अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १०

“सरळ सांग ना की खड्ड्यात जाऊन उडी मार.” मयंक ही जरा चिडून बोलला. “जे समजायचं आहे ते समज.” ऋतुजा आता गंभीर झाली. “नाहीतर मला विसर.” ती बोलली आणि प्रसादकडे चालली गेली.
मागील भागात.

थोड्याचवेळात त्या डिएसपी ऑफीसमध्ये एकच धावपळ सुरू झाली. नवनियुक्त जिल्हा प्रमुख तिथे येत असल्याची बातमी मिळाली होती. ति तिथे येणार हे डिएसपी साहेबांना माहीतीच होत. पण.एवढ्या लवकर येईल हे माहीती नव्हतं. तर दुसरीकडे साळवेंना ती येणार याची खात्रीच होती. तिला हॉस्पीटलमध्ये मोबाईलवर कडाडताना बघूनच ती फक्त याचं केस साठी आली आहे याची जाणीव त्यांना झाली होती.

काही वेळातच भैरवी तिथून येऊन पोहोचली होती. ती डायरेक्ट डिएसपी साहेबांच्या ऑफीसकडे गेली. त्या दिवशी तर पंजाबी ड्रेसमध्ये होती. पण आज कडक युनिफॉर्म मध्ये होती. ती ऑफीसमध्ये जाऊन मुख्य खुर्चीवर विसावली. आजुबाजुला डिएसपी साहेब, साटम, साळवे आणि इतर पोलीस अधीकारी होतेच.

तिने डिएसपी साहेब, साटम आणि साळवे या तिघांवर नजर टाकली आणि बघुन बघून बोलली. “तुम्ही जाऊ शकता.” तसा बाकीच्यांच स्टाफ त्या ऑफीसमधून बाहेर पडला.

“आता इथे आपलीच माणसं आहेत.” भैरवी “अस समजून ना मी?” ती तिघांवर नजर टाकत बोलली.

“काय साळवे?” भैरवी तिची भेदक नजर त्यांच्यावर टाकत बोलली. जस काही तिची ओळख आधीच करून तिला आहे ना? अस ती विचारत होती.

“हो मॅडम.” साळवे अदबीने बोलला.

“मॅडम?” भैरवीने तिचे ओठ ताणले. “आज चक्रम नाही बोलणार?” तसे साळवे जरा चमकलेच. तिकडे डिएसपी साहेब आणि साटमला ही ठसका लागता लागता राहीला होता.

आता पुढे.

“काय मॅडम?” साळवे चाचरतचं बोलला. “मी असं का बोलेल?”

“काय करता साळवे?” भैरवी हलकेच हसत बोलली. “साध राहील का लोक डोक्यावर बसतात ना.”

तसे साळवे जबरदस्ती हसले होते.

“मी इथे फक्त एकाच केस साठी आली आहे.” भैरवीने तिचा हेतु स्पष्ट केला. “बाकी तुम्ही काय करता? याच्याशी मला काही देण घेण नाही. मी तुमच्या रस्तात येणार नाही आणि तुम्ही माझ्या रस्त्यात येऊ नका. कोणी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की त्याच्याकडे मी बघेल. पण ह्या केसचा तपास पुर्ण पारदर्शक करा. तो गुन्हेगार आढळलाच तर बिनधास्त त्याला फासावर लटकवा.”

“हा आणि तुम्ही त्याला लटकु द्याल.” साळवे हळुच नकारार्थी मान हलवत बोलले.

“किती अचूक ओळखता ना मला साळवे.” भैरवी सुचक हसत बोलली. तस बाकीच्यांना अजूनच टेन्शन आलं होत.

नंतर तिने या केसबद्दल काही सुचना केल्या आणि बराच वेळ ह्या केसबद्दल चर्चा करत राहीली होती.

दुसरीकडे हॉस्पीटलच्या गेट बाहेर.

“अरे पण ऐक ना.” ऋतुजा मयंकला आवाज देत होती. पण तो थांबायलाच तयार नव्हता. तो ही आज प्रसादला बघायला आला होता. पण आजची न्युज बघून त्याला टेन्शन आलं होत. तो खूपच घाबरलेला होता.

“अरे झालं काय ते तर सांगशील?” ऋतुजाने मयंकच्या हाताला पकडून जवळ जवळ त्याला ओढलचं होत.

“काय सांगु?” मयंक “सांगीतल तर तुम्ही पाहीजे.”

“काय सांगायला पाहीजे?” ऋतुजा गोंधळून बोलत होती.

“लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना?” मयंक “मग तुम्हाला नव्हते दिसले का?”

“लहान बाळ? पाळणा?” मयंकच अस गोंधळून टाकणारे वाक्य बघून ती पण गोंधळून गेली होती. “काय बोलत आहेस तु?”

“कोणाच नाव परी ठेवायचं असतं ऋतु?” मयंक

ऋतुजाच्या तोंडातून आजवर परी नावाच पुराण खूप ऐकल होत. त्यावरून त्याने परी म्हणजे एखादी गोड मुलगी असा समज करून घेतला होता. पण आज जेव्हा टिव्हीवर प्रत्यक्ष तिने तिच्या परीला दाखवलं होत. तस मयंकने गालाला हात लावून तिथुन पटकन प्रस्थान केल होत.

“नाव ठेवताना काही वाटलं नाही का तुम्हाला?’ मयंक

“का असं वाटायला? हवं छान तर नाव आहे.” ऋतुजा

“कुठल्या अँगलने ती तुम्हाला परी दिसते?” मयंक चिडून बोलला. “चार कानाखाली वाजल्यानंतर जी विचारते की काय झाल? ती परी असते का? तिच नाव ना चंडिका, दुर्गा, काली असं असायला हवं होत.”

“हो ताईच खरं नाव भैरवी आहे.” ऋतुजाला आता मयंक कोणाबद्दल बोलत आहे ते कळलं होत. “आयपीएस ऑफीसर आहे. आजच ह्या जिल्ह्य़ात बदली झाली आहे तिची.”

“पाहील नाव मी टिव्ही वर.” मयंक “तिच्या टोपणनावाबद्दल बोलत आहे. काय तर म्हणे परी.” मयंक अजुनच चिडून बोलला.

तसा त्याचा हात जोरात पिळला गेला. “ताईबद्दल काही बोलायचं नाही हं. आधीच सांगते.” आता ऋतुजा ही चिडून बोलली. “आणि तुला असं घाबरायला काय झाल?”

“परवाच तिच्या हातच्या चार कानाखाली खाल्या आहेत त्याने.” मयंकचा मित्र तिथे बाईक घेऊन येत बोलला. मयंकनेच त्याला पटकन यायला सांगितलेलं होत. त्याने आल्या आल्या मयंकच बोलण ऐकलं आणि हसत सुटला होता.

“काय?” ऋतुजा गोंधळून बोलली.

“अगं त्या दिवशी दोन मुलांची मारामारी चालली होती.” मयंकचा मित्र बोलू लागला. “तर हा नेहमीप्रमाणेच शांतिदुत बनून मध्ये पडला. तरी ते मुल ऐकत नव्हते. तेव्हाच ताई पण तिकडून चालली होती. ती तिथे गेली आणि त्या दोघांसकट याच्याही कानाखाली मारुन मोकळी झाली. मग तिने विचारलं होत की नक्की का प्रोब्लेम आहे.”

आता ऋतुजाला ही खूप हसायला आलं होत. तस मयंक तिला तोंड पाडून बघू लागला.

“तु तिला एवढं घाबरशील तर तिच्यासमोर माझा हात मागण्यासाठी मदत कशी मागशील?” ऋतुजाने अजून एक बॉम्ब त्याच्यावर टाकला.

“म्हणजे?” मयंक अजूनच घाबरला. “तिच्याकडे मदत? का?”

“घरात तिच्या बोलण्याला खूप किंमत आहे.” ऋतुजा “तिच माझ्या आई बाबांना आपल्या लग्नासाठी मनवू शकते.”

“काय मला वेड लागलं आहे का?” मयंक “वाघीणीच्या गुहेत मला जायला सांगतेस.”

“तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना.” ऋतुजा कडक आवाजात बोलली. “तर तिच्याशी आधी तुला बोलायचं लागेल. तरच तुझ प्रेम खरं आहे अस मी समजेल.”

“सरळ सांग ना की खड्ड्यात जाऊन उडी मार.” मयंक ही जरा चिडून बोलला.

“जे समजायचं आहे ते समज.” ऋतुजा आता गंभीर झाली. “नाहीतर मला विसर.” ती बोलली आणि प्रसादकडे चालली गेली.

ऋतुजाच अस निर्वाणीच बोलण ऐकून मयंक ही स्तब्ध झाला होता. त्याच्या प्रेमावर शंका घेतली हे त्याला आज्जीबात आवडलं नव्हतं.

“ही समजते काय स्वतःला?” मयंक चिडून बोलला.

“हे बघ मयंक.” मयंकचा मित्र “ती तिच्या जागी योग्य आहे. “घरच्यांच्या परवानगीने लग्न करण्यात जी मजा आहे ना ती तुला आता समजणार नाही. तुझ्या बहिणीचा असा काही विषय असता तर ती तुझ्याकडे आलीच असती ना?”

मित्राच्या बोलण्याने चिडलेला मयंक शांत झाला होता.

“खऱ्या प्रेमाला परीक्षा द्यावीच लागते.” मयंकचा मित्र “त्यात तुला खरं उतरायचं आहे. ज्या दिवशी तु उतरलास ना त्या दिवशी सगळ्यात जास्त आनंद माझ्या होणाऱ्या वहीनीलाच होईल.”

वहीनी नाव ऐकुन मयंक जरा लाजला. मग तो ही परीला भेटण्यासाठी तयार झाला होता.

ऋतुजा परत प्रसादजवळ गेली होती. प्रसाद निर्विकार चेहऱ्यानेच नाश्ता करत होता. आजवर त्याने एकही शब्द तोंडातुन काढला नव्हता. अगदी पत्रकारांनाही त्याने नकार दिला होता. त्याच्या मनात काय चाललं आहे? हे कोणालाच समजून येत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की ही वादळापूर्वीची शांतता होती. ज्याच्यावर प्रसादने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. त्यांच्याकडूनच त्याचा विश्वासघात झालेला होता. आता तो त्या घटनेतून मानसीकरित्या बाहेर पडला होता. तसा प्रसाद शांत मुलगा होता. अगदी त्याच्या वडिलांसारखा. पण राग चढल्यावर मात्र त्याच्या आजोबांपेक्षा ही हट्टी होत होता. मग प्रत्यक्ष देव जरी समोर येऊन उभा राहीला तरी तो कोणाचचं ऐकत नव्हता.

सरलांना आता प्रसादच्या या निर्विकार चेहऱ्याची भिती वाटायला लागली होती. त्यांच्या ही डोळ्यासमोर भडकलेली आग दिसायला लागली होती. आता तर त्याचे सवंगडी देखील त्याच्या सोबत आले होते. साई, विद्या, मायकल आणि भैरवी हे सगळेच तर आले होते. साई तर काल येऊन प्रसादची सही घेऊन गेला होता.

मग त्यांना आणखी एक चेहरा आठवला. जो अजूनही तिथे आलेला नव्हता. म्हणजे हे त्याचीच तर वाट बघत नाहीत ना? हा विचार त्यांच्या मनात घोंगावु लागला.

तेवढ्यातच राजन तिथे जाऊन पोहोचले. त्यांनी हलकेच त्यांच्या बहिणीच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. पण त्यांना तरी कुठे माहीत होत की आत्ता नक्की धीराची गरज कोणाला लागणार होती ते. सरला राजनला बघून हलकेच हसल्या.

राजनलाही चार्जशीट रद्द झाल्याचं समजलं होत. त्यांनी सरलांजवळ पोलिसांबद्दल बरीच चौकशी केली. पण ते अजून हॉस्पीटलमध्ये आले नव्हते. तो ड्युटीवर असणारा एकच हवालदार तिथे उभा होता.

आपल्या मुलाबद्दल एवढी काळजी बघून सरलांना आपल्या भावावर जास्तच प्रेम भरून आलं होत. सोनीया ही अगदी समजदार झाल्यासारखी वागत होती. नाही ती तिच्या भावाबरोबर भांडत होती आणी नाही कोणत्या कामाला नकार देत होती. आज सकाळचा नाश्ता ही तिनेच बनवुन आणलेला होता.

आजोबा ही सकाळीच प्रसादला भेटून गेले होते. ऋतुजा ही थोडावेळ थांबून तिच्या जॉबवर निघून गेली. राजन, सोनीया, सरला तिथेच थांबलेल्या होत्या. तर मायकल वॉर्डच्या बाहेर थांबलेला होता. त्याच आता येणारे आणि जाणारे या सर्वांवर बारीक लक्ष होत. तशी त्याची ६ फुटाच्या आसपासची उंची आणि पिळदार शरीरयष्टी बघून समोरचा ही जरा विचारच करत होता. तर विद्या आज काही तिथे आली नव्हती.

दुपारच जेवण घेऊन येणा-या विमला सोबत रिया आली होती. सोनीया तिच्यासोबतच लगबगीने घरी गेली होती. राजन ही थोडावेळ थांबून हवालदाराकडे थोडीफार चौकशी करून ते देखील चालले गेले.

यानंतर हॉस्पिटलमधलं वातावरण अचानक बदलताना दिसायला लागलं. नेहमीचे वॉर्ड बॉय बदलून तिथे नवीन वॉर्ड बॉय दिसायला लागले. नर्स ही बदलल्या गेल्या. प्रसादाच्या वॉर्डबाहेर जास्तीचे वॉर्डबॉय दिसायला लागले. ड्यूटीवर असणारा हवालदार ही बदलला गेला.

अस तणावपूर्ण झालेल वातावरण बघून सरला आणि विमला एकमेकींकडे टेन्शनमध्ये बघायला लागल्या.

क्रमशः

कसा वाटला भाग ? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all