अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ५

“खरं तर मी पण वैतागली आहे तुमच्या दादाला.” परी तोंड वाकड करत बोलली. “आँ?” ऋतुजा आणि सोनिया एकत्रच आश्चर्यचकित झाल्या. तिकडे प्रसादही घाबरला होता.
मागील भागात.

ऋतुजाही तिच आवरुन परत हॉस्पिटलकडे निघुन गेली होती. सुमारे तासाभराने परी तिच्या जुन्या आठवणींच्या ठिकाणी पोहोचली होती.

हिच तर ति जागा होती जिथे पहील्यांदाच तिने त्याला पाहील होत. ती नेहमीच तिच्या आत्याकडे म्हणजेच विमलांकडे येत होती. याच मैदानातून आत्याच्या घरी जाताना क्रिकेट खेळणारा प्रसाद तिला दिसला होता. आताही तिला त्याचा तेव्हाचा निरागस चेहरा तिला आठवला होता.

‘जो मुलगा साधा उंदीर मारायला ही घाबरत होता. त्यानेच एका सरकारी अधीका-याचा....’ ही गोष्टच तिला पटत नव्हती. ‘त्यात एवढी माणसं आगीमुळे दुखापत झाली. कसा काढु तुला यातून प्रसाद?’ परी मनातच विचार करत होती.

मैदानातून चालता चालता ती त्याच्या समोरच्या चाळीत पोहोचली आणि भूतकाळात हरवली होती.

आता पुढे.

(भुतकाळ.)

आठवीची परीक्षा संपुन सुट्ट्या लागल्या होत्या. ह्यावर्षी पण आत्याच्या घरी यायला मिळाल म्हणुन परी आनंदात होती. गाडीतुन उतरताच परी पटापट तिच्या आत्याच्या घरी जाऊ लागली होती. तिचे आई वडील तिला थांबवुन बघत होते. पण ती खुपच घाई घाईत चालली होती. तिला अस जाताना बघुन तिचे आई वडील नकारार्थी मान हलवत हलकाच हसले होते.

परी चाललीच होती की तेवढ्यातच पाठीमागुन एक बॉल तिच्या हाताला लागुन गेला. तस तिने चिडुन मागे पाहील तर काही मुल क्रिकेट खेळत होती. त्यात तो पण होता ज्याला बघण्याच्या ओढीने ती तिच्या आत्याकडे आली होती. बॅटही नेमकी त्याच्याच हातात होती. मग परी मुद्दाम रागाने बघु लागली. हाताला लागुन गेलेला बॉलही तिने हातात उचलुन घेतला होता.

ते बघुन तो परीच्या जवळ आला. त्याला येताना बघुन परी त्याच्यातच हरवली होती. आता दिसायला चांगलाच उंचापुरा झाला होता. तब्येतीत ही खुप चांगली प्रगती केलेली होती. खुपच हॅन्डसम दिसायला लागला होता.

“दे ना पापा की परी.” तिला आवाज आला तशी ती त्याच्याकडे गाल फुगवुन बघायला लागली.

“एवढ्या दिवसांनी भेटली तर अस बोलणार प्रसाद?” परी लटक्या रागात बोलली.

“सॉरी बाबा.” प्रसाद घमाने चांगलाच भिजलेला होता. त्यामुळे टीशर्ट त्याच्या पिळदार शरीरयष्टीला चांगलाच चिटकून बसलेला होता.

“चल घे.” परी त्याच्याकडे बॉल टाकत बोलली. नंतर प्रसादला सुंदर स्मित करुन तोऱ्यातच आत्याच्या घरी पळाली होती.

तिच्या या अदेला प्रसाद बघतच राहीला होता. शेवटी बाकी मुलांनी आवाज दिल्यावर तो त्याच्या विचारातुन बाहेर आला आणि परत खेळायला पळाला होता.

त्याच दिवशी संध्याकाळी समोरासमोरच्या चाळीच्या मधल्या भागात बैठी खेळंचा फड रंगला होता. त्यात प्रसाद, सोनिया, ऋतुजा, परी, मायकल, साई, विद्या आणि अभिनव हे सगळेच जमले होते. दरवर्षी हा ग्रुप जमत होता आणि पुर्ण मे महीना चाळीत धुमाकुळ घालत रहात होता. अशा खेळा खेळात परीला प्रसाद आणि प्रसादला परी आवडायला लागली होती.

ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांचा हा नजरेचा खेळ चालु होता. ग्रॅज्युएशनची परीक्षा संपली तस प्रसादला परीच्या भेटीची ओढ लागली होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा परी ऋतुजाच्या घरी येणार होती. प्रसाद ऋतुजाच्या कामासाठी तिला घेऊन कॉलेजला गेलेला होता. जसजसा वेळ होत चालला होता. तसतसा प्रसादचा जीव खालील होऊ लागला होता. तो आता तर ऋतुजाच्या मागेच लागला होता.

“ऋतुजा आवर ना यार लवकर.” प्रसाद वैतागुन बोलला.

“हो रे. जरा दम धर ना.” ऋतुजा ही तितकीच वैतागुन बोलली. “माहितीये मला, तुला कसली घाई झाली आहे ती. वेळ आहे अजुन तिला यायला.” ऋतुजा प्रसादाला घाई करण्याला वैतागली होती.

“एवढी कशाला चिडतेस.” प्रसादनेही तोंड वाकडं केल होत. “जेव्हा गरज होती. तेव्हा दादा-दादा करत होती. आता मला गरज आहे तर लगेच भाव खायला लागी.”

प्रसादने तोंड बारीक केल होत. तसा ऋतुजाने दिर्घ श्वास घेतला. तिच्या क्लासरुमधला राग त्याच्यावर काढला गेला होता.

“नको नाटकं करुस.” ऋतुजा प्रसादजवळ जात बोलली. “झालय माझ. चल आता.”

मग दोघेही पटकन घरी जायला निघाले होते. प्रसाद आज त्याची बाईक जरा फास्टच चालवत होता.

“ऐ बाबा. तुला तुझी नसेल काळजी. पण मला माझी आहे. हळु चालव जरा. नाहीतर तुझी स्पीड काकुंपर्यंत पोहोचली समज.” ऋतुजाने प्रसादाला दम दिला.

तस प्रसादने नाखुशीनेच गाडीची स्पीड कमी केली होती. तरीही अर्ध्या तासातच ते घरी पोहोचले होते. पण प्रसादचा मुडच ऑफ झाला होता. तर ऋतुजाला आता हसायला आल होत. कारण ऋतुजाचे पाहुणे अजुन काही पोहोचलेलेच नव्हते. तिकडे प्रसादची बहीण सोनिया आणि ऋतुजाची बहीण रिया या दोघीही प्रसादला बघुन हसायला लागल्या होत्या.

तेवढ्यातच गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तशी प्रसादची कळी खुलली होती. पाहुण्यांची गाडी येऊन पोहोचली. ऋतुजाची मामी, त्यांचा छोटा मुलगा उतरला होता. ड्राईव्हर साईडने ऋतुजाचे मामा उतरले होते. पण प्रसादाला ती काही दिसली नाही. मग तो हिरमुसला होता. तिकडे ऋतुजाही टेन्शनमध्येच आली होती. कारण ती जर आली नाही तर प्रसाद ऋतुजाच वर्षभर डोक खात राहीला असता. याची ऋतुजाला खात्रीच होती.

प्रसाद आता निराश होऊ लागला होता. तेवढ्यात गाडीच्या दुसर्‍या बाजुचा मागचा दरवाजा उघडला गेला. ती गाडीच्या त्या बाजुला असल्याने ती तर काही त्याला दिसली नाही. पण तिचे जमिनीवर टेकलेले पाय त्याने लगेच ओळखले होते. ती तिची ओढणी सावरत गाडीच्या दुसर्‍या बाजुने पुढुन निघाली. बस तिची ती अदा पाहुन आपले प्रसाद साहेब फ्रिज झाले होते. तो एकटक तिला बघत राहीला होता. शेवटी सोनिया पुढे आली आणि तिचे हळुच प्रसादाला कमरेत चिमटा काढला होता. मग तो वास्तवात आला. त्या घाबरुन इकडे तिकडे पाहिल. कोणी बघीतल तर नाही याची खात्री केली.

पण त्याची ती नजर तर तिने कधीच पाहिली होती. प्रसादच मन तिला कधीच जाणवलं होत. तीच ऋतुजाकडे येण हे फक्त त्याच्यासाठीच असायच. ती फक्त त्याच्या बोलण्याची वाट बघत होती आणि एक तो होता की जो मन मोकळ करायला तयारच नव्हता. म्हणून ती जरा गाडीतुन उशीराच उतरली होती. त्या आधी ती गाडीत बसुनच प्रसादची गम्मतच बघत होती.

गाडीतून उतरल्यावर तिरप्या नजरेनेच तिने प्रसादला पाहिल होत. तिची ती तिरकी नजर ऋतुजाच्या नजरेतून सुटली नव्हती. जशी परी ऋतुजाला भेटली तशी ती परीच्या कानात बोलली.

“कशाला त्रास देतेस गं माझ्या दादाला?” ऋतुजा

“तुझा दादा मला त्रास देतो. ते नाही दिसत तुला?” परी गालात हसतच बोलली.

मग सगळेच घरात गेले होते. तर प्रसाद त्याच्या घरी गेला होता. सोनिया मात्र ऋतुजाला मदत म्हणून तिथेच थांबलेली होती.

प्रसाद तर आता पाहुण्यांची त्यांच्या घरी यायची वाट बघत होता. संध्याकाळी बऱ्याच उशीरानेच ते सगळे प्रसादाच्या घरी आलेले होते. सगळी मोठी माणस हॉलमध्ये बसलेली होती. तर सगळी तरुणाई दर वर्षीप्रमाणे प्रसादाच्या खोलीत गेली होती. मग बऱ्याच गप्पांना उधाण आलेले होते.

थोड्यावेळाने ऋतुजाने सगळ्यांनाच शांत केल आणि प्रसादकडे पाहील.

“हे बघ. आता तुझं खुप झाल.” ऋतुजा वैतागुन बोलली होती. प्रसाद आणि परीचा कधीचा डोळ्यांचा खेळ चालु होता. ते दोघेही काहीच बोलत नाही ते बघुन ऋतुजा वैतागुन बोलली होती. “तुमच काय आहे ते आत्ताच क्लिअर करुन घ्या.” ऋतुजा

“हा नाहीतर काय?” सोनियाने ही ऋतुजाच्या वाक्याला सुर मिसळला.

“खरं तर मी पण वैतागली आहे तुमच्या दादाला.” परी पण तोंड वाकड करत बोलली.

“आँ?” ऋतुजा आणि सोनिया एकत्रच आश्चर्यचकित झाल्या. तर दुसरीकडे प्रसादही घाबरला होता.

“मग काय? रिया जवळ कधीचा निरोप दिलाय त्याच्यासाठी पण काही बोलेल तर शप्पथ.” परी प्रसादकडे आठ्या पाडुन बघत बोलली.

मग सगळे रियाकडे बघायला लागले. तिला ज्याची भिती होती तेच झाल. ती नेहमीप्रमाणे परीचा निरोप द्यायला विसरलेली होती. त्यामुळे रिया आता चांगलीच घाबरली होती. तिला आता या तिघी खुप भांडतील अस वाटल होत. त्यासाठी तिने तिच्या मनाची तयारी पण केलेली होती.

पण झाल उलटच. ऋतुजा आणि सोनिया जोरजोरात नाचायला लागल्या होत्या. तर प्रसाद अजुनही विचित्र नजरेने या दोघींकडे बघत होता. त्याला अजुनही काहीच समजल नव्हतं. म्हणुन दोघींनी डोक्याला हात लावला.

“आता यात माझी काय चुक?” परी प्रसादकडे कटाक्ष टाकुन बोलली.

“बघ बाई.” सोनीया “आता तुलाच झेलायच आहे.”

सोनीया आणि ऋतुजा हसायला लागल्या होत्या. तर प्रसादची आत्ताशी ट्युब पेटली होती. आता चिडवा चिडवीला उत आला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर बाकी सगळी मंडळी ऋतुजच्या घरी परतली होती. तिथुन निघताना प्रसादने परीला हलकेच मिठीत घेतल होत. यानंतर त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरवात झालेली होती.

बघता बघता त्यांच्या चाळीतल्या ग्रुपला ही यांच्या प्रेमाची खबर लागली होती. तस त्या सगळ्यांनी देखील “आमचा अंदाज कसा खरा झाला?” इथून चिडवायला सुरुवात केली होती. सोबत खेळताना सर्व मूल या दोघांना चिडवायची एकही संधी सोडत नव्हते. सुट्टी संपुन घरी परतण्याची वेळ आल्यावर परीचे डोळे इतर वेळेस पेक्षा जरा जास्तच भरुन आले होते.

“तु तर अशी करत आहेस जस काय आत्ताच तुझी विदाई चालु आहे.” विद्या हळुच परीच्या कानात बोलली होती. सकाळी हा सगळा ग्रुप त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी एकत्र आलेले होते.

“गप ना.” परी तिच नाक वर ओढुन बोलली. तिचा तो क्युटपणा बघुन सगळ्यांनाच हलकाच हसु आल होते.

“अस काय करत आहेस?” प्रसाद परीचा हात पकडुन बोलला. “फोन तर आहेच ना. तरी वाटलं भेटावे की मी येत जाईल. नको काळजी करु.”

“आवर स्वतःला.” अभिनव मागुन येणाऱ्या मोठ्या मंडळीकडे बघत बोलला. “नाहीतर आत्ताच जर तुमच प्रकरण समजल ना. तर तुझी कायमची विदाई होईल.”

तसा अभिनवच्या पाठीत एक बुक्कीच पडली. परीने जोरात त्याच्या पाठीवर मारलं होत. तसा अभिनव खुपच कळवळला होता.

“अगं! तुझा हात आहे की मस्करी.” अभिनव पाठ चोळत बोलला. “किती जोरात लागलं.”

“काय झाल?” परीने वडील तिथे येत बोलले. तसे सगळेच गडबडले होते.

“काही नाही अभिनव परीला पापा की परी म्हणुन चिडवत होता.” साईने नेहमीप्रमाणेच शब्दांच जाळ फेकलं. “मग परी माहीती आहे ना कशी मारते?” साई हसतच बोलला.

“हा, ते तर आहेच.” परीचे वडील “चल बेटा निघायचं ना?” पलीकडे बघत बोलले.

तशी परी हळुच तिची नजर प्रसादवर टाकुन तिथुन निघाली होती. ऋतुजा, सोनीया, रिया तिला सोडायला गाडीपर्यंत गेल्या होत्या. प्रसादची तर हिम्मतच झाली नव्हती तिला निरोप द्यायची. तो लांबूनच तिची गाडी दिसेनाशी होईपर्यंत तिला बघत राहीला होता. मग सगळेच आप आपल्या जरी परतले होता.

परी तिच्या घरी परतल्यावर आता प्रसादसोबत फोनवर बोलु लागली होती. दोघांनाही भेटायची इच्छा झालीच तर दोघांसाठी मध्य ठरेल अशा ठिकाणी ते भेटत होते. मोठी माणस सध्यातरी या गोष्टीपासून अनभिज्ञ होते. पण बाकी मुलांनी त्यांना चिडवुन हैराण केल होत. फक्त प्रसादच्या आजोबांना ते बरोबर माहीती पडलं होत. अनुभवी नजर ती, तिच्या पासुन लपुन तरी काय राहु शकते? मग एके दिवशी त्यांनी प्रसादला रंगहात पकडल होत. आधीपासून एकमेकांचे क्राईम पार्टनर होते. मग ह्या गोष्टीतही आज ते गुपचिळी करुन राहीले होते.

सगळं काही सुरळीत चालु होत. पण सुखाची दिवाळी साजरी केल्यानंतर दुखाःची एक सर येतेच की.


क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरु नका.

🎭 Series Post

View all