी बोलली होतीस?” विमला चिडून बोलल्या. “प्रसादला पाहील होत? कसा चेहरा झाला होता त्याचा?”

“अगं आत्तु.” परी डोक्याला हात लावत बोलली. “सरप्राईज द्यायचं होत. पण तुम्ही सगळाच बट्ट्याबोळ केला.”

“मग किमान तुमच्या ग्रूपला तरी सांगायचं.” ऋतुजा “बिचारे तुला उचलून दमून गेले.”

“ग्रूप?” परी “म्हणजे? सगळेच आले होते?”

तस विमलांनी होकारात मान हलवली आणि परीने अजूनच डोक्याला हात लावला. तिन तासांनी परीचे आई वडील तिथे येऊन पोहोचले. झालेली सगळीच घटना ऐकुन तिथे फक्त हास्याचे कारंजे उडायला लागले होते.

“लवकर उरकून घेऊ.” परीचे वडील “नाहीतर अजून कोणीतरी काहीतरी करायचं.”

तसे परत सगळे हसले. दोघांची सुपारी फोडण्यात आली. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ही ठरवली गेली. तिथून परी आणि प्रसाद सोडून सगळेच लग्न आणि साखरपुड्याची तयारीची तयारी करायला लागले होते.

पण आपले हे लव्ह बर्ड्स मात्र त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे तलावाच्या काठी जाऊन बसले होते. जिथून ते वेगळे झाले होते. आज तिथूनच त्यांना एकत्र यायच होत.

“सॉरी रे.” परी प्रसादचा हात हातात घेत बोलली. “तुला सरप्राईज द्यायचं होत. पण बाकीच्यांनी सगळीच वाट लावली.”

“असु दे गं.” प्रसाद “आपल्यासाठीच करत होते ना ते. आता नाही सोडणार ना मला?”

“नाही रे.” परी प्रसादच्या कुशीत शिरत बोलली.

“बरं.” प्रसादने तिच्या केसांवर किस केल. “मग ऋतु आणि मयंकसाठी घरच्यांना मनवशील ना?”

“मी नाही म्हटलं तरी तु ते सोडणार आहेस का?” परी लटक्या रागात बोलली.

तसे ते दोघेही हसले.

काहीच दिवसांनी परी आणि प्रसादचा साखरपुडा उरकून घेतला गेला. त्याच्या काही दिवसांनी लग्न ही उरकून घेतलं गेल. या दोघांच्या लग्नाला साटम आणि साळवे ही जातीनं हजर राहीले होते. अगदी मिस्टर अधीकारी ही आलेले होते.

मध्यंतरी विद्युत उपकरण कायदेशीर रित्या प्रसादच्या नावे झाल्याने भारतातल्या ब-याचश्या कंपन्यांनी प्रसादला ऑफर दिली. त्यापैकी प्रसादच्या सर्व अटी मान्य असलेल्या कंपनीसोबत प्रसादने करार केला होता. त्यामुळे प्रसाद बराच प्रसिद्ध झाला होता. म्हणूनच लग्नाला खूप सारी गर्दी झालेली होती. अगदी धुमधडाक्यात दोघांच लग्न लावुन दिल गेलं.

इतकी वर्ष लांब राहीलेले हे वेडे, शेवटी एक झालेच. अपराधापासुन मुक्त होऊन, तत्त्वांना जपून त्यांना त्यांच्या कर्माच्या हिशोबाने त्यांना एकत्र आणलं गेल होत.

समाप्त.

कशी वाटली कथा? कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेत.

🎭 Series Post

View all